जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर - बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आयोजित सामूदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडप्यांचा विवाह झाला. मुकुंदनगर येथील डी. के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने आयोजन केले होते. भवानी पेठेतील अण्णाप्पा काडादी प्रशालेत दुपारी साडेबारा वाजता त्रिसरण पठण आणि मंगल परिणयाच्या विधीने विवाहसोहळा झाला.तथागत बद्धविहार समिती, मुकुंदगनर तालीम संघ, प्रबुद्ध कला व क्रीडा तरुण मंडळ, मातोर्शी रमाबाई आंबेडकर तरुण मंडळ, न्यू सिद्धार्थ तरुण मंडळ, भीमरत्न तरुण मंडळ, नवभारत तरुण मंडळांच्या...
  May 7, 11:35 AM
 • सोलापूर - शासकीय तंत्रनिकेतनच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थिनींनी दैनंदिन जीवन सुसह्य करण्यासाठी विज्ञानाचा आविष्कार घडवला आहे. रश्मी जंगम, अश्विनी द्येवरकोंडा, अश्विनी जोशी, सुनील नडगम या विद्यार्थ्यांनी प्रा. एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टंट वॉटर हिटरची निर्मिती केली आहे. यामुळे अगदी वाळलेला कचरा आणि रद्दी कागद सयंत्रात टाकून पाच सेकंदात गरम पाणी मिळवता येणार आहे.गरम पाणी ही प्रत्येक कुटुंबाची अत्यावश्यक गरज आहे. यासाठी गॅस, रॉकेल, लाकूड, कोळसा या इंधनांचा वापर...
  May 7, 11:30 AM
 • सोलापूर - जमिनींच्या वाढत्या किमतीमुळे मध्यमवर्गीयांचे गृहस्वप्न आवाक्याबाहेर जात असतानाच घर खरेदीवरील सरकारी करांचा विळखा अधिक घट्ट होत आहे. 25 एप्रिलपासून घराच्या खरेदीसाठी मुद्रांक शुल्कापोटी 17 हजार 400 रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. मुद्रांक शुल्कातील पाच लाखांपर्यंतची सवलत कमी केल्याने हा फरक पडला आहे. कर्ज, उचल आदी मार्गांनी जीवाचा आटापिटा करून गृहसौख्य मिळवू पाहणा-यांना हा मोठा धक्का आहे.राज्य शासनाने 25 डी नियमानुसार दिलेली सवलत काढून घेतली आहे. 25 डी सवलतीनुसार ग्राहकांना...
  May 6, 11:33 AM
 • सोलापूर - मोटारसायकलवर दादा, अण्णा, अप्पा व अन्य नावाने फॅन्सी नंबरप्लेट लावून फिरणा-यांवर कारवाईची मोहीम वाहतूक शाखेने तीव्र केली आहे. आता पोलिसांचे टार्गेट अॅपेरिक्षा, स्क्रॅप रिक्षा, ओव्हरसीट प्रवासी घेणा-या रिक्षा असणार आहे.एक हजार ते बाराशेच्या आसपास शहरात बिगर पासिंग अॅपेरिक्षा, बिगर परवाना अॅपेरिक्षा, स्क्रॅप रिक्षा फिरतात. अनेक अॅपेरिक्षांवर नंबरप्लेट नाहीत. तीन प्रवाशांना घेण्याची मुभा असताना अॅपेरिक्षात बारा ते पंधरा प्रवासी आणि तीन आसनी रिक्षांमध्ये सहा प्रवासी वाहतूक...
  May 6, 11:31 AM
 • सोलापूर - उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे औज येथील बंधारा तुडुंब भरला आहे. साडेचार मीटरइतका पाणीसाठा झाला असून, बंधा-यापासून पाच किलोमीटरपर्यंत तो पसरला आहे. शहराला पुढील दीड महिना पुरेलइतका तो आहे.दरम्यान, महापौर अलका राठोड, उपमहापौर हारून सय्यद, सभागृह नेते महेश कोठे, नगरसेवक दिलीप कोल्हे, सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे यांच्यासह अधिका-यांनी बंधा-यातील पाणीसाठ्याची पाहणी केली. शुक्रवारी महेश कोठे यांच्या प्रभागातील नागरिकांनी पाण्यासाठी आंदोलन केले होते. टाकळी...
  May 6, 11:29 AM
 • सोलापूर - सोलापुरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे तर आहेतच; पण वाहतुकीच्या समस्येनेही शहराला ग्रासले आहे. सोलापूरची जुहू चौपाटी म्हणून परिचित असलेला पार्क चौपाटीचा परिसर सायंकाळी गर्दीने फुललेला असतो. येथील चार हुतात्मे सोलापूरचा इतिहास सांगतात. या परिसराला रोज सायंकाळी भेळ, आइस्क्रीम, पाणीपुरी आणि फेरीवाल्यांचा गराडा असतो. याच परिसरात नागरिक आपली वाहने लावतात, तर ग्राहकांच्या प्रतीक्षेत रिक्षावालेही ठाण मांडून उभे असतात. एरव्ही निवांत असणा-या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे...
  May 6, 11:28 AM
 • सोलापूर - महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे यंदा प्रथमच राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषम पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून त्यात अश्विनी रुग्णालयाचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल, कवी मंगेश पाडगावकर (साहित्य), रमेश देव व वंदना गुप्ते (अभिनय) आणि हिवरे बाजारचे पोपट पवार आदींचा समावेश आहे. महामंडळाला यंदा 23 वर्षे पूर्ण होत असल्याने हे पुरस्कार 12 मे रोजी सायंकाळी सात वाजता योगी सभागृह, दादर (मुंबई) येथे वितरित केले जातील. याचवेळी चौथ्या गुजराती परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील 1100...
  May 6, 11:26 AM
 • सोलापूर - भारनियमनामुळे विजेचा वापर कमी होत असतानाच दुसरीकडे त्यातूनही जास्त विजेचा वापर केला तर वर्षाला अतिरिक्त 160 रुपये भरावे लागणार आहेत. या महिन्यातील वीज बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवही ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे. दरम्यान, थकबाकीदारांसाठी अभय योजना सुरू करण्यात आली आहे.दर महिन्याला येणारे महावितरणचे बिल म्हणजे ग्राहकांवर महाकराचा बोजाच आहे. स्थिर आकार, वीज आकार, वीज शुल्क , वीज विक्री कर, इतर आकार या पद्धतीने वीजबिल भरावे लागते. त्यातच आता दहा जानेवारी 2002 रोजीच्या...
  May 6, 11:24 AM
 • सोलापूर - सोलापुरातील पुणे नाक्याजवळील जागा एसटीचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. गेल्या दहा वर्षापासून या जागेचा वाद सुरू होता. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णयच हायकोर्टाने कायम ठेवलो. अंबादास साळुंके या व्यक्तीनेही या मोकळ्या जागेवर दावा केला होता. त्यामुळे हे प्रकरण 10 वर्ष वादात अडकले होते. शेवटी या प्रकरणाचा निकाल एसटीच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे नवे बसस्थानक होण्याचा मार्गही आपोआप मोकळा झाला.पुणे नाका याठिकाणी ही 4 एक्कर मोकळी जागा...
  May 6, 11:22 AM
 • सोलापूर - महापालिकेचे पाणी चोरून वापरल्याप्रकरणी अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील 15 कारखानदारांवर शुक्रवारी गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण पाच गुन्हे दाखल असून चार पोलिस अधिकारी तपास करीत आहेत.महापालिकेच्या जलवाहिनीला अनधिकृतपणे छिद्र पाडून नळजोड घेतली. त्यामुळे 11 लाख 825 रुपयांचे नुकसान झाले, असा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एमआयडीसी परिसरात महापालिकेच्या वतीने अनधिकृत नळजोड शोधमोहीम घेण्यात येत असून, आतापर्यंत 600 कारखानदारांकडील नळ तपासण्यात आले. उपमहापौर हारुण सय्यद यांनी मोहीम राबवत...
  May 6, 11:21 AM
 • सोलापूर - वर्षातील 183 दिवस पाणीपुरवठा करत महापालिका नळजोडधारकांकडून वर्षभराची पाणीपट्टी (2 हजार 205 रुपये) घेते. वस्तुत: निम्मीच रक्कम घेणे अपेक्षित असताना, त्यात आणखी 25 टक्क्यांची वाढ म्हणजे ग्राहकांना लुटण्याच प्रकार असल्याचे भारतीय नागरिक ग्राहक महासंघाने म्हटले आहे.महासंघाचे प्रमुख अॅड. खतिब वकील आणि बसवराज येरनाळे यांनी महापौर आणि आयुक्तांसमोर पाण्याचे गणित मांडले. परंतु नागरिकांसमोर ही वस्तुस्थिती पोहोचली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.अशी हवी आकारणी - एका व्यक्तीला...
  May 6, 11:20 AM
 • सोलापूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शाळांचे मूल्यांकन करण्याचे ठरवले आहे. उत्तम शाळेचे निकष ठरवण्यात आले असून त्याआधारे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. मंडळाच्या वेबसाइटवर ही माहिती सविस्तर देण्यात आली आहे. देशातील केंद्रीय शाळांचे असेसमेंट व अॅक्रिडेशन करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक वर्गाचेही गुणवत्तेनुसार अॅक्रिडेशन होणार आहे. शाळांना याची तयारी करावी लागणार असून तीन वर्षात आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक वर्गाकडे लक्ष व विद्यार्थ्यांमध्ये...
  May 6, 11:19 AM
 • सोलापूर: वाघ, सिंह, बिबट्यासह इतर वन्यजिवांची गणना करण्यासाठी रविवारी पाणवठय़ावर निरीक्षण करण्यात येणार आहे. पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांतील 90 ते 100 पाणवठय़ांवर वन्यजीव विभागाचे कर्मचारी 24 तास निरीक्षण करणार आहेत. वन्यजीव विभागातर्फे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला राज्यात एकाच दिवशी पाणवठय़ावर येणार्या प्राण्यांची गणना करण्यात येते. उन्हाळ्यात दिवसभरातून किमान एकदा तरी वन्यजीव पाणवठय़ावर येतातच. काही निशाचर प्राणी रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात ते सहज...
  May 6, 06:02 AM
 • सोलापूर - अशोक चौकात रस्त्यावर पडलेल्या वाळूमुळे सायकल घसरून ट्रकखाली आली आणि विद्यार्थी चिरडून ठार झाला. शुक्रवारी झालेल्या या अपघातात आकाश लक्ष्मण बंदीछोडे (वय 16, रा. शरण बसवेश्वरनगर, नीलमनगर) या विद्यार्थ्याचा बळी गेला. आकाशने मार्चमध्येच दहावीची परीक्षा दिली होती.शाळेला सुटी लागल्याने तो आठ दिवसांपासून पोहायला जात होता. पोहणे झाल्यानंतर नेहमीप्रमाणे तो सायकलवरून घराकडे निघाला. अशोक चौकात रस्त्यावर वाळू पडलेली होती. त्यामुळे आकाशची सायकल घसरली आणि मागून येणा-या ट्रकखाली (एमएच 42 बी...
  May 5, 10:39 AM
 • सोलापूर - गोदूताई विडी घरकुल ते स्टेशनकडे जाणारी बस. नेहमीचे टप्पे घेत निघालेली. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अशोक चौक थांब्यावर बसमध्ये शहरवासीयांना परिचित असलेला चेहरा प्रवेश करतो. पाहणा-यांच्या भुवया उंचावतात. ती व्यक्ती रीतसर पैसे भरून तिकीट घेते. थोड्या वेळानंतर शालेय विद्यार्थिनींकडून तिकिटासाठी पैसे घेताना वाहकास त्या पकडतात आणि वाहकाची भंबेरी उडते. ही घटना शुक्रवारी बस क्रमांक 30च्या प्रवाशांनी अनुभवली. तो परिचित चेहरा होता आमदार प्रणिती शिंदे यांचा.महापालिकेने...
  May 5, 10:36 AM
 • सोलापूर - 16 खेड्यांपासून बनलेल्या सोलापूर शहराचा विस्तार वाढत गेला. 20 वर्षांपूर्वी आणखी नऊ खेडी शहरात आली आणि शहराचा परिघ वाढला. त्यातलाच जुळे सोलापूर परिसर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरला असला तरी नागरी सुविधांपासून आजही हा भाग वंचित राहिला आहे. चो-यांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बगिचा, एसटी स्टँड, क्रीडांगण आदींसाठी राखीव भूखंड विकसित झाले नाहीत. महापालिकेला ही विकासकामे करणे सध्यातरी झेपणारे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर हद्दवाढ परिसरातील परिस्थिती दिव्य...
  May 5, 10:34 AM
 • सोलापूर - नियमबाह्य नंबरप्लेट असणा-या 440 वाहनांविरुद्ध शुक्रवारी कारवाई करण्यात आली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी शहरातील पाच चौकात कमांडो पथकाच्या मदतीने जोरदार मोहीम राबवली. कमांडो पथकाच्या हाती चक्क पक्कड व पाने होते. नंबरप्लेटवर अप्पा, दादा असलेल्या वाहनचालकास पक्कड-पाने देत प्लेट काढून घेतली जात होती. ती नव्याने रंगवून बसविल्यानंतरच वाहने ताब्यात दिली गेली. या बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध दिव्य मराठीने वृत्त प्रसिद्ध केले होते. गेल्या दहा दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. यात...
  May 5, 10:32 AM
 • सोलापूर - योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन वर्षांपूर्वी आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबीयांचे सर्वेक्षण सात संस्थांमार्फत करण्यात आले. तेव्हाच या योजनेच्या मूळ उद्दिष्टाला तडे गेले. महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यावेळी सर्वेक्षण करण्यात आले. या संस्थांमार्फत दुर्बल घटकांत समावेश असलेल्या 14,666 कुटुंबीयांची यादी तयार करण्यात आली. ही यादी पडताळण्याचे काम संबंधित झोन अधिका-यांनी केले. यादीला अंतिम मंजुरी देण्याची जबाबदारी हद्दवाढ विशेष अधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पार...
  May 5, 10:30 AM
 • सोलापूर - देऊळमधील केश्याच्या भूमिकेसाठी मूळचा सोलापूरचा असलेल्या गिरीश कुलकर्णी याला सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या आनंदाच्या क्षणी त्याने दिव्य मराठीला सांगितले की, या पुरस्कारामुळे चित्रपट सृष्टीच्या शंभराव्या वर्षाचा एक सोनेरी दिवस अनुभवता आला.वळू, विहीर, विविध लघुपट, देऊळ आणि मसाला असा प्रवास करणा-या गिरीशने चाळिशी गाठण्याआधीच मराठी चित्रपट क्षेत्रात स्वत:ची एक प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. आपल्याबद्दल गिरीश...
  May 5, 10:28 AM
 • सोलापूर - गाणगापूर स्थानकाजवळ चेन्नई-शिर्डी गाडी उभी असताना दरोडेखोरांनी लूट केली. तीन महिला प्रवाशांचे एकूण 10 तोळे सोने चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे.गुरुवारी पहाटेच्या साखरझोपेत दरोडा पडला. गाडी क्रॉसिंगसाठी थांबली होती. ती साप्ताहिक असल्यामुळे मार्गरक्षणासाठी रेल्वे सुरक्षा दलाचा एकही जवान तैनात नव्हता. या प्रकाराने प्रवाशांचा संताप अनावर झाला. त्यांनी गाडी सोलापूर स्थानकावर रोखून धरली होती. प्रवाशांचा वाढता संताप लक्षात घेता सोलापूरच्या पोलिसाकडे फिर्याद न...
  May 5, 10:24 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात