जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • कळंब -नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश न मिळण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या देवळाली (ता.कळंब) येथील अक्षय देवकर याच्या कुटुंबाला छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी भेट दिली. या कुटुंबाचे दुःख पाहून छत्रपती संभाजीराजेंनाही अश्रू अनावर झाले. शेतकरी कुटुंबातील अक्षय शहाजी देवकर या दहावीत ९४.२०% गुण मिळवणाऱ्या मुलाने अकरावीत चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल की नाही या चिंतेतून २० जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोमवारी कुटुंबाला...
  June 25, 09:38 AM
 • सातारा - लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी ईव्हीएमचा घोळ झाल्याचे आरोप केले जात आहेत. अशा स्वरुपाचे आरोप करणाऱ्या नेत्यांमध्ये आता खासदार उदयनराजे भोसले यांची भर पडली आहे. उदयनराजेंनी सातारा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असा इशारा दिला. निवडणूक आयोगाने माझ्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी, मी पडलो तरी चालेल. लोकसभेत किती व्हायरस शिरले असा सवाल करताना उदयनराजेंनी आपला संताप नोंदवला आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमधून झालेली मतमोजणी आणि प्रत्यक्ष झालेले मतदान यात फरक आढळून आला आहे....
  June 22, 11:44 AM
 • सातारा - साताऱ्यात कोयना आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी सकाळी 4.8 स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7 वाजून 48 मिनिटांनी भूकंप झाला. कोयनापासून 10 किमी अंतरावर याचे केंद्र आहे. भूकंपामुळे संबंधीत भागात कोणतीही हानी झाल्याची माहिती मिळाली नाही. कोयना व्यतिरिक्त कराड आणि पाटण परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. कोयना भागात गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यामुळे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे लोक भीतीपोटी रात्रीच्या वेळी...
  June 20, 12:06 PM
 • सातारा -लाेकसभा निवडणुकीच्या काळात सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील गटबाजी राेखण्यात यश आल्याचा पक्षाचा दावा फाेल ठरला आहे. पक्षाच्या नेत्यांवर वारंवार टीका करणारे खासदार उदयनराजे भाेसले यांना आवरा, नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला माेकळे, असा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी शुक्रवारी दिला. शनिवारी मुंबईत हाेणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही आम्ही हेच सांगणार असल्याचे ते म्हणाले....
  June 15, 10:29 AM
 • सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले असतील, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, खुद्द उदयनराजेंनी मात्र या पदाबाबत खळबळजनक वक्तव्ये केली आहेत. मुख्यमंत्र्यांचे काम हे चार भिंतींत बसलेल्या कारकुनासारखे असते. त्यांना फक्त प्रशासन सांभाळायचे असते. पण, आपल्याला चार भिंतींत बसणे नव्हे, तर मुक्त फिरणे आवडते, अशी भूमिका त्यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत मांडली. तेव्हाच त्यांनी या पदासाठी...
  June 14, 10:36 AM
 • सातारा- माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचीत भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी खासदार रणजीतसिंहांचे कौतुक केले आहे. खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील जनतेसाठी घेतलेल्या पाण्याच्या धाडसी निर्णयाबद्दल उयनराजेंनी रणजित निंबाळकरांचे कौतुक केले. रणजीत निंबाळकर यांच्या पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागाने नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे अनधिकृत पाणी थांबवण्याचा निर्णय...
  June 13, 04:48 PM
 • अकलूज - नीरा देवघर धरणाचे बारामतीला गेली १२ वर्षे नियमबाह्य नेण्यात येणारे पाणी बंद करण्याचा अध्यादेश बुधवारी राज्य शासनाने काढला. माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी साेडून नुकतेच भाजपत आलेले अकलूजचे माजी राज्यमंत्री रणजितसिंह मोहिते यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांना मोठा धक्का बसला आहे. आता फलटण, माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्याला सात टीएमसी पाणी जास्तीचे...
  June 13, 09:31 AM
 • माढा - चारचाकीसह अन्य वाहने चालवण्यासाठी चालक ठेवले जातात. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात एका अवलियाने आपली मोटारसायकल चालवण्यासाठी चक्क पगारी ड्रायव्हर नेमला आहे. मोहन बबन चवरे यांनी आपल्या नव्याकोऱ्या मोटारसायकलसाठी दत्ता नागनाथ पवार यांना ५०० रुपये रोजाने चालक म्हणून ठेवले आहे. हो, मला गाडी चालवायला भीती वाटते, पण माझ्यामुळे एखाद्याला रोजगार मिळतोय याचं समाधान आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. इंदिरानगर भागात आई व भावासह राहणारे मोहन चवरे माढ्यात तब्बल ३५ वर्षांपासून...
  June 13, 09:00 AM
 • सोलापूर - सोलापूरमधून बेपत्ता झालेले वकील राजेश कांबळे यांचा थेट मृतदेहच सापडल्याने खळबळ माजली असून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे. वकील राजेश कांबळे बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी कसून तपास सुरू केला तेव्हा राजेश कांबळे यांचा मृतदेह सापडला. परंतु, कांबळे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर त्यांना ठार केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. हे तुकडे एका पोत्यात भरून...
  June 13, 08:56 AM
 • सोलापूर -दूर अंतराच्या रेल्वेत थकून जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. या प्रवासात कुणी तुमच्यापाशी येऊन कुणी तुमची मसाज करून दिली तर? हे ऐकूनच आराम वाटला असेल ना! ...हे खरे आहे. देशात प्रथमच प. रेल्वेचा रतलाम विभाग इंदूर स्टेशनवरून धावणाऱ्या ३९ रेल्वे गाड्यांत ही सुविधा देणार आहे. अवघ्या १०० रुपयांत प्रवाशांना डोके व पायाच्या तळव्याची मसाज करून दिली जाईल. यामुळे प्रवाशांना आराम वाटेल, वर रेल्वेच्या उत्पनातही वाढ होणार आहे. रतलामने दिला होता प्रस्ताव...: तिकीट दर वगळता इतर...
  June 9, 08:34 AM
 • सोलापूर -सोलापूरच्या विद्यापीठ प्रवेशद्वारावर अॅसिडयुक्त बॅटऱ्यांनी भरलेल्या ट्रकवर प्रवासी बस आदळून गंभीर अपघात घडला. बस ट्रकला जाऊन धडकल्याने बॅटऱ्या फुटल्या व त्याचे अॅसिड बसवर उडाले. या अॅसिडने आग धरल्याने बसने पेट घेतला. त्यामुळे बसमधील १३ जण होरपळले. स्थानिक युवकांनी बसची काच फोडून प्रवाशांना वाचवले. कर्नाटकमधून बॅटऱ्या घेऊन निघालेला ट्रक विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ थांबला होता. शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास तेलंगण परिवहन महामंडळाची बस हैदराबादहूहन पुण्याकडे निघाली...
  June 8, 09:00 AM
 • पंढरपूर -पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ते पत्राशेडपर्यंत स्कायवॉक ६५० मीटरच्या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. तसेच दर्शन हॉलच्या कामाला तांत्रिक मान्यता मिळेल. ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर भाविकांना श्री विठुरायांचे सोयीस्कर दर्शन मिळावे यासाठी राबवण्यात येणारी टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीची गुरुवारी बैठक घेण्यात आली,...
  June 7, 10:44 AM
 • काेल्हापूर/ सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचं आमचं ठरलंय असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावर शिवसेनेत काेणतीही नाराजी नसल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह व ठाकरे कुटुंबीयांसह काेल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेत. या वेळी महसूलमंत्री तथा भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलही उपस्थित हाेते. लोकसभा निवडणुकीत साथ दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरकरांचे आभार...
  June 7, 10:15 AM
 • सोलापूर -सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेहमी दहशतवाद आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा कांगावा केला. आता या शत्रूराष्ट्राला प्रत्युत्तर देण्याची चांगली संधी आहे. आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आता पाकिस्तानवर हल्ला करावा आणि जनतेने त्यांची केलेली निवड सार्थ ठरवावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी साेलापुरात केले. मोदी ज्या मुद्द्यांवर निवडून आले ते पाहता...
  June 7, 09:02 AM
 • दौलताबाद/औरंगाबाद -काेल्हापूरच्या देवीचे दर्शन घेऊन गाेव्याला निघालेल्या औरंगाबादच्या सात मित्रांची कार व ट्रकचा बेळगावला भीषण अपघात झाला. यात सातही मित्र ठार झाले. पुणे- बंगळुरू महामार्गावर बेळगावच्या श्रीनगर मार्गावर दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. मृतांपैकी चौघे औरंगाबदजवळ शरणापूर तर दाेघे दाैलताबादचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये अमोल हरिशचंद्र निळे (२६), अमोल चौरे (२६), रवी मच्छिंद्र वाडेकर (२६), सुरेश कैलास कान्हेरे (२९), नंदू किसन पवार (सर्व रा. शरणापूर) गोपी कडुबा पवार (३२) व महेश नंदू...
  June 3, 10:14 AM
 • सोलापूर- अनेक ठिकाणी लग्नात घोड्याला नाचवण्याची प्रथा आहे. पण या प्रथेमुळे माढा तालुक्यातील अंजनगावच्या एका व्यक्तीचा हकनाक जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे लग्न सभारंभात घोडा नाचवण्याची प्रथा बंद करण्यात यावी, अशी मागणी सुरू झाली आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव गावातील किसन वाघमोडे यांच्या घरी लग्न होते. लग्नातील धार्मिक विधीसाठी नवरदेवाची मिरवणूक घोड्यावरुन मंदीराकडे रवाणा झाली. त्यावेळी गावकऱ्यांनी नवरदेवाचा घोडा बँडच्या तालावर नाचवण्यास...
  May 30, 06:24 PM
 • कोल्हापूर- लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळीकडे मंत्रिमंडळाची चर्चा सुरु झाली आहे. यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांनी राजकारणातल्या मोठ्या नेत्यांना पराभूत केले. त्यात हातकणंगलेमध्येही नवख्या धैर्यशील माने यांनी मात्तबर राजू शेट्टी यांना पराभव दाखवला. पण आता याच कोल्हापूरमध्ये चकित आणि सुखद अशी घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. कोल्हापूरात राजकारणातील नवा कोल्हापुरीत पॅटर्न पाहायला मिळाला. शिवसेनेचे नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील माने यांनी ज्यांचा पराभव केला त्या...
  May 29, 12:44 PM
 • औरंगाबाद -प्रकाश आंबेडकरांविरोधात प्रचार करण्यासाठी सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईतून मौलाना बोलावले होते. अकोल्यात आंबेडकर जिंकणार आहेत, मग त्यांना इथे मतदान कशाला करता, त्यापेक्षा सुशीलकुमार शिंदेंना मतदान करा, असे आवाहन या मौलानांच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यामुळेच आंबेडकरांचा पराभव झाल्याचा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. ते गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. दलित समाजाची मते एमआयएमला मिळाली. मात्र, मुस्लिम समाजाची मते प्रकाश...
  May 28, 09:10 AM
 • सोलापूर -लिंगायत समाजाचे वर्चस्व तसेच सोलापूरकर जनतेचे मोदींवरचे प्रेम यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही दिसून आले. तसेच काँग्रेसच्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या मतांना बहुजन वंचित बहुजन आघाडीने खिंडार पाडले. यामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा पराभवास सामोरे जावे लागले. या पराभवामुळे त्यांचे राजकीय पटलावरून जवळपास पॅकअप झाल्याचे चित्र आहे. कारण त्यांनी स्वत:च ही शेवटची निवडणूक असल्याचे घोषित केलेले आहे. दरम्यान, मागच्या वेळच्या तुलनेत भाजपला अधिक...
  May 24, 12:27 PM
 • कोल्हापूर- चुरशीच्या अशा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावेळेसही कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती, तसेच शिवसेनेनेही परत एकदा संजय मंडलिकांना संधी दिली. याशिवाय बसपातर्फे दुनदप्पा कुंदप्पा श्रीकांत तर वंचित आघाडीतर्फे डॉ. अरुणा माळी मैदानात होत्या. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची खास बाब म्हणजे एकेकाळी शिवसेनेचे उमेदवार असलेले धनंजय...
  May 23, 06:18 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात