Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर- शहरातील नागरिकांना नळाच्या पाण्यासाठी आता पाचशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत शनिवारी 25 टक्के पाणीपट्टीवाढीला बहुमताने मंजुरी देण्यात आली. ही रक्कम 2205 वरून 2700 रुपयांवर गेली आहे. ही दरवाढ 1 जुलै 2012 पासून लागू होणार आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अलका राठोड होत्या. प्रशासनाने 40 टक्के पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव सवर्साधारण सभेकडे सादर केला. सदस्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतले. अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर 25 टक्के...
  April 1, 05:55 AM
 • सोलापूर: दैनिक 'दिव्य मराठी' च्या सोलापूर आवृत्तीचे शनिवारी मोठ्या दिखामदार सोहळ्यात लोकार्पण झाले. येथील श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात देशातील सर्वांत मोठ्या भास्कर समूहातील या मराठी वृत्तपत्राच्या स्वागतासाठी अनेक मान्यवर आणि उत्साही सोलापुरकर आवर्जुन उपस्थित होते. या सोहळ्याची काही क्षणचित्रे...
  March 31, 02:29 PM
 • सोलापूर - अवघ्या वर्षभराच्या आत मराठी मनाचा ठाव घेणाऱया दैनिक भास्कर समूहातील दैनिक दिव्य मराठीच्या सोलापूर आवृत्तीचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या साथीने आणि असंख्य सोलापूरकरांच्या साक्षीने शनिवारी संपन्न झाला. आपल्या मर्जीचे वृत्तपत्र शहरातून प्रसिद्ध होणार असल्याने त्याच्या स्वागतासाठी येथील श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात असंख्य सोलापूरकर जमले होते.प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार सुमित्रा महाजन, राज्याचे...
  March 31, 11:17 AM
 • सोलापूर- दैनिक भास्कर या देशातील सर्वात मोठ्या वृत्तपत्र समूहातील दैनिक दिव्य मराठीच्या सोलापूर आवृत्तीचा प्रकाशन समारंभ शनिवारी 31 मार्च रोजी होत आहे. महाराष्ट्रातील ही पाचवी आणि देशातील 65 वी आवृत्ती आहे. शिवछत्रपती रंगभवनामध्ये सकाळी साडेदहा वाजता होणा-या या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभा ग्रामीण विकास स्थायी समितीच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन (इंदूर), सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे,...
  March 31, 03:41 AM
 • पंढरपूर: श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर करण्यात येणार्या लेप प्रक्रियेमुळे मूर्तीच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागातील उपअधीक्षक एम. सिंग यांनी रविवारी केले. विठ्ठलाच्या मूर्तीवर रविवारी मध्यरात्रीपासून लेप देण्याची प्रक्रिया करण्यासाठी सिंग येथे दाखल झाले आहेत. या लेप प्रक्रियेची त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.ते म्हणाले,रविवारी रात्री साडेअकरापासून ते पहाटेपर्यंत मूर्तीची संपूर्ण स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानंतर...
  March 19, 08:10 AM
 • पंढरपूर: पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला लेप देण्याची प्रक्रिया रविवारी रात्री सुरू करण्यात येईल. दोन रात्री हे काम चालणार असल्याने सोमवार व मंगळवार असे दोन दिवस पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. या काळात मुखदर्शन घेता येईल. ही माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली.विठ्ठल मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी मंदिर समितीने लेपप्रक्रिया करण्याचे ठरवले. औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक एम. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीला हॅवॅकर...
  March 18, 08:48 AM
 • सोलापूर - अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील अंबिका प्लास्टिक कारखान्यात शॉर्टसर्किटने शनिवारी आग लागली. यामध्ये मशिनरीसह, प्लास्टिक आणि कच्चा माल जळून खाक झाला. यात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.या आगीत जीवितहानी मात्र झाली नाही. अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीत यल्लप्पा नल्ला, वासुदेव नल्ला, नरेंद्र नल्ला यांचे अंबिका आणि नल्ला प्लास्टिक फर्मचा हा प्लास्टिक कारखाना असून, या ठिकाणी प्रामुख्याने प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक ग्लास, टेक्स्टाइल कंपनीस लागणाया पिशव्या तयार...
  March 11, 07:11 AM
 • सोलापूर - अनेक शंका-कुशंकांना फाटा देऊन अखेर कॉँग्रेस-राष्ट्रवादीने हातमिळवणी करत सोलापूर महापालिकेत सत्ता कायम ठेवली. महापौरपदी कॉँग्रेसच्या अलका राठोड यांची वर्णी लागली तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करणारे हरुण सय्यद यांना राष्ट्रवादीने उपमहापौरपदी विराजमान केले. सय्यद हे सोलापूर महापालिकेत पाणीपुरवठा विभागात चावीवाला म्हणून काम करीत होते. मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढविली होती. ते एक हजार...
  March 7, 05:10 AM
 • सोलापूर: सोलापूर महापालिकेच्या महापौर पदाची माळ कॉंग्रेसच्या अलका राठोड यांच्या गळ्यात पडली आहे. त्यांनी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांचा पराभव केला. तर उपमहापौर पदी राष्ट्रवादीचे हारुण सैय्यद हे निवडून आले आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राजश्री कणके यांचा पराभव केला. महापालिकेचे महापौर पद हे ओबीसी महिलेसाठी राखीव होते. महापालिकेत कॉंग्रेसचे 45, राष्ट्रवादीचे 16 अपक्ष 1 असे 62 संख्याबळ मिळवून आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. गेल्या टर्ममध्ये कॉंग्रेसच्या अलका राठोड यांना महापौर पदापासून...
  March 6, 02:25 PM
 • सोलापूर - स्वीकृत नगरसेवकपदासाठी आवश्यक मते देण्यास भाजपने नकार दिल्याने युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेने सोमवारी येथे जाहीर केला. त्यामुळे महापालिकेचा कारभारात हे दोन्ही पक्ष स्वतंत्र कारभार करणार आहेत. सोमवारी स्वीकृत पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यात भाजप आणि सेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहे. सोलापूर महापालिकेत पक्षीय बलाबल पाहता आघडीचे तीन, तर युतीचे दोन स्वीकृत नगरसेवक निवडून येऊ शकतात. युतीच्या कोट्यातील दोनपैकी एक स्वीकृत नगरसेवक शिवसेनेचा करावा, अशी...
  March 6, 01:16 AM
 • सोलापूर :श्री डान्स क्लासेसच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त नार्थ कोट प्रशालेच्या मैदानावर डान्स शो चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात चारशे कलाकारांनी नृत्य सदर केले. कार्यक्रमाचे खास आकर्षण 'डान्स इंडिया डान्स' फेम सिद्धार्थ याने डान्स करून रसिक प्रेक्षकाची मने जिंकली. तसेच फ्याशन शो चे आयोजन करण्यात आले होते.(फोटो :- संदीप वाडेकर)
  March 5, 03:41 PM
 • सोलापूर: मराठी विज्ञान परिषद आयोजित पहिले विभागीय विज्ञान साहित्य संमेलन 17 व 18 मार्च रोजी सोलापुरात आयोजित करण्यात आले असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती निमंत्रक डॉ. नितीन ढेपे यांनी दिली. दोन दिवस चालणार्या या विज्ञान साहित्य संमेलनात बाळ फोंडके, दीपक घारे, फारुक शेख, पुरुषोत्तम वेल्होर, डॉ. बालसुब्रमण्यम आदींसह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा येथील विज्ञान साहित्यिकांची मांदियाळी असणार आहे. येथील गुजराती सभागृहात ग्रंथदिंडीने संमेलनास प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी...
  March 5, 01:09 PM
 • सोलापूर: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते येथील स्मृति वनातील अवकाश निरीक्षण गृहाचे उद्घाटन करण्यात आले. हे आशिया खंडातील पहिले सार्वजनिक अवकाश गृह आहे.येथील गृह ग्लोरिया प्रोजेक्टशी संलग्न करावे, असा सल्ला डॉ. कलाम यांनी दिला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, उद्यानाचे विश्वस्त डॉ. वासुदेव रायते आणि सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक किशोर ठाकरे उपस्थित होते.(सर्व छाया- संदीप वाडेकर)
  March 3, 01:12 PM
 • सोलापूर - कोणत्याही देशाचा विकास हा तेथील संशोधनावर अवलंबून असतो. एका संशोधनातून दुसरे संशोधन जन्म घेत असते. त्यामुळेच संशोधनातून विकास साधणारे अभियंते राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार ठरतात, असे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी शुक्रवारी काढले. आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानपर कार्यक्रमात ते बोलत होते. भारताला प्रगत राष्ट्र बनविण्यात अभियंतांचे योगदान या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ . अनिल...
  March 3, 12:41 AM
 • सोलापूर - नात्यातील मुलीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा कारणावरून चौघांनी मिळून एका महिलेसह दोघांचा खून केला, तर एकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगर तांडा येथे घडली. बदामी सागर भोसले (वय 25), हणमंत नामदेव राठोड (वय 45 दोघे रा. शंकरनगर ता. दक्षिण सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर आमरी गोपू भोसले (वय 30 रा. शंकरनगर, ता. दक्षिण सोलापूर) हे जखमी झाले आहेत. आमरीन आणि हणमंत यांचे एका मुलीशी अनैतिक संबंध होते. मुलीचे नातेवाईक अशीकार काळे, शेकू काळे, अर्मया काळे,...
  March 2, 12:19 PM
 • सोलापूर - युवकांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, विद्यार्थी दशेपासूनच युनिक बनण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत. छोटी स्वप्ने पाहणे हाच गुन्हा आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.सोलापूर विद्यापीठातील इन्स्ट्रुमेंटेशन केंद्र व विज्ञान केंद्रात बहुद्देशीय सभागृहाचे उद्घाटन डॉ. कलाम यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. युवकांशी संवाद साधण्यावर डॉ. कलाम यांचा मुख्यत: कल राहिला.अध्यक्षस्थानी...
  March 2, 06:34 AM
 • पंढरपूर - श्रीक्षेत्र पंढरपूर येथील ऐतिहासिक विठ्ठलमूर्तीची झीज थांबवण्यासाठी इपॉक्सी पद्धतीने लेपन करण्याची गरज असल्याचा अहवाल पुरातत्त्व विभागाच्या समितीने दिल्यानंतर 15 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. झीज रोखण्यासाठी विठ्ठलमूर्तीवर इपॉक्सी लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. मात्र वारकरी संप्रदायाने त्याला तीव्र विरोध केल्याने तूर्त या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. पुरातत्त्व विभागाच्या पथकाने मूर्तीची पाहणी करून लेपन...
  March 1, 01:05 AM
 • पंढरपूर - विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक मंगळवारी भक्त निवास येथे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनाबाबत सकारात्मक चर्चा झाली. औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी पाहणी करून दिलेल्या अहवालात विठ्ठल मूर्तीच्या मूर्ती संवर्धनासाठी लेप प्रक्रिया गरजेचे असल्याचे मत नोंदवले आहे. त्यामुळे पुढील 8 दिवसात मंदिर समिती मूर्ती शास्त्राचे अभ्यासक गो. ब. देगलूरकर व आंदोलन करणा-या वारकरी संघटनांच्या...
  February 29, 02:18 AM
 • सोलापूर - घरगुती कारणावरून पती- पत्नीमध्ये भांडण झाल्यान, रागाच्या भरात पतीने आपल्या अठरा महिन्यांच्या मुलीला विहिरीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना नुकतीच सोलापूर जिल्ह्यातील वाढेगाव (ता. सांगोला) येथे घडली. मारुती तुकाराम हजारे असे या काळीज नसलेल्या बापाचे नाव आहे. मारुती हा ऊसतोड कामगार आहे. पत्नी अनिता सोबत त्याचे शनिवारी कडाक्याचे भांडण झाले. या वादामुळे रागाच्या भरात मारुतीने चक्क आपल्या अठरा महिन्याच्या मुलीला घरातून उचलले व विहिरीत फेकून देऊन फरार झाला. सदर मुलीचा मृत्यू झाला...
  February 28, 03:47 PM
 • सोलापूर - भाळवणी (ता. मंगळवेढा) येथील फटाका कारखान्यात फटाके उन्हात वाळण्यासाठी ठेवले असताना उष्णतेमुळे झालेल्या स्फोटात पाच महिला कामगार जागीच ठार झाल्या, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनेस्थळी पोहोचल्या आहेत.भाळवणी येथे सागर फायर वर्क्स हा फटाके तयार करण्याचा कारखाना आहे. सोमवारी फटाके तयार करून कामगारांनी ते वाळत घातले होते. कडक उन्हामुळे या फटाक्यांचा भीषण स्फोट झाला. त्यात कारखान्यात काम करत असलेल्या 25 कामगारांपैकी...
  February 20, 06:59 PM
 
जाहिरात

RECOMMENDED