जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर - आरक्षणासाठी बळी गेलेल्या कणेरीवाडीच्या विनायक गुदगेच्या मृत्यू प्रकरणी सकल मराठा समाजाने रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आतापर्यंत मराठा आंदोलनात झालेल्या आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांच्यातर्फे करण्यात आली आहे. यासह, सोमवारी 6 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील 13 नाल्यांच्या पाण्याने शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दिवसभर अभिषेक घातले जाणार आहे. तसेच 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण...
  August 5, 05:29 PM
 • सांगली- आठ महिन्यांच्या गर्भवतीवर आठ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना सांगली जिल्ह्यातील तुरची फाटा (ता. तासगाव) येथे गुरुवारी उघडकीस आली. हे कृत्य करताना नराधमांनी पीडितेच्या पतीला कारमध्ये डांबून ठेवले होते. ही घटना ३१ जुलै रोजीची आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद (पूर्ण नाव नाहीत) या चार जणांची नावे सध्या समोर आली असून इतर चार जणांचा शोध घेण्यात येत आहे. पीडित गर्भवती महिला ही सातारा...
  August 3, 09:03 AM
 • पुणे/कोल्हापूर/सांगली - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मराठा समाजातील मान्यवरांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक चालू असताना राज्यात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींच्या घर तसेच कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलनं करण्यात येत आहे. याची सुरूवात आज सकाळी पुण्यात झाली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा गणपतीजवळील कार्यालयासमोर मराठा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची कल्पना असल्यामुळे सकाळपासून कार्यालसमोर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता....
  August 2, 02:54 PM
 • पुणे - जोडून आलेल्या सुट्या आनंदात घालवण्यासाठी दापोलीहून महाबळेश्वरला निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचाऱ्यांसाठी शनिवारची सकाळ काळरात्र ठरली. आंबेनळी घाटात सकाळी साडेदहाला एका वळणावर बस सुमारे पाचशे फूट दरीत कोसळली. यात एका अधिकाऱ्याचा अपवाद वगळता, चालकासह बसमधील सर्व ३३ कर्मचारी जागीच ठार झाले. पावसाची संततधार धुके, निसरडे रस्ते आणि खोल दरीत उतरण्यास येणाऱ्या अडचणींमुळे मदतकार्यातही अडथळे येत असले तरी दोर लावून ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे आणि वर...
  July 29, 08:23 AM
 • कोल्हापूर- वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे चंद्रकांत पाटील हे अपघाताने मंत्री झाले आहेत. मी 14 वेळा निवडणुका लढवल्या. 7 वेळा थेट जनतेतून निवडणुकीला सामोरा गेलो. चंद्रकांत पाटील यांना निवडणुकाना कसे सामोरे जायचे हे अजून शिकायचे आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. वादग्रस्त वक्तव्य करणे, हे मंत्री पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची वक्तव्ये फारशी गांभीर्याने घेण्यासारखी नसतात. हीच बाब...
  July 28, 03:07 PM
 • कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज कोल्हापुरातील मराठा आरक्षणाच्या मंचावर उपस्थिती लावली. आरक्षणासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू असल्याचे सांगतानाच पवारांनी कार्यकर्त्यांना संयमाचा मोलाचा सल्ला दिला. तसेच आम्हाला कोणाच्या ताटातील घास नको, आमचे तेवढे मात्र आमच्या ताटात टाका, असा शब्दांत पवारांनी त्यांची भूमिका मांडली. काय म्हणाले शरद पवार... आपण 58 मोर्चे काढले. लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आले. पण कुठे काहीही गैरप्रकार घडला नाही याबाबत सर्वांचे कौतुक....
  July 28, 01:12 PM
 • कोल्हापूर- मागील तीन दिवसांपासून सकल मराठा समाजाने ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गुरुवारी ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर शोभा बोन्द्रे या उपस्थित होत्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाठींबा देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची एकमुखी मागणी केली. मानवी साखळी बनवून मुस्लिम समाजाचा मराठ्यांना पाठिंबा.. मुस्लिम बोर्डिंग आणि...
  July 26, 06:07 PM
 • कोल्हापूर - भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. याबाबतचा निर्णय प्रधानमंत्री मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा घेतील, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र भाजप मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. पहाटे 3 वाजेपर्यंत जागून काम करणा-या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार, असा उलट सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास मराठा आरक्षणाचा निर्णय आता कोर्टाच्या हातात आहे, जेवढे करणे शक्य...
  July 25, 06:19 PM
 • सांगली- मराठा आरक्षणासाठी सरकारने जे करायला हवे होते ते केले. आता निर्णय न्यायालयाच्या कक्षेत आहे. त्यावर सरकार काहीही करू शकत नाही, तरीही मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळत असेल तर फोडा, असे हतबल उद्गार राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले आहेत. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. पेड लोक आंदोलनात घुसले आतापर्यंत शांततापुर्ण वातावरणात चाललेले हे आंदोलन हिंसा करून बदनाम करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आणखी...
  July 24, 03:11 PM
 • कोल्हापूर- भारत राखीव बटालियन मधील खेळाडू कर्मचाऱ्यांच्याकडून बंदोबस्तावर न पाठवण्यासाठी तसेच अन्य त्रास न देण्यासाठी चक्क 40 हजार रूपयांची लाच घेणारे सहायक समादेशक आणि त्याच्यासोबत पोलीस निरीक्षक अशा अन्य सहा जणांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले, अशी माहिती विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत याच भारत राखीव बटालियनमध्ये सहायक फौजदार म्हणून कार्यरत असणाऱ्या एका खेळाडूने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर...
