Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • नगर - प्रदीर्घ विश्रांतीनंतर नगर शहर व जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ४४ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसामुळ दडी मारली होती. पावसाअभावी पिके जळण्याच्या मार्गावर होती. जून, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे साडे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र, पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ देखील खुंटली होती. ऑगस्ट महिन्यात पावसाची अपेक्षा होती. आॅगस्ट...
  August 17, 11:54 AM
 • नगर- तालुक्यातील सर्व धनगर समाजबांधव तहसील कार्यालयासमोर एसटी आरक्षणासाठी धरणे आंदोलन करीत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने शेड्युल्ड ट्राईब महाराष्ट्र राज्यासाठी सूची २ प्रमाणे एसटी आरक्षणामध्ये ४७ जातींचा समावेश केला. त्यामधील ३६ क्रमांकावर ओरान धनगड असा धनगर जातीचा उल्लेख आहे. इंग्रजी, हिंदी उच्चाराप्रमाणे त्या ठिकाणी धनगरऐवजी धनगड असे झालेले आहे. सदर ठिकाणी र ऐवजी ड असा उच्चार केलेला असून तोच आमच्या समाजाच्या अंगलट आला अाहे. गेल्या ४० वर्षांपासून मागणी करूनही...
  August 15, 11:46 AM
 • नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी भानुदास कोतकर याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी मंगळवारी मंजूर केला. कोतकरची प्रकृती ठीक नसून तो दुर्धर आजाराने त्रस्त आहे. जिल्हाबंदीची अट कायम ठेवत एक लाखाच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला. अशोक लांडे खूनप्रकरणात वैद्यकीय जामिनावर सुटलेल्या कोतकरला केडगाव दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. मागील काही दिवसांपासून तो न्यायालयीन कोठडीत होता. मात्र, त्याने प्रकृतीचे कारण पुढे...
  August 15, 11:43 AM
 • नगर- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) घोटाळ्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नावाने जिल्हा प्रशासनाला बनावट आदेश दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला. याप्रकरणी नायब तहसीलदार संजय परदेशी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. इव्हीएमच्या गैरवापरामुळे आपले राष्ट्र व लोकशाही धोक्यात आली आहे. या घोटाळ्याबाबतचा परिणामकारक अहवाल ३० दिवसांत सादर करा, असे या बनावट आदेशात म्हटले आहे. हा बनावट आदेश नवी दिल्ली येथील मुख्य निवडणूक...
  August 15, 11:38 AM
 • नगर- रस्तारूंदीसाठी दिल्ली दरवाजा पाडला, तर अवजड वाहने थेट शहराच्या मध्यवस्तीत शिरतील. भरधाव जाणाऱ्या या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढून नवे प्रश्न निर्माण होतील. दिल्ली दरवाजामुळे सध्या ही वाहने आत येऊ शकत नसल्याने नगरकर थोडेफार सुरक्षित आहेत, असे मत व्यक्त करत ही वेस पाडण्याचा आततायीपणा महापालिकेने करू नये, असे मत अनेकांनी व्यक्त केले. दिल्ली दरवाजा ही केवळ ऐतिहासिक वास्तू नाही, तर तिचा उपयोग शहराचे संरक्षण करण्यासाठी होत असे. सुरक्षेचा व व्यापारी नाका म्हणजे या वेशी होत्या....
  August 14, 11:56 AM
 • नगर- आमदार विनायक मेटे यांच्या नावाने शेवगाव पोलिस ठाण्याच्या निरीक्षकालाच सहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. या घटनेची चर्चा थांबत नाही, तोच याच अधिकाऱ्याची चक्क खाकी वर्दी चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील खाकी वर्दीची अब्रूच चव्हाट्यावर आली. घरातून ६२५ रुपये िकमतीची खाकी वर्दी बूट व कॅपसह चोरीला गेल्याची फिर्याद निरीक्षक गोविंद ओमासे यांनी स्वत: रविवारी आपल्याच पोलिस ठाण्यात दिली. त्यापूर्वी काही तास अगोदरच आपली ६ लाख २० हजारांची फसवणूक...
  August 14, 11:46 AM
 • राहुरी शहर- धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी जागरण गोंधळ घालून नगर-मनमाड मार्गावरील चिंचोली फाट्याजवळ तासभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. शिर्डी व शनिशिंगणापूरला दर्शनासाठी जाणारी भाविकांची वाहने अडकून पडली. कोल्हारकडून बेलापूरमार्गे राहुरी फॅक्टरी हा २० किलोमीटर अंतराचा वळसा घालून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला. आंदोलनात बोलताना विखे साखर...
  August 14, 11:39 AM
 • जामखेड शहर- खैरी नदीपात्रातून वाळू उचलण्यास प्रतिबंध केल्यामुळे वाळूतस्करांनी तलाठी व तहसीलदारांवर सशस्त्र हल्ला केला. या आरोपींना अटक होईपर्यंत तलाठी संघटना व नगरपरिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन आजपासून सुरू केले. दरम्यान, पोलिसांनी एकूण नऊ वाळूतस्करांवर गुन्हा दाखल केले असून आरोपी फरार आहेत. कामगार तलाठी शिवाजी सखाराम हजारे (सोनेगाव, धनेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. धनेगाव शिवारातील खैरी नदीपात्रात शनिवारी रात्री बाराच्या सुमारास वाळूतस्कर अवैध वाळूचा उपसा करताना...
  August 14, 11:37 AM
 • नगर, शेवगाव- आमदार विनायक मेटे यांच्या नावाने चक्क पोलिस निरीक्षकालाच ६ लाख २० हजारांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार शेवगाव येथे घडला. गोविंद ओमासे असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवसंग्राम संघटनेचा तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (गदेवाडी ) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिकाऱ्याची फसवणूक करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे, तेथे सामान्य नागरिकांचे काय? अशी उलटसुलट चर्चा खाकी वर्दीबाबत जिल्हाभर सुरू झाली आहे. शेवगाव...
  August 13, 11:56 AM
 • सात्रळ- स्मशान, मृतदेह, अंत्यविधी हे शब्द उच्चारले, तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. सुखाच्या कार्यक्रमात मदतीला धावणारे अनेक जण असतात; पण अंत्यविधीसारख्या दु:खाच्या कार्यात निर्विकार भावाने हाताची घडी घालून उभे राहाणाऱ्यांची संख्या जास्त असते. समाजातील हा विरोधाभास त्यांना बोचला. म्हणून त्यांनी मृतदेहात परमेश्वर पाहिला आणि स्मशानाला मंदिर मानून आजपर्यंत शेकडो अंत्यविधी पार पाडले. दु:खात जग जेव्हा शब्दरुपी सांत्वनात गुंतते त्यावेळी कृतिशील सांत्वन करणारा अवलिया म्हणजे राहुुरी...
  August 13, 11:45 AM
 • बोधेगाव- येथील मुख्य बाजारपेठेतील व शेवगाव-गेवराई मार्गालगत शेजारी-शेजारी असलेली दोन सराफांची दुकाने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडण्यात आली. शटर अर्ध्यापर्यंत वाकवून फोडून दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने असा ८० हजारांचा लंपास करण्यात आले. या घटनेमुळे गावातील दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली. मोठी रहदारी असलेल्या रस्त्यावरील ही दुकाने कुठलाही आवाज न होऊ देता कशी फोडली, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील सर्व सराफा दुकानदार बँकेची लॉकर सुविधा वापरत आहेत. त्यामुळे दुकानात...
  August 13, 11:42 AM
 • कर्जत- खडूच्या रंगरेषांतून धार्मिक, सामाजिक सौहार्द वाढवणारे संदेश रयत शिक्षण संस्थेच्या राशीन येथील जगदंबा विद्यालयातील कलाशिक्षक मझहर सय्यद देत असतात. त्यांच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. मजहर सय्यद यांनी आर्ट टिचर डिप्लोमा केला आहे. त्यांनी काही काळ अल्प मानधनावर एका खासगी स्टुडिओत कामही केले. के. के. आर्टस, पुणे, आग्रा येथे त्यांचे चित्र प्रदर्शन झाले आहे. सन २००३ मध्ये ते रयत शिक्षण संस्थेत कलाशिक्षक म्हणून रूजू झाले. विद्यालयात राष्ट्रीय सण असो,...
  August 13, 11:37 AM
 • अकोले- भंडारदरा धरणाचा पाणीसाठा रविवारी सकाळी सहा वाजता १०४४१ दलघफू झाला. धरणाची साठवण क्षमता ११०३९ दलघफू असून १५ ऑगस्टपूर्वीच धरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने भरल्याचे अहमदनगर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी जाहीर केले. रविवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत धरणात ३४८ व निळवंडे धरणात १६७ असे मिळून ५१५ दलघफू म्हणजे अर्धा टीएमसी नवीन पाणी आले. १ जूनपासून भंडारदरा धरणात १३६९१ व निळवंडे धरणात ७००७ दलघफू नव्याने पाणी आले. दोन्ही धरणे मिळून २०६९७ दलघफू...
  August 13, 11:34 AM
 • नगर - अपघाती मृत्यूच्या प्रकरणात विम्याच्या भरपाईचे पैसे लाटण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे मोटार अपघात प्राधिकरणासमोर खोटा दावा दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांसह कर्जत पोलिसांनी हा प्रताप केला आहे. त्यामुळे न्यायालयाने दावा तर फेटाळून लावलाच. त्यासोबत खोटा दावा करणाऱ्या व्यक्तींसह पोलिसांवरही योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. या कारवाईचा अहवाल दोन महिन्यांच्या आत न्यायालयात सादर करावा लागणार...
  August 12, 12:22 PM
 • नगर - मुलगा होण्यासाठी तसेच मुलींना वश करण्यासाठी जादुटोणा करत स्मशानातील राख देणाऱ्या पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील भोंदूबाबासह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. बबन सीताराम ठुबे असे या भोंदूबाबाचे नाव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जादुटोणा करत तसेच आपण डॉक्टर असल्याचे भासवत लोकांची फसवणूक करणाऱ्या ठुबे याच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या...
  August 12, 12:18 PM
 • नगर - महिलेच्या अंगात येणारे काढण्यासाठी नरबळी अथवा एक लाख रुपये देण्याची मागणी करणाऱ्या परराज्यातील दोन भोंदूबाबांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ अटक केली. पिरसाहब ऊर्फ अब्दुल गफ्फार खलिफा व सद्दाम सलीम तवर (दोघे रा. फत्तेवार शेखावटी, जि. सिक्कर, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी परिसरातील सुरूची डेअरी, एक्स ०१ ब्लॉक या दुकानात छापा टाकून पोलिसांनी ही कामगिरी केली. पोलिसांनी तक्रारदाराची नावे गोपनीय ठेवली आहेत....
  August 12, 12:14 PM
 • नगर- मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवली. जिल्ह्यातील सुमारे ७५० बसगाड्यांना ब्रेक लागल्याने महामंडळाचे सुमारे ७० ते ८० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, शहरातील तीनही बसस्थानकांत शुकशुकाट होता. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात मोठा पोलिस फाटा तैनात...
  August 10, 12:07 PM
 • नगर- एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं..., छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत सकाळी ८ च्या सुमारास सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत सकाळी ९ च्या सुमारास इम्पिरियल चौकात ठिय्या आंदोलन सुरू झाले. सकल मराठा समाजाच्या शहर बंदच्या हाकेला व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. दरम्यान, शुक्रवारपासून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय, तसेच गावपातळीवर साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात...
  August 10, 12:04 PM
 • शिर्डी- सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारलेल्या आंदोलनाला शिर्डीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प होती, तर छोट्या -मोठ्या व्यावसायिकांपासून हॉटेल व लॉजिंग दिवसभर बंद असल्याने महाराष्ट्र तसेच परराज्यातून बुधवारी शिर्डीत आलेल्या भाविकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. आजच्या बंदमुळे नेहमी रात्रंदिवस गर्दीने फुलून जाणाऱ्या शिर्डीत शुकशुकाट दिसत होता. आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या बसेस व खासगी बसेसची वाहतूक पूर्णपणे ठप्प होती....
  August 10, 07:15 AM
 • अहमदनगर- दिवसभर शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. शहरातील नेप्ती नाका चौकात कार पेटवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नगर-पुणे महामार्गावर ठिय्या मांडला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला आहे. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन शांततेत शिस्तबद्धपणे सुरू आहे. ठिय्या आंदोलनाच्या आधी चौकात राष्ट्रगीत झाले. एसटी महामंडळाच्या बस बंद आहेत. तसेच शाळा-महाविद्यालयांना अघोषित सुटी आहे....
  August 9, 05:57 PM
 
जाहिरात

RECOMMENDED