जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा येण्या-जाण्याचे रस्ते महापालिकेने रंगसफेदी करत साफ केले आहेत. दुभाजक रंगवले असून त्यात रोपेही लावली आहेत. येता-जाता पंतप्रधानांना परिसर प्रसन्न आणि स्वच्छ दिसेल, अशी व्यवस्था करण्यात यंत्रणा कामाला लागली आहे. पार्क स्टेडियम येथे श्री. मोदी यांची सभा होणार असून त्यासाठीही तयारी सुरू आहे. तिथे ४५ हजार श्रोते बसतील, अशी आसन आहे. पण भाजपचे नियोजन एक...
  January 8, 02:59 PM
 • सोलापूर- महाराष्ट्र सरकारच्या अधिकारातील सूत्रधारी कंपनीसह, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील वीज कर्मचारी, अभियंते यांनी ७ ते ९ जानेवारी या काळात ७२ तासांचा लाक्षणिक संप पुकारला आहे. प्रलंबित प्रश्न व महाराष्ट्राच्या ऊर्जा उद्योगाच्या चुकीच्या धोरणाविरोधात राज्यातील ८६ हजार तर सोलापुरातील २ हजार वीज कर्मचारी संपावर जाणार आहेत. दरम्यान, महावितरण प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. तरीही विद्युत पुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महावितरण...
  January 7, 11:31 AM
 • सोलापूर- नातेवाइकांच्या लग्नाचे कारण सांगून दोन दिवसांसाठी दागिने मागितले. मनप्पुरम गोल्डमध्ये दागिने गहाण ठेवून १ लाख ९ हजार रुपयांचे कर्ज घेऊन पळून गेले. असा प्रकार जोडभावी पेठ पोलिस ठाण्यांतर्गत घडला असून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्लिनाथ नागप्पा परशेटी (वय ५४, रा. रामराज्य नगर, शेळगी) यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या (मूळचा कर्नाटक गोकाक) महादेव सीताराम शिवशेट्टी याने फसवणूक केली. मेव्हण्याच्या साखरपुड्यासाठी गुलबर्गा येथे जायचे आहे, माझ्या पत्नीच्या अंगावर सोने...
  January 7, 11:25 AM
 • उस्मानाबाद- ऑनलाइन सर्व्हिस देणाऱ्या जिल्ह्यातील कॉमन सर्व्हिस सेंटरचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे या केंद्रामार्फत शासकीय योजनांसाठी केलेले अर्ज, पीकविमा आदींचे प्रस्ताव त्रुटीमुळे मुदतीनंतर परत येत असल्याने ग्राहकांचा रोष वाढत असताना दुसरीकडे केंद्र चालकांना या अडचणी मांडण्यासाठी नेमलेला अधिकारीच गायब राहात असल्याने अडचणी मांडायच्या कोठे, असा प्रश्न पडला आहे. राज्य व केंद्र शासनाने सर्व विभागाचे कामकाज डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेऊन या अनुशंगाने...
  January 5, 11:45 AM
 • तेर- दुष्काळाच्या भीषण परिस्थितीत अर्ध्या तेरकरांची तहान स्वातंत्र्यापूर्वीचा आड भागवत आहे. तेरसाठी दोन पाणीपुरवठा योजना राबवूनही ग्रामस्थांचा घसा कोरडाच आहे. कूपनलिका शेवटची घटका मोजत आहेत. भविष्यात ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने स्वातंत्र्यापूर्वी खोदलेल्या मात्र सध्या पाणी उपलब्ध असलेल्या विहीर व आडातील गाळ काढण्याची गरज आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावाची साधारण १८ हजार लोकसंख्या आहे. गावासाठी सर्व प्रथम १९७६ मध्ये ग्रामपंचायतच्या वतीने ५ लाख रुपये...
  January 5, 11:43 AM
 • तेर- दुष्काळी परिस्थिती, नापिकीला वैतागून व कर्जबाजारीपणामुळे उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी व गुरुवारी घडला असून मृत शेतकऱ्यांच्या अस्थी जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन मनसेच्या वतीने शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील शिवाजी जर्नाधन सगर (५५) यांनी बुधवारी (दि. २) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बोरीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर लगेच गुरुवारी...
  January 5, 11:40 AM
 • सोलापूर- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. तीन राज्यातील निवडणुकांत विजय मिळाल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सत्ताधारी भाजपच्या सभागृह नेत्याला मांडवा लागला. तर पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावर प्रशासनावर आरोप करत बसपच्या चार नगरसेवकांनी राजीनामे महापौरांकडे सुपूर्त केेले. ते पुढे गेले नाहीत, महापौरांकडेच राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसने भूसंपादनाचा विषय पुरवणी अजेंड्यात आणल्याबद्दल भाजपला धारेवर धरले. तर...
  January 5, 11:39 AM
 • पंढरपूर- विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या २७० कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधास शासनाने गुरुवारी मंजुरी दिली. त्यामुळे सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसरातील देवतांचे व्यवस्थापन मंदिर समितीमार्फत केले जाते. या देवदेवतांची पूजाअर्चा, रोजचे नित्योपचार, नैमित्तिक उपचार, यात्रा व उत्सव, भाविकांना भक्तनिवास, अन्नछत्र, प्रसादाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह दर्शनरांगांचे,...
  January 5, 07:49 AM
 • सोलापूर- ग्रामपातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या बळकट करण्यासाठी सहकार खात्याने अटल अर्थसाह्य योजना जाहीर केली. यातून सोसायट्यांनी शेतीपूरक उद्योग करून गावे स्वयंपूर्ण करणे अभिप्रेत आहे. एकूण प्रकल्प किंमत ४० लाख रुपये ठरले. त्याच्या ७५ टक्के (कमाल ३० लाख रुपये) अनुदान मिळेल. या पैशातून सोसायट्यांनी धान्य, फळे, भाजीपाला प्रतवारी स्वच्छता यंत्र, गोदाम, वाहतुकीसाठी वाहने, सहकारी ग्राहक भांडार, जलशुद्धीकरण प्रकल्प, वॉटर एटीएम, शेतमाल पॅकेजिंग, कापडी किंवा ज्यूट...
  January 4, 11:46 AM
 • लोहारा- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महाजनको व मेडाच्या पुढाकारातून लोहारा महावितरणच्या उपविभागीय कार्यालय परिसरात एक ते दोन मेगावॅटचे सोलार प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, मागील सहा महिन्यापासून या कामाला ब्रेक लागल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील विजेची उपलब्धता व मागणीत मोठी तफावत आहे. त्यामुळे अतिरिक्त भारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, ग्रामीण भागात होणारे भारनियमन आदी समस्यांना ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे....
  January 3, 12:17 PM
 • सोलापूर- केंद्र शासनाने घोषित केलेल्या उज्ज्वला गॅस जोडणी योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ५३४ कुटुंबांना गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील ९२ टक्के कुटुंबाकडे गॅस कनेक्शन उपलब्ध आहे, अशी माहिती भारत गॅसचे वरिष्ठ व्यवस्थापक राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये भारत पेट्रोलियमकडून ६६ हजार ६४१ हिंदुस्तान पेट्रोलियमकडून ३४ हजार ८८८ आणि इंडियन ऑइलकडून १० हजार ५ कनेक्शन देण्यात आले आहे. भारत सरकारच्या पेट्रोेलियम व नैसर्गिक...
  January 3, 12:14 PM
 • सोलापूर- जोडभावी पेठेतील पिठाच्या गिरणीच्या बोळात एका पंचविशीतील तरुणाचा दगड, विटा आणि फरशीने खून करण्यात आला आहे. खून कोणी केला आणि त्याचे कारण काय हे अद्याप पुढे आले नाही. ही घटना बुधवारी सकाळी उघड झाली. सागर प्रकाश सरवदे, वय २५, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खुनाची ही घटना १ जानेवारी रोजी रात्री ११.३० ते २ जानेवारी रोजी सकाळी ७ या दरम्यान घडली. याबाबत आई निर्मला प्रकाश सरवदे (वय ५२) यांनी जोडभावी पेठ पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले...
  January 3, 12:12 PM
 • सोलापूर- सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गाला नीती आयोगाने बुधवारी मंजुरी दिली. यासाठी आधी जाहीर १२८२ कोटी रुपयांच्या निधीत २८८ कोटी रुपयांची कपात करून आता ९९४ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती रेल्वे बोर्डातील सूत्रांनी दिली. दिल्लीत बुधवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारीला विविध विकासकामांच्या उद््घाटनासाठी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे....
  January 3, 07:49 AM
 • सोलापूर- शेतातील गवत घेण्यास विरोध केल्यामुळे शोभा हरिदास ऊर्फ सिद्राम तोडकरी (वय ५०, रा. बाळे) आणि हरिदास ऊर्फ सिद्राम तोडकरी या दोघांना मारहाण करण्यात आली, अशी फिर्याद शोभा तोडकरी यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली. तोडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मल्लू सदाशिव तोडकरी, नीलावती मल्लू तोडकरी, किरण मल्लू तोडकरी, अनिल मल्लू तोडकरी (रा. सर्व बाळे) यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. अज्ञात कारणावरून मारहाण नई जिंदगी, लोकमान्य नगर...
  January 1, 10:40 AM
 • पापरी - पापरी-कोन्हेरी रस्त्यावर टमटम उलटून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे. रविवारी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता, तर तीन जखमींपैकी पृथ्वीराज शहाजी रोकडे (१५) याचा रात्री उशिरा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
  January 1, 10:38 AM
 • माढा (सोलापूर)- सरकार आघाडीचे असो की युतीचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे कोणालाच जमलेले नाही. अच्छे दिन म्हणत सत्तेवर आलेल्या या सरकारच्या काळात तर आत्महत्येचे लोण कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर असह्य झाल्याने सोलापुरच्या माढा तालुक्यातील मानेगाव (थो) येथील दतात्रय हनुमंत बारबोले या 38 वर्षीय शेतकऱ्याने कांद्यावर फवारणी करण्याचे तणनाशक पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान त्यांना उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले...
  December 31, 12:35 PM
 • परंडा- तालुक्यातील लोहारा येथे शेतातील ऊस पेटवून देऊन याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यास शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहारा येथील शिवारातील गौतम दबडे यांच्या ऊसाच्या शेतातून धुर निघत असल्याने ते पाहण्यासाठी गौतम दबडे गेले होते. यावेळी गावातील रणजित बागल व संभाजी बागल यांनी सदरील ऊस पेटवला होता. यात गौतम यांचे पाच ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. ऊस का पेटवला म्हणून गौतम यांनी विचारणा केली असता दोघांनी शिविगाळ व मारहाण करुन जिवे मारण्याची...
  December 29, 11:02 AM
 • बार्शी- बँकेच्या मुंबई येथील ग्राहक सेवा केंद्रातून (कस्टमर केअर) बोलतोय, असे सांगून महिलेच्या बँक खात्याची माहिती घेत त्यातून दोन लाख ४६ हजार ९६६ रुपये काढून घेण्यात आले. महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा नानाभाऊ धेंडुळे (वय २९, रा. उपळाई रोड, गोंदिल प्लॉट, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. आशा व त्यांचे पती नोकरी करतात. आशा यांचे आयसीआयसीआय बँकेत लातूर येथील औसा रोड शाखेत खाते आहे. शुक्रवारी सकाळी त्या बार्शीत घरी असताना त्यांना ९९३९०१७०७३,...
  December 29, 10:59 AM
 • परंडा- ऐन दुष्काळात तालुक्यातील कुंभेजा येथील शेतकरी किरण कोकाटे यांच्या शेतातील तीन एकर ऊस विद्युत तारेच्या घर्षणाने ठिणग्या पडून जळाला असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी घडली. सदर घटनेचा महसूलच्या वतीने पंचनामा करण्यात आला. तालुक्यातील कुंभेजा शिवारातील किरण कोकाटे यांच्या मालकीच्या गट नं.१७५/२ मधील अंदाजे तीन एकर क्षेत्रातील ऊस व ठिबक सिंचन संच शेतातातून गेलेल्या विद्युत तारेच्या घर्षणाने ठिणग्या पडून जळून खाक झाला. त्यामुळे २ लाख ५० हजार रुपयाचे...
  December 28, 11:56 AM
 • माढा- सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. २७) पहाटे सहाच्या सुमारास कुंभेज येथे ही घटना घडली. मनीषा दत्तात्रय नागटिळक (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा भाऊ भूषण मोहिते यांच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या चारजणांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पती दतात्रय नागटिळक, सासू भाग्यरथी दतात्रय नागटिळक, दीर रणजित नागनाथ नागटिळक, मावस सासू फुलाबाई यांचा गुन्हा दाखल झालेल्या संशयितांत समावेश आहे. पती, सासू व दीर या तिघांना...
  December 28, 10:56 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात