जाहिरात
जाहिरात
Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

 • जीवन विविध गोपनीय पैलूंनी बनलेले आहे. त्यात जितके खोलवर जाल, तितकेच त्याचे महत्त्व पटेल. जीवनाचे महत्त्व समजण्यासाठी फारच पराकाष्ठा करावी लागते. असे केले नाही तर आपण बेचैन होतो. त्यामुळे जीवनातील विविध पैलूंना व्यक्त होऊ द्या. त्यासाठी प्रयत्न करा. त्यातच सर्व सुखसमाधान आहे. ज्या वेळी आपण त्रस्त किंवा वैतागलेले असतो, तेव्हा एक प्रयोग करा. तो म्हणजे, तुम्ही पुरुष असाल तर आपल्यातील स्त्री तत्त्वाला जाणा आणि तुम्ही स्त्री असाल तर आपल्यातील पुरुष तत्त्वाला ओळखा आणि स्पर्श करा. ज्याप्रमाणे...
  September 5, 12:15 AM
 • लघुउद्योजक असल्याने मुंबईला जाण्याचा योग नेहमी येतो. असेच एकदा सर्व कामे आटोपून मी सायंकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचलो. मुंबईकरांसारखा सराईत नसल्यामुळे गर्दीत काही सुचत नव्हते. तरी उसने अवसान आणून ठाण्याकडे जाणा-या लोकलमध्ये चढलो. जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्याकडे दिवसभर खरेदी केलेल्या सामानाचे ओझे. कसे तरी आत शिरलो. थोड्या वेळानंतर टेकायला जागा मिळाली. सर्व स्टेशन्स पार करीत गाडी ठाण्यात थांबली. मी दोन स्टेशन आधीपासूनच सामानासहित दारात येऊन थांबलो. मात्र ठाण्यात...
  September 5, 12:14 AM
 • मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात सध्या विविध समस्यांनी जनता त्रस्त आहे. त्यात औरंगाबाद रेल्वेस्थानकही मागे नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरून चालणे कठीण झाले आहे. लहान मुले, वृद्ध महिला, पुरुष हे रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मची दुरवस्थेने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन जनतेच्या समस्यांवर तोडगा काढावा, इतकीच अपेक्षा.- शेख यकीन याकूब, अंधारी
  September 3, 12:31 AM
 • आकाशवाणी म्हणजे देववाणी. पूर्वीच्या कथा-कहाण्यांमध्ये आकाशवाणी झाली असे म्हटले जायचे. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी किंवा सावधानतेसाठी ते मार्गदर्शन असायचे. आजच्या संचार क्रांतीच्या युगात जिथे टीव्ही, कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाइल अशी आधुनिक साधने उपलब्ध आहेत, तिथे असाच विचार केला जातो की, रेडिओचे दिवस आता संपले आहेत. मात्र हा अपप्रचार फक्त शहरी भागात आहे. सकाळच्या वेळी गृहिणी मनोरंजनासाठी रेडिओच लावत असतात. बहुतेक जण एफएमच्या माध्यमातून माहिती, मनोरंजन, संगीत, क्रिकेट कॉमेंट्रीचा...
  September 3, 12:30 AM
 • स्वातंत्र्यानंतर दहा-पंधरा वर्षे सोडली तर देशभर घोटाळ्यांचा काळ सुरू झाला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र घोटाळेच उघड होऊ लागले. घोटाळ्यांचा देश म्हणून ख्याती झाली. स्वातंत्र्यानंतर काही काळ म्हणजे साधारणत: 1965 पर्यंत उमेदवारांची पात्रता व चारित्र्य बघूनच निवडणुकीसाठी पक्षांचे तिकीट मिळत असे. परंतु आता तसे होत नाही. आता गुंड प्रवृत्तीच्या लोकांनाच निवडणुकीचे तिकीट देण्यात येते. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी अशा प्रवृत्तींचा सर्रास वापर केला जातो आणि म्हणूनच आजचा नेता...
  September 3, 12:29 AM
 • आजकाल धावपळीच्या जगात धीम्या गतीने चालणा-यास नासमज, थकलेला आणि कमजोर समजले जाते. हा गतिशील काळ असून थोडीशीही दिरंगाई असफलतेचे कारण बनू शकते. तसेच अधिक धावणे आम्हाला कधी हिंसक बनवेल हेही समजत नाही. कारण की गतीने धावणारे नेहमीच यशाची अशा करतात. थोडे जरी अपयश आले की मनात हा विचार येतो की गती थोडी कमी होती. त्यामुळे तो पूर्ण ताकदीने धावतो आणि ताकदीने धावूनही यशस्वी न झाल्याने वाईट वाटणे साहजिक आहे. येथूनच माणसाच्या मनात हिंसक भावना निर्माण होते. एक-दुस-याला संपवण्याची स्पर्धा सुरू होते. त्या...
  September 3, 12:24 AM
 • गडकिल्ल्यांवर भ्रमंती करणे मला अधिक आवडते. आईवडिलांनी चार वर्षांचा असल्यापासून मला ट्रेकिंगला न्यायला सुरुवात केली. माझा पहिला ट्रेक होता प्रतापगडचा. मी चार वर्षांचा होतो. माझे आईबाबा दोघेही उत्तम ट्रेकर होते. आता इतक्या लहानपणी मी केलेल्या ट्रेकच्या आठवणी तशा पुसटच आहेत. मात्र त्या वेळी आईबाबांनी माझी किल्ल्यावर काढलेली छायाचित्रे मला त्या जमान्यात पुन्हा घेऊन जातात. लहानपणापासूनच किल्ल्यांवर भटकंती करण्याचा छंद जडला. जसजसे वय वाढत गेले तसा हा छंद अधिकच जोमाने बहरू लागला....
  September 3, 12:13 AM
 • वरुणराजा सध्या मनसोक्त बरसत आहे. त्यातच पोलिस शिपायांची भरती करण्याचा गृह मंत्रालयाचा विचार आहे. मात्र पावसामुळे पोलिस दलात भरती होऊ इच्छिणा-या उमेदवारांच्या मैदानावरील सरावात खंड पडत आहे.चिखलामुळे सराव शक्य होत नाही. त्यामुळे बयाच बेरोजगारांना पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न भंग पावते की काय, अशी भीती वाटत आहे. अनेक तरुण सकाळी धावण्याचा सराव भररस्त्यात करीत आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे पोलिस भरती पुढे ढकलावी.- अजित जोंधळे, औरंगाबाद
  September 2, 03:29 AM
 • भ्रष्टाचार कोण थांबवणार? भ्रष्टाचाराला कोण आळा घालणार? भ्रष्टाचार कसा होतो? भ्रष्टाचार कोण करतो? हे प्रश्न आज भारताच्याच नव्हे तर जगातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये डोकावत आहे. भ्रष्टाचार म्हणजे नेमके काय या खोलापर्यंत जाण्याचे सर्वसामान्य माणूस टाळतच आला आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम सर्वप्रथम गरजवंतांकडूनच होते. एखादे काम करण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करतो आणि त्याच कामासाठी आपण चिरीमिरी देतो. यामुळे अधिका-यांना भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमाई करण्याची व सर्वसामान्य...
  September 2, 03:23 AM
 • सामान्यांचे मरणही महागहा प्रेरणा मयेकर यांचा लेख वाचला आणि डॉक्टर तुम्हीसुद्धा असे आश्चर्योद्गार निघाले. भ्रष्टाचार हा हल्ली शिष्टाचार झालाय. अगदी आईच्या उदरात असल्यापासून ते मरणानंतरही आपला पाठलाग करतो. गर्भलिंग चाचणी, भ्रूणहत्या यापासून हे दुष्टचक्र सुरू होते. खरे तर धन्वंतरीची दवा आणि परमेश्वराची दुवा आजही आपण सारखीच मानतो.या व्यवसायाला काही लोकांनी बदनामीच्या उंबरठ्यावर आणून सोडले असे दुर्दैवाने म्हणावे लागते. एक तरी बरे की या व्यवसायात अजूनही चांगल्या लोकांची टक्केवारी...
  September 2, 03:21 AM
 • बुद्धीला वारंवार चालना द्यावी लागते. जे लोक हे करतात ते विद्वानांमध्ये गणले जातात. बाहेरची दुनियादारी जिंकण्यासाठी आणि संसाररूपी जीवन समजण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. बुद्धू आणि बुद्ध हे शब्द जवळपासच आहेत. बुद्ध होणे एक स्थिती आहे. ज्याला बोध झाला तो बुद्ध आहे आणि यात जो एकदा यशस्वी झाला त्याला बाहेरची दुनिया व्यर्थ वाटायला लागते. अशा नि:स्पृह लोकांना संसाराने बुद्ध म्हटले आहे. गणपती बुद्धीबरोबरच विवेकाचा देव आहे आणि हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. विवेक नसेल तर बुद्धी घातक होऊ शकते....
  September 2, 03:20 AM
 • शाळा शाळा खेळताना लहानपणीपासून प्रत्येक मुलीला शाळेतल्या बाई व्हावेसे वाटत असते. खरेच या शाळेतल्या बाई म्हणजे सर्वगुणसंपन्न, सर्व विषयांत पारंगत असे व्यक्तिमत्त्व. त्यांच्यासारखं आपणही व्हाव असं वाटणं साहजिकच. पुढे मी नोकरीला लागले. अगदी करिअर म्हणावे अशा टोकाला जाऊन पोहोचले माझ्या विषयात. मग एकदम मी थांबले. मुलगी झाली आणि वाटले आता आयुष्य आपले नाही राहिले - एकटीचे. आता सगळे जगणे हे तिच्यासाठी-नाही-तिच्यामुळे. आणि एक दिवस मला शिक्षिका होण्याची संधी चालून आली. तीही अगदी माझ्या मुलीच्या...
  September 2, 03:19 AM
 • ज्या ज्या युगात पापाचे प्रमाण वाढेल त्या वेळी दुष्टांच्या नाशासाठी मी पुन्हा पुन्हा अवतार घेईन, असे वचन भगवान श्रीकृष्णाने गीतेत दिले आहे. यानुसार द्वापारयुगात श्रीकृष्णाने अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण केले. या धर्तीवर कलियुगात भ्रष्टाचारी, अनाचारी व्यक्तींचे प्राबल्य जगात वाढले आहे. या अन्यायाच्या विरोधात जागृती निर्माण करण्यासाठी अण्णा हजारेंसारखी व्यक्ती पुढाकार घेत आहे. कृष्णवचन व अण्णांची भूमिका यापासून आदर्श घेऊन दुष्प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी जनतेच्या सहभागाची व...
  September 1, 02:36 AM
 • जीर्ण होत चाललेल्या पोथ्यांचे डिजिटलायजेशन करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान पटकावणारे पं. दिनेश वैद्य यांच्याबद्दल २० ऑगस्ट रोजीच्या दिव्य मराठीच्या अंकात वाचून या कार्याबद्दलची जाणीव झाली. हा दुर्मिळ ठेवा व त्यातील माहिती आता अधिक चांगल्या प्रकारे जतन होणार आहे, ही समाधानाची बाब आहे. याची दिव्य मराठीने घेतलेली दखल कौतुकास्पदच आहे.(सातपूर कॉलनी)
  September 1, 02:35 AM
 • कोणतेही कारण असो, कधीही रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवून विचार करा. यानंतरच विचारांची अंमलबजावणी करा. विचार ही विलक्षण शक्ती आहे. तुमचे चांगले करण्याचे प्रचंड सामर्थ्य या विचारांमध्येच दडलेले आहे. विचार बदला म्हणजे स्वभाव व व्यक्तिमत्त्व बदलेल. व्यक्तिमत्त्व बदलले की भविष्य बदलते. शुद्ध विचारांचा आदर जीवन घडवितो.(गंगापूर रोड)
  September 1, 02:33 AM
 • कोट्यवधींचा घोटाळा करणा-या महाभागांना यदाकदाचित कारावास घडलाच तर यातून सुटण्यासाठी हे नेते तब्येतीच्या तक्रारी उभ्या करतात, अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिवाचे रान करतात. अशा स्थितीत देशकल्याणाच्या विचारासाठी जामीन नाकारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे खरे नि:स्पृह व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या याच नि:स्वार्थी वृत्तीमुळे देशातील प्रत्येक स्तरातून मोठे पाठबळ उभे राहिले. एवढे पाठबळ पाठीशी राहिल्यानंतरही जनतेला शांततेचा मार्ग जपण्याचे आवाहन करणारा हा खरा गांधीवादी माणूस...
  September 1, 02:32 AM
 • विवाहाला एक आध्यात्मिक विचार असतो. दांपत्याला सामाजिक दृष्टीनेच बघू नये. पती-पत्नी होणे स्त्री-पुरुषांसाठी केवळ शारीरिक कृत्य नाही. या नात्यामध्ये जेवढी आध्यात्मिक गहनता असेल तेवढेच नाते आनंददायक होईल. आजच्या काळात सर्वाधिक मतभेद आणि आंतरिक तणाव या नात्यामध्येच पाहायला मिळतात. मनुष्य दांपत्याच्या सुख-दु:खाला उबगला आहे. ज्यांना दांपत्यामध्ये दु:खच दु:ख मिळाले आहे ते यातून बाहेर पडण्यासाठी आत्मघाती पाऊल उचलतात किंवा घर सोडून पळ काढतात. ज्यांना कौटुंबिक सुख अधिक मिळाले आहे, त्यांच्यात...
  September 1, 02:30 AM
 • २० जुलै २००५ हा दिवस माझ्यासाठी तसे म्हणाल तर न विसरता येण्याजोगाच. तेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये राहत होतो. लग्नानंतर काही वर्षांनी मातृत्वाची चाहूल लागली, पण त्याचा आनंद आम्हाला फार घेता आला नाही. २० जुलैला संध्याकाळपासून मला अस्वस्थ वाटत होते. जेवायची पण फारशी इच्छा नव्हती, पण अपरात्री भूक लागू नये म्हणून मी जेवायला बसले. जेवण फारसे गेलेच नाही. सगळे जण म्हणत होते की काळजी करू नकोस. पण मला कुठे माहीत होते की काळाने माझ्यापुढे काही वेगळेच वाढून ठेवले आहे. होत्याचे नव्हते झाले आणि...
  September 1, 02:28 AM
 • स्त्री भ्रूणहत्येबाबत ख-या अर्थाने महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होण्याची गरज आहे. महिलांच्या हट्टापायी आणि दुर्लक्षपणामुळे मुलींच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होत आहे. हे वास्तव असून ते नाकारून चालणार नाही. त्यामुळे महिलांची मानसिकता बदलणे, मुलींचा स्वीकार करणे आजच्या काळाची गरज आहे. वंशाच दिवा ही खुळी भावना समाजाच्या मनातून काढणे गरजेचे आहे. त्यातूनच स्त्री भ्रूणहत्येचा गंभीर प्रश्न सुटू शकेल.(डॉ. सुनीता जाधव, औरंगाबाद)
  August 31, 03:32 AM
 • शेतक-यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर त्यावर तोडगा म्हणजे सरकारच आहे. सरकारने मनात आणले तर आत्महत्या थांबू शकतील. शेतकरी आत्महत्या का करतो या बाबीचा विचार केला तर आपल्याला त्याची कारणमीमांसा करता येईल. शेती करणे म्हणजे इतर काही हाती नाही म्हणून त्यात पडणे, शेती हा धंदा आहे, पण शेतक-याजवळ पत नाही, भांडवल नाही. त्यामुळे मिळेल तेथून पैसे उभे करणे व धंद्यात अडकवणे. मात्र पिकणाया मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. तो अधिकार मात्र उत्पादकाचा आहे. तसेच शेतकयांना मदत म्हणून तयार केलेली सरकारी...
  August 31, 03:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात