जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • पाथर्डी - बँकिंग व्यवस्थापन प्रणालीचा आत्मा समजल्या जाणाऱया सीडी रेशीचे प्रमाण आदर्श ठेवण्यासाठी शहरातील विविध बँका व पतसंस्थांनी सोने तारण कर्ज सुविधा बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱयांची कुचंबणा होत आहे.कपाशीची लागवड करण्यासाठी अनेक शेतकऱयांनी काळ्या बाजारातून वाढीव दराने बियाणे व खते घेण्याकरिता आपल्याकडील सोने बँका व पतसंस्थांमध्ये गहाण ठेवून कर्ज काढले. शहरातील प्रत्येक बँक व पतसंस्थेमध्ये सोने तारण कर्जासाठी रांगा लागल्या होत्या. एकूण ठेवींच्या तुलनेत किती कर्जवाटप करायचे...
  October 21, 09:17 AM
 • शिर्डी - गाव बंद करणे, मोर्चा काढणे, भीक मांगो आंदोलन करणे आणि आरोप करणे तसेच विकासकामात अडथळे निर्माण करण्यापलीकडे विरोधकांचे कोणतेही काम नाही. एकमेकांवर विश्वास नसलेले लोक निवडणुकीसाठी आघाडी करण्याची भाषा बोलत आहेत. विरोधकांची अवस्था नापास शाळेतील घंटागाडीसारखी झाली असल्याची टीका नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी केली. नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या सक्षम आणि सतत विकासाचा...
  October 21, 09:14 AM
 • नगर - एकेकाळी नगरमध्ये वर्षभरात 200 नाट्यप्रयोग होत. आता ही संख्या दहाच्या आत आली आहे! महिन्यातून एखाद-दुसरा प्रयोग होतो, तोही अपुऱया प्रेक्षकसंख्येनिशी. वाढलेल्या तिकीटदरांबरोबरच नगरकरांचे कमी झालेले नाट्यप्रेम हे यामागचे कारण आहे.यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह हे शहरातील एकमेव नाट्यमंदिर. पण तेथे केवळ नाटके होत नाहीत. बँकांच्या वार्षिक सभा व राजकीय पक्षांच्या मेळाव्यांसाठीही या सभागृहाचा वापर होतो. असे असूनही पूर्वी तेथे वर्षातून 150-200 नाटके व्हायची. ती पाहण्यासाठी नगरकर गर्दीही...
  October 21, 09:13 AM
 • नगर - जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना नोव्हेंबरच्या पगारात 7 टक्के वाढीव महागाई भत्ता मिळणार असल्याची माहिती शहर माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव सुनील गाडगे यांनी दिली. तसे आदेश जिल्हा माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे व वेतन पथक अधीक्षक सुयश दुसाणे यांनी दिले आहेत. अशासकीय मान्यताप्राप्त, अनुदानित व अशंत: अनुदानित शाळेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा केली आहे. 1 ऑक्टोबरपासून सुधारित वेतन...
  October 21, 09:08 AM
 • नगर - हम सारी जिंदगी सेहत गवाकर पैसा कमाते रहे, फिरभी उसी पैसे से आरोग्य वापस नही ला सकते । इसलिए अपने आरोग्य के साथ समाज और मानवता को भी समय दो । बदन बनाओ ... देश बचाओ/ उसका दुरूपयोग मत करो । आरोग्यशील बनते हुए पहलवान नही, समाजसेवक बनो । बदन बनाके किसीका गुलाम मत बनो, शारीरिक और मानसिक स्वातंत्र्य कायम रखो, असा सल्ला जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश देतात.नाशिक विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेत नगरकरांना कृष्णप्रकाश यांच्या खिलाडूवृत्तीची झलक पहायला मिळाली. गुन्हेगारांना धडकी भरवणाया...
  October 21, 09:06 AM
 • नगर - दिवाळीत घर रंगवण्याचा लोकांचा उत्साह महागाईच्या दिवसांतही टिकून आहे. रंगांमध्ये उपलब्ध झालेल्या नव्या प्रकारांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.कच्चा माल, इंधन आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने रंगांच्या किंमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्यामुळे दिवाळीतील घराच्या रंगकामाचे गणित काहीसे कोलमडले आहे. रंगनिर्मितीमधील प्रमुख घटक असलेल्या टिटॅनियम डायॉक्साईडच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने गेल्या वर्षभरात किमतीत जवळपास 20 टक्क्यांनी...
  October 21, 09:04 AM
 • अकोले - तालुक्यातील विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाच्या कामाचे श्रेय लाटण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भाजपच्या कार्यक्रमात चांगलीच जुंपली आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकरराव पिचड यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार होते. मात्र कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकावर सेना - भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी केली. कार्यक्रम रद्द न झाल्यास विकास कामांचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारे पिचड...
  October 21, 09:00 AM
 • नगर - महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी सकाळी इम्पिरिअल चौकात पुन्हा अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली. कारवाईस विरोध करीत एका युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी या युवकास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. अतिक्रमण विरोधी पथकाने बुरूडगाव रस्त्यावरील शेख सलीम हुसेनभाई यांच्या पिठाच्या गिरणीचे बांधकाम पाडण्याची कारवाई केली. यावेळी गिरणीचालक शेख अब्बास यांनी कारवाई थांबविण्यासाठी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून...
  October 20, 12:21 PM
 • नगर - खासगी मोबाइल कंपन्या व भारत संचारने एकमेकांचे इनकमिंग कॉल बंद केल्यामुळे महाराष्ट्र, हरियाणा व पंजाब या राज्यांतील एअरटेल, आयडिया व व्होडाफोनच्या 6 कोटी 14 लाख मोबाइलधारकांची गैरसोय झाली आहे. ही सेवा पूर्ववत करण्यासाठी ट्रायने भारत संचारला पत्र पाठवले असल्याचे सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे सांगण्यात आले. इंटरकनेक्टिव्हिटी शुल्क न भरल्यामुळे भारत संचारने आयडिया, एअरटेल व व्होडाफोनच्या मोबाइलवरून लँडलाइनवर येणारे इनकमिंग कॉल बंद केले. ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन...
  October 20, 12:11 PM
 • नगर - दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि सोन्याचे भावही 400 रुपयांनी घसरले आहेत. याचाच फायदा घेत ग्राहक उद्या गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदीच्या तयारीत आहेत. नगर शहरात उद्या किमान 10 कोटी रुपयांची उलाढाल होईल, अशी सराफ व्यावसायिकांना अपेक्षा आहे. दसरा आणि दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी होत असते. काही महिन्यांपूर्वी सोने दिवाळीत 30 हजार रुपयांपर्यंत जाईल असे बोलले जात होते. पण तसे चित्र सध्या दिसत नाही. उलट दर काहीसे कमीच होत आहेत.दिवाळीसाठी नगरचा...
  October 20, 11:45 AM
 • नगर - नव्या प्रकारचे अद्ययावत झाडू बाजारात उपलब्ध असले, तरी लक्ष्मीचे महत्त्व अजून कमी झालेले नाही. दिवाळी जवळ आल्यामुळे लक्ष्मीला मागणी वाढली आहे. मात्र, लक्ष्मी बनवणा-याची संख्या आता कमालीची घटली आहे. फ्लॅट संस्कृतीत जुन्या पद्धतीच्या केरसुणीला फारसे स्थान राहिलेले नाही. तथापि, दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी नवी लक्ष्मी आवर्जून घरी आणली जाते. शिंदडीच्या झाडापासून लक्ष्मी अर्थात लक्ष्मी तयार केली जाते. प्रामुख्याने मातंग समाज या व्यवसायात आहे. माळीवाडा परिसरात हा पारंपरिक व्यवसाय...
  October 20, 11:11 AM
 • नगर: गुरुपुष्यामृत अर्थात गुरु पुष्य नक्षत्र आज आहे. सर्वार्थ, अमृतसिद्धीसोबतच गजकेसरी असा सुवर्णयोग जुळून आल्याने या दिवसाला आगळे महत्त्व आले आहे. यश, सफलता आणि सुख-समृद्धी देणारा हा योग आहे. सकाळी 6.35 वाजेपासून ते दुस-या दिवशी 6.30 वाजेपर्यंत हा योग राहील. म्हणजेच 24 तासांचे महामुहूर्त. या शुभदिवसानेच दिवाळीच्या खरेदीलाही सुरुवात होणार आहे. बाजार बहरले आहेत. सोने-चांदीसह इतर धातू आणि जमीन, घरांची खरेदी तसेच इतर शुभकार्ये या मुहूर्तावर केल्यास त्यास स्थैर्य मिळून मांगल्य प्राप्त होते, असे...
  October 20, 04:26 AM
 • नगर: राहुल गांधी यांना परत न भेटण्याचा व राळेगणसिद्धीत न बोलावण्याचा निर्णय सरपंच जयसिंग मापारी व त्यांच्या सहका-यांनी घेतल्याचे आपल्याला सांगितले. राळेगणच्या तरुणांना हा स्वाभिमान वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी व्यक्त केली. मापारी व त्यांच्या सहका-यांना राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. काँग्रेसचे खासदार पी. टी. थॉमस यांच्या पुढाकाराने ही भेट आयोजित झाल्याचा दावा मापारी यांनी केला असून, थॉमस यांनी मात्र...
  October 20, 01:16 AM
 • नगर - जिल्हा रुग्णालयासह 25 ग्रामीण रुग्णालयांतील 37 डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने आरोग्य विभागाच्या डॉक्टरांवरील कामचा बोजा वाढला आहे. रुग्णांची सेवा करण्यापेक्षा कामाचा निपटारा करण्याच्या नादात सिव्हिलसह ग्रामीण रुग्णालयांत रुग्णांची हेळसांड होत आहे. जिल्हा रुग्णालयात 10 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. सरकारी रुग्णालयांत तपासणीसाठी चांगली वैद्यकीय उपकरणे व औषधोपचार असतानाही सेवेला रुग्णांचा प्रतिसाद यथातथाच मिळतो. रुग्णालयांत डॉक्टर वेळेवर न मिळणे, नर्सेसचे किंचाळणे आदी...
  October 19, 07:54 AM
 • नगर । एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत ढवळे याच्यासह तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. नगर ह्यएमआयडीसीह्णमधील आर. के. इंजिनिअर्सचे मालक राजेंद्र बन्सीलाल कोठारी (वय 52 रा. मार्केटयार्ड, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चंद्रकांत रभाजी ढवळे (रा.खारेकर्जुने), राजेंद्र नवनाथ कोतकर, भरत विष्णू कोतकर (रा निंबळक) व सुभाष उमाजी कांडेकर (हमीदपूर) या चौघांविरुध्द एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या...
  September 21, 01:55 AM
 • नगर - माळढोक पक्ष्याच्या अभयारण्याचे पूर्वीचे 2९ हजार चौरस किलोमीटर आरक्षित क्षेत्र कमी होऊन ते 1222 चौरस किलोमीटरवर आले आहे. तथापि, नवीन क्षेत्र अधोरेखित करण्यासाठी अखत्यारीतील जागाच सापडत नसल्याने वनखात्याने आता शेतक-यांच्या खासगी जमिनींचे अधिग्रहण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी शहरालगतच्या शेती व निवासी जमिनींवर गंडांतर येणार आहे.नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत हे संपूर्ण तालुके, नेवासे तालुक्यातील काही गावे व सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर...
  September 14, 03:27 AM
 • आषाढी एकादशीला राज्यभरातून विठुमाऊलीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे. भाविकांच्या दर्शनाची वेळ वाढविण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यावर्षीपासून व्ही.आय. पी. दर्शन पासेसच्या संख्येत कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी जास्त वेळ उपलब्ध होणार आहे. आषाढी एकादशीची शासकीय पूजा, दर्शन मंडप आणि मंदिर सफाईसाठी लागणाऱ्या वेळेतही कपात केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी दिली. मंदिर समितीचे अध्यक्ष...
  June 15, 01:47 PM
 • शहरातील गुलमोहर रस्त्यावरील नरहरीनगरमध्ये रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एका युवतीवर गोळी झाडून पलायन केले. या हल्ल्यात नम्रता ठापसे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी फिर्याद देण्यास तरुणीच्या कुटुंबीयांनी टाळाटाळ केल्यामुळे कौटुंबिक कारणावरूनच हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नम्रता गेट लावण्यासाठी घरातून बाहेर आली असता अज्ञात...
  June 14, 02:00 AM
 • अहमदनगर - शहरातील चितळे रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना शुक्रवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख यांना आमदार अनिल राठोड यांनी मारहाण केली. त्यामुळे पालिका कर्मचा-यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.शहरातील अतिक्रमणांविरुद्ध गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिकेची कारवाई सुरू आहे. येथील चितळे रोडवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास दाखल झाले. अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू असतानाच...
  June 4, 01:41 AM
 • नगर - शहरातील बांधकाम विभाग व महानगरपालिका यांच्या संयुक्त पथकाद्वारे तीन दिवसांपासून राबविण्यात येणा:या मोहिमेत सुमारे दीडशे पक्की बांधकामे व साडेचारशे किरकोळ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. शहरामध्ये वाहतुकीची कोंडी असते. रस्त्यावरील विक्रेते, दुकाने व चहाच्या टप:यांमुळे वाहतुकीला अडथळे येतात. यावर महापालिकेने कारवाई सुरू केली की, अडथळा आणला जातो. या वेळी मात्र खुद्द पालकमंत्र्यांनीच आदेश दिल्याने अतिक्रमण हटाव कारवाई कोणताही विरोध न होता पार पडली. पालकमंत्र्यांनी नेमकी काय...
  June 3, 01:34 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात