जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • सातारा- पुणे-बंगलुरु महामार्गावार पाचवड उडड्णा पुलाजवळ डिझेल टॅंकर पलटी झाल्याने वाहतुक विस्कळीत झाली. डिझेलची वाहतूक करणारा टॅंकर (एमएच 06 बीपी 1355) पुण्याहून साता-याकडे निघाला होता. ड्रायवरचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर पलटी झाला. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहने रोखून ठेवण्यात आली होती. अपघातग्रस्त टॅंकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
  April 24, 12:27 PM
 • कोल्हापूर - पाचगाव (ता.करवीर) खून का बदला खून पद्धतीने राजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या अशोक पाटील व धनाजी गाडगीळ या दोघांच्या खुनांच्या गुन्ह्यांचे निकाल आज एकाच दिवशी जाहीर झाले. दोन्ही खटल्यातील एकूण 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी.बिले यांच्या कोर्टाने ही शिक्षा सुनावली. निकालाच्यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकालावेळी दोन्ही गटाच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारात मोठ्या प्रमाणात...
  April 23, 05:07 PM
 • कोल्हापूर-एका साध्या आणि सुटसुटीत संकल्पनेसाठी एकत्र येत कोल्हापूरसाठी सामाजिक काम करणाऱ्या नामांकित व्यक्ती आणि संस्थानी आज शहरातील काही निवडक पत्रकारांच्या हस्ते कोल्हापूर वाय फॉर एच या संस्थेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पत्रकार विजय कुंभार, पत्रकार समीर मुजावर, पत्रकार अनुराधा कदम,पत्रकार विजय पाटील,पत्रकार संभाजी गंडमाळे, पत्रकार धीरज बरगे,प्रेस छायाचित्रकार शशिकांत मोरे वाचन कट्ट्याचे युवराज कदम आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचा उद्देश स्पष्ट करताना सागर बगाडे म्हणाले,...
  April 22, 06:15 PM
 • सातारा- फलटणमधील निंबळक गावात एक युवती नीरा उजवा कालव्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. तिचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. अद्याप तरी तिला शोधण्यात यश आलेले नाही. ही युवती आपल्या मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील रुई गावात राहणाही प्रियांका घोडके ही युवती आपला मामा विक्रम भोसले यांच्याकडे निंबळक येथे सुट्टीसाठी आली होती. सकाळी ती मामासोबत कॅनाॅलवर गेली होती. मामा कॅनाॅलमध्ये पोहत होता तर ती काठावर बसली...
  April 21, 06:13 PM
 • सांगली- कृष्णा नदीतमगरीने 14 वर्षीय मुलाला ओढून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर डंक असे या मुलाचे नाव असून पहाटेपासून त्याचा शोध सुरु आहे. शोधकार्यात यासाठी वनविभाग पाच बोटींची मदत घेण्यात येत आहे. पलूस तालुक्याच्या ब्रह्मनाळ गावात ही घटना घडली आहे. सूत्रांनुसार, काल (शुक्रवार) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास काही मुले पोहोण्यासाठी नदीवर गेले होते. अचानक एका मगरीने सागरवर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेले. मगरीच्या हल्ल्यानंतर सागरच्या इतर मित्रांनी आरडाओरडा केला....
  April 21, 02:29 PM
 • कोल्हापूर- चंदगड तालुक्यातील देवरेवाडी गावात उतारावरुन भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दोन लोकांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते दोघे लग्नसोहळा पार पडल्यानंतर वधु-वरांना गिफ्ट घेण्यासाठी बाहेर पडले होते. लग्नमंडपासमोरच ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ढेकोळी बु. येथील चाळोबा लक्ष्मण रेंबुळकर (वय ३९) व जोतिबा भरमू पवार (वय ४२) देवरेवाडी येथे रेंबुळकर व पवार जंगमहट्टी येथील नातेवाईकांच्या लग्नाला आले होते. लग्नाच्या अक्षता पडल्यानंतर या दोघांनी वर्हाडी...
  April 20, 07:54 PM
 • कोल्हापूर- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्त्या होऊन तब्बल 38 महिने उलटले आहेत. तरीही आरोपी तपास यंत्रणांच्या हाती लागत नाही. सीबीआयसारखी यंत्रणासुद्धा कुचकामी ठरली आहे. गौरी लंकेश, डॉ.दाभोळकर, डॉ,कलबुर्गी यांच्याही हत्त्येतील सूत्रधारासह मारेकरी अद्याप मोकाट आहेत. याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) कोल्हापुरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पानसरे, दाभोळकर यांच्या हत्त्येचा तपास करणाऱ्या...
  April 20, 06:52 PM
 • कोल्हापूर- शहरातील जुना राजवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीने पत्नी घर सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पत्नीसह प्रियकरावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरात राहणारे सतीश गोंधळे (37) यांची पत्नी प्रिया गोंधळे (35) आणि विनायक कुलकर्णी याचे प्रेमसंबंध होते. दोघांच्या या प्रेम प्रकरणामुळे सतीश प्रचंड तणावात होते. प्रिया आपल्या प्रियकरासोबत पळून...
  April 20, 06:19 PM
 • सातारा- देशभरात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांत वाढ होत आहे. नुकतीच कठुआ येथे चिमुरडीची बलात्कार करुन हत्या केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. अशातच साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राजेशाही असती तर बलात्का-यांना गोळ्या घालून मारण्याची सजा दिली असती असे विधान केले आहे. ते साता-यातील एका आंदोलनात बोलत होते. जिल्हा परिषदेच्या समोर एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली म्हणाले, जनतेने निवडून दिलेले सदस्य,...
  April 19, 08:15 PM
 • सांगली- शहरातील आपटा पोलीस चौकी समोरील एका अपार्टमेंटमध्ये एका व्यक्तीचा खून झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. हल्लेखोरांच्या हल्ल्यात त्या व्यक्तीची आजी देखील गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आपटा चौकीसमोरील श्री अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर पारेख कुटुंबीय राहते. या कुटुंबातील टिलूभाई पारेख आणि त्यांची आजी राहत होती. मध्यरात्रीच्या अज्ञात हल्लेखोर टिलू पारेखच्या फ्लॅटमध्ये घुसले व...
  April 18, 02:00 PM
 • कोल्हापूर - राजकीय श्रेयवादाच्या विळख्यातून सुटलेली कोल्हापूर मुंबई विमानसेवा आज अखेर विकासाच्या दिशेने झेपावले. केंद्र सरकारच्या उडाण योजनेअंतर्गत कोल्हापूरची गेल्या सहा वर्षांपासून बंद पडून रखडलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ आज दुपारी तीन वाजता एअर डेक्कन कंपनीच्या विमानाच्या टेकऑफने झाला. कोल्हापूरकरांनी आज पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेल्या विमानसेवेचे अनोख्या जल्लोषात स्वागत केले. मुंबईच्या दिशेने झेपावलेल्या आजच्या पहिल्या विमानातून चक्क दिव्यांग मुले,...
  April 17, 05:46 PM
 • कोल्हापूर- उत्तप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराने इचलकरंजीतील एका घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.अरुणकुमार उमाशंकर उपाध्याय (वय 44, मुळ-भीमपूर ता बदलापूर, जिल जौनपूर. उत्तरप्रदेश) यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणकुमार यांनी गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून मडियाहू मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले...
  April 16, 08:24 PM
 • बेळगाव- सांगलीच्या शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानावर झालेल्या सभेत प्रक्षोभक विधाने केल्याने निवडणूक आयोगाने पोलिसात तक्रार दिली होती. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून बेळगाव पोलिसआयुक्तालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे हे येथील कुस्त्यांना उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रक्षोभक विधाने केली होती.
  April 13, 11:30 PM
 • कोल्हापूर तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे काढण्याची कारवाई रोकण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास खात्याच्या आदेशानुसार व अतिक्रमणे नियमित करण्याच्या कायद्यात बसवण्यासाठी मुंबईतील बैठकीत झालेला निर्णय आहे. त्याता माझा वैयक्तिक काही हस्तक्षेप नाही. तरी देखील विरोधक माझ्यावर बेताल आरोप करीत आहेत, त्यामुळे आता माझी सटकली आहे, असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना केले आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या वीस...
  April 13, 07:04 PM
 • कोल्हापूर- तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीत रौप्य पदक पटकावल्यानंतर तिच्या कोल्हापूर येथील घरी फटाक्यांच्या आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तेजस्विनी सावंतने 50 मी. रायफल शुटिंग प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. नेमबाजीत भारताला मिळालेलं हे १२ वं पदक ठरलं आहे. तेजस्वीनीचे पती समीर दरेकर म्हणाले की, तेजस्विनीने आज देशाला पदक मिळून दिल्याने तिचा सार्थ आभिमान वाटतो. तिच्या या यशामागे तिने गेले 19 वर्ष घेतलेली मेहनत आहे. आज तिला यशस्वी झालेले पाहून खूप आनंद...
  April 12, 08:21 PM
 • पुणे - पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात (जि. सातारा) ३२ कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो घाटातील धोकादायक एस कॉर्नर वळणावर उलटला. मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात १८ जण ठार, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या अपघातात टेम्पोचालकही मृत्युमुखी पडला. मृतांमध्ये ७ महिला आणि एका मुलासह अकरा पुरुषांचा समावेश आहे. रात्रभर सुरू असलेल्या प्रवासामुळे चालकाला झोपेची गुंगी येत होती आणि त्यामुळेच हा अपघात घडल्याचे समजते. खंडाळा तालुका पोलिसांनी दिलेल्या...
  April 11, 01:02 AM
 • सांगली - पतीसाेबत हाेणाऱ्या सततच्या भांडणामुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने अापल्या तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. ही घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वज्रचाैंडे या गावात साेमवारी सकाळी उघडकीस अाली. सुनीता सुभाष राठोड (३२), जुळ्या बहिणी आशा (४), उषा (४) व ऐश्वर्या (२) अशी मृतांची नावे अाहेत. मूळ कर्नाटकातील विजापूर तालुक्यातील रहिवासी असलेले राठाेड कुटुंबीय कामाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात तीन महिन्यांपासून स्थलांतरित झाले हाेते. रविवारी कामाला सुटी...
  April 10, 01:22 AM
 • सातारा- धनंजय मुंडे यांनी साता-यातील पाटणमध्ये हल्लाबोलआंदोलनातशिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.शिवसेना आता शिवसेना राहिली नाही, ती भीवसेना झाली आहे. पाच ते सहा मंत्रीपदांसाठी भाजपसमोर लाळ गाळण्याचे काम शिवसेना करत आहे. वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते मात्र राजीनामे काही खिशातून बाहेर निघत नाहीत. असे धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले. राष्ट्रवादीचे नेते पूर्ण ताकदीने सत्ताधारी भाजप शिवसेनेवर हल्ला चढवत आहेत. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम...
  April 9, 06:39 PM
 • कोल्हापूर- जगातील पाचव्या क्रमांकाचे ज्वेलरी रिटेलर असलेले मलाबार गोल्ड आणि डायमंड्स यांच्या 215 व्या शोरुमचे आज कोल्हापुरात बॉलीवूड स्टार अनिल कपूर यांच्या हस्ते उद्घाटन मोठ्या जल्लोषात झाले. यावेळी समुहाचे इंडिया ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक ओ.आशेर, रिजनल हेड एम.पी.सूबेर आणि विशेष निमंत्रितांसह मान्यवर उपस्थित होते. सर्व वयोगटातील ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन बनवण्यात आलेल्या सिग्नेचर ज्वेलरी हे मलाबार गोल्ड आणि डायमंड्सचे खास वैशिष्टय आहे. रोजच्या वापरातील दागिने,...
  April 8, 03:49 PM
 • सांगली- एका 24 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणा-या मुलीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. यानंतर स्वत: चा गळा कापून हाताची नस कापली आहे. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस घटनास्थळी पोहचले असून दोघांनाही हाॅस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जतमधील मध्यवर्ती भागात सकाळी 10 वाजता ही घटना घडली. पीडित मुलगी सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी कृष्णा जालिंदर पिसाळ (24) हा मुलीच्या जवळ आला आणि तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. यात ती गंभीररित्या जखमी झाली. त्याने यानंतर स्वत: गळा आणि...
  April 7, 02:11 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात