Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • अहमदनगर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील दोषींच्या शिक्षेबाबत आज अहमदनगर कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज सकाळी ११ वाजता आरोपी संतोष भवाळ याच्या शिक्षेवर युक्तीवाद करण्यात आला. अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी भवाळचा युक्तीवाद पूर्ण केला. त्यानंतर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्जल निकम तीनही आरोपींच्या शिक्षेवर युक्तीवाद करत आहेत. या युक्तीवादादरम्यान त्यांनी तीनही दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दुपारी दीडपर्यंत या खटल्याचा...
  2 mins ago
 • नगर - नाशिक,जळगाव, धुळे, नंदुरबार नगरमधील पारधी समाजाच्या युवकांसाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. पोलिसांच्या मुलांनाही या मेळाव्याचा लाभ घेता येईल. न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी वाजता मेळाव्यास सुरूवात होईल. पुणे इतर ठिकाणच्या ५० मल्टीनॅशनल कंपन्यांचे अधिकारी मुलाखती घेतील. मेळाव्यात सहभागी सर्वांना एका वर्षासाठी मोफत जॉब कार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली....
  4 mins ago
 • नगर- कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या तिन्ही दोषींना द्यावयाच्या शिक्षेवर मंगळवारी सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरू झाला. यात तिसऱ्या क्रमांकाचा दोषी नितीन भैलुमे व मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. बुधवारी दुसऱ्या क्रमांकाचा दोषी संतोष भवाळच्या वतीने युक्तिवाद होईल. नंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करणार आहेत. या घटनेनंतर राज्यभर...
  04:00 AM
 • नगर- गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची पालकमंत्री राम शिंदे यांनी घटनेच्या पाचव्या दिवशी भेट घेतली. शेवगाव तालुक्यातील घोटण-खानापूर येथे ऊसदरासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात हे शेतकरी जखमी झाले होते. शिंदे यांनी सावेडीतील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये जाऊन या शेतकऱ्यांची विचारपूस केली. पालकमंत्री शिंदे यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजीत माने, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा,...
  November 21, 06:45 AM
 • राहुरी शहर- जगाच्या तुलनेत आशिया खंडात सर्वांत कमी पाणीसाठे आहेत. भूगर्भातील पाण्याचा सर्वात जास्त वापर होत असल्याने दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भीक्ष्य वाढत चालले आहे. त्यासाठी सांडपाण्याचा पुर्नवापर, शेतीला सूक्ष्म सिंचनाची जोड, पाणी वाटपाच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, तसेच पाणी गळतीचे प्रमाण थांबवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन युनायटेड किंडम येथील लाॅगबोराॅग विद्यापीठाचे शास्रज्ञ डाॅ. इयान स्माॅट यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे...
  November 21, 06:42 AM
 • नगर- जनतेचा कौल ओळखून सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, पण पारदर्शक कर्जमाफीच्या नावाखाली ऑनलाइनचा कोलदांडा घातला. या दिव्यातून पार पडून पावणेचार लाख शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी तीन हजार ३४७ शेतकऱ्यांना पात्र ठरवून १८ कोटी ११ लाख रुपये शासनाने उपलब्ध करून दिले. प्रत्यक्षात सुमारे दीड हजार शेतकऱ्यांच्या खात्यातच माफीची रक्कम पोहोचली. जटिल नियमावलीत अडकलेल्या यादीतील घोळामुळे नऊ कोटी खात्यात वर्ग होऊ शकले नाहीत. उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांना अजून दमडीचीही माफी मिळाली नाही....
  November 21, 06:39 AM
 • श्रीरामपूर- मर्यादित आणि अनिश्चित उत्पन्नामुळे गावाचा विकास खुंटतो. त्यामुळे शासकीय निकष पूर्ण करणाऱ्या मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत किंवा नगरपालिका हा एक चांगला पर्याय आहे, असे प्रतिपादन आदर्श हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. पवार यांनी बेलापूर बुद्रूक ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी अनौपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, गावगाडा हाकताना गावासाठी काय भलं आहे याचे चिंतन, मनन आणि सखोल अभ्यास करणे गरजेचा...
  November 21, 06:37 AM
 • संगमनेर- संगमनेरकरांसाठी प्रवरा नदी अमृतवाहिनी म्हणून आेळखली जाते. बारमाही वाहणारी प्रवरा गेल्या काही वर्षांत मात्र सातत्याने कोरडीठाक असते. यावर्षी मात्र प्रवरेने सलग १२१ दिवस अखंड वाहण्याचा विक्रम केला. हे आैचित्य साधत भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रवरामाईचे जलपूजन केले. यावर्षी निसर्गाने पावसाचे भरभरून दान दिले आणि संगमनेरकरांची जीवनदायिनी असलेली अमृतवाहिनी प्रवरा जुलै महिन्यापासून सातत्याने गेले १२१ दिवस अखंड प्रवाहित आहे. अनेक वर्षांनी असा सुयोग जुळून आला. परमेश्वराने...
  November 21, 06:20 AM
 • कोपरगाव- संजीवनी अॅकेडमीच्या सहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांसह राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन बालदिन साजरा केला. हा बहुमान महाराष्ट्रातील फक्त चार शाळांना मिळाला. त्यात जिल्ह्यातून संजीवनी अकॅडमीचा समावेश होता, अशी माहिती संजीवनी अकॅडमी या स्कूलच्या संचालिका मनाली कोल्हे यांनी दिली. कोल्हे म्हणाल्या, राष्ट्रपतींबरोबर बालदिन साजरा करण्याच्या संधीसाठी स्कूलने प्रस्ताव सादर केला होता. त्यात स्कूलच्या उपलब्धींबाबत पुराव्यांसह माहिती पाठवली...
  November 20, 06:29 AM
 • संगमनेर- वाळूत स्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर हल्ला करुन वाहने पळवून नेल्याची घटना घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. नायब तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या तक्रारीवरुन घारगाव पोलिस ठाण्यात तिघा वाळूतस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी नायब तहसीलदारांनादेखील तस्करांनी धक्काबुक्की केली. तालुक्यातील पठार भागात समावेश असलेल्या मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होतो. वाळूउपशासाठी जेसीबी,...
  November 20, 06:26 AM
 • नेवासे फाटा- भारतीय संस्कृतीत अन्नदान पवित्र मानले जाते. दर शनिअमवस्येला शनिशिंगणापुरातील यात्रोत्सवात अन्नदान करणाऱ्यांचे हात राबत असतात. दिल्ली, हरियाणा मुंबई येथील भाविकांकडून केल्या जाणाऱ्या अन्नदानाचा लाभ लाखो शनिभक्तांना होतो. भंडारादानात सर्वाधिक संख्या आहे हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील शनिभक्तांची. गेल्या १७ वर्षांपासून शनिशिंगणापुरात हा विशाल भंडारा अन्नदान करत आहे. शनिमंदिर सेवा मंडळ, मंडी डबवाली, हरियाणा, शनिदेव सेवा समिती ऐलनाबाद, सिरसा हरियाणा, शनिदेव सेवा सदन...
  November 20, 06:25 AM
 • श्रीरामपूर- जुने पढेगाव येथे कोळशाच्या भट्टीवर काम करणाऱ्या दोन आदिवासी मजुरांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृतदेहाशेजारी दारूच्या बाटल्या होत्या. संतोष शिवा वाघमारे (वय ४५) रवींद्र सखाराम घोगरे (२८) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही गायचूर (ता. रोहा, जि. रायगड) येथील रहिवासी आहेत. शनिवारी आठवडे बाजार असल्यामुळे त्यांना सुटी होती. रविवारी ठेकेदाराने त्यांच्या झोपडीजवळ शोध घेतला असता ते सापडले नाहीत. अखेर शेतातील कोळशाच्या भट्टीजवळ सकाळी त्यांचे मृतदेह आढळून आले.पोलीस निरीक्षक वसंत...
  November 20, 06:18 AM
 • अहमदनगर- शेवगाव येथे ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची चौकशी श्रीरामपूरचे प्रांतधिकारी करणार आहेत एक महिन्यात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शेवगाव-पैठण रस्त्यावरील घोटण, खानापूर, एरंडगाव कऱ्हेटाकळी आदी गावांत ऊस दरासाठी रास्ता रोको करण्यात आला होता. रस्त्यावर टायर, लाकडे जाळत पैठण डेपोची एसटीही पेटवण्यात आली होती. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली होती. लाठीमारानंतर जमावाने पोलिसांच्या...
  November 19, 06:24 PM
 • नगर- नगर शहरात सध्या लघुपट निर्मितीला चांगले दिवस आले असून या क्षेत्राकडे युवकांचा कल वाढत आहे. शहरी ग्रामीण भागात विविध विषयांवर अनेक लघुपट तयार होत असून नगर आष्टी तालुक्यातील कलाकारांनी एकत्र येऊन सपान लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे, अशी माहिती निर्माते संजय घाडगे यांनी नुकतीच दिली. आष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथे संजय व्हिजनच्या सपान लघुपट निर्मितीचा शुभारंभ उद्योजक कांतीलाला चनोदिया, चित्रपट निर्माते संजय घाडगे, सरपंच राजू गव्हाणे, मुख्याध्यापक मच्छिंद्र शेळके, गणेश कराळे...
  November 19, 05:47 AM
 • पारनेर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे भीमा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी आपल्या भाषणात विरोधकांवर टीका करण्याच्या उद्देशाने नाभिक समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून नाभिक संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, या मागणीसाठी तालुका नाभिक संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालयावर...
  November 19, 05:42 AM
 • नेवासेफाटा/सोनई- शनि अमावास्येनिमित्त शनिवारी शनिशिंगणापुरात सुमारे पाच लाखांहून अधिक भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. शुक्रवारी रात्री १२ वाजता शनिदेवाची महाआरती महापूजा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आॅस्ट्रेलियातील शनिभक्त राकेशकुमार यांच्या हस्ते, तर शनिवारी पहाटेची महाआरती झिम्बाब्वेतील शनिभक्त जयेश शहा, खासदार चंद्रकांत खैरे, डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. शुक्रवारी रात्री दहा वाजेपासूनच भाविकांची शिंगणापुरात गर्दी होऊ लागली. शनिवारी दिवसभरात, तर गर्दीने...
  November 19, 05:39 AM
 • अहमदनगर- महाराष्ट्राचे समाजमन ढवळून काढणाऱ्या कोपर्डी (ता. कर्जत, जि. नगर) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खूनप्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले. मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (२५), सहआरोपी संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) यांच्यावरील दाेषारोप सिद्ध झाल्याचे स्पष्ट करत जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निर्णय सुनावला. २१ व २२ नोव्हेंबरला शिक्षेबाबत युक्तिवाद होईल, त्यानंतर शिक्षा सुनावली जाणार आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार...
  November 19, 03:57 AM
 • नगर-संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खूनप्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयाने शनिवारी मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (२५), सहआरोपी संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) यांना तिघांना दाेषी ठरवले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितिजन्य पुरावे, वैद्यकीय पुराव्यांच्या अाधारे विशेेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रभावी युक्तिवाद करून अाराेपींना दाेषी ठरवण्याइतपत पुरावे न्यायालयासमाेर मांडले. विशेष...
  November 19, 03:00 AM
 • नगर- कोपर्डी (ता. कर्जत) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी तिन्ही अाराेपींना नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी दाेषी ठरवले. अाता २२ नाेव्हेंबर राेजी त्यांना शिक्षा ठाेठावण्यात येणार अाहे. ज्या नराधमांनी माझ्या छकुलीचे लचके तोडले त्यांचेही लचके तोडा. या अाराेपींना जन्मठेप नव्हे, तर फाशीच झाली पाहिजे. त्याशिवाय नराधमांवर जरब बसणार नाही. जेणेकरून पुन्हा कोणाच्याही मुलीवर असा प्रसंग उद्भवणार नाही, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या अाई-वडिलांनी...
  November 19, 12:55 AM
 • अहमदनगर- शिर्डीहून शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या जीपला राहुरीत अपघात होऊन 2 जण ठार तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे भाविक गुजरात, नाशिक, यवतमाळ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोलानाथ पाचारे (रा. वणी) व विवेकानंद आचल (रा. हैदराबाद) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. शिर्डीला आलेले हे भाविक जीपमधून शनिशिंगणापूरकडे निघाले होते. अहमदनगर-मनमाड महामार्गाने जात असताना राहुरीत रस्त्यात उभ्या असलेल्या एका वाहनावर जीप आदळून हा...
  November 18, 05:01 PM
 
जाहिरात

RECOMMENDED