  July 17, 07:20 PM
 • कोल्हापूर - शहर आणि जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारा ऐतिहासिक कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी व आज पावसात भिजण्यासाठी हौशी कोल्हापूरकरांनी कळंबा तलावावर मोठी गर्दी केली आहे. पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
  July 16, 05:22 PM
 • कोल्हापूर- मुसळधार पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे.पंचगंगा नदीलाही पूर आला असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान राधानगरी धरणातून 1600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. नदीकाठच्या गावांनाही यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. बहुतेक सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती...
  July 14, 03:53 PM
 • कोल्हापूर- कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातसलग सातव्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. पंचगंगा नदीने धोक्याचीपातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. शनिवारी पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी 63 गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम मिळालेली माहिती अशी की, बाजारभोगाव गावामध्ये कासारी नदीचे पाणी घुसले आहे. नदीचे पाणी...
  July 14, 03:18 PM
 • कोल्हापूर- गगनबावडा तालुक्यातदोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. तर, 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी 9 वाजेच्या सुमारास गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावाजवळ ही दुर्घटनाघडली. अपघातातील जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा भीषण अपघाताचे फोटो...
  July 13, 10:36 AM
 • कोल्हापूर -शिरोळ तालुक्यात एका खासगी बेकरीच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जाणारी बस उलटल्याने एक जण ठार तर 15 महिला जखमी झाल्या आहेत. कुरुंदवाड जवळ भैरेवाडी नांदणी रस्त्यावर आज (गुरूवारी) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात काशीनाथ बेरड (28) हा युवक जागेवरच ठार झाला.सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी नांदणी येथील गणेश बेकरीची बस कर्मचाऱ्यांना घेऊन कुरुंदवाड येथून निघाली होती. बसमध्ये एकूण 40 जण होते. कुरुंदवाडपासून सुमारे 5 किलोमीटरवर...
  July 12, 03:24 PM
 • कोल्हापूर- जिल्ह्यातील मलकापूर येथील एका कचरापेटीत दोन मृत अर्भके, चार गर्भाशय आणि औषधींचा बॉक्स सापडल्याने खळबळ उडाली आहे. बेकायदा गर्भलिंग निदान किंवा अनैतिक संबंधातून हे कृत्य झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. मलकापूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना भाजी मंडईच्या इमारतीजवळ कचरापेटीत ही अर्भके सापडली. याबाबत शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अर्भकात पुरूष जातीचे एक आणि स्त्री जातीचे एक आहेत. सोमवारीही कचरापेटीत सापडले होते 6 मृत अर्भके... एका कचरापेटीत सोमवारी (2...
  July 4, 04:03 PM
 • राहाता - वाकडी-गणेशनगर रस्त्यावरील हॉटेल गारवासमोर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या बसचे (एम एच १७ ए जी ७३९८) पाटे तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस विजेच्या खांबास धडकून पलटी झाली. सुदैवाने वीजप्रवाह खंडित झाल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात १५ विद्यार्थी जखमी झाले. ग्रामस्थ बाळासाहेब लहारे, माजी जि. प. सदस्य राजेंद्र लहारे, संदीप लहारे, जि. प. सदस्य कविता लहारे, शोभा घोरपडे आदींनी मुलांना बसमधून बाहेर काढले. जखमींना वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले....
  July 1, 11:48 AM
 • सातारा - येथील वराडे गावामध्ये अंगावर शहारे आणणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. सागर घोडरपडे नावाच्या व्यक्तीने त्याच्या आई आणि पत्नीवर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने स्वतःला संपवण्यासाठी स्वतःवरही चाकुने अनेक वार केले. या घटनेमध्ये आरोपी सागर घोरपडे याची पत्नी जागीच मृत पावली तर सागरसह त्याची आई गंभीर जखमी आहे. सागरने हे पाऊल उचलण्यामागे नेमके काय कारण होते, हे अद्याप समजू शकलेले नाहीत. मात्र काहीतरी प्रचंड रागातून अशी घटना घडली असल्याची चर्चा व्यक्त करण्यात येत आहे. सागर घोरपडे...
  June 30, 11:13 AM
 • कोल्हापूर- संजय घोडवत इंग्लिश स्कूलच्या बसला अतिग्रे फाट्याजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर स्कूल बसमधील 26 विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज (मंगळवार) सकाळी हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, स्कूल बस अतिग्रे फाट्यावरून शाळेकडे जात असताना सांगलीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. कंटेनर रस्ता दुभाजकाला धडकून समोरुन येणार्या...
  June 26, 02:15 PM
 • महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे सुरू ठेवला. फुलेंप्रमाणे शाहू महाराजांनी बहूजन समाज व त्यांच्या उद्धारासाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले. महाराष्ट्राच्या इतिहासातील अग्रगण्य व्यक्ती म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते. कोल्हापूर संस्थानात शिक्षणप्रसाराचे महत्वपूर्ण कार्य केले. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना देत आहे त्यांच्याविषयीची खास माहिती... राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य......
  June 26, 12:02 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात