जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • शिर्डी - देशातील शेतकरी सबळ झाला तरच देश सामर्थ्यशाली बनेल. त्यासाठी शेतक-यांना वाजवी व्याज दराने अल्प मुदतीची कर्जे, शाश्वत वीज पुरवठा, ग्रामीण भागात सेवांच्या विस्ताराबरोबरच शेती संबंधीत ज्ञान व कौशल्य शेतक-यांना उपलब्ध करून देण्याचे आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारने राष्ट्रीय आयोगाने सूचवलेल्या शेतीशाळासारखे उपक्रम राबवावे, अशी सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केली. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात मंगळवारी राज्य सरकारच्या कृषी व फलोत्पादन...
  November 16, 07:59 AM
 • नगर - मुंबईच्या विपुल ऑक्ट्रॉय सेंटरच्या जकात ठेक्याला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. सभापती अनिता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या सभेत सर्वानुमते ही मंजुरी देण्यात आली. जकात फेरनिविदा प्रक्रियेत सर्वाधिक 88 कोटी 5 हजार रूपयांची बोली लावणा-या विपुलला मंजुरी देण्यासाठी दुपारी 3 वाजता झालेल्या या सभेला उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे व स्मिता झगडे उपस्थित होत्या. विपुलला आठ दिवसांत 9 कोटींची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे. सध्याचा जकात ठेकेदार सहकार ग्लोबलची मुदत या...
  November 16, 07:55 AM
 • शिर्डी - कापूस, कांदा, साखर आदींवरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी, यासाठी पंतप्रधानांसमवेत चर्चेसाठी वेळ मागितली आहे. दोन दिवसांत केव्हाही बैठक होईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रवरानगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री म्हणाले, कापसावर सध्या कोणतीही निर्यातबंदी नाही. परंतु कापूस उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारभूत किंमत वाढवून मिळणे गरजेचे आहे. नवीन खरेदी केंदे्र सुरू करण्याचीही आवश्यकता आहे. याबाबत आपण पंतप्रधान, कृषिमंत्री, अन्न पुरवठा मंत्री...
  November 16, 07:51 AM
 • श्रीगोंदा - सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर तीस वर्षांपूर्वी वर्गणी करून निवडणूक लढवणारे बबनराव पाचपुते आज हजारो कोटींच्या संपत्तीचे धनी आहेत. संपत्ती मिळवण्यासाठी त्यांच्याकडे कुठली जादू आहे याची चौकशी व्हावी, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य व विकास आघाडीचे अध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी केली. तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत लोणी व्यंकनाथ येथे नगर-दौंड रस्त्यावर प्रा. दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विकास आघाडीने रास्तारोको आंदोलन केले. यावेळी ते म्हणाले,...
  November 16, 07:47 AM
 • नगर - महापालिकेतील विरोधी पक्ष नेतापदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते विनित पाऊलबुद्धे यांची नियुक्ती महापौर शीला शिंदे यांनी केली.यापूर्वी महापौरांनी विरोधी पक्षनेता म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक दशरथ शिंदे यांची निवड केली होती. पाऊलबुद्धे यांनी त्यांच्या निवडीस विरोध करून दशरथ शिंदे व महापौरांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. दरम्यान, तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षनेतापदी पाऊलबुद्धे यांचीच निवड योग्य असल्याचा साक्षात्कार महापौरांना झाल्याने त्यांनी...
  November 16, 07:43 AM
 • नगर - लाक्षणिक संपामुळे मंगळवारी सरकारी कार्यालयांत शुकशुकाट होता. जिल्ह्यातील महसूल विभागातील 1168 पैकी 909 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. संप हाणून पाडण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन कोलमडले. शासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. सकाळपासून संपाचा परिणाम सरकारी कार्यालयांत दिसून येत होता. काही कार्यालये उशिरा उघडली, तर काही बंदच होती. जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेयर, उत्पन्नाचे दाखले आदी कामांसाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करतात. शुकशुकाट पाहून कार्यालयाला...
  November 16, 07:37 AM
 • शेवगाव - चार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निर्मलग्राम अभियानाद्वारे जिल्ह्यातील गावा-गावांत स्वच्छतेचा संदेश पोहोचवीत अनेक गावांचा चेहरामोहरा पालटला. गावे बघता-बघता स्वच्छ झाली, सुंदर झाली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून निर्मलग्राम योजनाच जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. तालुक्यातील ज्या 22 गावांना हागणदारीमुक्त अभियानाचा पुरस्कार मिळाला त्यातील बहुतेक गावे पुन्हा हागणदारीयुक्त झाल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात या अभियानाचा पुरता...
  November 16, 07:32 AM
 • कर्जत - बीड-पुणे व नगर जिल्ह्याला जोडणा-या कर्जत-जामखेड रस्त्याच्या दुरवस्थेबाबत दिव्य मराठीने वृत प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणा-या कर्जत-जामखेड या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन वर्षभरात अनेकांचे बळी गेले होते, तर अनेकजण जखमी झाले होते. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत 6 नोव्हेंबर (बुधवार) च्या अंकात दिव्य मराठी ने कर्जत-जामखेड रस्त्यावर खड्डेच खडे हे वृत प्रसिद्ध केले...
  November 16, 07:28 AM
 • नगर - महामार्गावर ठिकठिकाणी दुकाने थाटलेल्या दुकानांतून गॉगल विकत घेण्याचा विचार करीत असाल तर सावधान! या नॉनब्रँडेड गॉगल्समुळे प्रवासादरम्यान उन्ह आणि धुळीपासून तात्पुरती सुटका होईल, पण त्याचे दूरगामी परिणाम गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याच्या वापराने डोकेदुखी, डोळ्यात जळजळ आणि अंधुक दिसणे यांसारख्या व्याधींचा मोठा धोका आहे. स्वस्ताच्या नादात आपल्या डोळ्यांशी खेळ करण्यासारखा हा प्रकार आहे. रस्ते का माल सस्ते में ही म्हण गॉगलच्या बाबतीत लागू होते. गेल्या 6-7 वर्षांत गॉगलविक्रेत्यांनी...
  November 16, 07:25 AM
 • नगर - जीपीओ चौकात वाहतूक नियोजन करण्यासाठी नेमलेले पोलिस चहाच्या टपरीवर सिगारेटचे झुरके घेत गप्पा मारत बसलेले आहेत, असे दृश्य दिसले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण हे रोजचेच झाले आहे. महापालिका व खासगी कंपनीच्या वादात सिग्नलचे भिजत घोंगडे पडले आहे. जनरल पोस्ट ऑफिसजवळ हा चौक असल्याने जीपीओ चौक म्हणून तो ओळखला जातो. औरंगाबाद, विशाखापट्टणम व सोलापूरकडे जाणारी अवजड वाहने या चौकातून जातात. नगर व भिंगार रहदारीही येथूनच चालू असते. अतिशय महत्त्वाचा चौक असूनही तेथील वाहतूक नियोजन शून्य...
  November 16, 07:20 AM
 • नगर - वॉर्ड क्रमांक 2 मधील रस्ते उखडले असल्याने तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. काही रस्त्यांवर गेल्या काही वर्षांत डांबरीकरण झालेले नाही. या परिसरातील ऐतिहासिक भिस्तबाग महालाला अवकळा प्राप्त झाली आहे. लालगुलाब कॉलनी, पाइपलाइन रस्त्याची श्रमिकनगरसमोरील बाजू, नम्रता कॉलनी, वाणीनगर, सेलटॅक्स कॉलनी, कसबे मळा, भिस्तबाग महाल, मोकाशी वस्ती, तपोवन रस्ता, जोंधळे फार्म या भागाचा या वॉर्डात समावेश आहे. मनपा प्रशासन व पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक भिस्तबाग महालाचा उकिरडा झाला...
  November 16, 07:16 AM
 • शिर्डी - शेतीमाल निर्यातबंदी न करता शेतीमालाच्या आधारभूत किमती उत्पादन खर्चावर आधारित असाव्यात, यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत असून, महाराष्ट्राला झुकते माप मिळविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी प्रवरानगर सांगितले. राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्या हस्ते राज्यातील 80 शेतक-यांना कृषिरत्न, कृषिभूषण व इतर पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. यावेळी कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे,...
  November 16, 07:13 AM
 • नगर । काँग्रेस पक्ष कुणाचीही खासगी मालमत्ता नाही. ती सर्वसामान्यांची चळवळ आहे. जिल्ह्यातील काँग्रेस व्यक्तिकेंद्रित झाल्याने पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याची भावना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीची बैठक मंगळवारी झाली. भास्करराव डिक्कर, श्रीकांत बेडेकर, डी. एम. कांबळे, सुभाष गुंदेचा, बाळासाहेब भंडारी, प्रताप परदेशी, आर. आर. पिल्ले आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी बेडेकर यांच्या हस्ते राज्य...
  November 16, 07:10 AM
 • नगर - मराठा समाजाच्या आरक्षणास कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोध नाही. मात्र, तरीही आरक्षण का मिळत नाही, असा सवाल करतानाच राजकारणात आरक्षण मिळाले नाही तरी चालेल. मात्र, शिक्षण व नोकरी यामध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीपूर्वी यावर तोडगा न निघाल्यास मराठा महासंघ वेगळा निर्णय घेईल, असा इशारा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मंगळवारी दिला. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख संभाजीराव...
  November 16, 07:07 AM
 • नगर - राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या लाक्षणिक संपाला मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला. सरकारने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास 15 डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी दिली. संपावरील कर्मचा-यांची सभा सकाळी गांधी मैदानात झाली. त्यावेळी खोंडे बोलत होते. श्रीकांत शिर्शिकर, विलास पेद्राम, एस. जी. भिंगारदिवे, आर. एस. निमसे, ए. आर. जोशी, पुरुषोत्तम आडेप, सुभाष तळेकर, जी. एस. जगताप, पी. डी. कोळपकर,...
  November 16, 07:04 AM
 • नगर- राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या लाक्षणिक संपावर उतारा म्हणून राज्य सरकारने प्रथमच 10 नोव्हेंबरला शासननिर्णय काढला. त्यातील कारवाईच्या तंबीमुळे कर्मचारी संघटनांत दुफळी माजली. राजपत्रित अधिकारी महासंघाने सोमवारी सायंकाळी ऐनवेळी माघार घेण्याची घोषणा केली. एकूण मागण्यांत शिक्षकांना झुकते माप दिलेले असतानाही शिक्षक संघटना व जिल्हा परिषद, महापालिका व निमसरकारी कर्मचारी संघटनांनी संपात सहभागी न होता फक्त काळ्या फिती लावून निषेध नोंदवला....
  November 16, 07:01 AM
 • अहमदनगर - शहरात लिंक रोडवरील निवासस्थानी घरातील नोकराने तिघांचा निर्घृण खून केल्याची घटना (सोमवार) रात्रीच्या सुमारास अहमदनगर शहरात घडली. लिंक रोडवर अरूण बबन पवार या शेतकर्याचे घर आहे सिद्धार्थ आणि नारायण हे दोन नोकर त्याच्याकडे शेतीकाम करत होते. मध्यरात्री अरूण पवार (वय ४५) आणि त्यांची बायको संगीता (वय ४०) हे घराच्या आवारात झोपलेले असताना नारायण या नोकराने त्यांच्या डोक्यात लाकडाने प्रहार केले, लाकडाच्या जबरी घावात हे दोघेही जागीच मरण पावले. त्यानंतर नारायणने घराच्या मागच्या बाजूला...
  November 15, 05:53 PM
 • राळेगणसिद्धी - देशाचे जबाबदार नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच आचार, विचार व चारित्र्याला जपावे. बालकांमधून उद्याचे राष्ट्रपुरुष निर्माण होणार आहेत, असा संदेश ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बालदिनाच्या निमित्ताने दिला. बालदिनी नगर येथील इंडस् वर्ल्ड स्कूलच्या दोनशे विद्यार्थ्यांनी राळेगणसिद्धीला जाऊन अण्णांशी संवाद साधला. शाळेचे संचालक विनायक देशमुख, प्राचार्य राधिका वर्टी व शिक्षक यावेळी उपस्थित होते.आपल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी कसे सहभागी व्हावे,...
  November 15, 08:50 AM
 • नगर - बुरूडगाव रस्त्यावरील सिद्धिविनायक हॉस्पिटलवर रविवारी झालेल्या हल्लाप्रकरणी एका पेशंटच्या नातेवाइकासह पोलिसांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना शिवीगाळ करून त्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी डॉक्टराविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भोसले आखाडा येथील दीपक भोसले यास अटक केली आहे. सिद्धिविनायक चिल्ड्रन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रताप पटारे यांनी यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हॉस्पिटलमध्ये वैशाली ऊर्फ...
  November 15, 08:36 AM
 • श्रीगोंदा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची ऊसदरातील तडजोड नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांवर अन्याय करण्यासाठी केलेली फिक्सिंग आहे, अशी टीका शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सोमवारी केली. काँग्रेसशी हातमिळवणी करून राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचे हे षड्यंत्र असल्याचे ते म्हणाले. घनवट यांनी पत्रकात म्हटले आहे की, शरद जोशी यांनी टनाला 2100 रुपयांची मागणी करताना उत्पादन खर्चाचा तपशील मांडला होता. आम्ही रान पेटवले, पण शेट्टींनी...
  November 15, 08:32 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात