जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • विजय मांडके | सातारा अनेक वर्षे राष्ट्रवादीत असूनही एकमेकांचे ताेंडही न पाहणारे साताऱ्यातील माजी आमदार शिवेंद्रराजे व माजी खासदार उदयनराजे हे बंधू आता पुन्हा भाजपच्या माध्यमातून एकाच पक्षात आले आहेत. आता तरी त्यांच्यातील मतभेद संपतील का, असा प्रश्न सातारावासीयांना पडलेला हाेता. मात्र रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाेन्ही राजांना आपल्यासमवेत रथात एकत्र आणले. या सर्वांनी मिळून पाेवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्याच...
  September 16, 08:25 AM
 • सातारा - पुणे बंगलोर महामार्गावरील सातारा तालुक्याच्या हद्दीत डी मार्ट जवळ मुंबईकडून बेळगावकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलसने समोर चाललेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास मुंबईवरून बेळगावकडे निघालेल्या KA 01 AF 9506 या एसआरएस कंपनीच्या ट्रॅव्हल्सने पुढे चाललेल्या ट्रकला (MH 43 BP 3127) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॅव्हल्सचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या...
  September 12, 11:14 AM
 • सांगली - सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी ३३ फूट झाली आहे. त्यामुळे पुराचा धोका कायम आहे. कोयना धरणातील विसर्ग कमी करून साेमवारी दुपारी १२ वाजता ४५ हजार २६७ क्युसेक करण्यात आला आहे. वारणा धरणातून ११ हजार ८९४ क्युसेक, अलमट्टी धरणातून २ लाख २० हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे लवकरच पूरपरिस्थिती नियंत्रणात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सकाळपासून धरणक्षेत्रात पाऊस कमी झाला असून कोयना येथे २१ मिलिमीटर, नवजा येथे २५ मिलिमीटर, महाबळेश्वर येथे २३...
  September 10, 09:19 AM
 • सांगली -पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केली. या मागणीसाठी ३१ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील महापूर निसर्ग आणि मानवनिर्मितही आहे....
  August 23, 08:06 AM
 • तुळजापूर : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दि.२९ सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार असून नवरात्रोत्सवातील धार्मिक विधी व इतर प्रथा परंपरांची माहिती जाहीर झाली आहे. यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवावर दुष्काळ आणि महापूर असे दुहेरी सावट राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा वर्षातील...
  August 22, 07:46 AM
 • कोल्हापूर - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरून पूरग्रस्तांसाठी मदत मागितली होती. यावर संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नसल्याचे सांगत त्यांनी विनोद तावडेंवर निशाणा साधला. भाजपने केले होते मदत फेरीचे आयोजन कोल्हापूर - सांगलीतील पूरग्रस्तांसाठी राज्यासह देशभरातून मदत येत आहे. याच पार्श्वभूमीवर 11 ऑगस्ट रोजी भाजपने मुंबईत मदत फेरी काढली होती. या फेरीत मंत्री विनोद तावडे आणि...
  August 20, 01:14 PM
 • लातूर -पूरग्रस्त भागातील जनावरांवर उपचार करण्यासाठी सांगलीत गेलेल्या लातूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकातील पशुधन पर्यवेक्षक नारायण खरोळकर यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे कार्यरत होते. त्यांच्या निधनाबद्दल पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दु:ख व्यक्त केले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुराच्या तडाख्याने अनेक जनावरांचा मृत्यू झाला. बचावलेली जनावरे साथीच्या आजारांना बळी पडू नयेत यासाठी...
  August 19, 09:34 AM
 • सांगली -अभिनेत्री दिपाली सय्यदने शनिवारी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. सांगलीकरांना अनेकांनी मदत केली आहे पण सांगलीपर्यंत ती पोहोचली नाही. तसेच पुराचे राजकारण करू नये असे त्या यावेळी म्हणाल्या. सांगलीतील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणार असून सय्यद फाऊंडेशनच्या माध्यमातून सांगली पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात यावेळेस भीषण पूरस्थिती निर्माण झाली. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशात...
  August 17, 07:33 PM
 • सांगली - महापुराने नुकसान झालेल्या सांगली व काेल्हापूर जिल्ह्यातील घरांचे पंचनामे सुरू झाले असून शनिवारपर्यंत याद्या निश्चित होतील. पूरग्रस्तांना शहरी भागात १५ हजार, तर ग्रामीण भागात १० हजार सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येत असून त्यामधील ५ हजार रुपये रोखीने वाटप सुरू आहे. सांगलीत आतापर्यंत १४ हजार ४२५ पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे ७ कोटी २१ लाख २५ हजार रुपयांच्या निधीचे वाटप झाले आहे. यंत्रणांनी अनावश्यक कागदपत्रे न मागता पूरबाधितांना मदत पोहोचवावी, असे...
  August 17, 09:18 AM
 • कोल्हापूर - राजर्षी शाहूंनी देशाला एकसंध राहण्याचा संदेश दिला आहे. आज संकट मोठं आहे आपण एकत्र या संकटाला तोंड देऊ असा दिलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुरग्रस्तांना दिला. देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसोबत साजरा केला. तसेच पीडितांची विचारपूस केली. यावेळी स्थानिक महिलांनी शरद पवारांना राखी देखील बांधली. महापुराचा मोठा फटका कोल्हापूर शहराला आणि आजूबाजूच्या अनेक गावांना...
  August 15, 12:35 PM
 • सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील काही पूरग्रस्त भागांना बुधवारी भेटी दिल्या. २००५ मध्ये पूर आल्यानंतर पाण्याची पातळी ग्राह्य धरली ती चुकल्याने यंदाची परिस्थिती उद्भवली आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी यंदाच्या पाण्याची पातळी त्याहून अधिक नोंद करून त्याप्रकारे उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. शरद पवार म्हणाले, अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग कर्नाटक सरकारने...
  August 15, 09:03 AM
 • सातारा - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे - मिलिट्री आपशिंगे. नावातच देशसेवेचे व्रत आहे. प्रत्येक घरातील एक जण सैन्यात किंवा सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. या गावात १६५० पेक्षा अधिक जवानांनी सैन्यात आणि इतर सुरक्षा दलात सेवा बजावली आहे. इंग्रजांच्या काळात पहिल्या महायुद्धात या गावातील ४६ जवान शहीद झाले होते. यामुळे इंग्रजांनी या गावाचे नाव मिलिट्री आपशिंगे असे ठेवले. दुसऱ्या महायुद्धातही गावातील...
  August 15, 07:46 AM
 • सांगली - सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या गावावर शोककळा पसरलेली आहे. याच पुरग्रस्त गावाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन केले जाहीर पुरग्रस्त ब्रम्हनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे....
  August 14, 01:25 PM
 • सांगली -महापुरात उद्ध्वस्त सांगलीच्या पलूस तालुक्यापासून अवघ्या ६० किमीवरील बाळेवाडी चारा छावणीतल्या ६० गुरांच्या तोंडाला कोरड पडली होती. टँकरने आलेल्या पाण्याचे टिपडे बैलापुढे सरकवत दत्ता हाके पुराच्या बातम्या वाचत बसले होते. सालाबादप्रमाणे यंदाही त्यांच्या शेतात पावसाचा थेंब पडला नाही. कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या त्यांच्या खानापूर तालुक्यासाठी वर्षातून ४ आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला होता. प्रत्यक्षात फक्त एकच आवर्तन सरकारनं सोडलं. आता बघा कसं सगळं पाणीच...
  August 14, 11:56 AM
 • औरंगाबाद -अत्यंत कष्टाने उभारलेले क्लिनिक आणि त्यातील कोट्यवधींचे महागडे उपकरण डोळ्यादेखत पुरात पाण्यात गेले असतानाही एका डॉक्टर दांपत्याने हजारो पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत देत अनोखा आदर्श निर्माण केला आहे. डॉ. जयश्री आणि श्रेणिक पाटील असे या दांपत्याचे नाव असून मागील १२ दिवसांपासून ते सातत्याने पूरग्रस्तांवर उपचार करत आहेत. उपचारासोबतच तातडीने लागणारी औषधे, सॅनिटरी नॅपकिन्स तसेच खाद्यपदार्थही पूरग्रस्तांना अगदी नि:शुल्क पुरवत आहेत. सांगतील प्रख्यात रेडिअाेलॉजिस्ट डॉ....
  August 14, 09:17 AM
 • मुंबई - राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 5 लाख 60 हजार 953 पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत, अशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली. स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर...
  August 13, 02:26 PM
 • सांगली -पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार स्वतःची जाहिरात करण्यात व्यग्र आहे. अलमट्टी धरणाची उंची आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थितीकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. शिरोळ तालुक्यात विविध ठिकाणी स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांंची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. पूरग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा दिलासाही त्यांनी दिला. आंबेडकर म्हणाले, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पाणी...
  August 13, 08:47 AM
 • सांगली - महापूर ओसरल्यानंतरही सांगलीकरांच्या मागील दुर्दैवाचा फेरा सुटण्याची चिन्हे नाहीत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावभागातील चार घरे कोसळली. त्यामुळे पुरात आठ दिवसांपासून असलेल्या घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय कोणीही आपल्या घरी परतू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, कृष्णा नदीचे पाणी ५० फुटांवर असून ते अद्याप पूररेषेहून ५ फूट अधिक आहे. पूर ओसरलेल्या भागात साफसफाई करण्याच्या कामाला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. या पुरामुळे नदीकाठच्या...
  August 13, 08:39 AM
 • सांगली -सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातल्याने लाखो संसार उद्ध्वस्त झाले. महापूर ओसरत असताना यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज येत आहे. अशा वेळी प्रत्येकाने जमेल तसे पुढे येऊन एकजुटीने या संकटास सामाेरे जाणे आवश्यक आहे. काही सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्य मराठीने एक गाव दत्तक घेऊन तेथील लोकांचे पुनर्वसन करण्याचा निर्धार केला आहे. दोन हजार लोकवस्तीचे गाव ज्या ब्रह्मनाळमध्ये बोट बुडाली, त्याच पलूस तालुक्यातील सुखवाडी हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. मोडून पडलेले संसार...
  August 13, 07:49 AM
 • मुंबई - कोल्हापूरात महापूराने हाहाकार माजवला आहे. यामध्ये हजारो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले. यानंतर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे सरसावत आहेत. यांसोबत आता छत्रपती संभाजीराजे सुद्धा पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. कोल्हापूरातील लोकांची मदत करण्यासाठी ते पाण्यात उतरले होते. आता ते पुरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांची मदत करणार असल्याची माहिती स्वतः संभाजीराजेंनी ट्विट करुन दिली आहे. संभाजीराजे यांनी माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने...
  August 12, 01:52 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात