Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • नगर- पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी घातक असलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून चक्क इंधन निर्मिती करण्याचा अभिनव प्रकल्प पारनेर तालुक्यातील सुपे एमआयडीसीमध्ये सुरू आहे. नगरचे उद्योजक क्षितीज झावरे व पुणे येथील श्रीरंग भातखंडे यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात दररोज १२ टन प्लास्टिक कचऱ्यापासून तब्बल सहा हजार लिटर इंधन तयार होते. नाशिक व अहमदाबाद येथेही त्यांनी हा प्रकल्प सुरू केला असून नगर शहरातील सर्व प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रियेची जबाबादारी घेण्यास हे उद्योजक तयार आहेत....
  10:51 AM
 • राहुरी शहर- मलकापूर नगर परिषदेच्या धर्तीवर राहुरीच्या जोगेश्वरी पाणी योजनेतून मीटर पध्दतीने २४ तास पाण्याचा पुरवठा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मलकापूरचे नगराध्यक्ष भाऊ शिंदे यांनी राहुरी भेटीत या योजनेची माहिती देऊन योजना पहायला येण्याचे निमंत्रण राहुरीच्या नगरसेवकांना दिले. तीस हजार लोकसंख्या असलेल्या मलकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच असताना भाऊ शिंदे यांनी २४ तास पाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ केला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंते बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली...
  10:48 AM
 • शिर्डी- साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी शिर्डीतील विकासकामे व पायाभूत सुविधांना मूठमाती देत साईबाबांच्या झोळीवर डल्ला मारून सरकारच्या मदतीने शेकडो कोटी विदर्भासाठी पळवले. त्यासाठी सरकारने हावरेंना राज्यमंत्रिपदाऐवजी कॅबिनेट दर्जा बहाल करावा, अशी टीका प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी केली. पत्रकारांशी बोलताना कोते म्हणाले, साई समाधी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हावरे यांनी मोठ्या घोषणा केल्या, पण एकही प्रत्यक्षात आली नाही. संस्थानच्या दोन्ही रूग्णालयांची...
  10:42 AM
 • पाथर्डी- नगरपालिकेतील ठेकेदारीवरुन कसबा पेठेत राहणारा पालिकेचा ठेकेदार व विद्यमान नगरसेवकाच्या भावात रविवारी तुंबळ मारामारी झाली. यात नगरसेवकाच्या भावासह पालिका ठेकेदार गंभीर जखमी झाला. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नगर येथे हलवण्यात आले. संबंधित ठेकेदार व नगरसेवकांच्या गटात पालिकेच्या ठेकेदारी कामांवरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. रविवारी दुपारी दोन्ही गटांत ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्याच्या कारणावरुन कसबा पेठेतील मारुती मंदिराजवळ...
  10:31 AM
 • शिर्डी - स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात शिर्डीने देशात तिसरा व राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात शिर्डीने हे यश संपादन केले. राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल नगरपंचायतीला पंधरा कोटींचे बक्षीस मिळणार आहे. शहरे स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने काही मानके ठरवून देशभरातील महापालिका व नगरपालिकांचे सर्वेक्षण केले. प्रत्येक घरातील कचरा गोळा करणे, त्याचे ओला व सुका असे विलगीकरण करणे, त्यावर प्रक्रिया करणे, सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करून...
  June 24, 11:06 AM
 • नगर - सन २०१६ पासून राज्यात खरीप हंगामाकरिता पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भात, बाजरी, भूईमूग, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, मूग, तूर, उडीद, कापूस, मका व कांदा या पिकांचा विमा योजनेत समाविष्ट केलेला आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने या योजनेंतर्गत जोखमीची व्याप्ती वाढवली आहे. आता या योजनेतील जाेखमीची व्याप्ती ७० टक्के करण्यात आली आहे. याेजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत आहे. या योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास...
  June 24, 11:02 AM
 • श्रीरामपूर- गोंधळ घालणाऱ्या चौथीतील विद्यार्थ्यांना शिक्षकाने तब्बल २०० उठबशा मारण्याची शिक्षा केली. या प्रकारानंतर मुलांना चालणेही कठीण झाल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. एवढे होऊनही शाळा व्यवस्थापनाने हात वर केल्याने पालकांनी तालुका शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शुक्रवारी चौथीच्या वर्गातील विद्यार्थी वर्गात गोंधळ घालत होते. गणेश पाटील या शिक्षकाने गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना २००...
  June 24, 11:00 AM
 • नगर - शाळा आणि महाविद्यालये देणग्या उकळत असतील, तर त्यांच्याविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार करा. देणग्या उकळताना ज्या शाळा, महाविद्यालये आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. प्रसंगी अशा शाळा बंद केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी दिली. दरम्यान, मागील चार वर्षांत केंद्रातील एकाही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री जावडेकर पुण्याहून शिर्डीला जात असताना खासदार दिलीप गांधी...
  June 24, 10:56 AM
 • नगर - प्लास्टिक व थर्माकोल बंदी कायद्याची शहरात काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने उपायुक्त, उपआरोग्याधिकारी, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी सावेडी उपनगरातील तीन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कॅरीबॅग बाळगणाऱ्या या दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यभर या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नगर शहरात...
  June 24, 10:43 AM
 • नगर- नगर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असून त्याचा आलेख कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहे. लुटमार व चोरीच्या घटनांमुळे नगर शहर असुरक्षित बनले आहे. पोलीसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत, त्यामुळे नागरिकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. चोरीच्या घटनांना आळा घालून शहरातील नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे...
  June 23, 10:59 AM
 • कोपरगाव- तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदेकसारे येथील आनंदवाडी परिसरात गुरुवारी (२१ जून) सायंकाळी सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह अतिवृष्टी झाली. सहाशे लोकवस्तीच्या या गावातील सुमारे शंभर घरांना त्याचा मोठा तडाखा बसला. संजीवनी आपत्ती निवारण पथकाने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची सुटका केली. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन पुरुष व दोन महिलांना दोराच्या साहाय्याने वाचवण्यात यश आले. मात्र, गायी व वीस शेळ्यांना जीव गमवावा लागला. विजांचा कडकडाट आणि...
  June 23, 10:52 AM
 • नगर- शिर्डी व परिसरात गुरुवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. नगर-मनमाड महामार्गावरील शासकीय विश्रामगृह व पोलिस ठाण्यात पाणी शिरल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आत प्रवेश करण्यासाठीही मोठी कसरत करावी लागली. महामार्गाला लागून असलेल्या गटारावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने पाणी साठले. वादळी वाऱ्यासह तब्बल तीन तास पडलेल्या पावसाने अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने लोकांची तारांबळ उडाली. झोपडपट्टीतील...
  June 23, 10:45 AM
 • नगर- गेल्या दीड वर्षात सव्वाशेपेक्षा अधिक अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यापैकी बहुतांश गुन्हेगार तुरूंगात आहेत. मात्र, असे असतानाही शहरासह जिल्हाभरात लूटमार, धमकी, घरफोड्या, तसेच इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. भरदिवसा लाखो रुपयांची चोरी होते, तरी पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. एका पत्रकाराला हात-पाय तोडण्याची धमकी, तर अन्य एका पत्रकाराला धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटल्याचा प्रकार नुकताच घडला. दैनिक दिव्य मराठीचे वार्ताहर दीपक कांबळे यांना गुरूवारी पहाटे नगर-पुणे...
  June 22, 10:31 AM
 • राहाता- निळवंडे धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे श्रीसाईबाबा संस्थान, शिर्डी नगरपंचायत व कोपरगाव नगरपरिषदेस पाणी दिल्यास १२ हजार २०१ हेक्टरचे सिंचनाचे पाणी कमी होणार असल्याची गंभीर बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपंचायत व कोपरगाव नगरपरिषदेला निळवंडे धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पिण्याचे पाणी देण्यास राज्याच्या विधी व न्याय खात्याने ७ फेब्रुवारीला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १८ जानेवारी २०१७ रोजी तांत्रिक मान्यता दिल्याने निळवंडे...
  June 22, 10:28 AM
 • कोेपरगाव- पाणी ही राष्ट्राची संपत्ती आहे. निळवंडे धरणातील पाण्यावरही सर्वांचा हक्क आहे. याच भूमिकेतून कोपरगाव शहराला निळवंड्यातून पिण्याचे पाणी शासन देणार आहे. तुम्ही काळजी करू नका, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी संजीवनी ग्रूप आॅफ इन्स्टिट्यूट कार्यस्थळावर बागडे यांच्या हस्ते आपत्ती निवारण पथकाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते....
  June 22, 10:24 AM
 • राहुरी शहर- मुळा धरणातील जलाशयात विषारी औषध टाकून सुरू असलेल्या अवैध मासेमारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या अटी व शर्तीचा भंग केल्याबद्दल नेरूळ (मंबई) येथील ब्रीज फिशरी कंपनीच्या व्यवस्थापकाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मुळा पाटबंधारे उपविभागीय अधिकारी एन. बी. खेडकर यांनी या संदर्भात गुरूवारी फिर्याद दिली. महाराष्ट्र मत्स्य उद्योगामार्फत ब्रीज फिशरी कंपनीला १ जुलै २०१७ पासून ५ वर्षांसाठी मुळा धरणातील मत्स्य संवर्धनाचा ठेका देण्यात आला आहे. या ठेक्यातील अटी व...
  June 22, 10:20 AM
 • राहुरी- रस्त्यातील रहदारीला अडथळा करणारी बाजारपेठेतील अतिक्रमणे, स्वच्छतेबाबत ठेकेदाराकडून होणारी चालढकल, तसेच वर्षानुवर्षे मालमत्ता व जागाभाडे भरण्यास नकार देणाऱ्यांना सरळ करण्याचे आव्हान नव्याने पदभार घेतलेले मुख्याधिकारी अनुप दरे यांच्यासमोर आहे. धुळे महापालिकेत सहायक उपायुक्त म्हणून काम पाहिलेले दरे यांनी राहुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार नुकताच हाती घेतला. पदभार स्वीकारताच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामाची माहिती घेऊन नागरी...
  June 21, 10:29 AM
 • टाकळी ढोकेश्वर- खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पटसंख्येत वाढ होण्यासाठी शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळेत सेमी इंग्रजीचा पॅटर्न आणला आहे. पारनेर तालुक्यातील पानोली गावात अंगणवाडीतच सेमी इंग्रजी पॅटर्न आणला गेला असून लोकसहभागातून राज्यातील पहिली सेमी इंग्लिश अंगणवाडी उभारण्याचा मान पारनेर तालुक्यातील या गावाला मिळाला आहे. या सेमी इंग्लिश अंगणवाडीच्या उद््घाटनप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. राज्यभर हा...
  June 21, 10:25 AM
 • मुंबई/ नेवासे- शिर्डीप्रमाणेच अाता नगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर शनैश्वर देवस्थानही लवकरच राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येईल. अाजवर खासगी ट्रस्टकडे असलेल्या या देवस्थानसाठी स्वतंत्र कायदा करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात अाली. या निर्णयामुळे शनिशिंगणापूर गावातीलच व्यक्ती विश्वस्त व अध्यक्षपदी निवडण्याची १९६३ पासूनच परंपरा खंडित झाली आहे. अाता ट्रस्टचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी व विश्वस्तांची निवड राज्य सरकार करणार आहे. यासंदर्भात...
  June 21, 07:24 AM
 • बोधेगाव- मुले पळवणारी टोळी आल्याच्या अफवा पसरल्याने गावागावांत सध्या भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा कुठल्याही माहितीवर विश्वास न ठेवता संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्याला मारहाण न करता पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद, बीड, जालना जिल्ह्यात आलेले अशा अफवांचे लोण आता नगर जिल्ह्यात आले आहे. सोशल मीडियातील या अफवांमुळे ग्रामस्थ सध्या रात्र-रात्र जागून काढत आहेत. अपरिचित, संशयास्पद, मनोरूग्ण, भटके, साधूवेशातील, स्री वेशातील,...
  June 20, 11:25 AM
 
जाहिरात

RECOMMENDED