जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • चोकाक (जि. कोल्हापूर) - शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यावर टॅक्स लावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक येथे पोहोचली. सांगली फाटा येथे भव्य दुचाकी रॅलीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर चोकाक येथे आयोजित सभेत अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका...
  September 2, 09:12 AM
 • चोकाक (जि. कोल्हापूर)- शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यावर टॅक्स लावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक येथे पोहोचली. सांगली फाटा येथे भव्य दुचाकी रॅलीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर चोकाक येथे आयोजित सभेत अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका...
  September 1, 07:09 PM
 • काेल्हापूर- केंद्र व राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांना पाठबळ देत आहे. त्यांचे हे धोरण निषेधार्ह अाहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस देशात एकता कायम ठेवण्यासाठी लढाई लढते आहे. त्याचाच एक भाग म्हणून अाम्ही काेल्हापुरातून संघर्ष यात्रा काढत असून ही यात्रा केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही तर ही तत्त्वांची लढाई आहे, असे काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी सांगितले. महाराष्ट्राला सनातनची नव्हे तर फुले-शाहू-आंबेडकरांची...
  September 1, 07:36 AM
 • मुंबई- सहा महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या सर्वपक्षीय १९ नगरसेवकांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या निर्णयामुळे या १९ नगरसेवकांसोबतच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तब्बल ९ हजार लोकप्रतिनिधींवर पद रद्द होण्याची टांगती तलवार आहे. त्यांची पदे रद्द झाल्यास मनपा, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या ९ हजार जागांवर नव्याने पोटनिवडणुका घ्याव्या लागतील. मात्र सुप्रीम कोर्टाने...
  August 24, 09:41 AM
 • कोल्हापूर - खंडणीसाठी जुळता जुळता जुळेना या आगामी मालिकेच्या सेटवर काल (सोमवारी) रात्री हल्ला करण्यात आला. करवीर तालुक्यातील केर्ली या गावात ही घटना घडली. याप्रकरणी केर्ली गावचा उपसरपंच अमित पाटील याच्यासह इतर 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. केर्ली गावात शुटिंग करायचे असेल तर प्रोटेक्शनसाठी आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे उपसरपंच अमित पाटील व त्याच्या साथीदारांनी दिग्दर्शकाला धमकावले होते. मात्र पैसे देण्यास दिग्दर्शकाने नकार दिल्याने काल...
  August 7, 03:03 PM
 • कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भर दसरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गटारीच्या पाण्याने अभिषेक घालून त्यांचा जाहीर निषेध केला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सातत्याने वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे, अशा भावना व्यक्त करत आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणा दिल्या. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी यावेळी अवघा दसरा चौक दुमदुमून गेला होता. मराठा आरक्षणाच्या...
  August 6, 07:01 PM
 • कोल्हापूर - राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पेटले असताना आत्महत्येचे सत्र काही थांबत नाहीत. कोल्हापूरच्या जागृती नगर येथे राहणारे 26 वर्षीय विनायक परशुराम गुदगी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या 10 दिवसांपासून हा युवक आपल्या समाजाला आरक्षण मिळणार नाही या शंकेने अस्वस्थ होता. तसेच त्याचे वर्तन सुद्धा बदलले होते असे त्यांच्या बंधूंनी सांगितले आहे. विनायक मूळचे बेळगाव येथील दड्डी गावातील रहिवासी होते. त्यांचे मूळ शिक्षण मराठीत झाले होते. गावातच नोकरी...
  August 6, 07:45 AM
 • कोल्हापूर - आरक्षणासाठी बळी गेलेल्या कणेरीवाडीच्या विनायक गुदगेच्या मृत्यू प्रकरणी सकल मराठा समाजाने रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आतापर्यंत मराठा आंदोलनात झालेल्या आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांच्यातर्फे करण्यात आली आहे. यासह, सोमवारी 6 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील 13 नाल्यांच्या पाण्याने शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दिवसभर अभिषेक घातले जाणार आहे. तसेच 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण...
  August 5, 05:29 PM
 • सांगली- आठ महिन्यांच्या गर्भवतीवर आठ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना सांगली जिल्ह्यातील तुरची फाटा (ता. तासगाव) येथे गुरुवारी उघडकीस आली. हे कृत्य करताना नराधमांनी पीडितेच्या पतीला कारमध्ये डांबून ठेवले होते. ही घटना ३१ जुलै रोजीची आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद (पूर्ण नाव नाहीत) या चार जणांची नावे सध्या समोर आली असून इतर चार जणांचा शोध घेण्यात येत आहे. पीडित गर्भवती महिला ही सातारा...
  August 3, 09:03 AM
 • पुणे/कोल्हापूर/सांगली - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मराठा समाजातील मान्यवरांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक चालू असताना राज्यात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींच्या घर तसेच कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलनं करण्यात येत आहे. याची सुरूवात आज सकाळी पुण्यात झाली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा गणपतीजवळील कार्यालयासमोर मराठा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची कल्पना असल्यामुळे सकाळपासून कार्यालसमोर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता....
  August 2, 02:54 PM
 • पुणे - जोडून आलेल्या सुट्या आनंदात घालवण्यासाठी दापोलीहून महाबळेश्वरला निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचाऱ्यांसाठी शनिवारची सकाळ काळरात्र ठरली. आंबेनळी घाटात सकाळी साडेदहाला एका वळणावर बस सुमारे पाचशे फूट दरीत कोसळली. यात एका अधिकाऱ्याचा अपवाद वगळता, चालकासह बसमधील सर्व ३३ कर्मचारी जागीच ठार झाले. पावसाची संततधार धुके, निसरडे रस्ते आणि खोल दरीत उतरण्यास येणाऱ्या अडचणींमुळे मदतकार्यातही अडथळे येत असले तरी दोर लावून ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे आणि वर...
  July 29, 08:23 AM
 • कोल्हापूर- वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे चंद्रकांत पाटील हे अपघाताने मंत्री झाले आहेत. मी 14 वेळा निवडणुका लढवल्या. 7 वेळा थेट जनतेतून निवडणुकीला सामोरा गेलो. चंद्रकांत पाटील यांना निवडणुकाना कसे सामोरे जायचे हे अजून शिकायचे आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. वादग्रस्त वक्तव्य करणे, हे मंत्री पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची वक्तव्ये फारशी गांभीर्याने घेण्यासारखी नसतात. हीच बाब...
  July 28, 03:07 PM
 • कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज कोल्हापुरातील मराठा आरक्षणाच्या मंचावर उपस्थिती लावली. आरक्षणासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू असल्याचे सांगतानाच पवारांनी कार्यकर्त्यांना संयमाचा मोलाचा सल्ला दिला. तसेच आम्हाला कोणाच्या ताटातील घास नको, आमचे तेवढे मात्र आमच्या ताटात टाका, असा शब्दांत पवारांनी त्यांची भूमिका मांडली. काय म्हणाले शरद पवार... आपण 58 मोर्चे काढले. लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आले. पण कुठे काहीही गैरप्रकार घडला नाही याबाबत सर्वांचे कौतुक....
  July 28, 01:12 PM
 • कोल्हापूर- मागील तीन दिवसांपासून सकल मराठा समाजाने ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गुरुवारी ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर शोभा बोन्द्रे या उपस्थित होत्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाठींबा देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची एकमुखी मागणी केली. मानवी साखळी बनवून मुस्लिम समाजाचा मराठ्यांना पाठिंबा.. मुस्लिम बोर्डिंग आणि...
  July 26, 06:07 PM
 • कोल्हापूर - भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. याबाबतचा निर्णय प्रधानमंत्री मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा घेतील, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र भाजप मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. पहाटे 3 वाजेपर्यंत जागून काम करणा-या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार, असा उलट सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास मराठा आरक्षणाचा निर्णय आता कोर्टाच्या हातात आहे, जेवढे करणे शक्य...
  July 25, 06:19 PM
 • सांगली- मराठा आरक्षणासाठी सरकारने जे करायला हवे होते ते केले. आता निर्णय न्यायालयाच्या कक्षेत आहे. त्यावर सरकार काहीही करू शकत नाही, तरीही मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळत असेल तर फोडा, असे हतबल उद्गार राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले आहेत. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. पेड लोक आंदोलनात घुसले आतापर्यंत शांततापुर्ण वातावरणात चाललेले हे आंदोलन हिंसा करून बदनाम करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आणखी...
  July 24, 03:11 PM
 • कोल्हापूर- भारत राखीव बटालियन मधील खेळाडू कर्मचाऱ्यांच्याकडून बंदोबस्तावर न पाठवण्यासाठी तसेच अन्य त्रास न देण्यासाठी चक्क 40 हजार रूपयांची लाच घेणारे सहायक समादेशक आणि त्याच्यासोबत पोलीस निरीक्षक अशा अन्य सहा जणांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले, अशी माहिती विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत याच भारत राखीव बटालियनमध्ये सहायक फौजदार म्हणून कार्यरत असणाऱ्या एका खेळाडूने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर...
  July 17, 07:20 PM
 • कोल्हापूर - शहर आणि जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारा ऐतिहासिक कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी व आज पावसात भिजण्यासाठी हौशी कोल्हापूरकरांनी कळंबा तलावावर मोठी गर्दी केली आहे. पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
  July 16, 05:22 PM
 • कोल्हापूर- मुसळधार पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे.पंचगंगा नदीलाही पूर आला असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान राधानगरी धरणातून 1600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. नदीकाठच्या गावांनाही यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. बहुतेक सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती...
  July 14, 03:53 PM
 • कोल्हापूर- कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातसलग सातव्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. पंचगंगा नदीने धोक्याचीपातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. शनिवारी पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी 63 गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम मिळालेली माहिती अशी की, बाजारभोगाव गावामध्ये कासारी नदीचे पाणी घुसले आहे. नदीचे पाणी...
  July 14, 03:18 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात