जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • नगर - पेरणीयोग्य ओल नसल्याने रब्बी हंगामात फक्त 65 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाची शक्यता नसल्याने खतांच्या खरेदीकडे शेतक-यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये खतांच्या गोण्या पडून आहेत. मे महिन्यानंतर फेब्रुवारीपर्यंत शेतक-यांच्या खतासाठी रांगा लागतात. चालू वर्षी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी उशीर झाला. जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर मागणी वाढून खतांचा काळाबाजार झाला. गोणीमागे 150 ते 250 रुपयांपर्यंत आन देऊन शेतक-यांनी खत खरेदी केले. रब्बी...
  November 24, 09:16 AM
 • नगर - मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांचा प्रश्न जटिल बनला आहे. हा प्रश्न कसा सोडवावा, असा प्रश्न सरकारी व्यवस्थेस पडत असतानाच अतिरेकी पकडल्यानंतर त्यास न्यायालयीन प्रक्रियेत न घेता पोलिसांकडून त्याचे एन्काउंटर करणेच योग्य, असा संदेश गेम मधून देण्यात आला. औरंगाबाद येथील एकमेव बजाज ऑटो कला व क्रीडा विभागातर्फे मंगळवारी रात्री 9 वाजता सहकार सभागृहात गेम हे नाटक सादर करण्यात आले. अतिरेक्यांचा प्रश्न सोडवितानाच दिग्दर्शक अशोक गावंडे यांनी पोलिसांच्या...
  November 24, 09:11 AM
 • नगर - श्रीरामपूर व कर्जत उपविभागातील सुमारे 100 गावांतील नदीपात्रातील वाळू ठेक्यांचा लिलाव 13 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. खुल्या, तसेच सीलबंद निविदा पद्धतीने हा लिलाव होणार आहे. निविदा भरताना अर्जाचे 2 हजार रुपये शुल्क रोख भरावे लागेल. प्रत्येक वाळूसाठ्यासाठी स्वतंत्र निविदा 12 डिसेंबरला सायंकाळी 5 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज शाखेत भरायच्या आहेत. लिलावाच्यावेळी प्राप्तिकर भरत असल्याचा पुरावा, पॅनकार्ड क्रमांक व विक्रीकर विभागाचा टीआयएन क्रमांक सादर...
  November 24, 09:03 AM
 • नगर - महापालिकेने कारवाई केल्यानंतरही भिस्तबाग चौकातील भाजीविक्रेत्यांनी आपल्या जागा सोडलेल्या नाहीत. महापालिकेने आम्हाला पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निजामशहाने 16 व्या शतकात हश्त-बेहश्त महालाची निर्मिती केली. या महालावरून या चौकाचे भिस्तबाग चौक असे नामकरण झाले. मात्र, केवळ नावातच बाग आहे. सगळीकडे घाण पसरली आहे. ग्रामीण भागातून येणारे शेतकरी या चौकात आपल्या शेतीमालाची विक्री करतात. त्यामुळे संध्याकाळी चौकात मोठी गर्दी होते. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना...
  November 24, 09:00 AM
 • नगर - प्रवेशबंदी असूनही जड वाहनांचा बिनदिक्कत संचार असल्याने रामचंद्र खुंट परिसराचा श्वास गुदमरला आहे. या भागातील नगरसेवक मात्र एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. कोठला स्थानकावरील वाहतूक कोंडीनेही नागरिक त्रासले आहेत. मनपाच्या झेंडीगेट येथील दवाखान्याची दुरवस्था झाली आहे. समोरच कचराकुंडी असल्याने या दवाखान्याचेच आरोग्य धोक्यात आले आहे. वॉर्ड क्रमांक 32 मध्ये इदगाह मैदान, शितळादेवी, किंग्जगेट रोडची पूर्व बाजू, शनिगल्ली, मनपा शाळा नंबर 4, ब्राह्यण कारंजा, नालबंद खुंट,...
  November 24, 08:56 AM
 • नगर - पत्रकारांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवून वार्तांकन करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी सायंकाळी राळेगणसिद्धीत केले. नको त्या प्रश्नांना महत्त्व का दिले जाते असा सवाल करीत ते पत्रकारांवर अक्षरश: कडाडले.दोन दिवसांपूर्वी हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना दारू पिणार्यांना खांबाला बांधून मारले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत माध्यमांनी विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याबाबत हजारे यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे हजारे कमालीचे संतापले...
  November 24, 06:47 AM
 • नगर - पोलिस शिपाईपदाच्या लेखी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी पोलिस मुख्यालय मैदानात जमा झालेल्या शेकडो उमेदवारांनी रेटारेटी व घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी बळाचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणली. मंगळवारी सायंकाळी साडेसहानंतर तब्बल दोन तास हा गोंधळ सुरू होता. यासंदर्भात बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे सांगून हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे आमदार अनिल राठोड यांनी सांगितले. रविवारी झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल...
  November 23, 11:33 AM
 • नगर - परतीच्या मान्सूनने वक्रदृष्टी टाकल्याने पिके करपली आहेत. जिल्ह्यातील सात तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत 50 टक्केही पेरणी झालेली नाही. त्यामुळे या वर्षी ज्वारीसह गहू व हरभ-याचे भाव भडकण्याची शक्यता आहे. विहिरी व तलावांतील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने पिके जगवायची कशी, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.दक्षिण जिल्ह्यात खरीप पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी रान तयार करूनही ओलावा नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. नगर, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा व पाथर्डी तालुक्यांतील...
  November 23, 11:32 AM
 • नगर - छत्रपती शिवाजीमहाराजांच्या युद्धचातुर्याचा साक्षीदार असलेला, तसेच छत्रपती संभाजीमहाराजांच्या जाज्ज्वल्य स्वाभिमानाचे दर्शन घडवणा-या बहादूर गडात (पेडगाव, ता. श्रीगोंदा) अप्रतिम शिल्प असलेली काही मंदिरे आहेत. हेरिटेज सप्ताहामुळे त्यांना उजाळा मिळाला आहे. भीमा नदीकाठी असलेला बहाद्दूरगड (धर्मवीरगड) हा नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. औरंगजेबाच्या काळात मोगलांची तेथे मोठी छावणी होती. एकेकाळी या गावांत 52 पेठा होत्या. औरंगजेबाचा दूधभाऊ खान बहादूर कोकलताश हा या प्रांताचा...
  November 23, 11:30 AM
 • औरंगाबाद - अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह त्यांचे भाऊ सचिन, अमोल व चालक अजय गायकवाड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून, गुरुवारी 24 रोजी त्यावर निकाल येणार आहे. मुख्य आरोपी भानुदास कोतकर यांच्या नियमित जामीन अर्जावर यापूर्वीच सुनावणी झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ दोन्ही प्रकरणांचा निकाल सोबत देणार आहे.नगरच्या न्यायालयाने 29 नोव्हेंबर 2009 रोजी आरोपींचा अंतरिम अटकपूर्व जामीन कायम केला होता. भानुदास यांचा जामीन...
  November 23, 11:28 AM
 • नगर - शेवटच्या घटका मोजणा-या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने मंगळवारी घेतला. ज्येष्ठ इतिहास संशोधक व कार्यकारी विश्वस्त सुरेश जोशी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे 1 जानेवारी 2012पासून डॉ. रवींद्र साताळकर हे कार्यकारी विश्वस्त म्हणून काम पाहतील. नवीन विश्वस्तांची नेमणूक व संग्रहालयाच्या नूतनीकरणाबाबत जिल्हा नियोजन भवनात विश्वस्तांची बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील, डॉ. साताळकर, डॉ....
  November 23, 11:27 AM
 • नगर - जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी 173 जागांसाठी एकूण 1 हजार 555 उमेदवारांनी 1 हजार 906 अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी मंगळवारी 1 हजार 256 अर्ज दाखल झाले. कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, पाथर्डी, देवळाली प्रवरा या नगरपालिकांसह शिर्डी नगरपंचायतीची निवडणूक 8 डिसेंबरला होणार आहे. 16 ते 22 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची मुदत होती. आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी बुधवारी (23 नोव्हेंबर) प्रसिद्ध करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 29 पर्यंत असून 30 नोव्हेंबरला निवडणूक...
  November 23, 11:25 AM
 • नगर - केडगाव येथील विजय शिंदे खूनप्रकरणातील आरोपी प्रवीण शिवाजी जगताप याची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.हॉटेल वंदनजवळील पाटील गॅरेजच्या आवारात मृतावस्थेत आढळून आलेल्या विजय मधुकर शिंदे (22, शबरी अपार्टमेंट, भिस्तबागनाका) याचा खून झाल्याची फिर्याद आशीष रवींद्र वाघमारे (पाइपलाइन रस्ता, एकविरा चौक, सावेडी) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणातील आरोपी प्रवीण शिवाजी जगताप (इंद्रप्रस्थ कॉलनी) याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायाधीश अनिल फटाले...
  November 23, 11:24 AM
 • राहाता - गोदावरी कालव्याच्या आवर्तनातून शेतीसाठी पाणी देण्याची सूचना आपण केली असून पाण्याबाबत कुणावरही अन्याय होणार नाही, अशी आपली भूमिका आहे, असे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केले.गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी माजी आमदार शंकरराव कोल्हे, माजी खासदार शंकरराव काळे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष नारायण कार्ले, राहात्याचे नगराध्यक्ष कैलास सदाफळ, जिल्हा परिषद सदस्य धनंजय धनवटे, पाटबंधारे...
  November 23, 11:23 AM
 • अकोले - तालुक्यातील देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्पातून यंदाच्या वर्षातले पहिले आवर्तन मंगळवारी सोडण्यात आले. त्यामुळे नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तीन तालुक्यांच्या 15 गावांतील 3914 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना दिलासा मिळणार आहे.पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावल्याने यंदा आढळा धरणात केवळ 585 दशलक्ष्य घनफुट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात 85 घनफुट मृत पाणीसाठा आहे, तर 200 दशलक्ष्य घनफुट पाणीसाठा राखीव आहे. उर्वरित 300 दशलक्ष्य घनफुट उपलब्ध पाणीसाठ्यावर 15 गावांना...
  November 23, 11:22 AM
 • नगर - शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शनी चौकात महावितरणने रोहित्र बसवले असून हे रोहित्रच आता आयलँड बनले आहे. अनेकदा तेथे शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडतात. असे असूनही या रोहित्राखालीच काही विक्रेत्यांनी टप-या थाटल्या आहेत. या रोहित्राचा वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे.शनीची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये यासाठी अनेकजण जप-जाप, उपास करतात. मात्र, या शनी चौकावरच अतिक्रमणांची वक्रदृष्टी पडली असून, त्यामुळे चौक विद्रूप होऊ लागला आहे. रोहित्रामुळे चौकात विजेच्या तारांचे मोठे जाळे तयार झाले आहे....
  November 23, 11:20 AM
 • नगर - गणेशोत्सवात तसेच संस्था, संघटनांच्या कार्यक्रमांबरोबरच अनामप्रेमचा अंधजनांचा ऑर्केस्ट्रा आता लग्नसमारंभांची शोभा वाढवणार आहे.स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्थेतील 15 युवक-युवतींनी सन 2005 मध्ये आपल्या कलागुणांचा वापर करून आर्केस्ट्राची निर्मिती केली. स्नेहालयाच्या विविध कार्यक्रमांत हे कलाकार गाणी सादर करीत. त्यांची सुरेल गाणी व उत्तम संगीत ऐकून बाहेरच्या कार्यक्रमांसाठी त्यांना बोलावणी येऊ लागली. रावसाहेब पटवर्धन स्मारक, तसेच यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात अनामप्रेमने...
  November 23, 11:19 AM
 • नगर - वॉर्ड क्रमांक 33 मध्ये मंगलगेट येथे भरणा-या आठवडे बाजारात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने या भागातील नागरिक वैतागले आहेत. अपु-या जागेमुळे विक्रेत्यांना चक्क उघड्या गटारांवरच दुकान थाटावे लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर पाण्याचे डबके साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. ख्वाजा शरीफ हवेली, वंजार गल्ली, जुना दाणेडबरा, मंगलगेट, मटन मार्केट, रामचंद्र खुंट, दाळमंडई, आडतेबाजार, राज चेंबर, तापकीर गल्ली, मंगलगेट पोलिस चौकी, तापीदास गल्ली या भागाचा या वॉर्डात समावेश आहे....
  November 23, 11:18 AM
 • शिर्डी- गोव्याचे मुख्यमंत्री दिंगबर कामत यांनी शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरास सहकुटुंब भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळेस संस्थानचे ट्रस्टी सुरेश वाबळे आणि अशोक खांबेकर उपस्थित होते. संस्थांनातर्फे दिंगबर कामत आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.
  November 22, 04:43 PM
 • शेवगाव/कर्जत - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने गटातटाला थारा देऊ नका. नवीन चेह-यांना संधी देऊन जिल्हा राष्ट्रवादीमय करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवगाव व कर्जत येथील शेतकरी मेळाव्यात केले.शेवगाव तालुका प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन पवार यांच्या झाले. यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, पैठणचे आमदार संजय वाकचौरे, आमदार...
  November 22, 10:11 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात