जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • पुणे- चिथावणीखोर वक्तव्य करून कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविराेधात ठाेस पुरावे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले अाहे. त्यामुळे अाता भिडे गुरुजींवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी त्यांच्या लाखाे समर्थकांनी (धारकरी) बुधवारी राज्यभर सन्मान माेर्चा काढले. मुंबईत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी,...
  March 29, 05:11 AM
 • कोल्हापूर- कणेरीपैकी धनगरवाडा (ता. पन्हाळा) येथील तानाजी रामू पाटील यांच्या गट नंबर 534 मधील 4 गुंठे शेत जमीन खरेदीसाठी लागणाऱ्या शासकीय फी व्यतिरिक्त 1500 रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांसह दुय्यम निबंधक यशवंत सदाशिव चव्हाण (54) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत आज सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत अशा पद्धतीने एखाद्या सरकारी कार्यालयातील सर्वच्या सर्व कर्मचारी...
  March 28, 08:02 PM
 • कोल्हापूर-करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठीचे विधेयक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर करण्यात आल्याने आता मंदिरात सरकारी पुजारी नेमण्याचा मार्ग सोपा झाला आहे. यानंतर हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी जाणार आहे. विधान परिषदेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी जाईल आणि त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पंढरपूरच्या आणि पंढरपूरच्या...
  March 28, 05:58 PM
 • कोल्हापूर- कोरेगाव भीमा दंगलप्रकरणात शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या व त्यांच्या अटकेची मागणी केल्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भिडे गुरुजी सन्मान मोर्चा काढला. भिडे गुरुजींना अटक केली तर जिल्हा बंद करू असा तीव्र इशारा यावेळी देण्यात आला. तसेच डॉ. प्रकाश आंबेडकर,जिग्नेश मेवानी, बी. जी. कोळसे-पाटील, उमर खालिद यांना तात्काळ अटक करावी यासह...
  March 28, 04:57 PM
 • कोल्हापूर - राज्यात भाजप सरकारने गेल्या तीन वर्षात कृषी पंपाची भरमसाठ वीजदरवाढ केली असून यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.म्हणून महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने 27 मार्च रोजी विधानभवनावर सर्वपक्षीय धडक मोर्चा काढणार असून या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी जाहीर पाठींबा दिला असल्याची माहिती फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी ते म्हणाले कि,शेतीपंप वीज ग्राहकांवर व...
  March 21, 09:25 PM
 • सांगली- काेरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी गुन्हा दाखल होऊन २ महिने गप्प असलेले शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी साेमवारी माैन साेडले. प्रकाश अांबेडकर व पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमुळे दंगल भडकली, नंतर महाराष्ट्रही पेटला, असा अाराेप करतानाच दंगल काळात झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने का द्यावी, नुकसान करणाऱ्यांकडूनच ही रक्कम वसूल करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. या दंगलप्रकरणी मिलिंद एकबाेटे व भिडे यांच्याविराेधात गुन्हे दाखल झाले अाहेत. एकबाेटे...
  March 20, 02:00 AM
 • कोल्हापूर- येथील न्यू शाहूपुरी मधील रमेश जयसिंग बनछोडे यांच्या 204 पाटणकर कॉलनीतील राहत्या दुमजली घराला आग लागून 15 लाखाचे प्रापंचिक साहित्य आगीत जळून खाक झाले तर एका म्हैशीचा या आगीत होरपळून मृत्यू झाला .सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 5 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने 20 जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास शाहूपुरी येथील पाटणकर कॉलनी मध्ये राहणाऱ्या रमेश बनछोडे यांच्या राहत्या घराला भीषण आग लागली....
  March 19, 08:55 PM
 • कोल्हापूर-देशातील समृद्ध वारशाचा आधार घेऊन ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नियोजित वापर करून भारताची विश्वगुरु ही जुनी ओळखच नव्याने दृढ करण्याचे आवाहन आज ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष प्रा. ए. एस. किरणकुमार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या 54 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. लोककला केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे होते. अवकाश शास्त्रज्ञ प्रा. ए. एस. किरणकुमार यांच्या हस्ते प्रियांका पाटील...
  March 19, 06:08 PM
 • पुणे/कोल्हापूर-उन्हाळा सुरू होऊन काही दिवसच झाले असले तरी वातावरणात प्रचंड उकाडा आणि तीव्र उन्हाच्या झळानी हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना गुढी पाडव्याच्या दिवशी मुसळधार पडलेल्या पावसाने काही अंशी दिलासा मिळाला. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले होते.पुण्यामध्ये शहराच्या विविध भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. आज दुपारी आकाशात ढग दाटून आले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. शहरात सर्वच ठिकाणी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी आज...
  March 18, 06:31 PM
 • कोल्हापूर- कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण हद्दीतील जमिनींचे सुनियोजन करून 42 गावांच्या सर्वांगिण विकासाचे प्रकल्प हाती घेऊन नगर रचना योजनेच्या माध्यमातून जमीन ताब्यात घ्यावात. तसेच नागरीकांचे जीवनमान उंचाविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडील अधिसूचनेनुसार कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र घोषित केले असून या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची पाहिली बैठक...
  March 18, 06:42 AM
 • कोल्हापूर- कोल्हापूर शहर पाणी पुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुल करणेच्या मोहिमेअंतर्गत आज 97 लाख 55 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी पाटबंधारे विभागाच्या पंचगंगा व वारणाभवन या इमारतींचा पाणी पुरवठा करणारी सहा कनेक्शन बंद करण्यात आली. पाटबंधारेच्या पंचगंगा भवनकडे 35 लाख 61 हजार 397 रुपये व वारणाभवन या इमारतीकडे 61 लाख 93 हजार 977 रुपये अशी एकूण रु.97 लाख 55 हजार 374 इतकी थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी महापालिकेने पाटबंधारे खात्याला जानेवारी 2018 मध्ये रितसर नोटीस बजावली होती. मुदत देवूनही थकबाकी न...
  March 17, 09:47 PM
 • कोल्हापूर- नव्वदीतल्या वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या एका नराधम नराधमाला आज कोल्हापुर जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विष्णू कृष्णा नलवडे (52) असे या नराधमाचे नाव आहे. भुदरगड तालुक्यातील नांगरवाडी गावी 4 मार्च 2015 रोजी अंथरूणावर खिळलेल्या एका असहाय वृद्धेवर या नराधमाने कुकर्म केले होते. या नराधमाला पकडून शेजाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या नराधमाविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरु होता. एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये वैद्यकीय...
  March 17, 07:34 PM
 • कोल्हापूर- शिक्षकांच्या न्याय मागण्यांबाबत आंदोलन करून शिक्षकांनी कोल्हापुरात चक्क राज्य सरकारच्या विरोधात भिक मागून आपला निषेध व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक विना अनुदानित वर्ग, तुकडी शिक्षक कृती समितीच्यावतीने आज शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी भीक मागो आंदोलन करून शासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील अतिरिक्त अथवा नैसर्गिक वाढीच्या सन 2012- 13 या सालात 5 हजार 973 तुकड्यांना सरकारने...
  March 17, 05:03 PM
 • कोल्हापूर- शिक्षणाचे कंपनीकरण करून शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आज कोल्हापुरातील बिंदू चौकातून दसरा चौकापर्यंत चक्क महिलांनी राज्य शासनाची प्रेत यात्रा काढली आणि जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. आज सकाळी बिंदू चौक येथून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. राज्य सरकारने कंपन्यांना शाळा सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे विधेयक विधानपरिषदे समोर मांडण्यात आले...
  March 17, 04:31 PM
 • कोल्हापूर/पुणे-ढगाळ वातावरणात आज पुणेकरांची सकाळ उजाडली. कोथरूड परिसरात पावसाचा हलका शिडकावा झाला आहे.शिवाजीनगर, डेक्कन परिसरातही हलका पाऊस कोसळला आहे.पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागास आणि कोकणात अवकाळी पावसाने काल झोडपून काढले.मुंबईतही पावसाचा हलका शिडकावा झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कळे, बाजारभोगाव परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ...
  March 15, 05:22 PM
 • कोल्हापूर वेगात दुचाकी चालवणाऱ्या एका स्टंटबाज तरुणाने महिलेच्या मोपेडला धक्का दिला. भरधाव वेगात तो तसाच पुढे निघाला. तरुणाच्या कृत्यामुळे संतापलेल्या डॅशिंग तरुणीने तरुणाचा पाठलाग केला. मिरजकर तिकटीजवळ त्याला गाठून आपली मोपेड त्याच्या दुचाकीला आडवी केली. क्षणाचाही विचार न करता चंडीचे रूप धारण करून तरुणीने त्याला भर चौकात चांगलाच चोप दिला. या प्रकारामुळे सुरुवातीला कोणाला काहीच समजत नव्हते. तरुणाची चूक कळाल्यावर मात्र बघ्यांनी चंडीचे रूप धारण केलेल्या तरुणीच्या धाडसाचे कौतुक...
  March 13, 05:42 PM
 • कोल्हापूर-हातकणंगले येथील आण्णासाहेब डांगे विद्यालयात शिकणारे दोन शालेय विद्यार्थी सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर जैन बस्तीजवळील विहिरीत पोहायला गेले असता गाळात अडकून त्यांचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 6 वीच्या वर्गात शिकणारे आमीन मुजावर (11) आणि अपान सय्यद (11) विहिरीत पोहत होती. त्यावेळी त्यांच्या बरोबरच अन्य मुलेही विहिरीत पोहायला आली होती. दोघांना गाळात अडकलेले पाहून बाकीच्या मुलांनी जोरात आरडा ओरडा केल्याने गावकऱ्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. नाकातोंडात आणि...
  March 12, 09:16 PM
 • कोल्हापूर- अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवार कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या रस्त्यावरच भर रणरणत्या उन्हात ठाण मांडून अंगणवाडी सेविकांनी रास्ता रोको आंदोलनही केले.यावेळी महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सगळा रोष काढण्यात आला. कांद्यात कांदा कुजका कांदा आणि पंकजा मुंडेना बोचक्यात...
  March 10, 05:39 PM
 • मुंबई/कोल्हापूर-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, आधुनिक युगाचा विश्वकर्मा म्हणून नावाजलेले कर्तुत्ववान कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत अनोख्या ढंगात महिला दिन साजरा करण्यात आला. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून एन. डी. स्टुडीओत साकार झालेल्या अखंड बॉलीवूडचा नजराणा याची देहि याची डोळा पाहण्याचा रंजक अनुभव महिलांनी घेतला. एन.डी. फिल्म वर्ल्डच्या अंतर्गत, एन.डी. स्टुडिओच्या भव्यदिव्य आवारात उभारण्यात आलेल्या या मायानगरीत, मराठी...
  March 9, 05:19 PM
 • कोल्हापूर-अश्विनी बिद्रे यांच्या खूनाची सत्तारूढ तीन आमदारांना पूर्ण कल्पना होती. हे तिघेही माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेयांचा भाचा राजेश पाटील याच्याबरोबरच अभय कुरूंदकर याच्या फ्लॅटवर येऊन गेले होते असा सनसनाटी आरोप मृत अश्विनीचे पती राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला. राजकीय दबाव असल्याचाही आरोप गुरूवारी दुपारी गोरे तसेच अश्विनी यांचे वडील जयकुमार व बंधू आनंदयांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी मोठा राजकीय दबाव असल्याचाही आरोप केला आहे. राजू गोरे म्हणाले, 11 एप्रिल 2016...
  March 8, 04:56 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात