जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • टेंभुर्णी- सोलापूर जिल्ह्यातील आढेगाव (ता. माढा) येथे एका अपंग शेतकऱ्याची हत्या करून ती आत्महत्या असल्याचा बनाव उघडकीस आला. या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बाबासाहेब खाडेकर (५६) असे मृताचे तर प्रकाश शिंदे, विशाल शिंदे, तेजेश शिंदे, सोमनाथ व्यवहारे व अमोल पाटील अशी संशयीतांची नावे आहेत. बाबासाहेब खाडेकर आणि संशयितांचा शेताच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यांनी बाबासाहेबांना धमकी दिल्याने मुलगा रघुनाथ खाडेकरने शनिवारी टेंभुर्णी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती....
  February 18, 08:31 AM
 • सांगोला- माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबद्दल एक ते दोन दिवसांत सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोला येथे शनिवारी व्यक्त केले. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत ४४ जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. उर्वरित चार जागांबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या राज्य प्रमुखांवर ही जबाबदारी सोपवली आहे. यावर अंतिम निर्णय काँग्रेस पक्ष येत्या ८ दिवसांत निर्णय घेईल. त्यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे पवारांनी...
  February 10, 09:24 AM
 • सांगोला- माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबद्दल एक ते दोन दिवसात सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे मत राष्ट्रवादी कॉँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगोला येथे शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. रफालबाबत दाल में कुछ काला है असे म्हणत जेपीसीची मागणी करून केंद्र सरकारने दूध का दूध पाणी का पाणी हे जनतेसमोर आणण्याची संधी असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील जागावाटपाबाबत पवार म्हणाले, ४४ जागांवर दोन्ही...
  February 9, 07:10 PM
 • मुरूम- गरोदर पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर रात्रभर मृतदेहाशेजारी झोपून राहिलेल्या पतीने सकाळी उठून पोलिस ठाणे गाठत खून केल्याची माहिती दिली. ही घटना उमरगा तालुक्यातील मुरूम येथे गुरुवारी (दि.8) रात्रीच्या दरम्यान घडली.घटनेची माहिती मिळताच मृत महिलेच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी आरोपी पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. मुरूम येथील संभाजीनगर येथील विनोद धनसिंग पवार (रा.बेळंब तांडा, ता. उमरगा) याची पत्नी...
  February 9, 04:41 PM
 • सोलापूर.दुग्ध व्यवसाय हा शेतीला चांगला जोड व्यवसाय. पण, यंदाच्यावर्षी दुष्काळामुळे जनावरांच्या चारा-पाण्याची मोठी समस्या आहे. तर, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनावरांना संसर्गजन्य रोग होत असून, इतर आैषधे अद्याप आली नाहीत. उपलब्ध आैषधे दवाखान्यांपर्यंत गेली नाहीत. उपचारांसाठी डॉक्टरांची पदे रिक्त, जनावरांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत दवाखान्यांची संख्या अपुरी. एकीकडे नैसर्गिक संकट अन् दुसरीकडे प्रशासनाच्या संथगतीच्या कारभाराची समस्या, यामुळे दररोज सुमारे दहा लाख...
  February 8, 11:53 AM
 • सोलापूर -सोलापूर विद्याापीठ पुरातत्त्व विभागाद्वारे मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील उत्खनन मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. ११ जानेवारीपासून नरखेड गावालगत असलेल्या भोगावती नदी काठावरील एका टेकडीवजा जागेवर हे उत्खनन मोहीम विभागप्रमुख डॉ. माया पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते मोहिमेचे उद््घाटन करण्यात आले. दरम्यान सातवाहन कालावधीतील सुसंगत अशा विविध वस्तू, मातीची भांडी, पेव , हस्तीदंती मणी, लाल - काळ्या मातीची भांड्याचे तुकडे आदी...
  February 7, 11:39 AM
 • उत्तर सोलापूर. भारतीय दूरसंचार निगमच्या (बीएसएनएल) केबलला परस्पर जोडणी करून केबल प्रक्षेपण केल्याचा प्रकार नान्नज येथे उघडकीस आला असून, या चोरीत दूरसंचार खात्यातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. यामुळे विभागाला लाखो रुपयांचा चुना लागला आहे. अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळत ती केबलच आमची नाही, असा पवित्रा घेतला आहे. दूरसंचार विभागाचे सर्वत्र फायबर केबलचे जाळे पसरले आहे. विभाग स्वतःच्या व्यवसायाच्या सेवा पुरवण्यासाठी या केबलचा वापर करतो. त्याच बरोबर खासगी...
  February 7, 11:36 AM
 • सोलापूर - दोन महिन्यांचे वेतन अदा करणे, त्यात एक महिन्याचे रोखीने तर एक महिन्याचे बँकेत वेतन अदा करणे. याशिवाय ११ कर्मचाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या अटीवर मागील २२ जानेवारीपासून सुरू असलेला संप सोमवारी १४ व्या दिवशी मागे घेण्यात आला. याबाबत महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी मध्यस्थी करून कामगार संघटनेबरोबर चर्चा केली. त्यानंतर सोमवारी संप मागे घेण्यात आला. दरम्यान मंगळवारी दुपारी वेतन अदा केल्यावर सिटीबस धावतील, असे परिवहन...
  February 5, 11:43 AM
 • सोलापूर - शहराच्या मध्यवर्ती परिसरातील सिद्धेश्वर वनविहारात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या फुलपाखरू उद्यानाची दुरवस्था झालीय. फुलपाखरांचा आकार दिलेले फायबरचे सांगाडे शिल्लक असून एकही रोपटे जिवंत नाही. राखीव वनक्षेत्रात वनराई फुलवण्याऐवजी सिमेेंटचा वापर करून बांधकामावर वनअधिकाऱ्यांचे विशेष लक्ष आहे. देशभरात फुलपाखरांच्या दीड हजार जाती आहे. त्यापैकी ६५ ते ७० प्रकारची फुलपाखरे सोलापुरात आढळतात. त्यामुळे निसर्गप्रेमींंनी फुलपाखरे उद्यान...
  February 5, 11:38 AM
 • अकलूज (जि. सोलापूर) - संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी काँग्रेसने आखलेला आराखडा आमच्या समोर मांडला नाही म्हणून त्यांच्याशी आमच्या वाटाघाटी बंद झाल्या आहेत. तरीही उमेदवारांची यादी जाहीर होईपर्यंत चर्चेची दारे खुली असतील, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी सांगितले. वंचित बहुजन मेळाव्यास आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सोलापूर लोकसभा लढवण्यासाठी आपल्याला आग्रह होत आहे, त्याचा आपण विचार करत आहोत, असे त्यांनी सांगितले. माढा लोकसभेसाठी माजी आमदार...
  February 4, 09:07 AM
 • सोलापूर- चोरी करण्यासाठी पुण्याहून सहा जणांची टोळी ४०० सीसीच्या बाईकवरून सोलापुरात आली. दिवसभर सोरेगाव, कुमठे, सैफुल, बाळे या भागात पाहणी केली. सोलापुरात दिवसभर रेकी केली. एका हॉटेलमध्ये जेवण केले. सोरेगावातील गजानन महाराज मंदिरात चोरीचा प्लॅन ठरला. एका शेतामध्ये दुचाकी लावून झोपले. मध्यरात्रीच्या सुमाराला मंदिराचा दरवाजा उघडून देवाच्या डोक्यावरील चांदीचे छत्र, पादुका, दानपेटीतील पैसे पळवले. चार ठिकाणी घरेही फोडली अन् थेट विजापूरला गेले. तिथून पुणे गाठले. ही कथा कुठल्या चित्रपटातील...
  February 3, 10:49 AM
 • सोलापूर- पंढरपूर-सोलापूर मार्गावर कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. पंढरपूर तालुक्यातील देगावजवळ शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला. मिळालेली माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर आगाराची इस्लामपूर- अक्कलकोट ही बस सोलापूरकडे निघाली होती. यावळी देगाव हद्दीत आले असता समोरून येणार्या भरधाव कारने बसला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की कार बसच्या निम्म्यापर्यंत आत घुसली. अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व...
  February 2, 07:10 PM
 • पंढरपूर- मुलगा नपुंसक असताना त्याचे लग्न लावून विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पंढरपूर शहरातील उमेश विरधे यांच्यासह त्यांची पत्नी , मुलगा , मुलगी यांच्यासह अन्य एक अशा एकूण पाच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्याच सुनेने तक्रार दिली आहे. दरम्यान, आपला पती नपुंसक असून लग्नाच्या पहिल्या दिवसापासून एकदाही त्याने शारीरिक संबंध ठेवले नसल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. उमेश विरधे यांचा मुलगा सिद्धिविनायक याचा विवाह जून २०१८ मध्ये सायलीशी झाला होता....
  February 2, 12:23 PM
 • सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला नरखेड येथील उत्खननाद्वारे अनेक रंजक पुरावे प्राप्त होत आहेत. लाल व काळ्या मातीचे भांडे मिळताहेत. शंखाच्या सहाय्याने तयार केलेले दागिने, बांगड्या, मातीच्या रांजणाचे अवशेष, जळालेले ज्वारी - मूग असे तब्बल २०० पेक्षा जास्त वस्तू या उत्खननाद्वारे आतापर्यंत आढळल्या. धान्य साठविण्याची प्राचीन पद्धत पेवही या उत्खननातून उजेडात आले. याबाबतची माहिती पुरातत्त्व तज्ज्ञ तथा पुरातत्त्व शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांनी दिली. सोलापूर विद्यापीठाच्या...
  February 2, 12:09 PM
 • सोलापूर : जीवघेण्या अपघातांच्या मालिकेनंतर शहरात जडवाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले. जडवाहनांना सकाळी सात ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते रात्री नऊच्या दरम्यान शहरात येण्यास मनाई करण्यात आली. तरीही सकाळी साडेआठपर्यंत व दुपारी चारनंतरही शहरात जडवाहने दिसत आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस चिरीमिरी घेऊन बंदीच्या वेळेत जडवाहने शहरात सोडत असल्याचे दिव्य मराठीच्या पाहणीत दिसून आले आहे. नागरिकांच्या जीवांचाच सौदा करण्याचा पोलिसांचा काळा कारभार छायचित्रांत कैद झाला. मंगळवारी व...
  January 31, 12:01 PM
 • अकलूज- पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देणे बेइमानी ठरेल असे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी स्वतः बेइमानी करून ५० टक्क्यांची सीमा ओलांडून सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी केला. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिवशी नथुराम गोडसेंच्या जयजयकाराच्या घोषणा भाजपच्या राजवटीत होत असल्याची टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त अकलूज येथे झालेल्या सभेत अजित पवार बोलत होते. केंद्र व राज्य सरकारवर सडकून...
  January 31, 07:53 AM
 • सोलापूर : १९६७ मध्ये फर्नांडिस बार्शीत होते. त्या वेळी कोयनेचा भूकंप झाला होता. सभा आटोपून रात्री बाराला कुर्डुवाडी मार्गे आम्ही कोयना परिसरात हिंडलो. शेतकऱ्यांचे काही नुकसान झाले नाही ना, याची पाहणी केली. त्यानंतर रेल्वेने पुन्हा परतीच्या मार्गावर असताना तिकीट निरीक्षक आला. त्याने थेट फर्नांडिस यांच्यासमोर येत तिकीट तिकीट असा आवाज दिला. आम्ही त्याला, अरे हे जॉर्ज फर्नांडिस खासदार आहेत, असे सांगितले. त्याने टीसी अवाक््च झाला. फर्नांडिस रेल्वेमंत्री होते, संरक्षणमंत्री होते. परंतु...
  January 30, 12:57 PM
 • सोलापूर : महात्मा गांधीजींचे सोलापूरशी लोकमान्य टिळकांएवढे घनिष्ठ संबंध नव्हते. तरीपण महात्मा गांधीजींची शिकवण प्रमाण मानून त्यांचे आदेश तंतोतंत पाळणारे शेकडो अनुयायी सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात होते. १९२१ आणि १९२७ साली असे दोन वेळा गांधीजी सोलापूर जिल्ह्यात येऊन गेले. २६ मे १९२१ रोजी गांधीजींची सोलापुरात भव्य सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी शेठ हिराचंद नेमचंद हे होते. त्यावेळी सोलापूर नगरपालिकेतर्फे मानपत्र देऊन गांधीजींना सन्मानित करण्यात आले होते. या सभेत त्यांनी लोकमान्य...
  January 30, 12:51 PM
 • सोलापूर : निवडणूक कालावधीत राजकीय पक्षांविरोधात आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी केल्या जातात. पण पुरावे नसल्याने कारवाईही होत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत आता मतदारच थेट आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकतील. यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल (C-vigil) मोबाइल अॅप विकसित केले आहे. या अॅपवर मतदारांना आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार तर करता येईलच; याशिवाय फोटो, व्हिडिओही टाकता येणार आहे. विशेष म्हणजे, पुराव्यांची खात्री करून केवळ १०० मिनिटांत कार्यवाही किंवा कारवाईचे स्टेटस तक्रारदारास...
  January 30, 07:46 AM
 • कळंब- दुष्काळी परिस्थिमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील ६६ हजार हेक्टरवरील जिरायत तर १५ हजार हेक्टरवरील बागायत शेतीला मदत मिळणार असून ६४ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कळंब तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप पिके पाण्याविना वाळून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होते. या शेतकऱ्यांना दिलासा...
  January 29, 11:28 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात