जाहिरात
जाहिरात
Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

 • जायकवाडी या मराठवाड्यातील मोठ्या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. गाळ असाच वाढत राहिला, तर या धरणातील पाण्याच्या साठ्यावर विपरीत परिणाम होईल. सध्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे. अपुर्या पावसामुळे मराठवाड्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शासनाने तांत्रिक पद्धतीने या धरणातील साचलेला गाळ उपसला, तर सिंचनाची क्षमता आणखी वाढू शकेल. गाळाचा वापर खत म्हणून शेतीसाठी करता येतो. तसेच पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाण्याचा गैरवापर थांबेल. पिण्याच्या पाण्यास...
  February 6, 03:00 AM
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्यपूर्ण शिक्षणाची कास धरत आहेत. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता किमान एक लाख रुपये फी भरावी लागणार आहे. शासनानेच फीवाढ केली आहे. ईबीसीची सवलत असणार्या मुलांनाही आधी तेवढी रक्कम भरा, शासनाकडून वर्षभरानंतर अनुदान आल्यावर अर्धी रक्कम परत केली जाईल, असे संस्थाचालक सांगतात. गरीब किंवा मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचे पालक इतकी मोठी रक्कम आणणार कोठून? शिवाय आता नोकरीची खात्री नसल्याने बँकांसुद्धा शैक्षणिक कर्जे देण्यास तयार होत नाहीत....
  February 5, 03:00 AM
 • बांधा, वापरा, हस्तांतरित करा हे तत्त्व मोठ्या रस्ता विकासकामासाठी वापरले जाते. परंतु नेमकी वाहनांची संख्या किती, हा भ्रम कायम असतो. एकीकडे वाहनांची संख्या भरमसाट वाढत आहे. दुसरीकडे टोलची कालमर्यादा वाढत आहे. टोल देऊनही रस्ता गुणवत्ता, इतर सोयींची बोंब सार्वजनिक आहे. अशा वेळी सर्वमान्य अशी युक्ती, योजना येईल. वाहतूक जास्त असलेल्या मार्गाचे २५ ते ३० किमीचे तुकडे पाडून तिथे वजनकाटे, सीसीटीव्ही कॅमेरे ही योजना राबवावी. वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनांवर टोल लावण्यात यावा. या कामी...
  February 4, 03:00 AM
 • लोकसभेच्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच एकहाती प्रचारयंत्रणेमुळे भाजपने जिंकल्या. मोदी लाटेमुळे आजवर कधी मिळाल्या नाहीत एवढ्या ३८० जागा भाजपला मिळाल्या. त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू-काश्मीर आदी राज्यांतील निवडणुकांत मोदींनाच प्रचारसभा घ्याव्या लागल्या. आतासुद्धा दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनाचा प्रचारसभा घ्याव्या लागतात. पंतप्रधानपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असताना भाजपसाठी त्यांनी मते मागत फिरणे योग्य वाटत नाही. भाजपकडे...
  February 3, 02:00 AM
 • सध्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही रोज वाढ होत आहे. वर्तमानपत्र असो की दूरचित्रवाणी, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या बातम्या आवर्जून दाखवल्या जातात. बेदरकारपणे वाहन चालवणे, पुरेसा अनुभव नसणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे, वाहनांची नीट काळजी न घेणे यासारख्या कारणांमुळे अपघात घडतात. भारतात अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. जगात सर्व देशांत मिळून रस्ते अपघातात जितके मृत्यू होत नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू एकट्या...
  February 2, 02:00 AM
 • आपल्या देशाची प्रगती व्हावी असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहिले असून या पत्रातील काही मुद्द्यांवर विचार व्हावा, अशी विनंती केली आहे. देशातील महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या जास्तीच्या संपत्तीचे विवरण घ्यावे. त्यांच्याकडील अतिरिक्त संपत्ती शासनाच्या तिजोरीत जमा करावी. तालुका आणि प्रत्येक जिल्हास्तरावर उद्योजकांना उद्योग काढण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे तरुणांना रोजगारांच्या संधी...
  January 29, 09:03 AM
 • आधुनिक तंत्रज्ञानामुळे गेल्या काही वर्षांपासून एलपीजी गॅस सिलिंडर नोंद (बुकिंग) करण्याची प्रक्रिया अत्यंत सहज आणि सोपी झाली आहे. आपला नोंदणी क्रमांक, ग्राहक क्रमांक तसेच आपल्या एजन्सीचे नाव तसेच त्यांनी कोणत्या तारखेपर्यंतच्या मागणीचा पुरवठा पूर्ण केला आहे इत्यादी अशा आशयाची माहिती ग्राहकास नोंद करताना केलेल्या फोन कॉलमधून आणि पाठोपाठ येणा-या एसएमएसद्वारे ग्राहकास प्राप्त होते. मात्र, गॅस सिलिंडर अमुक एका तारखेस अथवा त्याचे आसपास मिळू शकेल, असा उल्लेख झाल्यास मधल्या दिवसांत...
  January 21, 02:00 AM
 • सोशल मीडियावर प्रेम, मैत्री, सुख-दु:खाविषयीचे संदेश सहजपणे मिळतात. ते आपण तत्काळ इतरांना पाठवतो; परंतु हे संदेश जो तयार करतो. त्यामागे त्याच्या भावना, अनुभव असते. तेच आपण कॉपी करून सहज इतरांना फॉरवर्ड करतो. आपले विचार त्या संदेशाशी जुळतात का, आपली कृती त्यानुसार असते का, याचा विचारा व्हायला हवा. फक्त स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हा खटाटोप करत तर नाही ना? याचाही विचार होणे गरजेचे आहे. कृत्रिम निर्मिती फार काळ टिकू शकत नाही. त्याप्रमाणे कृत्रिम भावनाही टिकू शकत नाहीत. भावना मनापासून निर्माण व्हावी....
  January 20, 02:00 AM
 • संगीताच्या माध्यमातून अध्यात्म आणि अध्यात्मातून संगीत ही चेतना युवापिढीत जागवण्याचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रयास आहे. सोमवारी (दि. १२) नाशिक येथे ६००० बासरीवादक वेणुनाद कार्यक्रमातून विश्वविक्रम करणार आहेत. यानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगचे पूर्णवेळ साधक स्वामी दिनेश काशीकर यांच्याशी संवाद... प्रश्न : स्वामीजी मुळात वेणुनाद किंवा तुमचे असे कार्यक्रम होतात याचा उद्देश काय? स्वामीजी : आजची पिढी ही फॉरवर्ड आहे, फास्ट आहे. त्यांना शास्त्रीय संगीत किंवा योगा, मेडिटेशन या गोष्टी आवडत नाहीत असं...
  January 8, 01:38 AM
 • हिंदू देवदेवतांचा अवमान करणार्या पीके चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणावी व या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि अभिनेता आमिर खान यांना अटक करावी, या मागण्यांसाठी देशभरातील हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. अहमदाबादमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते हातात शिगा, काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले. चित्रपटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून दोन चित्रपटगृहांवर हल्ला करण्यात आला. स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक समजणार्या या संघटनांमुळे सामान्य जनतेला त्रास झाला, चित्रपटगृहांच्या मालकांना...
  December 31, 03:00 AM
 • अधिकृतपणे चलनात असलेली, परंतु सहजासहजी उपलब्ध न होणारी एक रुपयाची नोट पुन्हा उपलब्ध होणार असल्याची बातमी वाचून आनंद झाला. सरकारने एक रुपयाच्या नोटा पुन्हा छापण्याचा निर्णय घेतला आहे. एक रुपया हे भारतीय चलनाचे एकक आहे आणि कुठल्याही एककाला अनन्यसाधारण महत्त्व असते. एकक हे पायाचे दगड असतात. त्यावरच सारी इमारत उभी असते. रुपया घसरला/वधारला की त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होत असतो. माझ्या शालेय जीवनात मी एक रुपया रोजंदारीवर मजुरी केली आहे. त्यामुळे एक रुपयाच्या नोटेशी माझे...
  December 29, 02:00 AM
 • घुमान (पंजाब) येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक डॉ. सदानंद मोरे यांची यथोचित निवड झाली. डॉ. मोरे नगरला न्यू आर्ट््स महाविद्यालयात प्राध्यापक असताना माझे सहकारी होते. त्यामुळे त्यांच्या निवडीने विशेष आनंद झाला. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वाटचाल या शताब्दी ग्रंथाच्या अलीकडेच झालेल्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवणारे डॉ. मोरे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतील, असे प्रा. गणेश भगत यांनी...
  December 27, 12:12 AM
 • महाराष्ट्रात आयआयएमसारखी सर्वोच्च संस्था देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यांनतर औरंगाबादेतील उद्योजक मंडळींनी आयआयएम आपल्याच शहरात व्हावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. त्यासाठी या मंडळींनी विभागीय आयुक्तालयासमाेर साखळी उपोषणही केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संस्था नागपूरला नेण्याचा घाट घातला. गुणवत्तेच्या आधारावरच ही संस्था कोणत्या शहरात द्यायची याचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पण राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर आयआयएम नागपूरलाच देण्याचा...
  December 26, 12:34 AM
 • नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता सगळीकडे लगबग सुरू झाली आहे. मात्र, मराठी कॅलेंडरप्रमाणे गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. गेल्या काही वर्षांपासून ३१ डिसेंबर जोरात, धांगडधिंगा करीत साजरा करण्यात येतो. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जरी एक जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत होत असले तर त्यात गैर काहीच नाही. मात्र, धिंगाणा करीत आणि पार्ट्या झोडत स्वागत करणे कितपत योग्य आहे, असाही एक सूर ऐकायला मिळतो. अनेक ठिकाणी तर बुकिंगही संपल्याचे पाहायला मिळत आहे आणि कुणी भेटलं तरी ३१चं काय राव, असं...
  December 25, 12:55 AM
 • आजची तरुण पिढी बिघडत चालली आहे, असे ज्येष्ठ मंडळींच्या तोंडून ऐकण्यात येते. त्याला प्रमुख कारण इंटरनेटचे विस्तारलेले जाळे हेच आहे. मोबाइलचा वाढता प्रसार आणि त्यावरून वापरात येणारे विविध अॅप याला कारणीभूत आहेत. इंटरनेटचा वापर अनेक चांगल्या गोष्टींसाठी करणे केव्हाही चांगले. पण आजची तरुण मुले इंटरनेटवर विविध साइट पाहत असतात. पालकांना मुलांच्या इंटरनेट वेडाची कदाचित कल्पना नसेल, पण मुलांनी इंटरनेटचा वापर मर्यादित प्रमाणातच केला पाहिजे. आपण आपली संस्कृतीसुद्धा विसरत चाललो आहोत. इंटरनेट...
  December 25, 12:08 AM
 • पश्चिम महाराष्ट्राने खाल्ले मराठवाड्याचे हजारो कोटी, हे दि. २१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेले वृत्त वाचले. जिसकी लाठी उसकी भैंस ही म्हण आठवली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी मराठवाडा विनाअट सामील झाला. मराठवाडा आणि विदर्भाला झुकते माप देण्याचे आश्वासन यशवंतराव चव्हाणांनी दिले होते, पण इतिहास वेगळेच कथन करतो. छोट्या-मोठ्या मागण्यांसाठीही आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली किंवा न्यायालयात दाद मागावी लागते. मुख्यमंत्र्यांनीच यासंदर्भात खुलासा केला आहे. आमच्या हक्काचा निधी पश्चिम...
  December 24, 12:18 AM
 • गेल्या काही दिवसांपासून घर वापसीच्या सूत्रावरून प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. हा गोंधळ ज्या प्रकारे धुमसत ठेवण्यात आला आहे त्यावरून कोणी परकीय शक्ती तर जाणीवपूर्वक वातावरण अशांत राहण्यासाठी यामागे कार्यरत नसेल ? जनतेच्या समस्यांवर सत्ताधारी पक्षाकडून उत्तरे मिळवून देण्याची सुवर्णसंधी म्हणजे अधिवेशन होय. पण त्यातच खोडा घालण्यासाठी विरोधक ज्या प्रकारे उद्दामपणा करत आहेत तो सुज्ञ जनतेच्या लक्षात येत आहे. विरोध करण्यासाठी आवश्यक सूत्रे संपल्याने धर्मांतराच्या मुद्द्यावरून सुरू...
  December 23, 12:53 AM
 • आपला देश गणित विषयात जगात अग्रेसर आहे. गणिताची मूळ परंपरा आणि आधुनिक संकल्पनांचा जनक म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, माधवाचार्य, भास्कराचार्य, रामानुजन यांचा उल्लेख करावाच लागेल. २०१४ हे वर्ष थोर गणिती भास्कराचार्य द्वितीय यांचे ९०० वे जयंती वर्ष आहे. आज त्यांची जयंती. अंकगणित, बीजगणित, श्रेढीगणित, त्रिकोणमिती, खगोलशास्त्र, नक्षत्रविज्ञान यातील भास्कराचार्यांचे योगदान एकमेवाद्वितीय आणि सर्वमान्य आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ...
  December 22, 12:43 AM
 • काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळून मतदारांनी मोदी सरकारला भरभरून मतांनी निवडून दिले खरे. पण त्याच मोदी सरकारकडून आता मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी बुरे दिन येणे सुरू झाले आहे. १) २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेसाठी केंद्राने मुंबईलगत पालघर येथे सागरी सुरक्षा प्रशिक्षण केंद्र स्थापण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. पण केंद्रात भाजपचे सरकार येताच हजारो कोटींचा हा प्रकल्प द्वारका येथे हलवण्यात आला. २) पश्चिम रेल्वेचे मुंबईतील मुख्यालय अहमदाबादला...
  December 2, 02:00 AM
 • तरुण क्रिकेटपटू फिल ह्यूजचा मैदानावर मृत्यू होणे ही केवळ क्रिकेट जगतातीलच नव्हे, तर जगभरातील सर्वांनाच हादरवून सोडणारी घटना आहे. ज्या सीन अॅबॉटच्या चेंडूमुळे ह्यूजला जीवघेणी गंभीर दुखापत झाली, त्या सीनची उद्ध्वस्त मन:स्थिती शब्दांत सांगता येणे कठीण आहे. तो पुन्हा खेळेल की नाही ही शंकाच आहे. आजवर क्रिकेटच्या खेळांतून अशा प्रकारे घडलेल्या गंभीर दुखापती आणि मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन क्रिकेटवेड्या जनतेने आता शहाणे होणे गरजेचे आहे. क्रिकेटमधील स्पॉटफिक्सिंगसारख्या बेशिस्तपणामुळे...
  December 1, 12:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात