Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

  • कुंभमेळ्यामुळे शहराचा विकास व्हावा म्हणून कोट्यवधी खर्च केले जातात. ते फक्त सिंहस्थ कुंभमेळा म्हणून खर्च करू नयेत. सोयी- सुविधा या तात्पुरत्या नसाव्यात. साधू-संतांकरिता हा मेळा असला तरी अनेक भाविकांनी तो पाहून डोळ्याचे पारणे फेडले तर बिघडले कुठे? अलाहाबाद, वाराणसी, नाशिक अशा गंगेच्या ठिकाणी धर्मशाळा उभारून त्या कायमस्वरुपी असाव्यात. कुंभमेळ्यात जवळपासची जनताच नव्हे, तर संपूर्ण देशातील भाविक पदरमोड करून येत असतात. साधू, संत हे काही दिवसांसाठी येतात; पण जवळपासची जनता तेथे वास्तव्य करून...
    July 16, 12:36 AM
  • काँग्रेसमुक्त भारत, भ्रष्टाचारमुक्त भारत. खाणार नाही, खाऊ देणार नाही. पारदर्शक कारभार अशा अनेक मोठमोठ्या वल्गना करून सत्तेत आलेला पक्ष सध्या अनेक घोटाळ्यांनी बरबटत चालला आहे. व्यापम घोटाळा, ललित मोदी प्रकरण, चिक्की घोटाळा, अग्निशमन उपकरण घोटाळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदवी घोटाळा. असे अनेक घोटाळे उजेडात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की, आपण यांना एवढ्यासाठीच सत्तेवर बसवलं की काय? ज्या हुतात्म्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी स्वत:ची आहुती...
    July 16, 12:34 AM
  • शायरी विश्वात आपले नाव अजरामर करणारे औरंगाबादचे जिंदादिल शायर, केवळ उर्दू भाषेचे नव्हे, तर भारतीय भाषेचा उर्दू मोहरा आणि मराठवाड्याचे लेणे बशर नवाज यांच्या निधनाने औरंंगाबादची शान हरपली आहे. बशर नवाज हे महाराष्ट्राचे भूषण होते. त्यांची साधी राहणी व ते सरळ स्वभावाचे विचारवंत, कवी होते. तसेच ते औरंगाबादच्या उर्दू संस्कृती व सभ्यतेचे महान प्रतीक होते. बाजार हिंदी चित्रपटातील शायरीने बशर नवाज भारतीय आकाशातील प्रदिप्त चंद्र ठरले. कुछ लोग उर्दू को मुस्लिम की भाषा बना दिया, अब इसके जख्म कौन...
    July 15, 12:25 AM
  • डाळीला बोनसचा तडका या दिव्य मराठीतील (२० जून) अग्रलेखाद्वारे शेती पिकांचे किती निकृष्ट नियोजन आहे ते दाखवून दिले आहे. मागील दहा वर्षांत अनेकदा दुष्काळ पडला तरी साखरेचे अन् तांदळाचे विक्रमी उत्पादन होत आहे अन् तृणधान्य आणि कडधान्य यांचे मात्र फारच कमी उत्पादन होत आहे. ऊस अन् तांदळासारख्या पिकाला जास्त पाणी लागते, यावर शेतकर्यांनी पिकांचे नियोजन करण्याची गरज आहे. कमी पाण्यावर येणारी पिके घेतल्यास शेतकर्यांना आर्थिक फायदा होतो आणि दुष्काळाचा सामनाही करता येतो. त्याचप्रमाणे सर्व...
    June 26, 03:00 AM
  • जागतिक योग दिनाच्या निमित्ताने देशभरात सकाळीच देशबांधवांनी उत्स्फूर्तपणे योगाची प्रात्यक्षिके केली. मुस्लिम बांधवांचा विरोधही मावळलेला दिसून आला. काँग्रेसने मात्र नरेंद्र मोदी योगाचे मार्केटिंग करत असल्याचा आरोप केला, पण मायलेकरे कुठे गायब झाली होती? ते तेथे किंवा दररोज योग करतात का? ते मात्र समजू शकले नाही. भारताची प्राचीन परंपरा असलेला योग आता जगभरात साजरा होतोय, याचा निदान अभिमान तरी बाळगावा. देशात मोठ्या प्रमाणावर कुपोषण चालू आहे, मजुरांना योगाची काय गरज? वगैरे संदेश...
    June 23, 04:00 AM
  • माजी गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. एक सर्वसामान्य भाजी विक्रेता ते उपमुख्यमंत्री अशी त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सामान्य शिवसैनिकांना संधी दिली, त्यात भुजबळांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. त्यांची बेदरकार वृत्ती आणि शरद पवारांनाही आव्हान देण्याचे धार्ष्ट्य गोत्यात येण्यास कारणीभूत ठरले. शिवसेनेची लफडी, कुलंगडी बाहेर काढण्यात अग्रेसर असणाऱ्या भुजबळांची अवस्था दयनीय बनली आहे. आता...
    June 20, 12:40 AM
  • स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरून वाद म्हटल्यापेक्षा विचार, चर्चा चालू आहे. मूळ विचार स्मारक आणि त्याला पर्याय ट्रॉमा हॉस्पिटल अशा दोन बाजू आहेत. माझ्या मते यात वाद होण्याऐवजी समन्वय व्हावा. दोघांनाही एकत्र करून एका बाजूला मूळ स्मारक आणि दुसऱ्या बाजूला ट्रॉमा हॉस्पिटल असे बहुउद्देशीय आणि बहुपयोगी असे एक चिरंतन स्मारक करावे. मध्यभागी मुंडे यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा. शिवाय दोन्हीकडे छायाचित्रे लावण्यात यावीत. असे स्मारक चिरंतन व वैशिष्ट्यपूर्ण होईल. भाजप, पंकजा मुुंडे आणि...
    June 19, 01:27 AM
  • महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे जायचेच, असा ठाम निर्धार केला आहे की काय, अशी शंका येते. रचनात्मक आणि सकारात्मक क्षेत्रात महिला पुरुषांच्या पुढे गेल्या तर त्यातून समाजाचे हितच होईल; परंतु नारीशक्ती जेव्हा आधुनिकतेच्या भ्रामक कल्पनांच्या आहारी जाते तेव्हा त्याचे समर्थन करता येत नाही. स्त्रीच जर बिघडली तर तिचे कुटुंब, तो समाज बिघडायला फार वेळ लागत नाही. म्हणूनच मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवून गोंधळ घालणाऱ्या मुंबईतील जान्हवी गडकर आणि शिवानी बाली या धनाढ्य आणि...
    June 18, 01:16 AM
  • महाराष्ट्र राज्याच्या माहिती आयुक्तांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने धाडी टाकल्याचे, त्यात बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले. ओघाने माहिती आयुक्त पदालाही गालबोट लागले. वास्तविक सदर धाडी विद्यमान माहिती आयुक्त दीपक देशपांडे सार्वजनिक बांधकाम सचिव असताना तत्कालीन घोटाळ्यांसंदर्भात होत्या. त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या वृत्तांत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम सचिवांच्या घरावर छापे असे अधोरेखित व्हायला हवे होते. मात्र, त्यांची माहिती आयुक्त पदावर नेमणूक...
    June 17, 02:14 AM
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. ए. चोपडे यांनी संभाव्य कुलसचिवांचे इंग्रजीचे ज्ञान तपासण्यासाठी २५ जूनला लेखी परीक्षेचा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम संबंधित उमेदवारांना उपलब्धही करून देण्यात आला आहे. मात्र, स्वत:च्या नावापुढे डॉक्टरेटची पदवी लावणाऱ्या उच्चशिक्षित उमेदवारांनी कुलगुरूंच्या या निर्णयाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी हे हास्यास्पद आहे. उमेदवारांच्या ज्ञानाबद्दल ती शंका निर्माण करणारी आहे....
    June 15, 01:01 AM
  • या प्रवृत्तींना कोण आवरणार? या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या लेखावर केदार कुलकर्णी यांचा प्रतिवाद (१० जून) वाचला. या पत्रात कुलकर्णी असे म्हणतात की, ब्राह्मण जातीचे नाव बदनाम करण्यासाठी ब्राह्मणी वृत्ती, आक्रमक ब्राह्मणशाही या शब्दांचा निष्कारण वापर करून वाद उकरण्याचा वागळेंचा प्रयत्न दिसतो आहे. आपल्या देशात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र अशी जातींची उतरंड होती. या उतरंडीचे समर्थन करणाऱ्या ब्राह्मणांमधील काही जातीयवादी ब्राह्मणी वृत्तींना फुले- शाहू-आंबेडकर, प्रबोधनकार...
    June 13, 12:33 AM
  • शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मोदी सरकारने देशभरातील साखर कारखान्यांना ६ हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज द्यायचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर १५०० कोटी थेट जमा होणार आहेत आणि उर्वरित २२०० कोटी थकबाकी साखर कारखान्यांकडून अपेक्षित आहे. प्रश्न असा पडतो की अप्पासाहेब काडादी, नागनाथअण्णा नाईकवाडी, गोपीनाथ मुंडे यांचे कारखाने कधी अडचणीत आले नाहीत, तर मग इतर साखर कारखाने कसे काय अडचणीत येऊ शकतात? साखरसम्राटांनी कारखाने लुटायचे आणि शेतकऱ्यांना...
    June 12, 12:59 AM
  • ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अरबी समुद्रातील शिवछत्रपतींच्या स्मारकाला सद्हेतूने केलेला विरोध सहन न झाल्याने आमदार विनायक मेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केतकर यांच्या घरावर दगडफेक केली होती. त्यावरून बराच गदारोळही झाला. कालांतराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवस्मारकांसाठी लागणारा पैसा गरजूंना घरे पुरवणे इत्यादी चांगल्या कामासाठी केला जावा, अशी भूमिका घेतली व शिवस्मारकास जाहीर विरोध दर्शवला; परंतु मेटे यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. आता...
    June 10, 12:13 AM
  • दिव्य मराठी (९ जून) मध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा प्रसिद्ध झालेला लेख वाचला. आक्रमक धर्मांध ब्राह्मणशाहीकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. एखाद्या वाईट प्रवृत्तीला विशिष्ट जातीचे नाव देणे कितपत योग्य आहे? निखिल वागळे यांनी जातीयवादी मंडळींच्या दुष्ट प्रवृत्तीला आक्रमक धर्मांध ब्राह्मणशाही असे संबोधले आहे. ब्राह्मण जातीचे नाव वाईट प्रवृत्तीला देऊन जातीयवादाचा अधिक ऊहापाेह करणे योग्य नाही. ब्राह्मण जातीचे नाव बदनाम करण्यासाठी ब्राह्मणी वृत्ती, आक्रमक...
    June 9, 10:36 PM
  • फसवा फतवा! (२० मे) संपादकीय आवडले. माझ्या मते त्याचे स्वागत केले पाहिजे. भारतासह जगाला भाजून काढत असलेल्या अतिरेकी संघटनांना मुस्लिम राष्ट्रांनी चिरडून टाकावे, असा फतवा अतिरेक्यांचे उगमस्थान असलेल्या पाकिस्तानातून आणि तोही २०० मौलवींच्या लाहोर परिषदेतून निघाला आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान, अल-कायदा, आयएसआयएस, बोको हराम आणि इतर कथित जिहादी संघटनांचे तत्त्वज्ञान सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहे. त्यांचे काम इस्लामविरोधी आहे, असेही त्या फतव्यात म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कर, आयएसआय...
    May 21, 03:00 AM
  • औरंगाबाद महापालिका निवडणुकीत मुस्लिमांची मते मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) पक्षाच्या उमेदवारांना मिळाल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला. मुस्लिमांच्या मतांच्या फुटीचा फायदा आपल्याला होईल, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होते, पण सारे धुळीस मिळाले. गेली २८ वर्षे सत्तेवर असलेल्या युतीच्या कारभार्यांनी औरंगाबाद शहराचा विकास घडवला नसल्याने मतदारांत नाराजीची भावना होती. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत या पक्षाच्या उमेदवारांनी मारलेली मुसंडी...
    May 19, 03:27 AM
  • चार-पाच दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की, मागील वर्षापेक्षा यंदा जायकवाडीमधील पाण्याची स्थिती चांगली असून जुलै महिन्यापर्यंत चिंतेचे कारण नाही आणि गुरुवार, १४ मे रोजीच्या वृत्तपत्रात बातमी होती की, उपसा घटला! पाणी संकट गंभीर महापालिका प्रशासनाला हा अचानक साक्षात्कार कसा झाला? त्याच बातमीत पाणी कपातीचे संकेतही दिलेले आहेत. दर महिन्यातून चार- पाच वेळा फुटणाऱ्या जलवाहिन्या, त्यामुळे लाखो लिटर पाण्याची होणारी नासाडी, तसेच शहराच्या अनेक भागांत असलेल्या अनधिकृत नळ...
    May 16, 01:34 AM
  • वाहने पार्किंगची सुविधा नसल्यास लोक दुकानात जात नाहीत. वाहनचालक दुकानासमोर कशाही पद्धतीने वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक खोळंबते. यासाठी पार्किंगचे सुयोग्य व्यवस्थापन असणे गरजेचे आहे. रस्त्यावरील नो पार्किंगमधील वाहनांना जॅमर लावण्याच्या मोहिमेवर भर द्यावा. चारचाकी वाहनावर संबंधिताचा मोबाइल क्रमांक असावा. म्हणजे त्याच्याशी संपर्क साधून वाहनकोंडी सोडवण्यासाठी मदत होईल. तसेच अपघात झाला तर या माेबाइलचा उपयोग होतोच. एखादा वाहनाचा चालक दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवत असल्यास...
    May 15, 12:58 AM
  • उन्हाळा सुरू आहे. मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. आता टीव्हीसमोर बसून आयपीएल पाहणे हा मोठा खेळ? प्रत्यक्षात मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. शहरात तर गल्लीत कधी तरी क्रिकेट खेळले जाते. त्यात घरांच्या काचा फुटतात. जुने खेळ इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहेत. आयपीएलला प्रचंड प्रतिसाद, महागडी तिकिटे, स्टेडियमपर्यंत जाणे-येणे, महागडे खाद्यपदार्थ, वेळ यांचा विचार करता या गोष्टी कोणाला परवडतात? दैनंदिन समस्यांनी हैराण लोक मात्र टीव्हीपुढे विरंगुळा म्हणून पाहतात. प्रचंड श्रीमंत खेळाडू,...
    May 14, 12:35 AM
  • गाता गळा, शिंपता मळा आणि लिहिता हातावळा हे कविवर्य बा. भ. बाेरकर यांचे सुवचन पुढे नेऊन आस्वादता रसना असे म्हणता येईल. स्वर, कर प्रतिभा त्याचप्रमाणे रुचकर पदार्थांचा आस्वाद घेण्याची रसिकता या वृत्ती मनुष्याच्या ठायी असल्याच पाहिजेत. आपल्याकडे ऋतुमानाप्रमाणे विविध फळांची रेलचेल असते. जळगावची मेहरुणची केळी व बाेरे, डहाणू व घोलवडचे चिकू, पुण्याचे अंजीर, सीताफळे व विदर्भाची संत्री सुप्रसिद्ध आहेत. क जीवनसत्त्व असणारी काळी करवंदे उन्हाळ्यात येतात. डाेंगरदऱ्यातील आदिवासी बांधव...
    May 13, 02:07 AM
 
जाहिरात

RECOMMENDED