Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • पाथर्डी- मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास तांत्रिक कारणामुळे विलंब झाला असला, तरी हा प्रश्न लवकर सुटावा, म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर सकारात्मक वाटचाल सुरू आहे. आरक्षणासह सर्व प्रलंबित मागण्यासाठी आपण मराठा समाजाबरोबर आहोत, प्रसंगी संघर्षाची भूमिका घेऊ, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. जुन्या बसस्थानक चौकात २७ जुलैपासून सकल मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलन सुरू असून नऊला आंदोलन तीव्र करून सरकारला जाब विचारण्याचा निर्णय संयोजकांनी घोषित केला आहे....
  August 6, 12:31 PM
 • पारनेर- दुष्काळी तालुका म्हणून पारनेरची ओळख पुसण्याचा यशस्वी प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला आहे. पारंपरिक पिकांऐवजी फुलांची शेती करत समृद्धीचा मळा या शेतकऱ्यांनी फुलवला आहे. कमी पाण्यात होणारी ही फुलशेती तालुक्याच्या अर्थकारणाला दिशा देणारी ठरत आहे. बहिरोबावाडी येथील बाळू माधव औटी यांना शेवंतीतून हेक्टरी १२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तालुक्यातील हंगे, सुपे, चास, कामरगाव या भागात पूर्वीपासूनच फुलशेती होत आहे, पण आता गोरेगाव, किन्ही, बहिरोबावाडी, डिकसळ, हिवरे कोरडा या गावांमधील...
  August 6, 11:59 AM
 • अकोले - आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते, विचारवंत व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त तसेच बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त प्रेमानंद दादासाहेब रुपवते उर्फ बाबुजी (७२) यांचे शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. स्वादूपिंडाच्या कर्करोगाने ते आजारी होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रविवारी दुपारी ४ वाजता मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी तसेच...
  August 5, 12:34 PM
 • नगर - मोडकळीस आल्याच्या कारणास्तव साडेचार महिन्यांपासून बंद पडलेली शहर बससेवा आता नव्या रूपात सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बससेवेसाठी दीपाली ट्रान्सपोर्ट संस्थेची निविदा मंजूर करताना २०१८ मधील नवीन बसगाड्या असतील तरच नुकसान भरपाईचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्थायी समिती सभेत शनिवारी मंजूर करण्यात आला. शहर बससेवेच्या विषयाला अर्थपूर्ण ब्रेक लागल्यामुळे वाटाघाटी होऊनही स्थायी समोर हा विषय येण्यास तब्बल दोन महिने तर मागील सेवा बंद झाल्यापासून तब्बल साडेचार महिने...
  August 5, 12:32 PM
 • नेवासे - मराठा, धनगर व मुस्लिम समाजाच्या नेवासे येथील आरक्षण मोर्चाला गैरहजर राहिल्याने आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची मोटारसायकल अडवून आंदोलकांनी घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली. शहरात शुक्रवारी झालेल्या मराठा, धनगर व मुस्लीम समाजाच्या मोर्चाला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व धर्मिय बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र आमदार मुरकुटे हे या मोर्चास उपस्थित नसल्याने त्याचा मोर्चात निषेध केला होता. शनिवारी सायंकाळी आमदार मुरकुटे हे आपली गाडी संपर्क कार्यालयासमोर...
  August 5, 12:27 PM
 • नेवासे- मराठा, धनगर व मुस्लिम समाजाच्या अारक्षणासाठी तिन्ही समाजांच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. राज्यातील या क्रांतिकारी प्रयोगाची नेवासे तालुक्यात सुरुवात झाली आहे. या एकत्रित ताकदीपुढे सरकारला नमावे लागेल, असा इशारा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलताना दिला. नेवासे बसस्थानकाजवळच्या ईदगाह मैदानापासून तहसील कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. हजारोंच्या या मोर्चात मराठासह इतर समाजाचे नागरिक सहभागी झाले होते. त्यात वकील,...
  August 4, 11:54 AM
 • कोपरगाव- शहरातील अनेक मुस्लिम बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जाहीर पाठिंबा देऊन शुक्रवारी तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुंडन करत सरकारचा निषेध करण्यात आला. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सगळ्या क्षेत्रांत आरक्षण द्यावे, तसेच आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवर झालेले...
  August 4, 11:49 AM
 • नगर- नगर- पुणे महामार्गावरील रेल्वे पुलाजवळील प्रियंका कॉलनी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. या कारवाईत तब्बल २१ जणांना अटक करून दोन लाख ५७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नूतन पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे नगर शहरात जुगार अड्डे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने राजरोसपणे...
  August 3, 11:13 AM
 • नगर- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या श्रीपाद छिंदमने पोलिस बंदोबस्तासाठी ४ हजार १७४ रुपयांचे शुल्क भरले होते. त्याने पोलिस बंदोबस्तात महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी हजेरी लावली. अवघ्या दीड मिनिटात निवेदन देऊन छिंदम सभागृहाबाहेर पडला. त्याचे निवेदन स्वीकारल्याच्या कारणावरून नगरसेवकांनी महापौरांवर टीका करत वॉक आऊटचा इशारा दिला. सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यामुळे महापौरांनी सभा तहकूब करून शुक्रवारी घेण्याचे आदेश दिले. माजी...
  August 3, 11:09 AM
 • नगर- सकाळी उठल्यावर हैदर नेहमी दारात दिसायचा. परंतु बुधवारी सकाळी ६ वाजता हैदर जागेवर नसल्याने मालक नादिरखान सिलावर खान यांनी तत्काळ कोतवाली पोलिस ठाणे गाठले. आपला लाडका हैदर जागेवर नाही, त्याला कोणी तरी चोरून नेले असल्याचे खान यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी देखील तत्काळ खान यांची फिर्याद नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली. अखेर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका शेतात हैदर सापडला. पोलिसांच्या कामगिरीमुळे चोरट्यांच्या हाती लागलेला हैदर सुखरूप परत मिळाल्याने खान सुखावले....
  August 3, 11:05 AM
 • राहुरी- पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. आठ दिवस पाऊस झाला नाही, तर पिके जळून जाण्याचा धोका आहे. भर पावसाळ्यात पिकांसाठी धरणातून आवर्तन सोडावे लागण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात यंदा ४ लाख २४ हजार ४९६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा ५ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज होता. पण ९० टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. दरवर्षी दीड लाख हेक्टरवर कपाशीचे पीक घेतले जाते. बोंडअळी व अपुरा पाऊस यामुळे कपाशीचे क्षेत्र ५० हजार हेक्टरने घटले असून सुमारे १...
  August 2, 12:10 PM
 • अकोले, राहुरी शहर- लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांची गरज लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. महाजन यांनी अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांना आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता १४०० क्युसेक आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९३१२ दलघफू आणि निळवंडे धरणाचा पाणीसाठा ६४६० दलघफू आहे. या...
  August 2, 12:01 PM
 • नेवासे- मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेणाऱ्या गंगापूर येथील काकासाहेब शिंदेच्या दहाव्याचा कार्यक्रम बुधवारी कायगाव टाेका येथे झाला. शिंदेने ज्या ठिकाणी जलसमाधी घेतली हाेती त्या कायगावच्या पुलाला त्याचे नाव मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने देण्यात अाले. तसा फलकही या ठिकाणी लावण्यात अाला. काकासाहेब शिंदेने २३ जुलै राेजी कायगावातील गाेदापात्रात जलसमाधी घेतली हाेती. त्या वेळी या ठिकाणी संतप्त जमावाने माेठ्या प्रमाणावर ताेडफाेड केल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली...
  August 2, 07:02 AM
 • नगर- ऐतिहासिक दिल्ली दरवाजा पाडावा की नाही, याचा अंतिम निर्णय आयुक्तस्तरावर होणार असला, तरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेशीच्या आतील बाजूस झालेली अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा, असा मतप्रवाह वाढत आहे. वेशीचे बांधकाम दगडांना क्रमांक देऊन उतरवून घ्यावे व सिद्धिबागेत तिचे स्थलांतरण करण्यात यावे असाही प्रस्ताव पुढे आला अाहे. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. स्वयंस्पष्ट अहवाल आल्यानंतर कारवाईचे संकेत देण्यात आले. हा...
  August 1, 12:36 PM
 • नेवासे- महसूल खात्यात नोकरीचे आमिष दाखवून बनावट निवडपत्र देऊन अंगणवाडी सेविकेला साडेतीन लाख रुपयांचा गंडा घालत जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. २ ऑगस्टपर्यंत त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नेवासे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळातील एक मोठे रॅकेट यामुळे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सुलतानपूर येथील अंगणवाडी सेविका सुनीता राजेंद्र देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे, २०१५ मध्ये संजय सोन्याबापू आगळे व त्यांची पत्नी जनाबाई संजय आगळे (नेवासेफाटा) यांनी सांगितले...
  August 1, 12:33 PM
 • वाळकी- पूर्वीच्या जिल्हा दूध संघाच्या व आता सात तालुका दूध संघाच्या मालकीच्या सावेडीतील ८९ गुंठे जागेची विक्री काही महिन्यांपूर्वी झाली होती. यात अटी-शर्थींचा भंग केल्याप्रकरणी बुऱ्हाणनगर येथील बाणेश्वर दूध संस्थेचे प्रतिनिधी रोहिदास कर्डिले यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागाचे सचिव, सहनिबंधक व जागेचे खरेदीदार साई मिडास यांना नोटीस देऊन १३ ऑगस्टला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या जागेची २७ कोटी ११ लाखांना बोली लावत साई...
  August 1, 12:30 PM
 • सोनई- इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी नेवासे पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी सभापती व पंचायत समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांच्याकडे सुपूर्द केला. गडाख म्हणाल्या, गेल्या वर्षभरात मराठा समाजाचे मोर्चे शांततेत झाले.आता हिंसाचार घडवून शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या सर्वाची परिणिती अनेक समाजबांधवांच्या आत्महत्येत होत आहे. त्यामुळे मी गेले काही दिवस...
  August 1, 12:21 PM
 • टाकळी ढोकेश्वर- पारनेर तालुक्यातील एकेकाळी निर्मल व आदर्श गाव म्हणून नावलौकिक असलेल्या गारगुंडीचे माजी सरपंच बाळकृष्ण संपत झावरे व निवृत्ती विठ्ठल झावरे यांना एक वर्षासाठी नगर व पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले. तडीपारीचे आदेश २ जुलैला पारनेरचे उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज यांनी पोलिसांना दिले असून दोन दिवसांपूर्वी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. दोघांना एक वर्षासाठी नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे व राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर व जुन्नर...
  July 31, 12:11 PM
 • नगर- निसर्ग सौंदर्याने नटलेले डोंगरगण, राष्ट्रीय नेत्यांच्या वास्तव्याने पुनित झालेला भुईकोट किल्ला, डोंगरावरचा सलाबतखान मकबरा, औरंगजेबाच्या शेवटच्या दिवसांचा साक्षीदार असलेले आलमगीर, आशियातील एकमेव असलेले रणगाडा संग्रहालय, ताजमहालाची आठवण करून देणारा फराहबख्क्ष महाल, अवतार मेहेरबाबांच्या चिरविश्रांतीचे स्थान असलेले मेहेराबाद आणि वंचित मुलांसाठी कार्यरत स्नेहांकूरला सावेडीतील ज्येष्ठ नागरिक मंचाच्या सदस्यांनी भेट दिली. निमित्त होतं वर्षा सहलीचं. मंचाच्या अध्यक्ष ज्योती...
  July 31, 12:07 PM
 • - पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांचा विद्यार्थिनींसाठी उपक्रम. - पोलिस बंदोबस्तामुळे महिला आणि विद्यार्थिनींमध्ये समाधान - बंदोबस्तामुळे बसस्थानक परिसरातील भुरट्या चोऱ्यांना आळा कर्जत- विद्यार्थिनींची छेड काढली, तर पोलिसी हिसका काय असतो हे सध्या टवाळखोर तरुणांना कळू लागले आहे. छेडछाडीला आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी शाळा आणि बसस्थानक परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे महिला ल विद्यार्थिनींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण झाले आहे. शहरात पाचवी...
  July 31, 12:03 PM
 
जाहिरात

RECOMMENDED