जाहिरात
जाहिरात
Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

 • अतिरेक्यांच्या अमानुषतेचे दर्शन घडवणाऱ्या पॅरिसवरील १३/११ च्या हल्ल्यात आणि २६/११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यात बरेच साधर्म्य असले तरी हल्ला होताना आणि त्यानंतर दोन्ही ठिकाणच्या नागरिक, प्रशासन, सत्ताधारी-विरोधक, प्रसारमाध्यमे यांच्या प्रसंगावधानात व परिपक्वतेत कमालीचा फरक जाणवतो. पॅरिसवरील अतिरेकी हल्ल्यानंतर मेट्रो सेवा बंद होताच टॅक्सीचालकांनी मीटर बंद करून मोफत सेवा सुरू केली. पॅरिसमध्ये राहण्याची सोय नसलेल्यांना स्थानिक लोकांनी आपल्या घरात आश्रय दिला. त्यांच्या घरी तसे...
  November 19, 12:56 AM
 • एकवेळ आपल्याला आपला मित्र ओळखता नाही आला तरी चालेल; पण शत्रू मात्र नेमकेपणे ओळखता आला पाहिजे, असे एका प्रसिद्ध राजकीय नेत्याचे वाक्य आहे आणि शेषराव मोरे यातील मर्म पुरेपूर ओळखून आहेत . म्हणूनच दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येमुळे, समूहवादी विचाराविरुद्ध प्रागतिक लोक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना मोऱ्यांनी यातील धोका बरोब्बर ओळखला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेचा वापर त्यांनी पुरोगाम्यांना दहशतवादी ठरवण्यासाठी केला. त्याचा राजकीय लाभ त्यांना...
  November 18, 02:00 AM
 • काँग्रेस अध्यक्षा यांचा काळा पैसा सफेद करणाऱ्या कंपनीशी असलेली मनी ट्रान्सफर संबंध उघडा पडतेवेळी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्तकर्त्यांपैकी मा. नयनतारा यांचे अनुसार आपले पुरस्कार परत केले कोणत्या मनोवृत्तीचा हे लक्षात येते. बुद्धिजीवी वर्गाने सर्वपक्षीय कालखंडात घडलेल्या घटनांना समान न्याय देऊन सर्वपक्षीय राजवटीत पुरस्कार परत करावेत म्हणजे ते पक्षपाती वाटणार नाही. कुठल्याही घटनेचे पुरस्कार परत करण्यासाठी भांडवल करू नये. सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून पुरस्कार परत करावेत म्हणजे ते...
  November 17, 12:11 AM
 • दीक्षाभूमी आज देशासह जगाला मानवतेची शिकवण देणारी आधुनिक तक्षशिला बनली आहे. ज्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन झाले ते ठिकाण म्हणजे नागपुरातील पवित्र दीक्षाभूमी होय. मात्र, याच ऐतिहासिक दीक्षाभूमीचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दीक्षाभूमीला अ दर्जा आतापर्यंत मिळायला हवा होता. मात्र, कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने क श्रेणीतून ब श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा दिला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ठिकाण हे...
  November 12, 01:58 AM
 • सध्या भाजप-शिवसेना युतीमध्ये बरीच धुसफूस निर्माण झाली आहे. फडणवीस सरकारने काही कामे करायला घेतली की शिवसेना त्याला विरोध करते. इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा युतीचा संमिश्र कार्यक्रम होता. तिथे शिवसेनेने आमंत्रणाची वाट का बघावी? ते सत्तेत आहेत याचा अर्थ हा कार्यक्रम त्यांचाही होता. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या प्रकरणात सुधींद्र कुलकर्णीच्या चेहऱ्यावर शाई फेकली. युतीतील या...
  October 22, 04:03 AM
 • शेतकऱ्याला पगार हा अग्रलेख वाचला. शेतकरी समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या लेखातील अनेक मुद्दे पटणारे आहेत. आज शेतकरी अनेक संकटांचा सामना करून जीवन जगत आहे. शेतकरी मदतीचा विषय आला की विविध तर्कवितर्क लावण्यात येतात. शेतकऱ्यांना विविध नावांचे िबरूद लावण्यापलीकडे नेत्यांनी काहीही केले नाही. शेतकऱ्यांना काही द्यायचे म्हटले की सर्वसामान्यांच्या कपाळावर लगेच आठ्या येतात. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले, डाळीच्या भावाने शंभरी पार केली तरी कोणी मोर्चे काढीत नाही. शाॅपिंग माॅल आणि मल्टिप्लेक्समध्ये...
  October 16, 04:38 AM
 • सोशल साइट रेडिटच्या टॉप ट्रेंडमध्ये सहभागी या फोटोत दिसत असलेल्या झाडावर कोणतीही डिझाइन नाही, ती आग आहे. हे झाड काही दिवसांपासून हळूहळू जळत आहे. रेडिट युजर लायसेन्स टू शिलनुसार जवळपासच्या लोकांनी सांगितले की, येथे एक वीज पडली होती. त्यामुळे या झाडाची ही स्थिती झाली आहे. यावर कॉमेंट लिहिणाऱ्यांनी म्हटले आहे की, हे अमेरिकन राज्य फ्लोरिडातील छायाचित्र आहे. युजर्सनी हेही सांगितले आहे की, काही महिन्यांपूर्वी तेथे अशी घटना घडली आहे. reddit.com
  October 15, 12:45 AM
 • मंगळवार, २९ च्या दिव्य मराठीतील अॅड. अजित कडेठाणकरांचा सिंहस्थाच्या कुर्बानीतून साधलेली सामाजिक समरसता, हा लेख धर्ममार्तंडांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. एक पैठणकर म्हणून मुस्लिम बांधवांच्या कुर्बानी देण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना लेखकाने व्यक्त केलेल्या भावना अंतर्मुख करणाऱ्या आहे. सध्या जातीय सलोखा बिघडवण्याचे काम होत आहे. या पार्श्वभूमीवर पैठणमधील हिंदू आणि मुस्लिम समाजाने एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. कुंभमेळ्याच्या शाही...
  October 6, 12:50 AM
 • नॅशनल डाटा एन्क्रिप्शन पॉलिसीच्या सोमवारी जारी करण्यात आलेल्या मसुद्याने भारतभर चर्चेचा गदारोळ उडाला. देशभरातील तमाम नेटिझन्सचा यामुळे संताप झाला. सरकारच्या कोणत्याही निर्णयाचे जोरदार समर्थन होत असलेल्या सोशल मीडियावर एन्क्रिप्शन पॉलिसी जाहीर होताच सरकारचे अक्षरशः धिंडवडे काढणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊसच पडला. चिवचिवाटाविषयी अधिकच संवेदनशील असलेल्या राज्यकर्त्यांनी धोरणच मागे घेतले. भारत हा लोकशाहीवादी देश असून येथे प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगण्याचे...
  September 25, 04:43 AM
 • गुजरातच्या पाटीदार समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे. हार्दिक पटेल या तरुणाच्या नेतृत्वाखाली जवळपास १० लाख लोकांनी अहमदाबादमध्ये आंदोलन केले. वास्तविक पटेल समाज सर्वच बाबतीत अग्रेसर असतानाही जातीच्या उतरंडीवर खालच्या क्रमांकावर जाण्यास तयार झाला. ही अधोगतीच आहे. केवळ संख्येच्या बळावर आर्थिक संपन्न असतानाही अनावश्यक मागणी करणे म्हणजे देशात वर्गकलह निर्माण करणे होय. असे कृत्य म्हणजे देशद्रोहच आहे. लोकशाही असल्यामुळे कुणीही निवडणुकीचा धाक दाखवून सत्ताधाऱ्यांवर दबाव...
  September 24, 06:49 AM
 • टिळकांनी गणेशोत्सवाबाबत मांडलेली संकल्पना आपण विसरत चाललो आहोत. आज महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया असून शेतकरी त्रस्त आहेत. राज्यातील सर्व गणेश मंडळांनी खर्चात ३० टक्के कपात करून शिल्लक पडलेली रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून वापरावी. जेणेकरून बळीराजाला बळ मिळून तो आत्महत्येकडे वळणार नाही. तरुणांनी संकल्प केला तर राज्यातून कोट्यवधींचा निधी दुष्काळासाठी जमा होऊ शकतो. यातून सहजपणे दुष्काळावर मात केली जाऊ शकते. सध्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची खूप आवश्यकता आहे. याच पद्धतीने...
  September 23, 05:00 AM
 • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत गदारोळ झाला. वास्तविक पाहता इतिहास लिहिण्याचे वेगवेगळे दृष्टीकोण असतात. साम्राज्यवादी, हिंदूवादी, साम्यवादी या दृष्टीकोनातून संपूर्ण भारतीय इतिहास लिहीला गेला. यात प्रत्येकाला अभिव्यक्ती असते. मात्र मी म्हणतो तसा इतिहास लिहा ही अरेरावी इतिहास संशोधनात चालत नाही. तसेच श्रीमान बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वता सांगितले आहे की, मी इतिहासकार नसून कादंबरीकार आहे. इतिहास व कादंबरी यात खूपच फरक आहे. तरी सुद्धा विरोधी...
  September 22, 02:23 AM
 • हिं दू राष्ट्र अशी असलेली आपली पूर्वीची ओळख पूर्णपणे पुसून नेपाळने आता स्वत:ला धर्मनिरपेक्ष व लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. तशी तरतूद असलेली नवी राज्यघटना २० सप्टेंबरपासून लागू झाल्याची घोषणा नेपाळच्या संसदेचे अध्यक्ष रामबरन यादव यांनी केली. नेपाळने आता हिंदू राष्ट्र राहिले नाही याचे विलक्षण दु:ख भारतातील रा. स्व. संघ परिवाराला तर होणारच आहे. त्याचबरोबर नेपाळ धर्मनिरपेक्ष वगैरे झाल्यामुळे पुरोगामी म्हणवणाऱ्या शक्तींच्या छावण्यांतही आनंदाचे चीत्कार उमटले असतीलच. मात्र...
  September 22, 02:18 AM
 • शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाणही वाढल्याने गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी म्हणून या दुष्काळाकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यात आज हजारो नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळ आहेत. यापैकी काही मंडळांनी पुढे येऊन जरी दुष्काळग्रस्तांना मदत केली तरी बरेच काही साध्य होईल. गणेश मंडळे लाखोंनी वर्गणी गोळा करतात. मंडप सजावट, रोषणाई, कार्यक्रम आणि जेवणावळीवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. राज्यात सध्या दुष्काळ आहे. तेव्हा या सर्व बाबींवर पैसा खर्च करण्याऐवजी सामाजिक जाणीव म्हणून गणेश मंडळांनी...
  September 15, 10:29 PM
 • राज्यात पावसाने ओढ दिली आहे. पावसाअभावी अनेक हेक्टर्सवरील पिके जळून गेलेली आहेत. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, जनावरांना चारा नाही. जनावरे बेवारस म्हणून सोडावी लागत आहेत. अद्यापही छावण्या तयार झालेल्या नाहीत. धान्य तसेच भाजीपाल्याचे भाव परवडेनासे झालेले आहेत. राजकीय पातळीवर दुष्काळासाठी काही हालचाल जरूर दिसते, पण ही मदत सर्वांपर्यंत पोहोचणार आहे का? हे दौरे म्हणजे राजकीय कर्मकांडाचा भाग ठरू नयेत. यासाठी राजकारण वगळून सर्वच पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अशा स्थितीत महागाईने डोके वर...
  September 10, 03:00 AM
 • आत्महत्येमागील कारणे खूप किचकट आणि लवचिक असतात. एखाद्या आमिषाला बळी पडल्याने, कोणाच्या दबावात येणे, प्रेमप्रकरणातील अपयश, नोकरी न मिळाल्याने आई-वडिलांच्या धाकाला बळी पडल्याने वा मानसिक संतुलन बिघडल्याने मुले-मुली आत्महत्या करतात. आत्महत्यांमागील कारणांचा शोध घेतला असता संस्कार कमी पडतात, असे लक्षात येते. याशिवाय आई-वडिलांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांना नको इतकी मोकळीक देतात. आपला मुलगा वा मुलगी कुठे जाते, काय करते, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण?...
  September 4, 04:00 AM
 • मित्राला चाकूचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना वाचून मन सुन्न झाले. केवळ एकांत मिळावा म्हणून निर्जनस्थळी जाण्याची अधीरता शेवटी गुन्हेगारांना आणि विकृतांना आयतेच आमंत्रण देऊन गेली. श्रुती कुलकर्णीचे प्रकरण ताजे असताना ही घटना घडणे म्हणजे घडलेल्या घटनेपासून तरुणाई काही बोध घेत नाही हे स्पष्ट झाले. एखाद्या चांगल्या काॅफी शाॅपमध्ये कोपऱ्यातल्या टेबलवर बसूनही निवांत गप्पा मारता आल्या असत्या. पण केवळ मनमोकळे बाेलणे हा उद्देश एवढे लांब जाण्यात नव्हता हे दिसून येते. बहुतांश...
  September 4, 04:00 AM
 • सध्या दुष्काळामुळे मराठवाडा होरपळला आहे. परिस्थिती भीषण आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणी वाली नाही. अशात आत्महत्यांचे सत्रही थांबलेले नाही. दुबार पेरणीही वाया गेल्याने कर्ज वाढत गेले. त्यामुळे बँका पुन्हा कर्ज देत नाही. अशा बिकट परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी सर्वपक्षीय राजकीय नेते केवळ दौरे करून पोकळ आश्वासने देत आहेत. अचानक कधी नव्हे ते सर्वांना शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. लाखोंचा पोशिंदा आज अन्नाला मोताद झाला आहे. सोबत लवाजमा घेऊन...
  September 4, 04:00 AM
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात नवनव्या संकल्पना आकाराला येत असल्या, तरी त्यामुळे शेतकरी, कामगार असे घटक नाराज होत आहेत. भूसंपादन विधेयकावरून सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडले असताना आता कामगारांना नोकरीवरून काढणं सोपं करण्याचा कायदा मंजूर होत आहे. इतर काही आर्थिक घडामोडीही सरकारच्या पथ्यावर पडण्यासारखी परिस्थिती नाही. भारतात परदेशी गुंतवणूक व्हावी, भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवावं, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. भारतात येणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांसाठी...
  September 3, 04:00 AM
 • १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे पन्नासावे वर्ष सरकार साजरे करत आहे. हा सोहळा १ ते २६ सप्टेंबर चालेल. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून लाहोर शहराला वेढा घातला होता. अमेरिकेने पाकिस्तानला पुरवलेले ११० रणगाडे (कुप्रसिद्ध पँटर्न टँक) भारतीय सैन्याने ताब्यात घेतले होते, तर बलाढ्य अशा साबरजेट विमानांचा आपल्या चिमुकल्या नाट विमानांनी धुव्वा उडवला होता. विशेष म्हणजे आपली सर्व युद्धसामग्री ब्रिटिशकालीन म्हणजे १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याला वारशाने मिळालेली...
  September 3, 04:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात