Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर- पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम व्यापकपणे राबवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. येत्या २ ते १० ऑक्टोबर या आठ दिवसांच्या कालावधीत लोकसहभागातून जिल्ह्यातील ओढ्यांवर ५ हजार ७०० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठेवल्याचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय झाला. उपाध्यक्ष शिवानंद पाटील, समाज कल्याण समितीच्या सभापती शीला शिवशरण, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, जिल्हा परिषद सदस्य सुभाष...
  August 21, 12:30 PM
 • अकलूज- श्रीपूर येथील श्री पांडुरंग साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा १४५ रुपये जादाने ऊस दर अदा केला आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रती टनास दोन हजार ३०० रुपये शेतकऱ्यांना अदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी दिली. एफआरपीपेक्षा १४५ रुपये जास्तीचे देणारा हा जिल्ह्यातील एकमेव कारखाना आहे. कारखान्याने सरत्या हंगामात ९ लाख ५१ हजार टन उसाचे गाळप केले होते. ११.६० टक्के एवढा जिल्ह्यातील सर्वाधिक साखर उतारा या कारखान्यास मिळाला होता. ११ लाख ३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन...
  August 21, 12:20 PM
 • सोलापूर- फेब्रुवारी, मार्च महिन्यात ऊस गाळप केलेल्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप बिलाची रक्कम अदा केली नसल्याने साखर आयुक्तांनी जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांवर जमीन महसूल अधिनियमानुसार (आरआरसी) कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पण यापैकी भीमा व सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या वसुली आदेशाला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पाच सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. कारखान्यांची मालमत्ता जप्त करून उसाचे थकीत बिल द्यावे, असा हा आदेश होता. पुणे येथील बैठकीत सर्वच कारखान्यांनी ५...
  August 21, 12:11 PM
 • सोलापूर- राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त म्होरक्या चित्रपटाचा निर्माता कल्याण पडाल यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा अट्टल गुन्हेगार श्रीनिवास संगा आणि त्याचे साथीदार अद्याप पोलिसांना सापडत नाहीत. तीन महिने झाले तरी पोलिस तपासात स्वारस्य दाखवत नाहीत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी पडाल कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यात खासगी सावकारविरोधी कृती समितीचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. पडाल यांनी संगा...
  August 21, 10:12 AM
 • संगमनेर- शहर पोलिस ठाण्याची सूत्रे अखेरीस प्रभारी पदभार असलेल्या निरीक्षक अभय परमार यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत. शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती झालेल्या परमार यांना जिल्ह्यातच नियुक्ती मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहाला दिलेले आश्वासन खोटे ठरले. शहर पोलिस ठाण्यातील प्रभारी राजदेखील आता संपुष्टात आले आहे. राज्यभर गाजलेल्या आणि बहुचर्चित ठरलेल्या नगरच्या केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे परमार यांना प्रशासकीय कारवाईला...
  August 20, 11:41 AM
 • सोलापूर- जिल्हा परिषदेला सन २०१७-१८ व सन २०१८-१९ या वर्षासाठी तब्बल २४३ कोटी ३९ लाखांचा निधी मंजूर झाला होता. पण, पाच महिन्यांमध्ये त्यापैकी फक्त २२ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. कोट्यवधींचा विकासनिधी लाल फितीच्या कारभारात अडकला असून पुढील वर्षी मार्च एंडच्या गडबडीत खर्च करण्याच्या प्रशासनाच्या टार्गेट पूर्तीमुळे ग्रामीण भागातील विकासकाम, गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा धोका आहे. जिल्हा परिषद प्रशासन, अर्थ व ग्रामपंचायत विभागासाठी एकूण सात कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर...
  August 20, 11:29 AM
 • सोलापूर- शहरासह जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स संसर्गित रुग्णांना शासन स्तरावरील औषधोपचार सेवासुविधा चांगल्या पध्दतीने पुरवून रुग्णांमध्ये जगण्याची उमेद वाढवणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) एआरटी सेंटरला शासनाकडून प्लस दर्जा मिळाला आहे, अशी माहिती एआरटी सेंटरच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा वरेरकर-चिटणीस यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली. त्यामुळे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित रुग्णांना सेकंड लाइन...
  August 20, 11:02 AM
 • सोलापूर- प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानच्या पर्वतरांगांवर धावणाऱ्या टॉयट्रेनच्या पर्यटकांना आता वातानुकूलित (एसी) कोचमधून प्रवासाची साेय हाेणार अाहे. कुर्डुवाडी येथील वर्कशॉपमध्ये अाठ दिवसांत या एसी कोचची निर्मिती झाली असून दाेन दिवसांत ताे माथेरानला पाठवला जाईल. प्रायोगिक तत्त्वावर सध्या एकाच रेकला हा डबा जोडण्यात येणार आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभला तर अन्य रेकसाठीदेखील एसी कोच तयार केला जाईल. या एका डब्यासाठी सुमारे आठ ते दहा लाखांचा खर्च आला. काही दिवसांपासून माथेरानच्या...
  August 20, 06:28 AM
 • उस्मानाबाद - शहरातील तेरणा महाविद्यालय ते पोलिस मुख्यालय या दरम्यानच्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यावरून वाहनधारकांना विशेषत: दुचाकीस्वारांना अक्षरक्ष: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर मंदिरासमोर असलेला जीवघेणा खड्डा दोघा तरुणांनी पुढाकार घेऊन बुजविण्याचा प्रयत्न केला. तेरणा महाविद्यालय ते बसस्थानक हा शहरातील प्रमुख मार्ग असून यावरून दररोज डझनभर अधिकारी, लोकप्रतिनिधी ये-जा करतात. परंतु, अलिशान वाहनातून या खड्ड्याची...
  August 19, 12:53 PM
 • सोलापूर - शहरात पाऊस पडतोय. त्यामुळे रस्त्यावरील पाण्यात लपलेले खड्डे वाहनधारकांना ठळकपणे जाणवू लागले आहेत. कुंभारवेेस, कोंतम चौक, साखर पेठ, भारतीय चौक, बाळीवेससह शहरातील १२०० किमी रस्त्यांपैकी ६०० किमी रस्ते खराब आहेत. हद्दवाढ भागात खड्डे आणि दलदल निर्माण झाली आहे. महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने अध्यादेश जारी करून १३ कलमी कार्यक्रम महापालिकेला दिला आहे. त्याने तरी सोलापूर खड्डेमुक्त हाेणार का, की गणरायाचे स्वागत खड्ड्यांनीच होणार असा प्रश्न पडला...
  August 19, 12:50 PM
 • सोलापूर- मनोरुग्णांवर व्यवस्थित उपचार करता यावेत, यासाठी विम्यांचे सुरक्षा कवच दिले जाणार आहे. विमा कपंन्यांना मानसिक आरोगय कायदा लागू करण्यात आला आहे. सामान्य आजारासाठी विमा पॉलिसीव्दारे उपचार केले जातात. आता मानसिक आरोग्य कायद्यानुसार मनोरुग्णांवर विम्याव्दारे उपचार होतील. विमा कंपन्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अशा सूचना विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना दिल्या आहेत. मानसिक आरोग्य कायदा २०१७ हा २९ मे रोजी संमत झाला आहे. त्यात म्हटले आहे की, विविध...
  August 18, 12:14 PM
 • सोलापूर- ज्येष्ठ विचारवंत, भाष्यकार, लेखक, संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर (८२) यांचे शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. विजापूर रस्त्यावरील बेन्नूरनगर आयटीआयच्या पाठीमागे असलेल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. प्रा. बेन्नूर यांच्यावर शनिवारी दुपारी दोन वाजता मोदी जवळील मुस्लिम कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रा. बेन्नूर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३८ रोजी सातारा येथे...
  August 18, 12:11 PM
 • प्रा. फखरुद्दीन बेन्नूर यांच्याशी पहिला संबंध आला तो या १९८२च्या जातीय दंगल रोखण्याच्या निमित्ताने. त्यावेळी त्यांचे जे धाडसी व्यक्तिमत्त्व दिसले, त्याच्याने मी प्रभावित झालो. निधड्या छातीने कठीण प्रसंगाला सामोरे जाणारा एक धडाडीचा माणूस त्यांच्यात दिसला. त्यावेळी ते तरुणही होते. वैचारिक बांधिलकी मानणारा आणि त्या विचारांसाठी कुठल्याही प्रकारचे संकट निर्भयपणे झेलू पाहणारा हा माणूस दिसला. तो चार भिंतीच्या सुरक्षिततेमधला विचारवंत नव्हता, प्रसंगी मैदानात दोन हात करण्याची त्यांची...
  August 18, 12:07 PM
 • सोलापूर- सोलापूर ते जत या एसटी बसने प्रवास करताना महानंदा हिरेमठ (रा. मित्रनगर शेळगी) यांच्या पर्समधून सात तोळे दागिने चोरीस गेले. ही घटना १४ आॅगस्ट रोजी घडली. फौजदार चावडी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे . सौ. महानंदा व त्यांचे नातेवाईक जतला जाण्यासाठी बसमध्ये बसले. पर्समध्ये सोन्याचे दागिने, दोन हजार असे साहित्य ठेवले होते. चोराने पैसे व दागिने पळवले. त्याची किंमत चालू बाजार भावाप्रमाणे दोन लाख होते. मात्र पोलिसात ७२ हजारांची नोंद आहे. मजरेवाडी चौकात मंगळसूत्र हिसकावले मजरेवाडी चौकातून...
  August 18, 12:03 PM
 • तुळजापूर - सत्तेत राहायचे असेल तर धनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल, अन्यथा सत्तेतून पायउतार करू, असा सज्जड इशारा फडणीस यांना देऊन आता आरक्षण मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार सुरेश कांबळे यांनी केला. धनगर आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने तुळजापूर ते चौंडी पदयात्रेचा गुरुवारी(दि.१६) तुळजाभवानी मातेच्या दरबारात जागरण गोंधळ घालून शुभारंभ करण्यात आला. यावेळी संयोजक सुरेश कांबळे, आमदार नारायण पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर, डॉ. इंद्रजित...
  August 17, 12:51 PM
 • सोलापूर - उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी स्मार्ट सिटी कंपनीकडून करावी, यास महापालिका सभागृहाने मान्यता दिल्याचे सूचना व उपसूचनेत नमूद करण्यात आले आहे. पण तो प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे आला नव्हता. त्यामुळे पुढील कार्यवाहीस अडचण येत होती. याबाबत महापौर शोभा बनशेट्टी व आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांच्यात चर्चा झाली. महापौर बनशेट्टी यांनी समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे गुरुवारी सायंकाळी आयुक्तांशी चर्चा करताना स्पष्ट केले पण तो प्रस्ताव शनिवारी जाणार आहे. एकीकडे...
  August 17, 12:08 PM
 • सोलापूर- रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक नागसेन मेंगर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपती पदकाने सन्मानित हाेणारे मेंगर हे सोलापूर विभागातील पहिले कर्मचारी ठरले आहे. मेंगर यांना पुरस्कार जाहीर झाल्याने सोलापूर विभागाची मान उंचावली आहे. गेल्या ३१ वर्षांपासून मेंगर हे आरपीएफच्या सेवेत आहेत. या सन्मानाबद्दल सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
  August 15, 12:53 PM
 • सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशपातळीवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरसह १४ जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी भारत जाधव व कार्याध्यक्षपदी संतोष पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष निवडीबाबत पक्षाने दोन वेळा मुलाखत प्रक्रिया राबविली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शहराध्यक्ष म्हणून जाधव व कार्याध्यक्ष म्हणून पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून...
  August 15, 12:35 PM
 • सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात प्रथमच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने पुणे येथील उष्णदेशीय हवामान खात्याकडून कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीवरून प्रयोगाचे नियंत्रण ठेवले जात आहे. जिल्ह्यात पुढील ९० दिवसांत १८० तास उड्डाणाद्वारे कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला जाणार आहे. यासाठी २५ जणांची टीम कार्यरत असून सोलापूर विमानतळावर दोन विमानेही सज्ज अाहेत. ढगांची उपलब्धता पाहून प्रतिदिन दोन तपास विमानाद्वारे कृत्रिम...
  August 15, 12:31 PM
 • सोलापूर- सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली असून, आता ही गाडी पाच मिनिटे आधी म्हणजे १० वाजून ४० मिनिटांनी सोलापूर स्थानकावरून सुटणार आहे. बुधवारपासून (दि. १५) हा बदल अमलात येणार आहे. यासह कोल्हापूर- सोलापूर एक्स्प्रेस सोलापूर स्थानकावर पाच मिनिटे उशीरा पोहोचणार आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या मुंबईला पोहोचण्याच्या व मुंबईहून सोलापूरकडे निघण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सिध्देश्वर एक्स्प्रेसच्या थांब्यांमध्येही बदल करण्यात आलेला नाही....
  August 15, 11:49 AM
 
जाहिरात

RECOMMENDED