Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर: कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक भगवंत मोरे यांनी पोलीस अधिक्षकांच्या बदल्याचे आदेश बुधवारी (ता. 1) काढले. जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांसह 312 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी करवीरचे पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांची नियुक्ती झाली आहे. तर त्यांच्या जागी दत्तात्रय राजभोज यांची बदली झाली आहे. एलसीबीचे दुर्योधन पवार यांची बदली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत झाली आहे. गांधीनगर ठाण्याचे पोलीस...
  June 2, 11:49 AM
 • कोल्हापूर - सुप्रसिद्ध ग्रामीण कथालेखक चारुता सागर (वय 80) यांचे रविवारी (दि. 29) अल्प आजाराने निधन झाले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना गेल्या आठवड्यात सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दिनकर दत्तात्रय भोसले यांनी चारुता सागर या टोपणनावाने लेखन केले. त्यांच्या नागीण या कथासंग्रहाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तीन कथांवर बेतलेल्या राष्ट्रीय पारितोषिकप्राप्त जोगवा या चित्रपटाच्या दर्शन कथेचे वाचन पु. ल. देशपांडे यांनी केले होते. याशिवाय नदीपार मामाचा वाडा यासारखे...
  May 30, 05:08 AM
 • कोल्हापूर - अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेले सदाशिवराव मंडलिक काँग्रेसच्या वाटेवर आहेत. दोन दिवसांपूर्वी मंडलिक यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावनेनुसार काँग्रेस हाच मुख्य प्रवाह असून त्यात जाण्याशिवाय गत्यंतर नाही, अशा निष्कर्षापर्यंत मंडलिक आले आहेत. येत्या ५ जून रोजी मंडलिक यांनी कार्यर्कत्यांची बैठक बोलावली असून, तेथे बहुदा अंतिम निर्णय घेतला जाईल. मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा सूर...
  May 27, 11:31 PM
 • सांगली - तासगांव सहकारी साखर कारखाना आमदार संजय पाटील यांना अत्यंत अल्प किंमतीत फुंकून टाकण्याच्या प्रक्रियेला गृहमंत्री आर.आर.पाटील यांची मूक संमती असल्याचा आरोप शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांनी केला आहे. पाटील म्हणाले, आमदार संजय पाटील यांच्या 'गणपती ऍग्रो फूडस्' या खाजगी कंपनीला हा कारखाना कसा काय दिला गेला? त्यामागे संजय पाटील व आर.आर.आबा यांच्यातील राजकीय समेट हे मुख्य कारण आहे. या कारखान्याच्या विक्री व्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. कारखाना कवडी मोलाने दिला गेला आहे. हे...
  May 27, 11:21 PM
 • सांगली - मिरज दंगलीसंदर्भात सरकार न्यायालयाला माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे याविरोधात विधानभवनावर धडक मारून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती सर्वपक्षीय दंगलविरोधी कृती समितीचे नारायणराव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. मिरज दंगलीसंदर्भात आम्ही वारंवार सरकारकडे चौकशी केली. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दंगलीमागील खरे सूत्रधार सीबीआय चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत. आता सरकारने न्यायालयाला लवकरात लवकर माहिती दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
  May 24, 08:43 PM
 • सांगली- तासगावमधील बिरणवाडी येथे अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सांगलीतील वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिरणवाडी गावात मोरे कुटुंबातील सात जणांना रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. हा त्रास वाढल्याने अमोल मोरे यांनी या सर्वांना खासगी वाहनाने रुग्णालयात आणले पण वाटेतच निवास महादेव मोरे (45), अजय अरविंद मोरे (16) आणि सोनम प्रताप आमटे (15) यांचा मृत्यू झाला, तर...
  May 24, 06:48 PM
 • कोल्हापूर - अकार्यक्षम कारखान्यांना कर्जवाटप करण्यात दबाव आणणाऱयांची नावे जाहीर करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केली. राज्य बॅंकेचे अध्यक्ष माणिकराव पाटील यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, तुमच्या गैरकारभाराचे खापर सरकारच्या माथ्यावर हाणण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे. तुम्हाला फार सहकाराची दूरदृष्टी असल्यास त्याची शिकवणी सुरू करा. राज्यातील जनतेच्यावतीने आम्ही मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांनी या शिकवणीमध्ये सहभागी होण्याची विनंती...
  May 24, 04:26 PM
 • कोल्हापूर - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भाई माधवराव बागल यांच्या जयंतीनिमित्त 28 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहेत. बागल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा यंदाचा भाई माधवराव बागल पुरस्कार इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक आचार्य शांताराम गरुड यांना जाहीर झाला असल्याची माहिती बागल विद्यापीठाचे अध्यक्ष बाबूराव धारवाडे व प्रा. रा. कृ. कणबरकर यांनी दिली. 28 मे (शनिवारी)रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवन येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन....
  May 24, 04:15 PM
 • इस्लामपूर - पंधरा वर्षांच्या एका मुलाचा इस्लामपूर पालिकेच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. रवि गाडीवडर असे या मुलाचे नाव आहे. सोमवारी दुपारी रवि येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी आला होता. तेथे पाण्यात उडी मारल्यानंतर तो बुडाला. काही वेळाने भरत शिंगाडे यांनी तेथील सुरक्षारक्षकास रवि अद्याप पाण्यातून वर न आल्याचे सांगितल्यावर सुरक्षारक्षकाने रविचा शोध घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले. तेव्हा तो बेशुध्दावस्थेत होता. त्यानंतर रुग्णालयात उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे...
  May 24, 04:08 PM
 • सांगली तासगावपासून २२ कि.मी. अंतरावर बिरनवाडी येथे एका लग्न समारंभादरम्यान अन्नातून विषबाधा होऊन चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याशिवाय चार जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनप प्रताप आमटे, माधव मोरे, निवास माधव मोरे आणि अजय अरविंद मोरे यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
  May 24, 12:25 PM
 • सोलापूर - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिरातील पूजा आणि धार्मिक विधी गेल्या चार दिवसांपासून बंद आहेत. मंदिराच्या पुजा:यांनी आपल्या मागणीसाठी पूजा बंद केल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. सोलापूर शहरातील सिद्धेरामेश्वर मंदिर केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटकातील भाविकांचेही श्रध्दास्थान आहे. सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवर असल्याने या मंदिरात दोन्ही राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. मात्र गेल्या...
  May 22, 10:37 AM
 • सांगली - स्वत:च्या शेतातील कणसे चोरणा:यांना विरोध केल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी त्या शेताचे मालक लक्ष्मण जानू निकम व त्यांची पत्नी मंगल लक्ष्मण निकम यांना धारदार शस्त्राने वार करून काल हत्या करण्यात आली. खानापूर तालुक्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत परशुराम रामचंद्र निकम यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मयत निकम पती- पत्नीची देवीखिंडी गावापासून दीड कि. मी. अंतरावर शेती आहे. त्यांना...
  May 21, 03:10 PM
 • कोल्हापूर - शहराच्या स्वच्छतेसाठी कंत्राट देण्यात आलेल्या रॅमकी या कंपनीकडून कंत्राट महापालिकेकडून काढून घेण्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक सदस्यांनी कचरा उठावात होत असलेल्या हलगर्जीपणाचा मुद्दा उचलून धरत रॅमकी गो-बॅकची मागणी केली. एक महिन्यात करारातील तरतुदीप्रमाणे कारवाई करून ठेका रद्द करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. सभेच्या सुरुवातीलाच सचिन चव्हाण यांनी रॅमकीकडून कचरा उठावाचे काम व्यवस्थित होत नसताना प्रशासनाला त्यांचा पुळका का...
  May 20, 04:44 PM
 • कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांनी महापालिकेकडे शहरातील विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी केली आहे. तसेच या नगरसेवकांनी महापालिका निधी देत नसेल तर महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांना कुलूप लावावे, असा संतप्त सवाल पालिकेकडे केला आहे.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी निधी देण्याची मागणी केल्यानंतर प्रशासनाने असमर्थता दर्शविल्यामुळे सभेत गोंधळ झाला. गोंधळामुळे सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान, शासनाकडून महापालिकेला दहा कोटी रुपयांचे अनुदान मिळावे,...
  May 20, 04:41 PM
 • सांगली - खून प्रकरणी कारागृहात असलेल्या महिलेने जिल्हा कारागृहात स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता संतोष चौगुले (वय 30, रा. बनेवाडी, ता. वाळवा) असे या महिलेचे नाव असून, सावत्र मुलीच्या खून प्रकरणी ती कारागृहात होती. सहा महिन्यांपूर्वी सावत्र मुलीचा दोरीने गळा आवळून खून केल्याच्या आरोपाखाली तिच्यावर खटला सुरू आहे. कारागृहात जेवण झाल्यानंतर दुपारी तीन तास विश्रांती दिली जाते. दोनच्या सुमारास कारागृहातील महिला पोलिस कर्मचारी जेवणासाठी गेल्या...
  May 20, 04:38 PM
 • मिरज - मिरजमध्ये सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विनायक सूर्यवंशी आणि हिंदू एकता आंदोलनाचे नेते अशोक खटावकर यांना अटक करण्यात आली आहे. विनायक हे मिरजेचे शिवसेना शहराध्यक्ष विकास सूर्यवंशी यांचे भाऊ आहेत. विकास यांना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफलखानाचा कोथळा बाहेर काढल्याचे मोठे पोस्टर गणपती महोत्सवात लावण्यात आल्याने याठिकाणी दंगल उसळली...
  May 20, 04:07 PM
 • विटा - देवीखिंडी (ता खानापूर) परिसरात शेतात कामासाठी गेलेल्या पती-पत्नीचा अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव लक्ष्मण ज्ञानू निकम (वय 60) असे असून, त्यांची दुसरी पत्नी असलेल्या मंगल निकम (वय 35) यांची हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण व मंगल यांच्या मानेवर व डोक्यावर वार केल्याच्या खूणा असून, अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  May 20, 04:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED