जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर- पत्नी असताना दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले. दोघांमध्ये घरगुती कारणावरून नेहमी भांडणे व्हायची. याच कारणावरून पतीने राॅकेल ओतून पेटवून दिले. पत्नीचा मृत्यूपूर्व जबाब घेण्यात आला होता. तोच न्यायालयात सिद्ध झाल्यामुळे पतीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी सुनावली. संतोष बसवराज गायकवाड (वय ३८, रा. भैरूवस्ती, लिमयेवाडी परिसर) याला शिक्षा झाली. मल्लवा गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ६ मे २०१६ रोजी घडली होती. सलगरवस्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल...
  December 16, 11:15 AM
 • सोलापूर- शहरातील शास्त्रीनगर परिसरातील इंदिरानगरात सुरु असलेल्या कुंटणखान्याचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे मुंबईतून साडेचार हजार रुपये रोजावर एक तरुणीला बोलावून तिच्याकडून देहविक्री करून घेतली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी धाड टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. रजिया जाबीर शेख (वय-49) या महिला दलालाचा त्यात समावेश आहे. काय आहे हे प्रकरण? रजिया जाबिर शेख ही शास्त्रीनगर भागातील इंदिरा नगरात एका घरात राहते. रजिया मागील सात वर्षांपासून आपल्या घरात कुंटणखाना...
  December 15, 07:04 PM
 • पंढरपूर- अयोध्येत राम मंदिराची लवकरात लवकर उभारणी व्हावी यासाठी झोपी गेलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी पंढरपूर येथून उद्धव ठाकरे २४ डिसेंबरला रणशिंग फुंकणार अाहेत. विठ्ठल हे कोट्यवधी गोरगरीब, मजूर, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे आराध्य दैवत असल्याने सभेसाठी पंढरपूरची निवड केल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २४ डिसेंबर रोजी येथे होणाऱ्या सभेच्या तयारीचा आढावा खासदार संजय राऊत शुक्रवारी पंढरपुरात घेतला. खासदार राऊत यांनी सभा ज्या...
  December 15, 09:53 AM
 • delete
  December 14, 10:23 AM
 • सोलापूर- दुष्कर्म व विनयभंग प्रकरणातील संशयित आरोपीस अटकपूर्व जामीन मिळाल्याविरुद्ध आणि अारोपीकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर एका तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. करमाळा तालुक्यातील सारंग श्रीदत्त सरडे या तरुणाविरुद्ध पीडित तरुणीने बार्शी पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून सरडेविरुध्द पोलिसांनी कारवाई करावी यासाठी तरुणीने प्रयत्न केले होते. त्यानंतर सरडे यास अटकपूर्व जामीन मंजूर झाला....
  December 14, 09:46 AM
 • सोलापूर - अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी न्यायालयाने तरुणास १० वर्षांची शिक्षा सुनावली. अशोक गंगासागर शुक्ल (कल्याणनगर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. माढ्यातील अल्पवयीन मुलीस बेकरीत काम करणाऱ्या अशोक शुक्लने फूस लावून पळवून नेले होते. तत्पूर्वी पीडितेच्या वडिलांनी २४ एप्रिल २०१६ राेजी माढा पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. अाराेपी या मुलीस उत्तर प्रदेशात घेऊन गेला. तिथे त्याने मुलीबरोबर बळजबरीने लग्न करून दुष्कर्म केेले. हे निष्पन्न...
  December 14, 09:12 AM
 • सोलापूर- केवळ एक बटण दाबून १५ सेकंदांचा व्हिडिओ तयार करणाऱ्या चिनी अॅपच्या भुलभुलैयात तरुणाई अडकत चालली आहे. सामाजिक स्वास्थ्याबरोबरच वैयक्तिक नुकसान, मौल्यवान वेळेचा अपव्यय, त्यातून येणारे नैराश्य आणि त्रागा याकडे दुर्लक्ष करीत तरुणाई सोशल मीडिया स्वातंत्र्याचा गैरअर्थ काढत वाटेल त्या प्रकारे व्यक्त होत चालली आहे. आताची पिढी एकलकोंडी बनते आहे, त्रासिक बनते आहे. महत्त्वाकांक्षा कमी, विनाकष्टाने मिळणाऱ्या प्रसिद्धीकडे झपाट्याने आकर्षित होते आहे. याकडेही मनोविकार तज्ज्ञ...
  December 13, 09:52 AM
 • सोलापूर- अभियांत्रिकी शिक्षण घेत असणा ऱ्या विद्यार्थ्यांना कधीही इंटर्नशीप करता येऊ शकेल. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात एआयसीटीईने इंटर्नशीप संदर्भातील नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना उन्हाळी स्टीमध्ये पूर्णवेळ किंवा शैक्षणिक सत्र कार्यकाळात अर्धवेळी इंटर्नशीप करण्याची अनुमती महाविद्यालयांकडून मिळणार आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रॅक्टीकलचा अनुभव मिळावा या उद्देशाने हा बदल होत आहे. आता विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकलसाठी वेळ...
  December 13, 09:22 AM
 • मंगळवेढा- दुष्काळ असतानाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतीपंपांची वीज तोडल्यास त्यांना त्यांना कार्यालयात कोंडू, असा इशारा प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपसे यांनी दिला. बोराळे वीज उपकेंद्राला कायमस्वरूपी अधिकारी मिळावा, या मागणीसाठी खुपसे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने मंगळवेढा वीज वितरण कार्यालयावर हलगी मोर्चा काढला. या वेळी ते बोलत होते. तालुकाध्यक्ष राजू स्वामी यांनी कायस्वरुपी अधिकारी मिळावा, या मागणीचे निवेदन दिले होते. त्याकडे दुर्लक्ष...
  December 13, 09:02 AM
 • सोलापूर- भाजपच्या खोट्या आश्वासनाला जनता ओळखू लागली आहे. तसेच जात आणि धर्माच्या नावाने जास्त काळ राजकारण करता येत नाही, हे पाच राज्यांतील निकालावरून दिसत आहे. आजचा काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. लोकांचा कौल मान्य असून आत्मचिंतन करण्यात येईल, अशी भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. विजयकुमार देशमुख, पालकमंत्री : पाच राज्यांत जनतेने कौल दिला तो मान्य केला पाहिजे. राजस्थान व मध्य प्रदेशातील निकाल पाहता जनतेने नाकारले...
  December 12, 10:15 AM
 • सोलापूर- जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळा डिजिटल झाल्या असल्याचा गाजावाजा प्राथमिक शिक्षण विभागाकडून केला जातो. परंतु काही शाळांमध्ये वीज जोडणी नसल्याचे आढळून आले. डिजिटल क्लास रूम, ई-लर्निंग साहित्य काही शाळांमध्ये धूळखात पडलेले आहे. जिल्ह्यातील १७६ शाळांमध्ये वीज जोडणी झालेली नाही. तर ३५२ शाळांमध्ये वीज आहे. परंतु बंद स्थितीमध्ये आहे. मग सर्व शाळा डिजिटल कशा झाल्या? शाळा डिजिटल करण्याच्या योजनेत जिल्हा परिषदेच्या २८०५ तर मनपा ५९ शाळा डिजिटल झाल्या आहेत. मात्र काही डिजिटल शाळा...
  December 12, 09:39 AM
 • सोलापूर -विजापूर वेस येथील कुरेशी गल्लीत जनावरांची कत्तल प्रकरणाची बातमी दाखवली, बातमीत मुलाखत दिली या कारणावरून स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारासह दोघांवर शनिवारी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. बिलाल बाबू कुरेशी (वय २७), जाफर लालू कुरेशी (वय १९) या दोघांना पोलिस कोठडी मिळाली आहे. कत्तलखान्यामुळे दुर्गंधी पसरते, याबाबत स्थानिक वाहिनीमध्ये शेख यांनी मुलाखत दिली. पोलिस आयुक्त व...
  December 11, 10:34 AM
 • अक्कलकोट- हालचिंचोळी येथील एका वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून झाला. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास प्रशांत शहा यांच्या शेतातील ज्वारीत ही घटना उघडकीस आली. दत्तात्रय पांडुरंग धायगोडे (वय ५९) असे त्याचे नाव आहे. उत्तर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय यांचा भाऊ सुदाम पांडुरंग धायगोडे यांनी फिर्याद दिली. शनिवारी रात्री दत्तात्रय हा घरात मोबाइल ठेवून काही न सांगता बाहेर गेला होता. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादी सुदाम...
  December 11, 10:28 AM
 • सोलापूर- क्रिकेट खेळण्यावरून मुलाचे एका तरुणासोबत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून तरुणाने मुलाच्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. त्याप्रकरणी सिद्धेश्वर सुरेश शेटे (वय ३०, पासलेवाडी, मोहोळ) यास सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मैनाबाई दिलीप शेटे (वय ४०, रा. पासलेवाडी, मोहोळ) असे मृताचे नाव आहे. ही घटना दोन फेब्रुवारी २०१७ रोजी गावात घडली होती. याबाबत माहिती अशी की, मैनाबाई यांचा मुलगा विशाल व आरोपी सिद्धेश्वर शेटे...
  December 11, 10:20 AM
 • सोलापूर - पोलिस ठाण्यात आल्यानंतर नागरिकांना कशी मदत मिळते. त्यांच्या कामाचा लवकर निपटारा होतो का? कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस निरीक्षक अथवा उपअधीक्षक कसे काम करतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, चोरीचा तपास, गुन्हेगारांना अटक या विविध मुद्द्यांवर पोलिस ठाण्याचा कसा कारभार चालतो आणि मुख्य म्हणजे नागरिकांप्रती कसे पोलिसिंग होते या आधारे पोलिस ठाण्याचे रँकिंग ठरणार आहे. तीन महिन्यातून एकदा संबंधित पोलिस ठाण्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस...
  December 10, 10:48 AM
 • अकलूज - अकलूज येथील जुम्मा मशिदीत रोज ४ हजार वॅट विजेची निर्मिती होत आहे. या मशिदीतील विजेची दैनंदिन गरज भागवून उरलेली वीज मंडळास विकली जात आहे. सौर ऊर्जेवर वीज निर्मितीचा प्रकल्प राबवणारी ही राज्यातील पहिलीच मशीद आहे. अकलूजच्या भाजी मंडईलगत सुमारे ६०० नागरिकांच्या क्षमतेची जुम्मा मशीद आहे. मशिदीमध्ये ३० पंखे, ४० एलईडी बल्ब, पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटार या कामांसाठी विजेचा वापर होतो. त्याशिवाय जानेवारी महिन्यात येथे सहा एसी संच बसवण्यात येणार आहेत. या सर्व बाबींवर मशिदीला...
  December 10, 10:40 AM
 • सोलापूर - कोंतम चौक ते सिव्हिल चौक या मार्गावरून रिक्षातून प्रवास करताना मीनाक्षी कर्णेकर (रा. समृद्धी गार्डन जवळ, विजापूर रोड, सोलापूर) यांच्याजवळील सोन्याचे दागिने पळविले. ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली असून जेल रोड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. अनोळखी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. श्रीमती कर्णेकर या रिक्षातून प्रवास करताना अगोदरच रिक्षामध्ये बसलेल्या दोन महिलांनी प्रवासादरम्यान त्यांच्या पर्समधील एक तोळ्याचे दागिने काढून घेतले. सिव्हिल चौकात आल्यानंतर ही बाब लक्षात आली....
  December 10, 10:32 AM
 • मंगळवेढा - साेलापूर जिल्ह्यातील सलगर बु. (ता. मंगळवेढा) येथील ऑनर किलिंग प्रकरणास अाता नवे वळण लागले अाहे. या प्रकरणातील मृत डॉ. अनुराधा बिराजदार हिच्या अंत्यविधीच्या जागेपासून २० फुटांवर तिचा प्रियकर पती डॉ. श्रीशैल बिरादारचा मृतदेह रविवारी आढळून आला आहे. त्यामुळे डाॅ. शैलेश यांची हत्या झाली की त्यांनी अात्महत्या केली याविषयी तर्क-वितर्कांना उधाण अाले असून, हे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. गुरुवारी सकाळी कर्नाटक पोलिस डाॅ. श्रीशैलला घेऊन अनुराधाच्या अंत्यविधीच्या ठिकाणी व...
  December 10, 10:04 AM
 • वेळापूर- येथील आंतरराष्ट्रीय विज्ञान व अाध्यात्मिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर उपवास जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातमधील १४० साधक पदयात्रेत सहभागी आहेत. दररोज केवळ लिंबूपाणी आणि मध प्राशन करून हे साधक ४० किलोमीटर प्रवास करत आहेत. गुरुवारी रात्री ही दिंडी वेळापूर (ता. माळशिरस) येथे पोहोचली. श्री आनंदमूर्ती सेवा मंडळ, मानस योग साधना अकलूज शाखेने दिंडीचे स्वागत केले. दहा...
  December 8, 08:41 AM
 • औरंगाबाद- मागील ११ महिन्यांपासून शहर पोलिसांनी ज्याला शोधण्यासाठी दिवसरात्र एक केले तो चोरटा अखेर बालाजीनगरमध्ये सापडला. पोलिस कर्मचाऱ्याचे हरवलेले पिस्तूल घेऊन तो रोज शहरात राजरोसपणे फिरत होता. गुन्हे शाखेने एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज व हातावर गोंदवलेल्या चाेरट्याचा बारकाईने तपास करत त्याला ७ डिसेंबर रोजी अटक केली. अजय जितेंद्र कांडे (१९, रा. भीमनगर, गेवराई. ह. मु. गल्ली नं. २, बालाजीनगर) असे त्याचे नाव आहे. ७ जानेवारी २०१८ रोजी अमित शिवानंद स्वामी या पोलिस कर्मचाऱ्याचे ९ एमएम बोरचे...
  December 8, 08:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात