जाहिरात
जाहिरात
Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

 • आज शासनातर्फे समाजातील अनेक घटकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजना ज्यांच्यासाठी राबवल्या जातात त्या त्यांच्या पदरात पडतात का, हा खरा ध्यानात घेण्यासारखा प्रश्न आहे. आज निराधार योजनांमधून मिळणाया लाभाची निराधार लोक वाट पाहत असतात. शेतकरी कर्ज आणि शेतीच्या योजनांची वाट पाहत असतात. भूमीहीन अल्पभूधारकाच्या लाभाची वाट पाहत असतात, तर बेघर असलेले घरकुलांच्या योजनेची वाट पाहत असतात. मात्र संबंधित अधिकारी आणि समाजातील काही पुढारीच योजनेतील लाभाचा मलिदा लाटण्यात मश्गुल असतात....
  August 31, 03:28 AM
 • ऋषि-मुनींनी ज्याला तप म्हटले आहे त्यालाच आज शिस्त म्हटले जाऊ शकते. शिस्तीमुळे व्यवस्था निर्माण होते. हनुमंत ही अशीच एक सुव्यवस्थित देवता आहे. सीतेच्या शोधात लंका धुंडाळणा-या हनुमंताला सीतामाई सापडली नाही. त्यांचा शोध सुरूच आहे. तेवढ्यात त्यांना बिभीषणाचे घर दिसते. तुलसीदासांनी सुंदरकांडात लिहिले आहे-भवन एक पुनि दीख सुहावाहरि मंदिर तहं भिन्न बनावामग सुंदर महाल दिसला. त्यामध्ये देवाचे मंदिर बांधले होते. इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. बिभीषण लंकेत राहत असूनही त्याच्या घरात चार...
  August 31, 03:27 AM
 • व्यवसायाने मी ओबेसिटी कन्सल्टंट असल्यामुळे वेगळ्या विचारसरणीची खूप माणसे भेटतात. त्यातल्याच माझ्या एक स्टुडंट मिसेस फर्नांडिस. त्यांचे वजन १०० किलो इतके होते. त्यांचा नवरा नौदलामध्ये असल्याने त्याची प्रकृती अतिशय उत्तम, व्यायामाने कमावलेले शरीर यामुळे तो एकदम फिट होता. त्यांना दोन मोठी मुले होती. फर्नांडिस बार्इंच्या गलेलठ्ठपणामुळे त्यांच्या प्रकृतीच्या छोट्यामोठ्या कुरबुरी सतत सुरू असायच्या. त्यामुळे त्यांचा स्वभाव खूपच चिडचिडा बनलेला होता. त्यामुळे त्या स्वत:वर व दुसयावर...
  August 31, 03:25 AM
 • जंगलाचा आकार होतोय कमी! हा 4 ऑगस्टच्या अंकातील लेख वाचून आश्चर्य वाटले. महाराष्ट्र सरकार याबाबतीत इतके उदासीन का? पाणी, जंगले आणि जमीन या तीन गोष्टी पर्यावरणाचे अविभाज्य अंग आहेत. याबाबत आज जनजागृती राहिली नाही तर येणा-या काळात पर्यावरणाचा समतोल ढासळेल आणि नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे जंगलांबाबत शासनाने, जनतेने नेहमीच सतर्क राहण्याची गरज आहे.
  August 30, 12:36 AM
 • आज सर्वसामान्य माणूस भ्रष्टाचाराने त्रस्त आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचारच भ्रष्टाचार हे वास्तव आहे. हे वास्तव ध्यानात घेऊनच अण्णा टीमने जनलोकपाल बिल मंजूर करण्यासाठी दिल्लीत आंदोलन केले. अण्णा म्हणतात की अर्धी लढाई जिंकली. शासनाने अण्णा टीमचे लोकपाल विधेयक पारित केले तर शंभर टक्के भ्रष्टाचार मिटणार नाही, मात्र साठ टक्के भ्रष्टाचार नक्कीच कमी होऊ शकतो. जनलोकपाल कायद्याची भीती निर्माण होईल. त्यामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल होईल. भ्रष्टाचार करणायांना दहा वेळा विचार करावा लागेल....
  August 30, 12:34 AM
 • महाराष्ट्राच्या विधानसभेत चर्चेविनाच खासगी विद्यापीठ विधेयक मंजूर झाले. चर्चा न होणे हा लोकशाहीचा घात आहे. महाराष्ट्रातल्या नफेखोर शिक्षण माफियांच्या नफ्याचे सर्व मार्ग मोकळे करणारा हा कायदा केल्याने सत्ताधारी मोठ्या प्रमाणावर असलेल्या संस्थाचालकांना दिलासा मिळाला आहे. उच्च शिक्षणात धंदा करून जनतेला लुटण्यास कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. येऊ घातलेल्या खासगी विद्यापीठांवर एकूण व्यवहाराबाबत कुठलेही नियंत्रण नाही. यूजीसीच्या बंधनातून ती मुक्त आहेत. शुल्काबाबत शालेय शुल्क...
  August 30, 12:33 AM
 • आपल्यामध्ये काही दैवी शक्ती विराजमान असतात. बाहेर पैसा, पद, प्रतिष्ठा आणि समूहाचे बळ उपयोगी पडत असले तरी आत मात्र एकच बल कामी येते ते म्हणजे मनोबल! मनोबल समजून घ्यावे लागते. आपली मनोबलाबद्दलची समज जेवढी लख्ख होईल तेवढेच आपले यश भ्रष्टाचार व कलंकमुक्त असेल. सध्या आपल्या देशात असेच एक तुफान पाहिले आहे. प्रामाणिक लोकांनी त्यांचे मनोबल वाढण्यासाठी सतत प्रयत्न करायला पाहिजेत. भ्रष्ट व गुन्हेगारच प्रामाणिक लोकांपेक्षा जास्त साहसी व निर्ढावलेले असतात. हे लोक नेहमीच त्यांच्या धाडसाचा गैरवापर...
  August 30, 12:31 AM
 • मी नेरूळच्या लॉ कॉलेजात अॅडमिशन घेतल्यापासून ठाण्यावरून सिडको येथून अनिश्चित वेळी कधी एस. टी., तर कधी एन. एम. एम. टी. पकडायचे. लॉच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेला जाताना एकदा २६ नंबरची एन. एम. एम. टी. पकडली. नेरूळपर्यंतचे तिकीट १४ रुपये होत असे, पण सुटे पैसे माझ्याकडे व कंडक्टरकडेही नसल्याने त्याने ते नंतर देतो या तत्त्वावर स्वत:कडे ५० रुपये ठेवून घेतले. मीही गडबडीत ठीक आहे म्हणून बसायला जागा मिळाल्याबरोबर पुस्तक उघडून वाचत बसले. माझा स्टॉप आल्यावर मी उतरून कॉलेजला पोहोचले आणि लक्षात आले की, त्या...
  August 30, 12:30 AM
 • आजची मुले व मुली उद्याच्या या महान व विशाल देशाचे खरे आधारस्तंभ राहणार आहेत. त्यांचे भवितव्य उज्ज्वल, मंगल, निकोप, निरोगी व कर्तव्यदक्षपणाचे असावे. यासाठी शाळा, समाज, कुटुंब यांच्याकडून सर्वंकष विधायक व रचनात्मक संस्कार व्हायला हवेत. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांचा सिंहाचा वाटा असतो. यासाठी पालकांनी मुला-मुलींची बौद्धिक क्षमता ओळखून त्यांना घडवण्याचा प्रयत्न करायला हवा.(वैजापूर)
  August 29, 03:56 AM
 • या देशात एखाद्या व्यक्तीला हक्क मागायचा असेल किंवा एखादे काम करायचे असेल तर सर्वप्रथम सरकारी टेबलावर वजन ठेवण्याची जरुरी असते, ही वस्तुस्थिती आहे. या हक्कासाठी जर ती व्यक्ती उपोषणाला बसते तर त्याला ब्लॅकमेलिंग अशी संज्ञा दिली जाते. त्यामुळे पुस्तकात वाचलेली आझादी व परिवर्तनाची गोष्ट जेव्हा आजचा युवा वर्ग अनुभवायला लागला, तेव्हा भ्रष्टाचारा विरुद्ध आंदोलनात तो सहभागी होत चालला. त्याला मास हिस्टेरिया असे म्हणतात. सध्या निवडणूक प्रक्रियेत बदल हवा यासाठी या जनलोकपालमध्ये मागणी...
  August 29, 03:55 AM
 • जनगणमन... या राष्ट्रगीतामधील सिंध हा शब्द काढून तेथे सिंधू हा शब्द टाकावा, या मागणीसाठी प्रा. श्रीकांत मळुष्टे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचे वृत्त 14 ऑगस्ट रोजी दिव्य मराठीच्या अंकात वाचण्यात आले आणि ती याचिका उचलून धरीत केंदशासनाने तसे प्रतिज्ञापत्र तीन आठवड्यांच्या आत सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिल्याचे वृत्तही लगेच 18 ऑगस्टच्या दिव्य मराठीच्या अंकात वाचले. सिंध प्रांत आता भारतात राहिला नसून पाकिस्तानात गेला असला तरी प्रस्तुत राष्ट्रगीतामधील...
  August 29, 03:53 AM
 • खरे आणि खोटे आपण आपल्या सोयी-गैरसोयीनुसार स्वीकारलेले असते. तत्त्वज्ञांचे म्हणणे आहे की लोकांच्या आयुष्यात खोटे वंगणाची भूमिका निभावते. खोटेपणा त्यांच्या जीवनात लवचीकता आणतो आणि एक दिवस ते खोटेपणाच्या एवढे कह्यात जातात की खरे काय याचे विस्मरणच होऊन जाते. फक्त बोलताना खोटी माहिती देणे एवढाच खोटेपणा मर्यादित नाही.स्वामी अवधेशगिरीजी यांनी अहिंसेचे सत्य खूप उत्तम प्रकारे शब्दबद्ध केले आहे. लोकांनी बहुतांश वेळा अहिंसेतील खोटेपणा पकडल्याने तिचा अर्थ बदलला आणि आपण अहिंसेचा योग्य लाभ...
  August 29, 03:51 AM
 • लहान मुले म्हणजे मूर्तिमंत निरागसता. त्यांची ही निरागसता कधी-कधी आपल्याला निखळ हास्याचा अनुभव मिळवून देते, त्याचीच ही छोटीशी आठवण. माझा मुलगा अथर्व त्या वेळेस चारएक वर्षांचा असावा. आमच्या घरी मी, माझे यजमान, अथर्व आणि माझी नणंद असे राहायचो. एकदा मी आणि माझे यजमान माझ्या नणंदेशी तिच्या लग्नाविषयी चर्चा करत होतो, की तिच्या अपेक्षा काय आहेत इ. तेवढ्यात तिथे अथर्व आला आणि तुम्ही काय बोलताय असे विचारू लागला. माझे यजमानही त्याला समजावू लागले, की हे बघ, आपली स्वप्ना आत्या आहे ना, तिचे आता लग्न...
  August 29, 03:50 AM
 • आईचा सांभाळ न करणा-या मुलाने आईला पोटगी द्यावी, असा निर्णय लोहारा (जि. उस्मानाबाद) येथील न्यायालयाने नुकताच दिला आहे. या निर्णयामुळे त्या मातेच्या मातृत्वाला न्याय मिळाला, असे म्हणता येईल काय? अर्थातच याचे उत्तर नाही, असे असणार आहे. वस्तुत: जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठीही कायदा करावा लागतो, यावरूनच आपल्या समाजाची मानसिकता कशी आहे, हे दिसून आले असून, भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीची एकेक शिखरे पार करणा-या समाजासाठी ही बाब खचितच भूषणावह नाही. देश-धर्म आणि जात कोणतीही असो, मानवी...
  August 27, 11:26 PM
 • सम्राट जहांगीर त्याच्या न्यायनिष्ठूरतेसाठी प्रसिद्ध होता. कुणावरही अन्याय झाला असेल तर तो थेट बादशहाकडे जाऊ शकत असे. एकदा सम्राट जहांगीर विरंगुळ्याच्या क्षणी मद्यपान करीत होते. त्यांचा मंत्रिसमूहदेखील सोबत होता. सम्राटाचे सेवेकरी त्यांच्या ग्लासात मद्य ओतत होते. मद्य ग्लासात ओतताना अचानक एका सेवकाकडून एक थेंब बादशहाच्या अंगावर उडाला. ते पाहून सम्राट जहांगीर फार चिडला. त्याने कसलाही विचार न करता त्या सेवकाचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. त्या सेवकाने शिरच्छेदाचा आदेश ऐकताच पूर्ण...
  August 27, 12:32 AM
 • किंग एडवर्ड (तिसरा) ची सेना व किंग फिलीप (सहावा) च्या सेनेदरम्यान क्रेसी येथे झालेले हंड्रेड इयर्स वॉर (१३३७-१४५३) निर्णायक युद्ध होते. या युद्धात फ्रेंच सैन्याला फार नुकसान सोसावे लागले. हे युद्ध ऑगस्ट १३४६ मध्ये दक्षिण फ्रान्सच्या क्रेसीजवळ लढण्यात आले. एडवर्डच्या नेतृत्वाखाली निघालेल्या इंग्रजी सैन्याने त्या वेळी के्रसीमध्ये तळ ठोकला होता. सैन्याला तिथेच रोखून धरण्यासाठी किंग फिलीप 8000 घोडेस्वार आणि 4000 धनुर्धारी सैनिक असलेले एक विशाल सैन्य घेऊन क्रेसीत येऊन दाखल झाला. फ्रान्सच्या...
  August 27, 12:29 AM
 • अनेक वेळा सर्व काही अनुकूल असते, जीवनात सगळे ठीकठाक चाललेले असते; पण तरीही आपण आनंदी नसतो. काही लोकांना त्यांच्या उदासपणाचे कारण विचारले तर ते सांगू शकणार नाहीत. आपण खुश नाही एवढेच त्यांना माहीत असते. भारतीय संस्कृतीत एक शब्द आहे सौजन्य. हा शब्द ज्या लोकांना जगत येईल ते आनंदी असतील आणि इतरांनाही खुश ठेवतील. आनंदी राहण्यासाठी स्वत:ला प्रवाहित करावे लागते. जशी आई तिच्या अपत्यामध्ये वाहत असते आणि त्याचा आनंद अनुभवते. या प्रवाहात वाहण्यासाठी आईची ममता काम करीत असते. त्यामुळे आपल्या अंतरात...
  August 27, 12:29 AM
 • आम्ही बंगळुरूला एकमजली घरात पहिल्या मजल्यावर राहायचो. घराबाहेर मस्त मोठी गच्ची होती. एक दिवस आम्ही संध्याकाळी ७-७.३० च्या सुमारास ऑफिसमधून परत आलो. मी गच्चीत कपडे वाळत घातले होते, ते नव-याला आणायला सांगितले आणि सामान घेऊन आत गेले. पर्स खाली ठेवून हातपाय धुवायला जाणार तेवढ्यात नवरा कोणाला तरी ओरडतोय असं वाटलं म्हणून बाहेर गेले तर काय - अगं, एक बाई उभी आहे गच्चीत, मी कपडे काढायला गेलो तर दिसली एकदम. नव-याचे बोलणे ऐकून माझी तर भीतीने गाळणच उडाली. एव्हाना समोरचे गुजराती कुटुंब त्यांच्या गच्चीत...
  August 27, 12:28 AM
 • भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद हे अत्यंत बुद्धिमान, शांत व धाडसी माणूस होते. ते अनावश्यक राग व उत्तेजना टाळत. त्यांच्या हाताखाली काम करणा-या लोकांकडून चूक झाली तरी ते त्यांना प्रेमाने समजावून सांगत. एकदा डॉ. राजेंद्रप्रसाद पाटण्याहून त्यांच्या गावाला जात होते. त्यांच्या गावी जाण्यासाठी तेव्हा बस किंवा रेल्वेसारखी साधने नव्हती. त्यामुळे नाव किंवा आगबोटीत बसून जावे लागत असे. डॉ. प्रसाददेखील सहज एका आगबोटीत जाऊन बसले. बोट सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात एक तरुण उठला व त्याने...
  August 26, 12:36 AM
 • एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात युनायटेड किंगडम ऑफ नेदरलॅण्ड्सच्या दक्षिण प्रांतात उफाळून आलेली बेल्जियन क्रांती हे एक तीव्र जनआंदोलन होते. त्याची परिणती विभक्त बेल्जियमच्या निर्मितीत झाली. त्या वेळी दक्षिण प्रांतातील लोक बेरोजगारीशी लढत होते व नेदरलॅण्डचा राजा पहिला विल्यमच्या निरंकुश शासनामुळेही ते त्रस्त होते. 25 ऑगस्ट 1830 रोजी ब्रुसेल्सच्या एका ऑपेरा हाऊसमध्ये नेपल्समधील स्पॅनिशविरोधी क्रांतीविषयी असणा-या ला मुए डी पोर्टिसी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या नाटकामुळे...
  August 26, 12:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात