Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • कोपरगाव- अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने प्रियकरच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केला. ही घटना कोळपेवाडी परिसरातील सुरेगाव शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती तालुका पेालिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली. अनिल बाबासाहेब घुसळे (३६ वर्षे, सुरेगाव) असे मृताचे नाव अाहे. आरोपींमध्ये बाळू दिलीप खंडवे (२६ वर्षे) व विलास पुंजाराम कुवारे (४१ वर्षे, सुरेगाव) या दोघांचा समावेश आहे. रमा अनिल घुसळे व बाळू...
  August 31, 11:35 AM
 • अहमदनगर- गायरान जमिनीच्या वादातून पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी 51 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, कळसपिंपरी गावात अनेक वर्षांपासून गायरान जमीन होती. या जमिनीत कंस पवार यांचे कुटंब शेती करत होते. मात्र, या जमिनीवर जलसंधारणाचे काम करण्याचा निर्णय गावकर्यांनी घेतला. ग्रामस्थांनी या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात अर्ज दिला केला. मात्र,...
  August 30, 12:39 PM
 • नगर- आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हुकमी एक्के गळाला लावण्यासाठी राजकीय पातळीवर अर्थपूर्ण तडजोडींचा नवा फंडा यशस्वी होत आहे. उमेदवारीचा शब्द देऊन लाखोंचा मंट्याल देण्याचीही तयारी काही पक्षांनी दाखवली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण मोठी उलथापालथ होत असल्याने इतर पक्षांतून फुकट इनकमिंगची अपेक्षा करणाऱ्यांनी मात्र तोंडात बोटे घातली आहेत. दरम्यान, प्रभागांच्या फोडाफोडीमुळे चाचपणी करणाऱ्यांमध्येही संभ्रम वाढला आहे. महापालिकेचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत...
  August 30, 09:52 AM
 • राहुरी शहर- ऑनलाइन बुक केलेल्या मोबाइल पार्सलमध्ये चक्क धातूची मूर्ती व हळद-कुंकू देऊन एका महिलेने राहुरीच्या तरुणाला फसवले. फसगत झालेल्या तरुणाने पोलिसात धाव घेऊन घडलेल्या घटनेबाबत कैफियत मांडली. मात्र, पश्चातापाशिवाय काहीच वाट्याला आले नाही. मुजफ्फर बाबू इनामदार (बुवाशिंदबाबा गल्ली) या तरुणाला लकी ड्रॉमध्ये नंबर निघाला असून १८ हजार किमतीचा ओप्पो मोबाइल अवघ्या ४ हजारांत मिळणार आहे. वस्तू हवी असेल, तर नजीकच्या पोस्टात रक्कम भरून पार्सल ताब्यात घ्या, अशी माहिती अज्ञात तरुणीने...
  August 30, 09:45 AM
 • निघोज- गावातील अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून दिवसाढवळ्या तलवारी घेऊन गंुड फिरत आहेत. या अवैध व्यवसायांपेक्षा सरकारमान्य दारूची दुकाने चालू झालेली बरी, असे प्रतिपादन सरपंच ठकाराम लंके यांनी ग्रामसभेत करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. दारूबंदी उठवण्याचा ठराव आगामी ग्रामसभेत मंजूर होणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. आठ दिवसांपूर्वी सरपंच लंके यांना एका दारूविक्रेत्याने तलवार दाखल्याची चर्चा परिसरात होती. मात्र, याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही....
  August 30, 09:36 AM
 • नगर- महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयुक्तांनी शासन राजपत्रात प्रारूप प्रभागरचना व आरक्षण शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केले. दोन दिवसांपूर्वी प्रभागाची व्याप्ती स्पष्ट झाली असली, तरी अधिसूचनेकडे लक्ष लागले होते. प्रभागाची रुपरेषा लक्षात आल्यानंतर नगरसेवकांसह इच्छुकांची धावपळ उडाली आहे. आगामी निवडणूक १७ प्रभागांतील ६८ जागांसाठी होणार असून चार नगरसेवकांचा एक प्रभाग असेल. दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी आरक्षणाची सोडत जाहीर केली. ९ जागा अनुसूचित जाती, १...
  August 29, 12:03 PM
 • जामखेड शहर- जामखेडजवळील धोत्री गावात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दरोडा पडला. सात ते आठ दरोडेखोरांनी पती-पत्नीवर सत्तूरने वार करून गंभीर जखमी केले. सुमारे ७५ हजारांचा सोन्या-चांदीचा ऐवज त्यांनी लांबवला. जखमींना मध्यरात्री नगरला हलवण्यात आले. अजिनाथ निवृत्ती जाधव व नर्मदा अजिनाथ जाधव अशी जखमींची नावे आहेत. दादासाहेब आजीनाथ जाधव (२९, जाधव वस्ती, धोत्री शिवार, जामखेड) हे सोमवारी रात्री कुटुंबीयांसमवेत झोपले असताना चार दरोडेखोरांनी घराचा दरवाजा लाथा आणि दगड मारून उघडला....
  August 29, 11:49 AM
 • राहाता- मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी असलेला नमुना ६ अर्ज श्री साईरामच्या नावे भरून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरुद्ध राहाता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार माणिकराव आहेर यांनी मंगळवारी याबाबत फिर्याद दाखल केली. शिर्डी मतदारसंघात सुरू असलेल्या मतदार नोंदणी व पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑनलाइन वेबसाइटवरून मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, तसेच नावात दुरुस्ती, पत्ता, वय बदलण्यासाठी विविध फॉर्म...
  August 29, 07:39 AM
 • नगर- बदली होऊनही हजर न झालेल्या व रूजू होऊन दीर्घरजेवर गेलेल्या प्राथमिक शिक्षकांवर कारवाई करावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभापती राजश्री घुले यांनी सोमवारी दिली. शिक्षण समितीच्या सभेत प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या धोकादायक असलेल्या इमारतींमधील विद्यार्थ्यांची सोय पर्याय ठिकाणी करण्याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. रिक्त...
  August 28, 11:18 AM
 • नगर- महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (२४ ऑगस्ट) सोडत काढण्यात आली. त्याच दिवशी प्रभागाच्या चतु:सीमा व समाविष्ट भागासह नकाशे मनपाच्या आवारात प्रसिद्ध करण्यात आले होते. पण कोणती कॉलनी, नेमकी कोणाच्या प्रभागात समाविष्ट झाली, याबाबत नगरसेवकांसह इच्छुकांत मोठा संभ्रम आहे. प्रभाग रचनेची अधिसूचना सोमवारी जाहीर होणार असल्याने नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मनपात गर्दी केली होती. त्यावेळी प्रशासनाने शिळ्या कढीला फोडणी देत शुक्रवारी प्रसिद्ध केलेले नकाशेच मनपात डकवले....
  August 28, 11:13 AM
 • राहुरी शहर- वाळूतस्करांकडून माणसांपाठोपाठ जनावरे चिरडण्याचे काम सुरू अाहे. मात्र, पोलिस व महसूल प्रशासन अन्यायग्रस्ताला न्याय देण्याऐवजी वाळूतस्करांना संरक्षण पुरवत असल्याचा आरोप करत मेंढपाळ संघटनेचे अध्यक्ष व नांदगावचे सरपंच सखाराम सरक यांनी प्रशासनाच्या खाबुगिरीचे वाभाडे काढले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उजव्या कालव्याजवळ वाळूच्या डंपरची धडक बसून १४ मेंढ्या ठार झाल्याची घटना २२ ऑगस्टला रात्री घडली. पारनेर तालुक्यातील कण्हेर पोखरी येथील पोपट कोंडिबा हंडे हे मेंढ्या...
  August 28, 10:50 AM
 • नगर- प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे जाहीर होताच सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी दुसऱ्या टप्प्यातील चाचपणीला सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रसंगी प्रतिस्पर्धी पक्षाला खिंडार पाडण्याची रणनिती आखली जात आहे. फोडाफोडीच्या राजकारणाची सर्वच पक्षांनी धास्ती घेतली अाहे. दरम्यान, आमच्याच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचा दावा सर्वच पक्षातील पदाधिकारी करत आहेत. भाजप व शिवसेना स्वबळावर लढणार आहे, तर आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे...
  August 28, 10:05 AM
 • पाथर्डी- भंडारदरा धरण भरले, मुळा धरण येत्या काही दिवसांत भरेल. मात्र, घाटशील धरण अजून कोरडेठाक आहे. धरणात पाण्याचा एकही थेंब नाही. ऑगस्ट महिना संपत आला, तरी पाथर्डी परिसरात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर तालुका उभा अाहे. अधूनमधून पडणाऱ्या भीज पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळून चाऱ्याचा प्रश्न काही काळापुरता सुटला आहे. गेल्या वर्षी पाथर्डी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला होता. या पाणीसाठ्यावर आतापर्यंत पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची जेमतेम गरज भागली. उपलब्ध...
  August 27, 11:39 AM
 • श्रीगोंदे- खासदार दिलीप गांधी यांचा देऊळगाव येथील कार्यकर्ता सचिन गायकवाड यांचा भाऊ शिवदास गायकवाड हा खरेदी केलेल्या जमिनीचे पैसे देत नव्हता. घोगरगाव येथील अरुण उगले यांनी पैसे मागितले असता त्यांच्या अंगावर कार घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणातील फरार आरोपी शिवदास गायकवाड यास पोलिसांनी शनिवारी पहाटे ४ वाजता गजाआड केले. श्रीगोंदे तालुक्यातील देऊळगाव येथील सचिन गायकवाड याने घोगरगाव येथील अरुण मारुतराव उगले (४९) यांच्याकडून चाळीस लाखांना शेतजमीन विकत घेतली....
  August 27, 11:35 AM
 • नेवासेफाटा- गावच्या विकासाच्या स्वप्नाने त्यांना झपाटले. गावाशी नाळ जोडत व ती मजबूत करण्यात यश येताच ते समाजाचे सेवेकरी बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली गावाने वर्षभरातच मोठी मजल मारली. सरपंच नाथा घुले यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकासाची गंगा आणली. नियोजनबद्ध पद्धतीने या गावचा होत असलेला विकास व बदललेलं रूप कौतुकास्पद आहे. नाथा घुले यांचा पोलिस उपअधीक्षक ते सरपंच असा पोलिस वर्तुळातून राजकीय, सामाजिक वर्तुळातला प्रवास. नोकरीनिमित्त बाहेर असतानाही गावाची नाळ घुले...
  August 27, 11:30 AM
 • नगर- शहर व जिल्ह्यात एकाच वर्षात सुमारे सव्वा कोटी रुपये िकमतीच्या तब्बल ५०७ दुचाकी चोरट्यांनी लांबवल्या. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दोन वर्षातील हा आकडा नऊशेच्याही पुढे गेला आहे. यावरूनच जिल्ह्यात दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांना मात्र या रॅकेटपर्यंत पोहचण्यात अद्याप यश आलेले नाही. शहर व जिल्ह्यातून दररोज सरासरी दोन दुचाकी वाहनांची चोरी होत असताना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसतात. खून, दरोडा, अत्याचार या मोठ्या...
  August 27, 11:26 AM
 • प्रतिनिधी- अकाेला- अकाेला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम या पाच जिल्ह्यात डेंग्यूचा प्रभाव चांगलाच वाढला अाहे. १ जानेवारी ते २१ ऑगस्ट १८ दरम्यान डेंग्यूचे ११७ बाधित रुग्ण आढळले असून ६८६ संशयित रुग्ण आढळले. तसेच तसेच हिवतापाचे ७६ रुग्ण अाढळले अाहे. हिवतापासाठी अकोला जिल्ह्यात १,८५,४१३ रक्त नमुने तपासण्यात आले. त्यातील २३ संशयित आढळले. वाशीम जिल्ह्यात १,३४,७३८ रक्त नमुने तपासले असता ९ संशयित आढळले. अमरावती जिल्ह्यात २,५८,१३५ रक्त नमुने तपासून त्यामध्ये २७ संशयित तर दोघांना हिवताप...
  August 25, 11:15 AM
 • शेवगाव- पोलिस निरीक्षकाला फसवणारा शिवसंग्रामचा तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी रात्री त्याच्या राहत्या घरातून जेरबंद केले. मागील आठवड्यात त्याच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात तब्बल चार गुन्हे दाखल झाले आहेत. आमदार विनायक मेटे यांचा बनावट आवाज काढून पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना त्याने सुमारे सहा लाख २० हजार रुपयांना गंडा घातला होता. चापडगाव येथील राधाबाई दादासाहेब गोर्डे या महिलेची जमीनविक्री व्यवहारात १५ लाख रुपयांची फसवणूक व...
  August 25, 11:07 AM
 • नगर- महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून प्रारूप प्रभागरचना व आरक्षणाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मनपा सभागृहात शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभागरचना व आरक्षण पाहून काही दिग्गजांच्या कपाळावर आठ्या उमटल्या, तर काहींना दिलासा मिळाला. विद्यामान सदस्यांचा कार्यकाळ २९ डिसेंबरला संपणार आहे. प्रभागरचना करताना उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य, त्यानंतर पूर्वेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभागरचना करताना भौगोलिक...
  August 25, 10:58 AM
 • कोपरगाव- धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा या व अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातील खंडोबा मंदिरापासून पारंपरिक वेशात जागरण गोंधळ करत मेंढ्यांसह मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार किशोर कदम यांना मागण्यांचे निवेदन मोर्चेकरांनी दिले. निवेदनात म्हटले आहे, चार वर्षांपूर्वी फडणवीस सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या सवलतींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजमितीस त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव...
  August 25, 10:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED