जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • नगर - एकेकाळी नगर शहर तालमींसाठी प्रसिद्ध होते. शड्डू ठोकत लाल मातीत घुमणारे मल्ल हे शहराचे वैशिष्ट्य होते. गेल्या काही वर्षांत मात्र तालमींची संख्या कमी होऊन जिमचे प्रमाण वाढले आहे. धकाधकीच्या आयुष्यात फिटनेस राखता यावा म्हणून अनेकजण जिमकडे वळत आहेत. सिक्स पॅक अॅब्स बनवण्यासाठी तरुणांचा जिमकडे वाढता कल आहे. कुस्ती हा महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ. एकेकाळी कुस्ती खेळणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. 13 वर्षांपुढील मुलाला तालमीत पाठवले जात असे. तिथे अंगमेहनत करून घेतली जात असे. नैसर्गिक...
  November 12, 10:26 AM
 • राळेगणसिद्धी - मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला फासावर चढवले पाहिजे. देशद्रोह्यासारखे गुन्हे करणा-यांना अशीच कडक शिक्षा करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 26/11 च्या हल्ल्यात अनेक भारतीयांना जीव गमवावा लागला. राष्ट्रय संपत्तीचेही मोठे नुकसान झाले. देशाची प्रतिमा मलिन झाली. देशद्रोहाचा गुन्हा करणा-या आरोपीस फाशीची शिक्षा होणेच गरजेचे आहे. कसाब हा एकमेव जिवंत आरोपी आहे. इतका मोठा गुन्हा करणा-या कसाबवर कोट्यवधीचा खर्च होत आहे....
  November 12, 05:02 AM
 • नगर: शेंडी-पोखर्डी, कापूरवाडी व बु-हाणनगर परिसरात झालेल्या बेकायदा उत्खननप्रकरणी प्रांताधिकारी एस. रंगनायक यांनी भूमापन अधिका-यांना त्या क्षेत्राच्या मोजणीचे तोंडी आदेश दिले होते. मात्र, लेखी पत्र नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयाने त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.शेंडी, पोखर्डी, कापूरवाडी व बु-हाणनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून उत्खनन झाल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी महसूल विभागाने बेकायदा स्टोन क्रशर व खाणींवर कारवाई केली होती. तथापि,...
  November 11, 07:16 AM
 • नगर: सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय समितीने 15 नोव्हेंबरला पुकारलेला राज्यव्यापी संप चिरडून टाकण्याची तयारी सामान्य प्रशासन विभागाने केली आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केलेल्या आवाहनानुसार राज्यातील कर्मचारी या संपात सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने मोर्चेबांधणी केली आहे. संपावर जाणा-या कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना सर्व कार्यालय प्रमुखांना देण्यात आले आहेत. त्याविषयीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.काम नाही...
  November 11, 07:12 AM
 • नगर: पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेसाठी गुरुवारी सुमारे दोन हजार उमेदवार उपस्थित होते. दुस-या दिवशीही भरती शांततेत पार पडली.सकाळी सात वाजता पोलिस मुख्यालय मैदान आणि अरणगाव रस्त्यावर एकाच वेळी भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला. मुख्यालयात कागदपत्र तपासणी, छाती-उंचीची मोजमापे, पुलअप्स, गोळाफेक, लांब उडी, शंभर मीटर धावणे या चाचण्या घेण्यात आल्या. प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे नजर ठेवत आहेत.बुधवारच्या यादीत नंबर असूनही भरतीस न आलेल्या सुमारे दीडशे...
  November 11, 07:03 AM
 • नगर: संपदा पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी साहेबराव भालेकर याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला. तसेच संचालक लघु घंगाळे व लक्ष्मण चेमटे यांच्या अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती आर. वाय. गाणू यांनी फेटाळला.संपदा पतसंस्थेमध्ये सोनेतारण विभागात काम करणा-या भालेकरने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. यावर न्यायाधीश रमेश जोशी यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. सरकारी वकील विवेक म्हसे यांनी सरकार पक्षाची बाजू...
  November 11, 07:00 AM
 • श्रीगोंदा: शहरासाठी 35 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली मात्र पंधरा वर्षांपूर्वीच कालबाह्य झालेली पाणीपुरवठा योजना आजही तशीच कार्यान्वित आहे. मात्र, या दरम्यान शहराची लोकसंख्या तीन पटीने वाढली असून, दरडोई 100 लिटरऐवजी 50 लिटर पाणीच नागरिकांना पिण्यासाठी मिळत आहे. सहा महिन्यांपूर्वी शासन दरबारी घोड धरणातून 29 कोटींची जलवाहिनी टाकून शहरात पाणी आणण्याचा प्रस्तावही रखडला आहे.शहर ग्रामपंचायत असताना ही पाणीयोजना राबविण्यात आली होती. आता नगरपालिका अस्तित्वात येऊन वीस वर्षांचा काळ लोटला आहे....
  November 11, 06:54 AM
 • नगर : माळीवाडा बसस्थानकाजवळील इम्पिरिअल चौक हा शहरातील सर्वाधिक गजबजलेला चौक, पण रिक्षा व एएमटीच्या गराड्यामुळे त्याची रयाच गेली आहे. या चौकात सतत वाहतुकीची कोंडी होत असते. चौकातील सिग्नल बंद आहेत. चौकात असलेल्या शेतकरी कुटुंबाच्या पुतळ्यावर धुळीचे थर साचले असून, त्याचा रंगही उडाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे, पण त्याच्यासमोरच्या कोपयात कचयाचे ढीग साचलेले असतात. पारस कंपनीच्या माध्यमातून या चौकातील आयलँडचे सुशोभीकरण करण्यात आले....
  November 11, 06:48 AM
 • नगर: गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेल्या सावेडीतील भाजी मार्केटची दुरवस्था झाली असून आता ते जुगा-यांचा अड्डा बनले आहे. परिसरातील नागरिकांसाठी हे भाजी मार्केट म्हणजे डोकेदुखी बनली आहे. जवळच असलेल्या क्रीडा व सांस्कृतिक संकुलाचीही तीच अवस्था आहे.नगरसेवक नीलिमा गायकवाड यांच्या वॉर्ड क्रमांक 18 मध्ये सेंट मोनिका कॉलेज, लॉइड कॉलनी, डोके बंगला, आकाशवाणी केंद्र, क्रीडा संकुल, सावित्रीबाई व्यापारी संकुल, म्युनिसिपल कर्मचारी कॉलनी, सिव्हिल हडको, गायकवाड मळा, पोस्टल कॉलनी, साधू वासवानी सोसायटी...
  November 11, 06:42 AM
 • राळेगणसिद्धी - आमच्या व राष्ट्रय स्वयंसेवक संघाच्या संबंधांचे कारणच काय? कोणाशी संबंध ठेवण्याची आम्हाला गरजच नाही. त्यामुळे कोणाला काय बोलायचे ते बोलू द्या. आज भागवत बोलले, उद्या आणखी कोणी बोलेल. सर्वच मला व अण्णा टीममधील सदस्यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांना काय बोलायचे ते खुशाल बोलू द्या, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. अण्णा व आमचे जुने संबंध असल्याचे रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी म्हटले होते. त्यावर अण्णा म्हणाले, मी व टीम...
  November 11, 04:37 AM
 • राळेगणसिद्धीः मुख्यमंत्री पृथ्वीराज चवहाण यांच्या वक्तव्यावरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भडकले आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी बोलत असल्यास त्याने निवडणूक लढविली पाहिजे काय? असा सवाल अण्णांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. मुख्यमंत्र्यांनी टीम अण्णाला निवडणूक लढविण्याचे आहवान केले होते. टीम अण्णाला राजकारणात प्रवेश करायचा आहे, हे उघड असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. तसेच राजकरणाबाहेर राहून एखाद्या पक्षाला विरोध करणे किंवा पाठींबा देणे चुकीचे आहे, असे सांगून...
  November 10, 04:37 PM
 • नगर - दोन वर्षांपासून वाढत असलेले रिअल इस्टेटचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कोसळले आहेत. राहण्यासाठी घर घेणा-यांपेक्षा गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून प्लॉट व फ्लॅट घेणा-यांचीच या मार्केटवर पकड आहे. त्यामुळे तोंडातोंडी भाव वाढवून गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवण्याच्या नादात वाढलेल्या भावाचा फुगा फुटला आहे. मागील तीन महिन्यांपासून या क्षेत्रातील ब्रोकर व बिल्डरांना मंदीचा तडाखा बसला आहे. गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय ठरलेल्या रिअल इस्टेटचे भाव झपाट्याने वाढल्याने सर्वसामान्यांचे...
  November 10, 12:46 PM
 • नगर - राज्य सरकारशी बुधवारी सायंकाळी झालेली चर्चा फिस्कटल्याने राज्य सरकारी कर्मचा-यांचा 15 नोव्हेंबरपासूनचा संप अटळ असल्याचे संघटनेने जाहीर केले. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी दिव्य मराठीशी बोलताना याला दुजोरा दिला. 35 महिन्यांचा थकलेला महागाई भत्ता मिळावा, केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचा-यांना शैक्षणिक व इतर सर्व सुविधा मिळाव्यात, निवृत्तीचे वय 60 करावे, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, अनुकंपावरील नोकरभरती तातडीने करावी, सर्वांना बोनस...
  November 10, 12:42 PM
 • नगर - पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे पोलिस भरती प्रक्रियेस बुधवारी सकाळी शिस्तबध्द वातावरणात सुरुवात झाली. सुमारे 2 हजार 300 उमेदवार भरतीत सहभागी झाले. सकाळी सहा वाजता सिध्दीबागेच्या प्रवेशद्वारातून उमेदवारांना मुख्यालयाच्या मैदानावर सोडण्यात आले. पंधरा टेबलांवर उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. कागदपत्रांबाबत काही उमेदवारांच्या शंका होत्या. कृष्णप्रकाश यांनी त्या तत्काळ दूर केल्या. नंतर उमेद्वारांची छाती व उंचीची मोजमापे घेण्यात...
  November 10, 12:39 PM
 • नगर - अशोक लांडे खूनप्रकरणातील आरोपी भानुदास कोतकर यांचा जामीन अर्ज व त्याची मुले संदीप, सचिन, अमोल यांच्यासह वाहनचालक अजय गायकवाड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी माझ्यापुढे चालवू नये (नॉट बिफोर मी) असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती ए. बी. पोतदार यांनी बुधवारी सांगितले. न्यायालयीन प्रक्रियेनुसार आता हे कामकाज नियमित कोर्टात न्यायमूर्ती आर. वाय. गणू यांच्याकडे पाठविण्यात आले. न्यायमूर्ती गणू यांनी पुढील सुनावणी 17 नोव्हेंबरला घेण्याचा आदेश दिला....
  November 10, 12:34 PM
 • राहाता - राज्य सरकारने आंदोलक शेतक-यांना चर्चेसाठी बोलवले याचे आपण स्वागत करतो. ऊस दरवाढीच्या मागणीमध्ये अर्थ आहे. कारण सध्या शेतीव्यवसाय आतबट्टयांचा बनला आहे. शेतक-यांचा सरकारवर दबाव वाढला पाहिजे. सरकारनेही ही चळवळ न दडपता प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी केली. पत्रकार परिषदेत विखे बोलत होते. ते म्हणाले, ऊस दरवाढीच्या प्रश्नांवरून राज्यात जोरदार आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे राज्यभरातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम...
  November 10, 12:31 PM
 • नगर - गैरव्यवहारामुळे गाजत असलेल्या संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 2010-11चे लेखापरिक्षण करण्यासाठी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला समक्ष हजर राहावे लागणार आहे. तसे पत्र पतसंस्थेच्या प्रशासकीय अध्यक्षांना आले आहे. संपदाच्या जिल्ह्यात 13 शाखा आहेत. पतसंस्थेत 25 कोटी 93 लाख 78 हजार 189 रुपयांच्या ठेवी आहेत. 26 कोटी 96 लाख 48 हजार 395 रुपयांचे कर्ज येणे आहे. 31 मार्च 2010 रोजी झालेल्या लेखापरिक्षणानंतर सुमारे 13 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले. लेखापरिक्षक देवराम...
  November 10, 12:05 PM
 • अकोले - तालुक्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे विहिरींनीही तळ गाठला असून, जनावरांच्या चा-याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.नगर जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून अकोले तालुक्याची ओळख आहे. तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाची अपेक्षा होती त्यानंतर दिवाळीदरम्यान पाऊस येईल, अशी आशा शेतक-यांना होती, मात्र ती ही फोल ठरली. यावर्षी पावसाळा कोरडा गेल्याने...
  November 10, 12:02 PM
 • शिर्डी - नगर पंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांतील इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिर्डीत युती-आघाडी, मनसे व आरपीआय यांच्यात चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. शिर्डी नगर पंचायतीच्या निर्मितीपासूनच कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हातात नगर पंचायतीची सूत्रे आहेत. गेल्या निवडणुकीत विखे गटाने 9 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. निवडणुकीनंतर डॉ. एकनाथ गोंदकर यांच्या गटाचे 4 नगरसेवक सत्ताधारी काँग्रेस पक्षाला...
  November 10, 11:58 AM
 • नगर - महापालिका हद्दीत सुमारे 100 लहान-मोठे अनधिकृत कत्तलखाने असून महापालिका अथवा जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावरील कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. शहरातील कत्तलखाने दोन दिवसांत हटविण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश मारलापल्ले आणि जे. जे. दाभोळकर यांनी 2001 मध्ये जिल्हाधिकारी आणि तत्कालीन पालिका मुख्याधिकायांना दिले होते. पुणे-औरंगाबाद बाह्यवळण रस्त्यावर हे कत्तलखाने उभारावेत, असे स्पष्ट आदेश असताना गेल्या दहा वर्षांत कत्तलखाने शहराच्या बाहेर गेले नाहीत हे विशेष. महाराष्ट...
  November 10, 11:53 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात