जाहिरात
जाहिरात
Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

 • महाराष्ट्रातील कारागृहांच्या रक्षणासाठी १ हजार ३६६ पदे भरण्यातच आलेली नाहीत. तसेच कारागृह सुरक्षेसाठी पोलिसांच्या वतीने २०१३-१४ मध्ये करण्यात आलेल्या सिक्युरिटी ऑडिटचीही अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही. चालू वर्षात नव्याने कारागृहांचे सिक्युरिटी ऑडिट करण्याचे फक्त आदेश जारी करण्यात आले आहेत. काही नामचीन गुंडांच्या टोळ्यांचे गुंड कारागृहात आहेत. अशा वेळी कारागृहांची सुरक्षा किती जय्यत असायला हवी हे राज्याच्या गृह विभागाला वेगळे सांगायला नको. तरीही विशेष कृती पथकाची स्थापना...
  September 3, 04:00 AM
 • राज्यातून एक ऑगस्टपासून एलबीटी हद्दपार करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी एलबीटीला विरोध केला होता. या करामुळे महागाईसोबत वस्तूंच्या किमती वाढतात, असा व्यापाऱ्यांचा अाक्षेप होता. खरे तर व्यापाऱ्यांचा या करामुळे फायदाच होणार होता. आता एलबीटी रद्द झाल्याने व्यापारी कमी किमतीत वस्तू विकतील याची काय हमी? उलट या माध्यमातून भरमसाट नफा कमावली जाईल. साखरचे भाव वाढल्याने िमठाई आणि चहाचे दर वाढले होते. आता साखर स्वस्त झाली असली तरी मिठाई आणि चहाचे भाव कमी झालेले नाही. असे कर रद्द केल्याने मनपाच्या...
  September 2, 04:00 AM
 • शेतकऱ्यांना मदत म्हणून बहुतांश दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत राज्य सरकारने कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला. तसे आदेशही संबंधित बँकांना दिले. काहींनी त्याचे पालन केले, तर काही बँकांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. पुनर्गठन म्हणजे आहे त्या कर्जाचे हप्ते पाडून ते तसेच ठेवायचे आणि शेतकऱ्यांना नवे कर्ज द्यायचे. ही तात्पुरती व्यवस्था झाली. पुढील वर्षी मागील वर्षाच्या कर्जाचे संपूर्ण कर्ज व्याजासह अधिक पुनर्गठीत कर्जाचा हप्ता व व्याज भरायचे. तेव्हा कुठे नवीन कर्ज मिळते. एकूणच पाहिले...
  September 2, 04:00 AM
 • राज्यात सध्या ऊस लागवड व गाळपाला बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय घाईघाईने घेतलेला दिसताे. असा निर्णय चुकीचा ठरल्याची अनेक उदाहरणे समाेर अाहेत. माेदी सरकारला शेतीचे काही कळत नाही, असा अाराेप यापूर्वी अनेक राजकारण्यांनी केला हाेता, हे खरे ठरत अाहे. या सरकारला एकतर देश चालविण्याचा अनुभव कमी दिसताे किंवा निर्णयक्षमता नाही असे जाणवते. कारण महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळामुळे जरी हा निर्णय याेग्य असला, तरी ऊस कारखानदारीवर कराेडाे कुटुंबे पाेट भरतात याचे भान या सरकारला नाही असे दिसते. अाजही...
  September 2, 04:00 AM
 • २९ च्या दिव्य मराठीतील,जलपुरुषा, माफ कर बाबा संपादकीय खूपच अप्रतिम जमले आहे. पाणी प्रश्नाचा नेमका वेध या संपादकीयामध्ये घेतला आहे. राजेंद्र सिंह यांना २०१५ चा,स्टाॅकहोम वाॅटर प्राइझ हा नोबेलच्या तोडीचा पुरस्कार दिला गेला. राजेंद्र सिहआणि भारतीयांना मिळणाऱ्या अशा जागतिक पुरस्काराचा एक भारतीय म्हणून आनंद आहेच, पण ज्यासाठी हा पुरस्कार दिला जातो, त्या पाण्याच्या न्याय्य वापरात आम्ही खूपच मागास असल्याची सल जास्त बोचणारी आहे. सिंचनाच्या नावाखाली सर्वांत अधिक खर्च याच आपल्या...
  September 1, 04:00 AM
 • आरक्षण हा भारतात नेहमी चर्चिला जाणारा विषय. दर पाच-दहा वर्षांनी एखाद्या समाजाच्या आंदोलनाने तो प्रकाशात येतो. या वेळी निमित्त आहे ते गुजरातच्या पाटीदार पटेल समाजाचे. आता आरक्षण मागणाऱ्या पाटीदार-पटेल, मराठा, जाट, कुर्मी, गुज्जर, रेड्डी या अनुक्रमे गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेशातील जातींना आपण मागास असल्याची जाणीव झालेली नसून आरक्षणाच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या समाजाच्या संधी कमी झाल्या. शिक्षण व नोकरीतील समाजाचा टक्का घसरत असल्याने निर्माण झालेल्या...
  September 1, 04:00 AM
 • २० आॅगस्टच्या दिव्य मराठीमध्ये केदारनाथ सुरवसे, सोलापूर यांचे पावसासाठी अंधश्रद्धा का जोपासता? हे पत्र वाचनात आले. त्यात सुरवसे यांनी पाऊस पाडण्यासाठी करीत असलेल्या अनेक उपायांत यज्ञाचाही उल्लेख केलेला आहे. पण सुरवसे यांना मला सांगावेसे वाटते, जगातील सर्व गोष्टी बुद्धीने सिद्ध करता येत नाहीत. कारण बुद्धीला मर्यादा असतात. बुद्धीच्या वा आकलनापलीकडील अनेक गोष्टी श्रद्धेने बघता येतात. त्याला आम्ही डोळस श्रद्धा म्हणतो. बहुधा १९९२ मध्ये शनिवारी आम्ही चार मित्रांनी संगमनेरला मोठ्या...
  September 1, 04:00 AM
 • ४ आॅगस्टच्या भूमिका पानावर संसद देशातील सर्वोच्च व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. तेथील खासदार मनरेगाचे मजूर नाहीत, असे अभिषेक मनू सिंघवी यांचे ट्विट प्रसिद्ध झाले आहे. हा टिवटिवाट करताना संसदेचा एक दिवसाचा खर्च सहा कोटी आहे, हे तुम्ही विसरलात. तुम्ही संसदेचे अधिवेशन चालू दिले नाही, तेव्हा आमच्यासारख्या असंख्य सामान्य माणसांच्या खिशातून भरलेला कराचा पैसा वाया गेला. मोदी सरकारची काही धोरणे जरूर चुकली असतील; पण म्हणून संसदच चालू न देणे कोणत्या तत्त्वात बसते? याचा अर्थ मागील पराभवातून...
  September 1, 04:00 AM
 • व्यापमं, चिक्की घोटाळा व ललित मोदी या प्रकरणांवरून मागील काही दिवसांपासून संसदेचे कामकाज ठप्प आहे. यामुळे रोज काही कोटी रुपयांची हानी झाली. हा सर्व भुर्दंड मात्र सर्वसामान्य माणसालाच आहे, तरीही काही प्रमाणात सामान्य माणूस धरणे, आंदोलनांच्या रूपाने याला पाठिंबा देत आहे. काही मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसद दीर्घ कालावधीपर्यंत बंद पाडणे हे देशाला परवडणारे नाही. देशात भ्रष्टाचार एवढा बोकाळला आहे की, कोणत्याही पक्षाचे राज्य आले तरी त्याला पायबंद घालणे अशक्य आहे. केवळ राजकीय लोकच...
  August 20, 06:23 AM
 • थायलंडची राजधानी बँकॉक येथील हिंदूंच्या सुप्रसिद्ध इरावन मंदिरात झालेला बॉम्बस्फोट चिंताजनक आहे. हिंदुस्थानबाहेरील हिंदू समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा हा भ्याडपणा आहे. बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आरोपींचा तत्काळ छडा लावून त्यांना फासावरच लटकावले पाहिजे, जेणेकरून हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या नजरेने पाहण्याचीही हिंमत त्या भेकडांना होणार नाही.
  August 19, 12:24 AM
 • महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथे सुरक्षेचे कारण पुढे करत यात्रा काळात मंदिराच्या तीनपैकी एकच दरवाजा उघडा ठेवला जाणार असल्याचे श्री नागनाथ संस्थानला पाठवलेल्या पत्रात पोलिसांनी म्हटले आहे. श्रावणी सोमवारी भगवान शिवाच्या मंदिरात पूजेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते आणि त्यात हे ज्योतिर्लिंग असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी या ठिकाणी अधिक बंदोबस्त लावून मंदिराचे तिन्ही दरवाजे खुले केले...
  August 18, 12:04 AM
 • शेअर्सच्या स्वरूपात भाविकांना दान देता यावे, यासाठी तिरुपती संस्थानने डीमॅट खाते उघडल्याची बातमी दिव्य मराठीत वाचली. दान स्वरूपात दररोज कोट्यवधींची रक्कम जमा होऊनही सामाजिक बांधिलकीसाठी पुढाकार न घेणाऱ्या देवस्थानांनी स्वत:चे उत्पन्न वाढवण्याची आणखी एक तरतूद केल्याचे वाचून खेदच झाला. दुष्काळ, अतिरेकी हल्ले, सुनामी, भूकंप अशा एकाही संकटात देशातील मोठ्या देवस्थानांनी एका पैशाचीही मदत केल्याचे ऐकिवात नाही. अर्थात, यात काही अपवादही आहेत. अशा देवस्थानांनी आता स्विस बँकेतही खाते...
  August 7, 01:00 AM
 • महापालिका वा नगरपालिकेसारख्या यंत्रणा कसे काम करतात याचे उत्तम उदाहरण म्हणून ठाण्यातील घटनेकडे पाहावे लागेल. ठाण्यातील कृष्ण निवास इमारत कोसळून झालेल्या अपघातात १२ जण ठार झाल्याच्या घटनेने ही बाब प्रकर्षाने लक्षात आली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या शिकस्त इमारतींची यादी असते. परंतु वर्षभर आणि एखादी दुर्घटना होईपर्यंत या संस्था काहीही करीत नाही.
  August 6, 06:26 AM
 • अश्लील संकेतस्थळे (वेबसाइट्स ) बंद करणे म्हणजे भारताचे तालिबानीकरण करणे होय, असे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा याचे मत आहे. या बंदीचे स्वागत करणे तर दूरच, उलट त्याबाबत गळा काढून दाखवण्यात जी धन्यता वाटत आहे, त्यावरून यांना समाजहिताची किती काळजी आहे, हे लक्षात येते. समाजाला बिघडवणाऱ्या या संकेतस्थळांतून असे कोणते प्रबोधन होत आहे की ज्यावर कुऱ्हाड घातल्याने मोठे नुकसान होणार आहे? वाईट गोष्टींना चिरडण्यासाठी कठोर पावले उचलली जाणे गरजेचे झाले असताना त्याची तुलना तालिबानी हैवानांशी...
  August 5, 12:45 AM
 • अश्लील संकेतस्थळे (वेबसाइट्स ) बंद करणे म्हणजे भारताचे तालिबानीकरण करणे होय, असे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा याचे मत आहे. या बंदीचे स्वागत करणे तर दूरच, उलट त्याबाबत गळा काढून दाखवण्यात जी धन्यता वाटत आहे, त्यावरून यांना समाजहिताची किती काळजी आहे, हे लक्षात येते. समाजाला बिघडवणाऱ्या या संकेतस्थळांतून असे कोणते प्रबोधन होत आहे की ज्यावर कुऱ्हाड घातल्याने मोठे नुकसान होणार आहे? वाईट गोष्टींना चिरडण्यासाठी कठोर पावले उचलली जाणे गरजेचे झाले असताना त्याची तुलना तालिबानी हैवानांशी...
  August 5, 12:35 AM
 • छगन भुजबळ यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून एसीबीने त्यांच्या अब्जावधी रुपये किमतीच्या मालमत्तांवर धाडी घातल्या. भुजबळांना बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप करत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. असे प्रकार इतर जातीतील नेत्यांबाबतही घडताना दिसून येतात. मात्र, त्यामुळे अशा नेत्यांना भ्रष्टाचारासाठी पाठबळ मिळते. या नेत्यांच्या अनुयायांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, भ्रष्टाचारी व्यक्तींना जात व धर्म नसतो. त्या कारवाईचा सामना करण्यास तो नेता सक्षम असतो....
  August 3, 01:00 AM
 • फाशीचे कवित्व हे २३ जुलै रोजी प्रसिद्ध झालेले संपादकीय वाचले. शीर्षक समर्पक वाटते. याकूबच्या फाशीचे कवित्व अजून रंगतेच आहे. कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी याकूब मेमन याला मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील खटल्यात फाशीची शिक्षा झाली. तब्बल २२ वर्षे इतका प्रदीर्घ काळ खटला चालतो आहे. तरी फाशी देण्याच्या शिक्षेची अंमलबजावणी अजूनही प्रलंबितच आहे. ज्या क्रूरकर्म्याने एका फटक्यात शेकडो निष्पाप लोकांचे बळी घेतले, त्याला फाशी देण्यात विलंब का लागतो आहे? अजमल कसाब, अफझल गुरूला असेच दीर्घ काळ जिंवत...
  July 24, 04:27 AM
 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीय अंतराळवीरांना अवकाशात उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रायोजेनिक इंजिनाच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी केली आहे. या नव्या इंजिनमुळे इस्रोला आठ टन वजनाचे सॅटेलाइट अवकाशात सोडणे शक्य होणार आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण जितके स्वयंपूर्ण होत जाऊ तितके ते आपल्यासाठीच हितावह असणार आहे. गरज आहे ते संशोधन व निर्माण (Research Development) क्षेत्रास कुठेही निधीची कमतरता पडू न देण्याची. अलीकडेच इन्फोसिसचे माजी संचालक नारायण मूर्ती म्हणाले होते की,...
  July 22, 01:13 AM
 • आज शिक्षणाची अवस्था घर का ना घाट का झाली आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी अभियांत्रिकी शिक्षण नादारी अर्ज करून पाच ते दहा हजारांत पूर्ण होत असे. गेल्या चार-पाच वर्षांत शैक्षणिक शुल्कात झालेली वाढ पाहता गरिबांना शिक्षण घेणे दुरापास्तच झाले आहे सत्तापालट झाल्यानंतरही कोणी शैक्षणिक शुल्क कमी करण्याचे आश्वासन देईल, असे वाटत नाही. मोदी सरकार कौशल्यावर आधारित शिक्षणास चालना देण्याच्या योजना राबवत आहे. पण तंत्रज्ञान शिकण्यासाठी विद्यार्थ्यास एका वर्षास एक लाख रुपये इतकी फी द्यावी लागत असेल तर...
  July 21, 01:05 AM
 • देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात १५ वर्षांवरील ३० हजार महिलांनी गर्भपात केल्याची नोंद सरकार दरबारी आढळून आली. त्यात १५ ते १८ वयोगटातील जवळपास १८०० मुलींनी आपला गर्भपात केला, ही धक्कादायक माहिती नक्कीच गंभीर बाब आहे. राज्यात विविध ठिकाणी गर्भपाताच्या किट्स, कामोत्तेजक औषधांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. मुली व महिला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेत आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा औषधांच्या ऑनलाइन...
  July 20, 01:37 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात