जाहिरात
जाहिरात
Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

 • आपण आपल्या शरीराचा उपयोग करताना आज्ञा देण्याच्या पवित्र्यात असतो. आपण आज्ञा देतो आणि शरीराचे अवयव काम करतात. यावर आपले नियंत्रण राहत नसेल तर आजाराचा प्रवेश झाला असे मानले जाते. पण मनाच्या बाबतीत अगदी उलट आहे. मन सर्व गोष्टींचा मालक बनते आणि इथूनच गडबड सुरू होते. जगात होणा-या गोष्टींबद्दल मनाच्या म्हणण्यानुसार आपण त्याचा अधिकार मानू लागतो तेव्हा तणाव निर्माण होतो. जैन मुनी तरुणसागरजी म्हणतात, तुम्ही नदीत स्नान करता तेव्हा शेकडो टन पाणी तुमच्या डोक्यावरून वाहते, पण त्याचे वजन जाणवत नाही....
  August 26, 12:33 AM
 • द्विपात्री विनोदी संवादाचे दूरदर्शनवर होणारे कार्यक्रम पाहून आपणही असे काही लिखाण करावे असे मला प्रकर्षाने वाटू लागले. ही कल्पना मी प्रथम घरी मांडली असता सर्वांनी माझ्याकडे जरा चमत्कारिक नजरेने पाहिले. विनोदी असे काही लिहिण्याची माझीही पहिलीच वेळ होती. लोकांना रडवण्यापेक्षा त्यांच्या चेह-यावर स्मित आणणे अवघड असते, असे म्हणतात. मी ते आव्हान स्वीकारले. मग मात्र मी समाजात डोळे उघडे ठेवून वावरायला सुरुवात केली. अर्थात मला बरेच विचित्र अनुभवदेखील आले. एकदा बगीचात फिरायला गेले असताना,...
  August 26, 12:33 AM
 • जीवन व मृत्यूचा योग्य अर्थ आपल्याला आकळला तर अनेक व्यर्थ कामे आपण करणे सोडू. आपले बहुतांश जीवन आपल्याला कोणत्याही प्रकारे कामी न पडणारी कामे करण्यात जाते. एक जुना प्रसंग स्वामी सत्यमित्रानंद नवीन प्रकारे समजावून सांगतात. एकदा असे घडले : महर्षी वेदव्यास त्यांचा पावन ग्रंथ लिहीत आहेत. दिवा जळतो आहे. दिव्यावर पतंग आला. व्यासांनी ते पाहिले आणि त्यांनी एक अद्भुत गोष्ट लिहिली की दिव्यावर पतंग आला, तो खाण्यासाठी बेडूक त्याच्यामागे पळाला, बेडूक पकडण्यासाठी साप पळाला आणि साप पकडण्यासाठी मोर...
  August 25, 06:35 AM
 • नेहमीप्रमाणे ऑफिसमधील कामे संध्याकाळी बरोबर ६ वाजता आटोपून मी विरार लोकल पकडण्यासाठी धाव घेतली. लक्ष्य होते संध्याकाळी ६.३६ ची विरार फास्ट लोकल! सारे अडथळे पार करत मी चर्चगेट स्थानकावर बरोबर ६.२४ ला हजर झाले. गाडी स्थानकावर यायला अजून ४ मिनिटांचा अवकाश होता. साहजिकच पोटपूजेसाठी काहीही कुरकुरीत घ्यायला बराच वेळ हाताशी होता. साधारण ५ रुपयांपासून ते अगदी १०० रुपयांपर्यंत बयाच प्रकारचे खाद्यपदार्थ चर्चगेट स्थानकावर मिळतात. मीदेखील माझ्या मूडला जपत खाण्याचे पार्सल घेतले आणि धावत्या...
  August 25, 06:34 AM
 • भ्रष्टाचार, वाढती महागाई, दहशतवाद, परप्रांतीयांचे लोंढे, शेतक-यांच्या आत्महत्या, गरिबांच्या जमिनींवर बिल्डरांचे अतिक्रमण हे पाहता आपला देश आजही पारतंत्र्यातच आहे असे वाटते. मात्र अण्णा हजारेंच्या रूपाने देशाला नि:स्वार्थी नेतृत्व लाभले आहे. भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी लोकपाल विधेयकावर अण्णा हजारे ठाम आहेत.त्यासाठी ते अहिंसेच्या मागाने लढत आहेत. शेवटी एकच अण्णा हजारे आणि त्यांना पाठिंबा देणारे कोट्यवधी लोक भ्रष्टाचार नष्ट करण्यास स्वेच्छेने तयार झाले हेही नसे थोडके!(सिल्लोड)
  August 25, 06:32 AM
 • संस्कृतीची जपणूक करणारा व एकता, बंधुत्वाचे दर्शन घडवणारा गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. त्यासाठी विविध गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे. परंतु हल्ली गणेशोत्सवासाठी काही गणेश मंडळांतील कार्यकर्ते रस्त्यावरून येणा-या-जाणा-या लोकांकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा करीत आहेत. शेवटी प्रत्येकाला आपापल्या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने काही ना काही दान करावे वाटत असते आणि तो स्वखुशीने करीत असतो. त्यामुळे जो कुणी स्वखुशीने जेवढी रक्कम दान किंवा वर्गणीच्या रूपाने देत असेल तितकीच घ्यावी. . गणेश...
  August 25, 06:30 AM
 • खासगी विद्यापीठांचे स्वागत करताना हा प्रसाद केरकर यांचा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारा लेख वाचला. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. तो प्रत्येकाला मिळायलाच हवा, यात दुमत असण्याचे कारण नाही. पण हल्ली याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. कॅपिटेशन फीस, डोनेशनचे आकडे पाहता शिक्षण ही काही लक्ष्मीपुत्रांची मक्तेदारी होऊ घातलीय असे वाटते. त्यामुळे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे वेगळ्या अर्थाने वाटायला लागते. सध्याच्या शैक्षणिक पद्धतीत असलेले दोष टाळून...
  August 25, 06:28 AM
 • यास नाझी-सोविएत समझोता व जर्मन-सोविएत समझोता ही म्हणतात. 23 ऑगस्ट 1939रोजी मॉस्कोत झालेल्या कराराच्या मसुद्यावर रशियन परराष्ट्रमंत्री व्याचस्लावमोलोतो व जर्मन परराष्टमंत्री जोयचिम वॉन रिबेनट्रॉस यांनी स्वाक्ष-या केल्या होत्या. तसे याला व्याचस्लावमोलोतो-रिबेनट्रॉस करारही म्हटले जाते. करारामध्ये जर्मनी व सोविएत रशिया हे एकमेकांवर आक्रमण करणार नाहीत, असा एक सिक्रेट प्रोटोकॉलही होता. त्यात फिनलँड, एसटोनिया, लातविया, लिथुआनिया, रोमालिया आणि पोलंडसारखे पूर्व युरोपातील देश कब्जा करून...
  August 23, 11:46 PM
 • नेपोलियनचे शौर्य आणि बुद्धिमत्ता सर्वांनाच ज्ञात आहे. त्याचे सैन्य या गुणांमुळेच त्याचा आदर करत होते आणि त्याच्याशी निष्ठावानही होते. नेपोलियन त्यांच्याशी मित्रत्वाने व्यवहार करीत होता आणि युद्धकलेतील त्यांचा उत्साह वाढवत होता. एक दिवस तो गाढ झोपलेला होता. अचानक त्याच्या सेनापतीने त्याला जागे केले. नेपोलियनला असे वाटले की काहीतरी गंभीर बाब असावी. त्याने विचारल्यानंतर सेनापतीने दक्षिणेकडील शत्रूने अचानक हल्ला केल्याची खबर दिली. हे ऐकून नेपोलियन उठला आणि भितींवर टांगलेला 34...
  August 23, 11:44 PM
 • असे म्हणतात की सत्य बाहेर येत नाही. ते उघड होण्यासाठी शांततेची गरज असते. परंतु संसाराचे सत्य समजावण्यासाठी महात्मा व्यक्तींनी स्वत:ला अलिप्त ठेवले. काही संतांनी तर जागे व्हा असे ओरडून सांगितले. जीवनात जो निद्रिस्त राहिला तो राक्षसी वृत्तीचा समजावा आणि जो जागला तो उंची गाठण्याची शक्यता असते. चला हा प्रसंग सुंदरकांडाद्वारे समजावून घेऊ. हनुमानाचा लंकेत प्रवेश झाला आहे. तो सीतेचा शोध घेत आहे. तुलसीदास म्हणतात, मंदिर मंदिर प्रति करि सोधा, देखे जह जह अगणित जोधा. त्याने सीतेचा प्रत्येक महालात...
  August 23, 11:42 PM
 • नुकताच आपण स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. आता 15 ऑगस्ट म्हटले की मला आठवते ते मागच्या वर्षीचे एक खास झेंडावंदन! मला लिहिण्याची देणगी मिळाली आणि त्यामुळे जगणे खरोखरीच समृद्ध झाले. त्याचाच एक आविष्कार म्हणजे गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी घडलेला हा प्रसंग. बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड हे चेंबूर येथील सुभाषनगर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी. त्यांनी मला मुक्तानंद हायस्कूलमध्ये झेंडावंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाल काय, असे विचारले. ते ऐकताच मी हरखून गेले. आजवर...
  August 23, 11:41 PM
 • दगडातून मूर्ती, हि-याला पैलू, सोन्याचे कोंदण, पाण्याचा मोती बनविण्याची किमया ज्या संस्कारांतून होते त्यालाच शिक्षण म्हणतात आणि शाळा म्हणजे चार भिंतींचे बंदिस्त जग नाही, तर या भिंतींच्या आत विद्यार्थ्यांचे भविष्य घडत असते आणि हे घडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हे शिक्षकांच्या हातात असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे तसेच त्यांच्यामध्ये नीतिमूल्यांची रुजवण करणे यासाठी आमच्या पंढरपूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश दाणे सरांनी एक...
  August 23, 10:11 AM
 • पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमधील शाही घराण्याच्या हाऊस ऑफ लेकास्टर व हाऊस ऑफ यॉर्क या दोन पक्षांमध्ये राजमुकुटासाठी संघर्ष झाला होता. हाऊस ऑफ लेकास्टरचे प्रतिनिधी चिन्ह लाल गुलाब होते, तर पांढरा गुलाब हाऊस ऑफ यॉर्कचे प्रतिनिधी चिन्ह होते. या दोन्ही शाखांमध्ये लढलेली ही लढाई वॉर ऑफ रोझेस नावाने ओळखली जाते. बेसबर्थची लढाई याच युद्धातील शेवटची लढाई होती. 22 ऑगस्ट 1485 ची लढाई लिसेस्टरशायर बोसवर्थ नावाच्या एका छोट्या खेड्यात झाली. या लढाईत लेकास्टर पक्ष विजयी झाला. युद्धात अर्ल ऑफ...
  August 22, 11:54 PM
 • एकदा मार्सेल्स शहरामध्ये प्लेगची साथ आली होती. शहरातील प्रत्येक घर या रोगाच्या तावडीत सापडले होते. या रोगावर कोणताच प्रभावशाली उपाय नव्हता. याचे निदान कसे करावे हे काहीच कळत नव्हते. एक दिवस सर्व प्रमुख तज्ज्ञांनी बैठक घेऊन विचारविनिमय केला. एका वरिष्ठ तज्ज्ञाने म्हटले की, जोवर आपल्यातला कोणी प्लेगने मृत्यू पावलेल्याच्या मृतदेहाची चिरफाड करीत नाही तोवर या रोगाचे कारण समजणे कठीण आहे. यात जो तपासण्याचे काम करील तो जीवनास मुकेल. हे ऐकून सर्वच तज्ज्ञ शांत झाले. अचानक हेन्नी गायन नावाचा एक...
  August 22, 11:54 PM
 • योगमाया यशोदेच्या घरी जन्मास येईल. मध्यरात्रीस वसुदेव कृष्णाला गोकुळात ठेवेल आणि मायाला मथुरेला आणले जाईल. कंस तिचा वध करेल. या छोट्याशा घटनेत मोठा संदेश आहे. केवळ जन्मास येऊन जिंदगी पूर्ण होत नाही. ही तर एक घटना आहे. जन्म घेतल्यानंतर ख-या जीवनाला सुरुवात होते. परंतु ज्याला जीवन म्हणतात त्याचा अधिकार माणसाजवळ आहे. जन्माला जीवनात बदलण्यासाठी श्रीकृष्ण चरित्रामध्ये जन्मअष्टमीच्या दिवशी चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. मध्यरात्रीला उत्सव करण्याचा अर्थ आहे की, जीवनातील अंधकार दूर करणे....
  August 22, 11:49 PM
 • स्टेशनच्या बाहेर पडलो. मी स्वत:ला दोष देत होतो...मी उगाच इतका तीव्र विचार केला. तो इतका तीव्र होता की ती मृत्यूकडे खेचली गेली. त्या दिवसापासून मी स्वत:ची मनामधली नखे नेहमीच बोथट ठेवतो. जिव्हारी लागते, पण मला त्या क्षणी ती भिकारीण आठवते.लहानपणी शाळेत एक धडा होता. नाव होते नाखून क्यूं बढते हैं? नख हे माणसाच्या हिंस्र स्वभावाचे प्रतीक आहे हे त्यात सांगितले होते, ते खरे. माणूस वरून कितीही सज्जन वाटला तरी मनाच्या कोप-यात कुठेतरी नखे असतात. ती वेळ बघून बाहेर पडतात. कधी मनातून, तर कधी प्रत्यक्षात. त्या...
  August 22, 11:48 PM
 • नाशिकमध्ये मी काही कामासाठी गेलो असताना एका आजोबांशी भेट झाली. माझे त्यांच्याकडचे काम संपल्यानंतर आमच्या शिळोप्याच्या गप्पा सुरू झाल्या. या आजोबांनी आपला जन्म कुठला, त्यांचे करिअर याच्याविषयी गप्पांच्या ओघात मला माहिती दिली. माझा जन्म कराचीचा असे गप्पांच्या ओघात ते सहज बोलून गेले. मी त्यांना विचारले, तुमचा जन्म किती सालचा? त्यावर ते म्हणाले, १९३१ सालचा. फाळणीपूर्वी पाकिस्तान हा भारताचाच भाग होता. त्या कालखंडात वावरलेली एक असामी माझ्यासमोर आहे म्हटल्यावर मी उत्सुकतेने त्यांना...
  August 21, 10:42 PM
 • एकदा प्रवासाला निघालेले महात्मा गांधी हैदराबाद स्टेशनवरून जाणार होते. ही बातमी कळताच स्टेशनवर गर्दी उसळली. सर्वांना गांधीजींना पाहण्याची आणि त्यांच्यासमोर त्यांच्या अडचणी मांडण्याची इच्छा होती. गाडी फलाटाला लागताच गर्दी गांधींच्या डब्याच्या दिशेने पळाली. ते पाहून गांधीजी स्वत:च डब्याच्या दरवाजात आले आणि त्यांनी लोकांचे अभिवादन स्वीकारले. नंतर गांधींनी लोकांना शांत करून त्यांच्या अडचणी मांडायला सांगितल्या. सगळ्यांनी मांडलेल्या अडचणीत दोनच गोष्टी सारख्या होत्या त्या म्हणजे...
  August 21, 10:30 PM
 • एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळी साम्राज्यादरम्यान एक महत्त्वाचा करार झाला. तो सुगौली करार नावाने ओळखला जातो. 4 मार्च १८१६ रोजी झालेल्या या करारावर नेपाळच्या वतीने राजगुरू गजराज मिश्रा आणि इंग्रज लेफ्टनंट कर्नल पॅरिश ब्रॅडशॉने स्वाक्ष-या केल्या. या करारामुळेच इंग्रज व नेपाळ्यांमध्ये सन १८१४ पासून सुरू असलेल्या लढाईचा अंत झाला. या करारामुळे नेपाळला त्याचा एकतृतीयांश भाग इंग्रजशासित भारताकडे द्यावा लागला त्यात पूर्व टोकावरील दार्जीलिंग...
  August 21, 10:28 PM
 • आपला व्यवहार हाच जगाचा व्यवहार आहे. जग जसे करते, जसे करू इच्छिते तसे आपण करू लागतो. याबाबतीत जे लोक व्यवहारकुशल असतात ते जगात फार यशस्वी होतात. याच प्रकारे आपला स्वभाव हा परमात्म्याचा स्वभाव आहे. ही गोष्ट आपल्या ध्यानात येईल तसे आपण दुस-यांबद्दल विनम्र आणि मायाळू बनू. हा खूप खोलवरचा विचार आहे. आपण आपला स्वभाव परमात्म्याच्या पायी विसर्जित केला तर आपल्याला हाच अनुभव येऊ लागतो. माणूस स्वत:ला जो मानत असतो तोच तो बनतो. आपण विराटाशी नाते जोडले तर आपणही विराट होऊन जाते. आस्तिक नेहमीच यामुळे धुंदीत...
  August 21, 10:28 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात