जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • नगर- शहरासह जिल्ह्यातील सराफी पेढय़ांची सुरक्षा रामभरोसे आहे. सुरक्षेच्या बाबतीत पोलिसांबरोबर सराफांमध्येही कमालीची उदासीनता आहे. दिवाळीमुळे सोनेखरेदीसाठी सध्या झुंबड उडाली आहे. या संधीचा लाभ उठवण्यासाठी सुवर्णटोळ्या घाट लावून बसल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी सोनई येथील सराफ अमृतलाल कडेला यांना जबर मारहाण करून लुटण्यात आले. अशा घटना यापूर्वीही झाल्या आहेत. पोलिसांचे दुर्लक्ष- दोन वर्षांपूर्वी सराफांच्या सुरक्षेबाबत शिष्टमंडळाने गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली होती. त्या...
  October 23, 07:53 AM
 • नगर- महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला जाण्याची घटना घडूनही प्रशासनाला जाग आलेली नाही. तेथील सुरक्षा व्यवस्था जैसे थेच आहे.बाळ चोरीला जाण्याची तिसरी घटना गुरुवारी घडली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. शनिवारी दुपारी दिव्य मराठी टीमने रुग्णालयात प्रवेश केला. आत जाताना कोणीही ओळखपत्र दाखवण्याविषयी विचारणा केली नाही. जनरल वॉर्ड, सिझर वार्ड, ऑपरेशन थिएटर, स्टोअररूम, ब्लड बँक अशा सर्व विभागात टीमने बिनदिक्कत फेरी मारली. एकाही कर्मचार्याने साधे हटकलेही नाही....
  October 23, 07:49 AM
 • राहाता - जागतिकीकरणामुळे जीवन गतिमान आणि स्पर्धात्मक झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने वैश्विक आणि स्थानिक यांचे संदर्भ बदलत आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेचा परिणाम समता आणि सामाजिक न्यायावर झाला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी केले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. महाराष्ट्राला असंख्य समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे. या सर्व समाजसुधारकांनी शैक्षणिक चळवळीत स्वत:ला झोकून देत देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक विचार मांडले....
  October 23, 07:42 AM
 • नगर - महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातून दोन दिवसांचे बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री झाला. घटनेचे पडसाद शुक्रवारी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत उमटून चांगलाच गदारोळ उठला. दरम्यान, झाल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश टेकवाणी यांनी सभागृहाची माफी मागितली. केडगाव येथील रेश्मा जालिंदर केदार ही महिला मंगळवारी देशपांडे रुग्णालयात बाळंत झाली. गुरुवारी रात्री एका अज्ञात महिलेने नर्स असल्याचा बनाव करून बाळाला डॉक्टरांना...
  October 22, 11:42 AM
 • नगर - दोन महिन्यांपासून रखडलेल्या महिला व बालकल्याण समितीच्या 16 सदस्यांची निवड शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आली. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी चार जागा मिळाल्या. सभापतिपदासाठी दावेदार असणा-या बसपाच्या किरण उनवणे यांची युतीच्या गटातून निवड करण्यात आली. नवीन सदस्य निवडण्यासाठी महापौर शीला शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. व्यासपीठावर आयुक्त संजय काकडे व उपमहापौर गीतांजली काळे उपस्थित होते. नामनिर्देशनाद्वारे सदस्यांची नियुक्ती...
  October 22, 11:37 AM
 • नगर - नगरकरांना रोज 10 दशलक्ष लिटर (10 एमएलडी) पाणी कमी पडते. शहराची लोकसंख्या आता चार लाखांच्या पुढे गेली आहे. परंतु आजही 15 वर्षांपूर्वीच्या जुनाट यंत्रणेद्वारे शहराला पाणीपुरवठा होतो. मुळा धरणातून शहराला रोज 70 दशलक्ष लिटर पाणी मिळते. प्रतिमाणसी रोज किमान 150 लिटर पाण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ 120 लिटर पाणी मिळते. हद्दवाढीत अनेक गावांचा शहरात समावेश करण्यात आला. पाण्याची आवक मात्र त्या तुलनेत वाढली नाही. वितरण व्यवस्था जुनाट झाल्याने पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. धरणात पुरेसा...
  October 22, 11:29 AM
 • श्रीगोंदा - घोड कालव्याच्या वितरिकेचे अतिरिक्त पाणी शेतक-यांनी रस्त्याच्या गटारीत सोडल्याने काष्टी-पेडगाव हा डांबरी रस्ता तुटला. गेल्या तीन आठवड्यांपासून रस्त्यावरच्या वाहतुकीला अडथळा झाला आहे. दरम्यान, या प्रश्नावरून पाटबंधारे व बांधकाम विभागात जुंपली आहे. शिरूर आगाराची सिद्धटेक मुक्कामी गाडी तीन आठवड्यांपासून बंद आहे. घोडची वितरिका क्रमांक 24 चा तालुक्यातील आनंदवाडी शिवारात टेल आहे. तीन आठवड्यांपूर्वी शेतात वितरिकेचे जादा झालेले पाणी काष्टी-पेडगाव रस्त्याच्या कडेला सोडून...
  October 22, 11:23 AM
 • जामखेड - कायम दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असलेल्या जामखेड तालुक्यात आरोग्यसेवचे तीनतेरा वाजले आहेत. राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण भागात रुग्णालये सुरू केली. मात्र, रुग्णालयामध्ये पुरेसे कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने खेड्यापाड्यांतील येणाया रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सर्वांसाठी आरोग्य, आरोग्यासाठी सर्वकाही ही संकल्पना घेऊन राज्य सरकारने ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सेवासुविधा मिळाव्यात, या हेतूने प्राथमिक...
  October 22, 11:19 AM
 • नगर - जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या 888 पाझर तलावांपैकी 826 तलाव संबंधित ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. त्यापैकी फक्त 21 तलावांमध्ये मत्स्यशेती करण्याचा अधिकृत ठेका ग्रामपंचायतींनी दिला आहे. ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे या ग्रामपंचायतींसह जिल्हा परिषदेचाही महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. 1972च्या दुष्काळानंतर बांधलेल्या बयाच पाझर तलावांत मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. काही तलावांत वेड्याबाभळींचे साम्राज्य पसरले आहे. या तलावांच्या...
  October 22, 11:17 AM
 • नगर - बाल हक्क अभियान, मानवी हक्क अभियान व फासेपारधी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान पोलिस संरक्षण न मिळाल्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. एरवी मोर्चेक-यांना प्रवेशद्वाराजवळच अडविले जाते. मात्र, या मोर्चेक-यांनी थेट जिल्हाधिका-यांच्या दालनात प्रवेश केला. आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा पंचपीर चावडीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर...
  October 22, 11:13 AM
 • नगर - ग्राहकांच्या तक्रारींची वाट पाहत दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही वैधमापन विभाग शांतपणे कामात मग्न आहे. चालू महिन्यात विभागातर्फे अजूनही धडक कारवायांची मोहीम उघडण्यात आली नसल्याचे कार्यालयातील अधिका-यांनी स्पष्ट केले. तसेच चालू वर्षीच्या कारवायांचा अहवालही बनवण्यात आला नसल्याचेही कार्यालयातर्फे सांगण्यात आले. ग्राहकांनी काळजी घ्यावीमालाच्या पॅकिंगवरील माहिती बारकाईने वाचाउत्पादकाचे पूर्ण नाव व पत्ता पाहावावजनाची खातरजमा करूनच खरेदी करावी.उत्पादनाची तारीख पडताळून...
  October 22, 11:10 AM
 • नगर - भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. देशभरातील सुमारे 12 लाख आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार, महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले असल्याचे संघटनेचे जिल्हा सचिव अॅड. रमेश नागवडे यांनी सांगितले. वाढती महागाई, सक्षम लोकपाल विधेयक, शेतक-यांना 2 हजार रुपये निवृत्ती वेतन, 1894 जमीन अधिग्रहण कायदा रद्द करून सुधारित कायदा करावा आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. यावेळी माजी आमदार बाळासाहेब नागवडे, राधाकिसन...
  October 22, 11:01 AM
 • नगर - दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शहरातील भेटकार्डांच्या दुकानांत खरेदीसाठी युवक-युवतींची गर्दी वाढली आहे. आशयघन संदेशासह आकर्षक डिझाइन्स असणा-या भेटकार्डाना पसंती मिळत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही भेटकार्डांची क्रेझ कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. गिफ्ट शॉपी व पुस्तकांच्या दुकानातही दिवाळीसाठी भेटकार्डांचे खास कलेक्शन पहायला मिळत आहे. मित्र, कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्टांविषयीचे प्रेमळ बंध उलगडवून दाखवणा-या मजकुरांचे भेटकार्ड ग्राहक खरेदी करत आहेत. 5...
  October 22, 10:57 AM
 • नगर - मुंबईहून नगरला जायचं असेल, तर नाशिकमार्गे जा असं कुणी सांगितलं, तर तुम्ही नक्की हसाल; पण ही माहिती पोलिस खात्याच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. नगरला जाण्यासाठी पुण्याऐवजी नाशिकमार्गे येण्याचा द्राविडी प्राणायाम करण्याचा सल्ला त्यात देण्यात आला आहे. अशा अनेक गमतीजमती या वेबसाइटवर पहायला मिळतात. या बाबींकडे लक्ष वेधूनही त्यात सुधारणा करण्यात येत नाही. महापोलिस ही महाराष्ट्र पोलिसांची अधिकृत वेबसाइट आहे. राज्य सरकार मराठी भाषेत व्यवहार करीत असताना ही वेबसाइट मात्र...
  October 22, 10:52 AM
 • नगर: अण्णा हजारे यांनी गेले काही दिवस पद्मावती मंदिर परिसरात असलेला आपला मुक्काम शुक्रवारी गावातील यादवबाबा मंदिरात हलवला. याबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत. दिल्लीतील आंदोलनामुळे हजारे यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. साहजिकच गर्दीचा मोठा ओघ सुरू झाला. हजारे यांच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर विभागाने दिला आहे. त्याची गंभीर दखल घेत राज्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी (कायदा व सुव्यवस्था) राळेगणला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर शुक्रवारी हजारे...
  October 22, 12:34 AM
 • नगर - गुरुपुष्यामृताचा शुभ मुहूर्त साधत नगरकरांनी गुरुवारी सोने खरेदी केली. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नगरच्या सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. दरम्यान, मोठे ग्राहक थेट इंटरनेटवरून सोन्याची खरेदी करत असल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी काही प्रमाणात कमी होती .दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यातच कामगार वर्ग व अन्य वर्गांचा बोनस झाला आहे असे असतानाच सोन्याचे भावही 400 रुपयांनी घसरले होते. नगर शहरातील सराफ बाजारात...
  October 21, 09:36 AM
 • नगर - नियमांचे बंधन असल्याने जकातीचा ठेका मुंबईतील विपुल ऑक्ट्रॉय सेंटरला देण्याबाबत महापालिका आयुक्त संजय काकडे यांनी असमर्थता दाखवल्यानंतर रात्री उशिरा झालेल्या बैठकीत पुन्हा निविदा मागवण्याचा निर्णय झाला.सोलापूर कन्स्ट्रक्शनच्या नकारानंतर दुसऱया क्रमांकाची बोली (81 कोटी 99 लाख) लावणाऱया विपुलने जकातीचा ठेका घेण्याची तयारी दर्शवली होती. तसे पत्रही त्यांनी प्रशासनाला दिले होते. त्याबाबत सर्व कायदेशीर बाबी प्रशासनाने तपासल्या. पहिल्याने नकार दिल्यास दुसया क्रमांकाची बोली...
  October 21, 09:32 AM
 • नगर - लांडे खून प्रकरणातील आरोपी माजी महापौर संदीप कोतकरसह अमोल, सचिन कोतकर व वाहनचालक अजय गायकवाड गुरुवारी सकाळी दहा वाजता कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. या वेळी त्यांची कसून चौकशी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार आरोपी कोतकर बंधू व गायकवाड हे आपल्या वकिलांसोबत कोतवाली पोलिस ठाण्यात आले. पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश व तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी त्यांची दोन तास कसून चौकशी केली. परंतु ते काहीही बोलले नाहीत.दर दोन...
  October 21, 09:28 AM
 • श्रीगोंदा - ग्रामीण भागातील सहकारी सेवा संस्थांच्या पायाभूत विकासासाठी आता नाबार्डने पुढाकार घेतला आहे. निवडक संस्थांना प्रायोगिक तत्त्वावर कर्जरूपी अर्थसाहाय्य करणार आहे. मात्र, यात जिल्हा बँकेच्या पीक कर्जाला कुठलाही अडसर न करता नियमातील संस्थांना आर्थिक बळकटी देण्यासाठी हा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक एम. व्ही. अशोक यांनी दिली. काष्टी सेवा संस्थेत नाबार्डने आयोजित केलेल्या राज्यव्यापी सेवा संस्थांच्या परिसंवादात ते बोलत होते....
  October 21, 09:26 AM
 • नगर - ऐन दिवाळीच्या तोंडावर अतिरिक्त घनकचऱयाच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात रोज सव्वाशे टन कचरा जमा होत असून तो उचलण्यासाठी महापालिकेकडे केवळ 30 घंटागाड्या आहेत.शहरातील 65 प्रभागांमधील सफाईसाठी मनपाचे 817 कामगार आहेत. ही संख्या अपुरी आहे. सगळा कचरा त्यामुळे उचलला जात नाही. सर्जेपुरा, रामवाडी, बंगाल चौकी, अमरधाम रस्ता या भागातील कचरा उचललाच जात नाही. तेथे कचऱयांचे डेपोच तयार झाले आहेत.घनकचयाची विल्हेवाट लावण्याचा ठेका मनपाने तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या हायड्रोएअर...
  October 21, 09:24 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात