जाहिरात
जाहिरात
Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

 • युरोपीय समाजात मे दिनासारख्या विशेषप्रसंगी सुंदर महिला आणि पुरुषांतून प्रतीकात्मक राजा-राणी निवडण्याची प्रथा होती, पण अमेरिकेत आधुनिक सौंदर्य स्पर्धांची सुरुवात एकोणिसाव्या शतकात झाली. या काळापर्यंत सार्वजनिक व्यासपीठावर महिलांचे प्रदर्शन सर्वसामान्य मानले जाऊ लागले होते. १८५४ मध्ये अमेरिकन शोमन पी. टी. बार्नम याने पहिल्यांदाच सौंदर्य स्पर्धा आयोजित केली, पण जनतेच्या विरोधामुळे ती स्पर्धा रद्द झाली. यानंतर १८८० मध्ये अमेरिकेच्या डेलावेअरमध्ये रेहोबोथ समुद्रकिनायावर...
  August 20, 01:14 AM
 • ही इंडोनेशियातील घटना आहे. शाळा नुकत्याच उघडल्या होता. शाळा सुरू झाल्यानंतर एक विद्यार्थी खूप उदास होऊन घरी परतला. त्याने वडिलांना म्हटले, बाबा, मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. वडिलांनी विचारले, अरे पण झाले काय ते तर सांगशील. मुलगा म्हणाला, शाळेत सगळी मुले माझी थट्टा करतात. वडिलांनी ते हसण्यावारी नेले आणि मुलाला सांगितले, यात काय नवीन आहे? ती मुले नंतर तुझे दोस्त बनतील. पण मुलाने पुस्तके आदळली. म्हणाला, काहीही झाले तरी मी शाळेत जाणार नाही म्हणजे नाही! वडिलांनी समजावून सांगितले तरी...
  August 20, 01:11 AM
 • सहस्रद्वीप सेतू सेंट लॉरेन्स नदीवरील एक आंतरराष्ट्रीय सेतू तंत्र असून अमेरिकेच्या उत्तर न्यूयॉर्कला तो कॅनडातील आँटारियोच्या दक्षिणपूर्व टोकाशी जोडतो. हा एक पूल नव्हे तर अमेरिका आणि कॅनडादरम्यानच्या थाउजंड आयलंड क्षेत्रात (यात लहानमोठी 1800 बेटे आहेत) पाच सेतूंची शृंखला आहे. या बेटांच्या संख्येमुळेच या भागाला थाउजंड आयलंड म्हटले जाते. या सेतूची रचना न्यूयॉर्कच्या रॉबिन्सन अॅण्ड स्टॅनमॅन नावाच्या एका अभियांत्रिकी कंपनीने केली होती. ८.५ मैल (१३.७ कि.मी.) लांबीचा हा सेतू १९३७ मध्ये...
  August 19, 03:08 AM
 • फक्त चेहरा पाहूनच भविष्य वर्तवणा-या एका ज्योतिष्याला ग्रीसचा महान तत्त्वज्ञ सॉक्रेटिसची भेट घेण्याची इच्छा होती. एका मित्राने सॉक्रेटिसची ही भेट घडवून आणली. त्या वेळी सॉके्रटिसच्या शिष्यांचा मोठा गट तिथे उपस्थित होता आणि तिथे बौद्धिक चर्चा सुरू होती. सॉक्रेटिस बौद्धिकदृष्ट्या जेवढा श्रीमंत होता, तेवढाच तो दिसायला कुरूप होता. त्याच्या भांडखोर बायकोने त्याच्या डोक्यावर गरम पाणी ओतल्याने त्याचा चेहरा विद्रूप बनला होता. ज्योतिष्याने सॉके्रटिसचा चेहरा पाहून भविष्य सांगायला...
  August 19, 03:06 AM
 • प्राचीन काळीच ख्रिस्ती धर्माचा भारत प्रवेश झाला आहे. प्रभू येशूच्या प्रमुख शिष्यांपैकी एक सेंट थॉमसने पहिल्या शतकातच भारतात मद्रासजवळ ख्रिस्ती धर्माचा प्रचार सुरू केला. त्या काळापासून त्या परिसरात ख्रिस्ती धर्माचा स्वतंत्रपणे प्रचार सुरू झाला. सोळाव्या शतकात पोर्तुगाली लोकांसोबत आलेल्या कॅथॉलिक धर्मप्रचारकांच्या माध्यमातून पोपच्या कॅथॉलिक चर्चशी त्यांचा संपर्क आला. पण भारतातील काही ख्रिस्ती बांधवांनी पोपची सत्ता...
  August 18, 03:55 AM
 • एकदा काका कालेलकर काही कामानिमित्त गांधींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. गांधींनी सन्मानपूर्वक त्यांना बसवले आणि म्हणाले, काका, तुम्ही बसा. मी जरा माझे काम पूर्ण करतो. असे म्हणून गांधी त्यांच्या मेजावर ठेवलेले सामान उचकटून काहीतरी शोधू लागले. काही वेळ शोध घेतल्यानंतर त्यांच्या चेह-यावर त्रासिकपणा दिसू लागला. काकांना राहवले नाही आणि त्यांनी विचारले, बापू, काय शोधत आहात? मला सांगा. मी पण मदत करतो. गांधी म्हणाले, एक पेन्सिल...
  August 18, 03:53 AM
 • सर व्ही. एस. नायपॉल यांचे पूर्ण नाव विद्याधर सूरज नायपॉल आहे. १७ ऑगस्ट १९३२ रोजी त्रिनिदाद येथे त्यांचा जन्म झाला. विद्यापीठीय शिक्षण घेण्यासाठी नायपॉल यांनी १९५० मध्ये त्रिनिदाद सोडले व ते ऑक्सफर्डमध्ये शिकण्यासाठी लंडनला गेले. ते कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध झाले. एका स्थलांतरिताची ओळख आणि स्वातंत्र्य यांचा पुनरुच्चार करणा-या मि. बिस्वास (१९६१) या त्यांच्या कादंबरीला इंग्लंडमधील ए हाऊस हा सन्मान मिळाला. त्यांच्या इन ए फ्री स्टेट...
  August 17, 02:10 AM
 • महात्मा गांधी चरखा संघासाठी गावोगावी निधी गोळा करीत होते. ओरिसातील एका गावी गांधींचे भाषण झाल्यानंतर एक वृद्ध महिला उठून उभी राहिली. तिच्या पाठीला बाक आला होता, केस पांढरे झाले होते आणि अंगावर फाटकी वस्त्रे होती. गांधींच्या दिशेने निघालेल्या त्या वृद्धेला स्वयंसेवकांनी रोखले, पण त्यांना बाजूला सारत गांधींजवळ जाऊन ती त्यांच्या पाया पडली व तिच्या साडीच्या एका घडीतून एक तांब्याचे नाणे काढून तिने ते गांधींजवळ ठेवले. गांधींनी ते नाणे...
  August 17, 02:06 AM
 • दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जर्मनी हा देश पूर्व जर्मनी (जर्मन डेमोकॅ्रटिक रिपब्लिक) आणि पश्चिम जर्मनी (फेडरल रिपब्लिक) या दोन भागात विभागला गेला. यासोबतच बर्लिनचेही दोन भाग बनले. पश्चिम बर्लिनवर ब्रिटन, फ्रान्स व अमेरिकेचा ताबा होता, तर पूर्व बर्लिन रशियाच्या ताब्यात होते. पूर्व बर्लिनमधील कम्युनिस्ट शासन तिथे पाश्चिमात्य जगतातील भांडवलवाद्यांचा प्रभाव रोखू इच्छित होते. त्यामुळे 13 ऑगस्ट १९६१ पासून बर्लिनमध्ये एक बॅरिकेड उभारायला सुरुवात झाली ते बर्लिनची...
  August 15, 01:50 AM
 • संत रज्जब प्रत्येक क्षणी भगवंताच्या स्मरणात हरवून गेलेले असत. त्यांना भेटायला येणा-या प्रत्येकाला ते अवगुणांचा त्याग करून साधे सरळ जीवन जगायला सांगत. त्यांचे म्हणणे होते की खरा माणूस, मग तो कोणत्याही धर्माचा असो, त्याने हर प्रकारे नशेपासून दूर राहायला हवे. त्यांच्या उपदेशामुळे हजारो लोक सन्मार्गाला लागले होते. पण त्यांच्याच गावातील महंमद जुबेर नावाचा तरुण वाईट संगतीत सापडल्याने गुन्हेगार झाला होता. जुगार खेळणे, मद्य पिणे आणि त्यानंतर लोकांना त्रास देणे हेच...
  August 15, 01:48 AM
 • रक्षाबंधन हा सण आनंदाचा, उत्साहाचा. दूर असलेल्या भावाला राखी पाठवायची बहिणीची घाई आधीपासूनच सुरू होते. त्या दिवशी जेवणात काय पदार्थ असणार हे सगळ्यांनाच ठाऊक असतं. नारळीभात नाही तर ओल्या नारळाच्या करंज्या किंवा नारळाच्या वड्या असेच काही असणार. गेल्या वर्षीच्या राखीपौर्णिमेला घडलेला प्रसंग सारखा जसाच्या तसा आठवतोय. माझी मुलगी आपल्या भावांना राखी बांधायला सकाळीच आली. तिने आपल्या दोन्ही भावांना राखी बांधली. तिला दोन मुली आहेत. त्यांनी आपल्या मामेभावांना राख्या बांधल्या. सगळे...
  August 13, 09:59 AM
 • औरंगाबाद - तुझं एक बरंय बाई. तुझी मुलं मोठी आहेत. शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहतात. त्यामुळे तुला जास्त काही व्याप नसणारच ना. नाही तर आमचं पाहा, आमचे चिरंजीव आता कुठे नववीत आहेत. सतत त्याच्या दिमतीला राहावं लागतं. सुनीताचं बोलणं नेहाला जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटलं. तिची दोन्ही मुलं उच्च शिक्षणाचं ध्येय मनात ठेवून मेहनत करणारी. आपल्या मनातला दुखरा कोपरा मैत्रिणीच्याही लक्षात येऊ नये, याचं नेहाला वाईट वाटलं. मुलं चांगल्या करिअरचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शिक्षणासाठी घर सोडून दूर राहतात....
  August 13, 09:52 AM
 • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रेनॉल्ड रेगन यांनी एकदा सोव्हिएत संघाविषयी थट्टेत एक विधान केले. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान खाली घालावी लागली. 11 ऑगस्ट 1984 रोजी रेगन रेडिओद्वारे जनतेला संबोधित करण्याच्या तयारीत होते तेव्हाच त्यांना आवाज तपासण्यास सांगण्यात आले. रेगनने माइकवर थट्टेने म्हटले, अमेरिकन नागरिकांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आत्ताच एका आदेशावर स्वाक्षरी केली असून आपण पाच मिनिटात रशियावर बॉम्बफेक सुरू करू. थट्टेने केलेले हे विधान प्रसारित झाले नाही;...
  August 13, 03:24 AM
 • नोबेल पुरस्कार मिळताच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे शुभेच्छा देणार्यांची रांग लागली. दूरदूरहून लोक येत होते. पण एक माणूस त्यांना भेटायला आला नाही तो म्हणजे त्यांचा शेजारी! त्याला वाटत असे की लोक टागोरांच्या का पाया पडतात? एवढे विशेष काय आहे त्यांच्यात. शेजार्याच्या उपेक्षेमुळे टागोरांचे मन दुखावले. दुसर्या दिवशी सकाळी समुद्रकिनार्यावरून फेरफटका मारताना त्यांना दिसले की सूर्याच्या सोनेरी किरणांमुळे समुद्र सोन्यासारखा चमकत होता. निसर्गप्रेमी टागोर हे दृश्य भावविव्हल...
  August 13, 03:18 AM
 • महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमध्ये वकिली करत असत. एकदा श्रीमंत पारशी शेठ रुस्तुमजींनी त्यांच्याकडे येऊन त्यांच्यावरील चोरीच्या आरोपाचा खटला लढण्याची विनंती केली. महात्मा गांधींनी रुस्तुमजींचे प्रकरण लक्षपूर्वक ऐकले व म्हणाले, तुम्ही कर टाळला असेल तर मला त्याबद्दल सगळे काही सांगा. रुस्तुमजीवर गांधींच्या बोलण्याचा परिणाम झाला.ते कबूल झाले की या वेळीच नाही तर मागेही अनेकदा त्यांनी करचोरी केली आहे. गांधी म्हणाले, हे तुम्ही कोर्टासमोर सांगणार असाल तरच तुमचे प्रकरण घेऊ शकतो....
  August 12, 04:06 AM
 • एस्केलेटर किंवा स्वयंचलित जिन्यांचा इतिहास दीडशे वर्षे जुना आहे. अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्समधील नाथन अमेसने या एस्कलेटर्सचे तंत्र विकसित केले. एस्कलेटर्सना त्यांनी रिव्हॉल्व्हिंग स्टेअर्स असे नाव दिले होते. ९ आॅगस्ट १८५९ रोजी त्यांना अमेरिकेत त्याचे पेटंट मिळाले. तथापि याअगोदरच एस्कलेटर विकसित करण्याचे श्रेय रेनोकडे जाते. त्याने १८९२ मध्येच एस्कलेटर्स बनवले होते. हे एस्कलेटर न्यूयॉर्कच्या कोनी आयलंडमध्ये व ब्रुकलिन ब्रिजच्या मॅनहटन टोकाकडे बसवले होते. यात पृष्ठभागापासून २५...
  August 11, 02:12 AM
 • नेताजी सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेण्यापूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेच्या मुलाखतीची तयारी करीत होते. या मुलाखतीसाठी त्यांची कठोर तयारी सुरू होती. त्यांना या मुलाखतीसाठी इंग्लंडला जावे लागले. मुलाखतीच्या जागी जमलेल्या सर्वांच्या चेहयावर भीती दिसत होती. परीक्षेत काय विचारले जाईल त्यावर सर्वजण चर्चा करीत होते. पण सुभाषचंद्र मात्र शांतच होते. त्यांच्या चेहयावर आत्मविश्वास दिसत होता. मुलाखतीसाठी त्यांना आत बोलावण्यात आले तेव्हा ते सर्वांचे अभिवादन करून स्थानापन्न झाले....
  August 11, 02:05 AM
 • इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर आणि थायलंड या दक्षिणपूर्व आशियाई देशांनी एकत्र येऊन 8 ऑगस्ट 1967 रोजी आसियान स्थापन केले. नंतर 1984 मध्ये ब्रुनेई, 1995 मध्ये व्हिएतनाम, 1997 मध्ये लाओस व म्यानमार आणि 1999 मध्ये कंबोडियासारखे देशही यात समाविष्ट झाले. खरे पाहता आसियान हे फिलिपाइन्स, थायलंड आणि मलेशियाकडून स्थापित दक्षिण-पूर्व आशियाई संघाचे संघटन आहे. सदस्य देशांत आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाला गती देणे, अंतर्गत वाद मिटवण्यासाठी योग्य ते व्यासपीठ देणे व या देशांतील शांततेला चालना...
  August 10, 06:28 AM
 • एक प्रसिद्ध मूर्तिकार होता. त्याने त्याच्या मुलालाही मूर्तिकला शिकवली. तोही त्याच्या वडिलांसारखाच मेहनती व सृजनशील होता. त्यामुळे लवकरच तो सुंदर मूर्ती तयार करू लागला. पण मूर्तिकार मात्र मुलाच्या मूर्तीमध्ये दोष काढत असे. अशा प्रकारे वर्षे लोटली. सर्वजण त्या मुलाची प्रशंसा करीत, पण वडील मात्र त्याचे दोष दाखवत. यामुळे तो मुलगा दु:खी व चिंतीत असे. एकदा त्याने एक युक्ती केली. एक आकर्षक मूर्ती तयार करून त्याने त्याच्या मित्राकरवी वडिलांकडे पाठवून दिली. मुलाच्या मित्राने मूर्ती तयार केली...
  August 10, 06:26 AM
 • प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. अजून एकाने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ. प्रत्यक्ष आत्महत्या करणा-या विद्यार्थ्यांचे पालक आधीच दु:खात. इतर विद्यार्थ्यांचे पालक धास्तावलेले. न जाणो आपल्याही मुलाने हा मार्ग अवलंबला तर? सर्वत्र शांतता. साप म्हणून भुई धोपटण्याचाच प्रकार. इंजिनिअरिंग कॉलेजात शिकत असणाया विद्यार्थ्यांचा पालक म्हणून मला काही गोष्टी जाणवल्या, त्या मांडण्याचा हा प्रयत्न व त्यावर सखोल चर्चा व उपाययोजना व्हाव्यात ही इच्छा....
  August 10, 04:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात