Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • नगर: महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातून बाळाला पळवून नेणा-या तीन महिलांना सोमवारी न्यायाधीश एस. डी. इंदलकर यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.बाळ चोरी प्रकरणी महिंद्रा प्रदीप शिंदे, शमीन शरीफ शेख व सारिका सिराज शेख (रा. मुकुंदनगर) या तीन महिलांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांची दिशाभूल केली. यामागे तिचा नेमका काय उद्देश होता, या बाबींचा तपास करण्यासाठी आरोपींच्या सात...
  October 25, 11:02 AM
 • नगर: दिवाळीमुळे विविध प्रकारच्या मिठाईला मागणी वाढली आहे. फराळाचे रेडिमेड पदार्थ खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. दरम्यान, खव्यात मध्यंतरी आढळलेल्या भेसळीमुळे हे पदार्थ विकत घेताना विशेष सतर्कता बाळगली जात आहे.दिवाळी म्हणजे खमंग फराळ! चिवडा, लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळे, अनारसे आदी पदार्थ पूर्वी घरोघर तयार केले जात. आता मात्र बाजारातून फराळाचे रेडिमेड पदार्थ व मिठाई आणून सण साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. अन्य वस्तंूप्रमाणेच मिठाईचे दरही यंदा वाढले आहेत. मिठाईचे सर्व...
  October 25, 10:54 AM
 • पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धीतील चिमुकल्यांसमवेत दिवाळी साजरी करणार आहेत. गावातील 21 गरजू महिलांना साडी-चोळी व पुरुषांना या काळात वाटण्यात येतील. हा खर्च अण्णा लष्कराकडून मिळणा-या निवृत्तिवेतनातून करतील. सध्या मौन सुरू असल्याने शब्दाविनाच अण्णांची दिवाळी साजरी होईल.दर वर्षी दिवाळीत अण्णा आपल्या निवृत्तिवेतनातील काही रक्कम गावातील छोट्या मुलांसाठी फटाक्यांवर खर्च करतात. यात लवंगी फटाके, फुलबाजी, भुईचक्र, भुईनळे असे आतषबाजीचे साहित्य प्रामुख्याने असते....
  October 25, 01:41 AM
 • नगर - भारत संचार निगम (बीएसएनएल) व खासगी मोबाइल कंपन्यांमधील इंटर कनेक्टिव्हिटी शुल्कावरून निर्माण झालेला वाद विकोपास गेला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 3 कोटी 82 लाख खासगी व बीएसएनएल ग्राहकांची सेवा विस्कळीत झाली आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी सेल्युलर ऑपरेटर असोसिएशनने बीएसएनएलला सेवा पूर्ववत करण्याबाबत पत्र पाठवले होते. या पत्राला कोणतेही उत्तर न आल्यामुळे जोपर्यंत बीएसएनएल खासगी सेवेची कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू करणार नाही तोपर्यंत बीएसएनएलची इंटरकनेक्टिव्हिटी...
  October 24, 10:15 AM
 • नगर - भ्रष्टाचार संपावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. मात्र, भ्रष्टाचाराच्या आडून अण्णा टीममधील सदस्यांकडून देशाची राज्यघटना हटाव मोहीम चालली आहे. संसदेपेक्षा अण्णा श्रेष्ठ असल्याच्या घोषणा देण्यात येतात. मात्र, कायदा व संसद यापेक्षा कोणीही मोठा नसल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली. शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत कवाडे बोलत होते. कवाडे म्हणाले, जनलोकपाल विधेयकात एनजीओचाही समावेश करणे आवश्यकता आहे. मात्र, अण्णांसह प्रत्येक सदस्याची...
  October 24, 10:11 AM
 • नगर - महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातून गुरुवारी नवजात बालक चोरण्याचा प्रयत्न केलेल्या तिघींनीही पोलिस कोठडीमध्ये चुकीची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचे तपासी अधिकारी हवालदार पंढरीनाथ नवले यांनी भिंगारमधील एकाची चौकशी केली. मात्र, महिंद्रा प्रदीप शिंदे ऊर्फ सालेदा लतीफ मन्यार हिने वैयक्तिक आकसापोटी भिंगारमधील एकाला गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले आहे. अटक केलेल्या सादिका सिराज शेख, महिंद्रा प्रदीप शिंदे व शमीम रफिक शेख यांची पोलिस...
  October 24, 10:05 AM
 • पारनेर - आर्थिक भ्रष्टाचार, राजकारणातील पारदर्शकता व शुद्धीकरणाची ऊर्जा राज्याला व देशाला राळेगणसिद्धीमधूनच मिळणार आहे. त्यासाठी सहकार चळवळीच्या शुद्धीकरणासाठी राज्याचे सहकार खाते अण्णांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. राळेगणसिद्धी येथे सुरू असलेल्या पतसंस्था आर्थिक सबलीकरण मोहीम व विचारमंथन शिबिरात पाटील बोलत होते. रविवारी (दि. 23) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी सहकार आयुक्त राजगोपाल देवरा,...
  October 24, 10:02 AM
 • नगर - प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभासदांना दिवाळीपूर्वी चालू वर्षीचा लाभांश मिळावा व कर्जावरील व्याजदर 9.5 टक्के करावा आदी मागण्यांसाठी ऐक्य मंडळाने सत्ताधारी सदिच्छा मंडळाविरुद्ध घोषणा देत बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. रविवारी सकाळी अकरा वाजता गांधी मैदानाजवळ बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर वाजत असलेल्या ढोल-ताशांमुळे परिसर दणाणून निघाला होता. या वेळी रामराव ढाकणे, सर्जेराव राऊत, जनार्दन काळे, अरुण ढोकणे, झुंबर बोरुडे, विश्वनाथ कदम आदी उपस्थित होते....
  October 24, 09:59 AM
 • नगर - अचानक वीज जाऊन अंधारात दिवाळी साजरी करण्याची वेळ यंदा नगरकरांवर फारशी येणार नाही. औद्योगिक क्षेत्रात या कालावधीत सुट्या असल्याने घरगुती ग्राहकांची वाढलेली विजेची गरज पूर्ण करता येईल असे नियोजन महावितरणने केले आहे. दिवाळी हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण असतो. आकाशदिवे, विद्युतदिव्यांची रोषणाई यामुळे या कालावधीत विजेची मागणी 20 टक्क्यांनी वाढते. सध्या सुरू असलेल्या भारनियमनात त्यामुळे भर पडण्याची शक्यता होती. मात्र, दिवाळीनिमित्त एमआयडीसीतील कारखान्यांना तीन-चार दिवस सुट्या आहेत....
  October 24, 09:54 AM
 • राहाता - ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांची थकीत पेमेंटसाठी गणेश परिसरात शेतकरी व कामगार संघर्षाच्या पावित्र्यात असून, दिवाळीपूर्वी हे थकीत पेमेंट न मिळाल्यास शेतकरी संचालकाविरुद्ध साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे. गणेश सहकारी साखर कारखाना गेल्या दहा वर्षांपासून कोल्हे गटाच्या ताब्यात आहे. मात्र, सध्या कारखाना कर्जाच्या खाईत सापडला असून, मागील गळिताचे पेमेंट अद्यापि शेतक-यांना मिळालेले नाही. कामगारांचे अनेक महिन्यांपासून पगार नाहीत. दिवाळीला...
  October 24, 09:48 AM
 • कर्जत - तालुक्यातील निमगाव गांगर्डा परिसरातील गावासाठीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची सतरा गाव पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. या योजनेखालील गावाचा समावेश टँकरमुक्त ग्राम यादीत झाल्याने दिवाळीच्या तोंडावर गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जीवन प्राधिकरणतर्फे सीना धरणावरून शाश्वत पेयजल होण्यासाठी पाणीपुरवठा योजना राबविली. विविध योजनांचा लाभ घेता येत नसल्याने या गावातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.हक्काचे पिण्याचे पाणी...
  October 24, 09:44 AM
 • जामखेड - जिल्ह्यातील कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळत या दोन मंत्र्यांचे मतदारसंघ सोडून संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करून पक्षाची ताकद वाढवा, असे आवाहन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी केले. जामखेड येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाच्या शुभारंभात पाचपुते बोलत होते. पाचपुते म्हणाले की, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात विकासाचा अनुशेष भरून काढून, एमआयडीसीचा प्रश्न, सिंचनाची सुविधा व्हावी, यासाठी...
  October 24, 09:39 AM
 • नगर - आम आदमी विमा योजनेंतर्गत 23 हजार लाभार्थींची प्रमाणपत्रे एलआयसीकडून मिळाली आहेत. या प्रमाणपत्रांची तालुकानिहाय वर्गवारी अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या कक्षात सध्या सुरू आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबांसाठी आम आदमी विमा योजना राबविण्याचा निर्णय 16 ऑक्टोबर 2007 रोजी घेण्यात आला. 18 ते 59 वयोगटांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबातील कमवता कुटुंबप्रमुख या योजनेचा लाभार्थी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून अशा व्यक्तीचा विमा उतरवण्यात येतो. त्याच्या 9 वी ते 12 वी इयत्तेत...
  October 24, 09:30 AM
 • नगर - बालकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या क्राय (चाइल्ड राईटस् अँड यू) संस्थेच्या सन 2012 च्या कॅलेंडरवर नगर येथील प्रसिद्ध चित्रकार अनुराधा ठाकूर यांची चित्रे झळकली आहेत. भारतातील 20 राज्यांतील 13 हजार खेड्यांतील, तसेच झोपडपट्ट्यांतील 20 लाख बालकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी क्राय काम करते. त्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना लागणारा निधी कॅलेंडर, शुभेच्छापत्र आदींच्या विक्रीतून जमवला जातो. अनुराधा ठाकूर यांच्या साँग्ज ऑफ नेचर या मालिकेतील चित्रे क्रायने कॅलेंडरसाठी...
  October 24, 09:24 AM
 • नगर - तब्बल पाच वर्षे वादाच्या भोव-यात सापडलेला जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष आता जिल्हा परिषद व जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीच्या उंबरठ्यावर आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दोन्ही मंत्री जिल्ह्याचा संयुक्त दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे पक्षाने जिल्ह्यासाठी नेमलेले संपर्कमंत्री पतंगराव कदम हेही पक्षाच्या कार्यक्रमात तब्बल अडीच वर्षांनी सहभागी होतील. थोरात व विखे यांच्यातील...
  October 24, 09:19 AM
 • नगर - पन्नास हजार लोकसंख्येमागे एक अग्निशमन गाडी महापालिकेकडे असायला हवी, असे शासननिर्णय सांगतो. नगर शहराची लोकसंख्या चार लाखांपेक्षा जास्त असूनही मनपाकडे सध्या केवळ चारच अग्निशमन गाड्या आहेत. त्यापैकी एका गाडीचे आयुष्य संपले आहे. दिवाळीतील आगीच्या संभाव्य घटना लक्षात घेता धोक्याची घंटा आताच वाजू लागली आहे. शहरातील इमारतींना आगी लागण्याच्या घटना अधूनमधून घडतात. घोडेगावकर बिल्डिंग, मोहन ट्रंक डेपो, जकात गोदाम येथे लागलेल्या आगीच्या घटना ताज्या आहेत. एवढे सारे घडूनही मनपाने आपल्या...
  October 24, 09:15 AM
 • नगर - दिवाळी म्हटली की सुटी, खमंग फराळाची मेजवानी, रोषणाई, आतषबाजी... पण हे झाले सर्वसामान्यांसाठी. प्रशासकीय अधिका-यांना, लोकप्रतिनिधींना ब-याचदा कामाच्या व्यापातच दिवाळी साजरी करावी लागते. दिवाळीचा आनंद लुटा; पण समाजातील उपेक्षितांचा विसर पडू देऊ नका. त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्या, असे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचे सांगणे आहे. यंदाची दिवाळी ही मंडळी कशी साजरी करणार आहेत, त्याबाबतचा हा विशेष वृत्तांत. नगरमधील पहिलीच दिवाळीनगरमधील ही माझी पहिलीच दिवाळी आहे. कुुटुंबीय,...
  October 24, 09:08 AM
 • नगर - येळी (ता.पाथर्डी) येथील वीज उपकेंद्राच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपून पाथर्डीकडे निघालेल्या पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या वाहनाच्या ताफ्यात अगदी समोर असलेल्या पोलिसांच्या गाडीला हरिण धडकले. पाथर्डीच्या पशू वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना ते मृत्युमुखी पडले.मिडसांगवीजवळून बबनराव पाचपुते यांच्या वाहनांचा ताफा जात असताना एक हरिण रस्ता ओलांडण्यासाठी झेपावले आणि पोलिसाच्या गाडीसमोर आले. धडक लागल्यानंतर ते बाजूच्या शेतात निघून गेले. पोलिसांच्या गाडीपासून काही...
  October 24, 01:12 AM
 • नगर - राज्य सरकार साखर उद्योगात धाडसी पावले उचलण्यास तयार असले तरी याच्याशी निगडीत धोरण केंद्र ठरविते आणि उत्तरे राज्य सरकारला द्यावे लागते. यासाठी साखर धोरण निश्चित करणे गरजेचे असून राज्यातील सर्व जबाबदार नेते पंतप्रधांनाना भेटणार आहेत. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी ही माहिती दिली. श्रीगोंदा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावर्षी 70 लाख टन साखर अतिरिक्त ठरणार आहे. ऊस उत्पादकांकडून जादा दराची मागणी होत आहे. गेल्या वर्षी दराबाबत निर्णय...
  October 24, 12:21 AM
 • श्रीगोंदा- कुकडी नदीवरील पाच धरणांमध्ये यंदा 27 टीएमीसी इतका (22 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे; पण लाभक्षेत्रात मात्र पावसाचे प्रमाण तुलनेत कमी असल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी र्शीगोंद्याच्या बागायत पट्टय़ावर लवकरच संक्रांत येण्याची भीती व्यक्त होत आहे.दरवर्षी कुकडीच्या पाण्यासाठी र्शीगोंदा व कर्जतकरांना उन्हाळ्यात संघर्ष करावा लागतो. यंदा तर कुकडीच्या पाचही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा असतानाही संघर्षाची वेळ येण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने...
  October 23, 08:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED