जाहिरात
जाहिरात
Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

 • चुलत वा मामेभाऊ-बहीण हिंदू धर्मामध्ये एकमेकांशी विवाह करू शकत नसले तरी धर्मांतर केल्यानंतर ते एकमेकांशी विवाह करू शकतात, असा निकाल नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये दिला आहे. सपिंड वा सगोत्र विवाहांना विरोध हा नव्या पिढीच्या विचारांना मारक असून, त्यातूनच ऑनर किलिंगसारखे प्रकार वाढीस लागतात, असे मतप्रदर्शन न्यायालयाने केले. या संदर्भात हिंदू विवाह कायद्याच्या काही तरतुदी माहीत करून घेणे गरजेचे ठरते. कायदेशीर हिंदू विवाहाकरिता खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे....
  August 9, 09:21 AM
 • निसर्ग हा मानवजातीचा सर्वात मोठा गुरू मानला जातो. नाना प्रकारे निसर्गाने मानवास सतत काही ना काहीतरी शिकवण दिलेली आहे. विज्ञान व निसर्ग यांचे अत्यंत घनिष्ठ नाते आहे. तेच नाते आता तंत्रज्ञान व निसर्ग यांच्यातही निर्माण होताना दिसते आहे. संगणक तंत्रज्ञानाने केलेली प्रगती गेल्या काही वर्षात निसर्गाने प्रेरित झाल्याचे दिसून येते. अनेक नैसíगक रचना या तंत्रज्ञानातील विविध संकल्पनांना जन्म देताना दिसत आहेत. तंत्रज्ञान हे एका अर्थाने निसर्गाचे शिक्षक बनून राहिले आहे. मानवी प्रगतीला पोषक...
  August 9, 04:18 AM
 • दुसर्या जागतिक महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बचे कोडनेम लिटिल बॉय होते. अमेरिकन बॉम्बवर्षक विमान बी 29 एनोला गेमधून 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी सव्वाआठ वाजता 1800 फुटांवरून हा बॉम्ब टाकण्यात आला. युद्धात शत्रूविरुद्ध अस्त्र म्हणून वापर झालेला हा पहिला अणुबॉम्ब आहे. यानंतर तीन दिवसांनी जपानच्या नागासाकी शहरावर दुसरा बॉम्ब टाकण्यात आला, त्याचे कोड नेम फॅट मॅन होते. दुसर्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या मॅनहॅटन प्रोजेक्टअंतर्गत लॉस अलामोस इथे लिटिल बॉय तयार...
  August 9, 04:10 AM
 • एक गरीब कोळी जाळे घेऊन सकाळीच नदीकडे निघाला होता. नदीवर गेल्यावर त्याला आढळले की चारीकडे जरा जास्तच अंधार दाटलेला आहे. वेळ घालवण्यासाठी तो नदीकिनारी फिरू लागला. त्याचा पाय एका गाठोड्यावर पडला. त्यात दगड भरले होते. वेळ घालवण्यासाठी त्याने त्या गाठोड्यातून एक-एक दगड काढून नदीत फेकायला सुरुवात केली. त्याने खूप दगड नदीत फेकले व शेवटचा दगड हातात शिल्लक राहिला असताना सूर्योदय झाला. सूर्यप्रकाशात त्याला दिसले की हातात असलेला दगड चमकतो आहे. त्याने लक्षपूर्वक पाहिले तर लक्षात आले की तो दगड...
  August 9, 04:08 AM
 • अमेरिका व कॅनडादरम्यान वाहणा-या नायगरी नदीवर बांधलेला पीस ब्रीज किंवा शांती सेतू जगप्रसिद्ध नागगरा धबधब्यापासून 20 कि. मी. अंतरावर आहे. या सेतूने न्यूयॉर्कमधील सिटी ऑफ बफेलो हे शहर कॅनडातील ऑटारियोतील फोर्ट एटी या गावाशी जोडले गेले आहे. सात स्तंभ असलेल्या या सेतूची लांबी सुमारे पावणेदोन किलोमीटर आहे. हा पूल बांधण्यासाठी सुमारे 1700 टन पोलाद वापरले आहे. महामार्गावरील या पुलाचे बांधकाम अमेरिका व कॅनडादरम्यान शांती प्रस्थापित होऊन शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण्यात आले....
  August 5, 11:03 PM
 • शिस्तबद्ध जीवन यशाची चव एका वेगळ्या प्रकारे चाखते. बेशिस्त माणसाचे यशदेखील सदोष असते. आळस ही जीवनातील सर्वात मोठी बेशिस्त आहे. सध्याचे जग पैशाच्या मागे धावते आहे. धनाचे वास्तव रूप अचूक प्रकारे समजून घ्यायचे असेल तर स्वत: बेशिस्तीपासून मुक्त झाले पाहिजे व स्वत:चा पैसा वैचारिक दारिद्र्यापासून मुक्त ठेवायला हवा. पैसा कमावण्यासाठी दोन गोष्टींची गरज पडते- पहिली विशिष्ट मानसिक परिस्थिती आणि दुसरी गोष्ट परिश्रम. आपली मानसिकता पाच पाय-यांशी जोडा.या पाच टप्प्यांत पैसा मिळवा, थेट उडी मारण्याचा...
  August 5, 11:02 PM
 • परवा एका खूप जवळच्या नातेवाईक असलेल्या बार्इंशी गप्पा मारत होते. नाते जरी सासरचे असले तरी आम्ही तशा खूप जवळच्या...नात्यानेही आणि मनानेही. पण त्या दिवशी ब-याच दिवसांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आला. त्या नेहमीसारख्या वाटल्या नाहीत म्हणून त्यांना कारण विचारले. त्या म्हणाल्या, आपली कोणाला गरज नाही असे वाटायला लागलेय आताशा. मुलगा आपल्या संसारात सुखी, नातवंडे भेटतात, खेळतात; पण तीही आपापल्या उद्योगात. सगळे सुख आहे गं, पण अगदी रिकामे वाटते. फोन ठेवला आणि मी विचारात पडले. खरंच ही समस्या आहे का?...
  August 5, 10:55 PM
 • फ्रान्सचा सम्राट फ्रान्सिस (पहिला) आणि रोमन शासक चार्ल्स (पाचवा) यांच्यात 3 आॅगस्ट 1529 रोजी एक ऐतिहासिक करार झाला ज्यामुळे या दोन्ही राजसत्तांदरम्यान सुरू असलेल्या लढ्याचा अंत झाला. या करारामुळे इटलीतील स्पॅनिश (हासबर्ग) अधिपत्यावर शिक्कामोर्तब झाले. चार्ल्सने 1525 मध्ये इटालीच्या पाव्हिया येथे फ्रेंच सेनेला पराभूत करून फ्रान्सिसला माद्रिद येथे करार करण्यास भाग पाडले. चार्ल्सचे सामर्थ्य वाढत असल्याने इंग्लंड, व्हेनिस आणि पोप लीमंट (सातवे) यांनी नंतर बाजू बदलली. १५२८ मध्ये चार्ल्सच्या...
  August 5, 01:34 AM
 • आपल्याला अभिमान वाटावा अशा अनेक सांसारिक यशस्वीता मिळतात. हा गौरव अहंकारशून्य असेल तर त्यालाच आत्मबल म्हटले जाईल; पण एका गोष्टीचा सर्वात जास्त अभिमान वाटायला हवा ती म्हणजे आपण माणूस असण्याचा. पैसा, पद, संतती आणि यश यांचा अभिमान पाण्यावरील बुडबुड्यासारखा सिद्ध होतो. माणसाला परमात्म्याने थेट त्याची झलक दाखवली आहे. आपले जीवन एका सरोवरासारखे आहे, ज्यात त्याच्या कृपेचा रस भरलेला आहे. खोलवर उतरून पाहिले तर हे सरोवर मानसरोवरापेक्षाही जास्त स्वच्छ व शुभ्र आहे. या सरोवरात विहार करण्यासाठी...
  August 5, 01:30 AM
 • काही घटना दिसायला साध्या असतात; पण काहींना त्या घटना, तो अनुभव आयुष्यभर साथ देतो. त्या दिवशी सचिन तेंडुलकरांचे सेक्रेटरी आणि माझे मित्र रमेश पारधे यांचा फोन आला. सर, तुम्ही डोंबिवलीत आहात, सचिनची आई आली आहे सचिनच्या मामांना हॉस्पिटलमध्ये बघायला. पण इथे लाईट गेलेत, कधी येतील माहीत नाही. सचिनच्या आईला मी तुमच्या घरी घेऊन येतोय. माझे घर डोंबिवलीला टिळक नगरमध्ये आहे आणि तळमजल्यावर. मी माझ्या शिकवणीच्या मुलांना सोडले. साधारणत: बारा-साडेबारा वाजता सचिनच्या आई रजनीताई तेंडुलकर घरी आल्या. माझे घर...
  August 5, 01:29 AM
 • दुस-या जागतिक महायुद्धादरम्यान नाझी सैन्याने ट्रेंबलिका नावाची छळछावणी उभारली होती. पोलंडची राजधानी वॉर्सापासून 50 मैल उत्तरपूर्वेकडे असलेल्या या छळछावणीत १९४२-४३ दरम्यान आठ ते दहा लाख ज्यूंचा नरसंहार करण्यात आला. लेबर कॅम्पमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने ज्यूंना या छळछावणीत आणले जात असे. पण तिथे त्यांना गॅस चेंबरमध्ये कोंडले जाई व तिथेच त्यांचा अंत होत असे. हा नरसंहार सुरू होऊन एक वर्ष उलटल्यानंतर छळछावणीतील काही धाडसी ज्यूंनी पहिल्यांदाच पळ काढण्याची योजना आखली. पळ काढण्यासाठी 2...
  August 3, 10:41 PM
 • आपल्या व्यक्तिमत्त्वात ज्या गोष्टीचा रस भरलेला असेल त्याचे तुषार आपल्याला भेटणा-यांवर पडतीलच. हनुमंत तर भक्तिरसाने ओतप्रोत आहे. हनुमंताच्या रोमरोमात राम आहे. यामुळेच हनुमंताचे दर्शन जो घेतो त्याला रामनामाचे सान्निध्यसुख मिळते. हनुमंताची केवळ उपस्थितीच संरक्षणाची ढाल बनते. सुंदरकांडात लंकाप्रवेश झाल्यानंतर हनुमंत आणि लंकनी यांचा संवाद तुलसीदासांनी अत्यंत सखोल भावातून लिहिला आहे. हनुमंताशी होत असलेले बोलणे लंकनीला सत्संगासारखे वाटते आणि लंकेत पुढे जाण्यासाठी ती हनुमंताला एक...
  August 3, 10:38 PM
 • एका नातेवाइकाची बायपास असल्याकारणाने नाशिकवरून पुण्याला जायचे होते. माझ्या भावाच्या मित्राची म्हणजे हेमंतची गाडी पुण्याला निघाली होती. घरची सोबत, त्यामुळे मी आणि माझी नणंद त्याच्या गाडीत पुण्याला निघालो. गाडीत गप्पा चालूच होत्या, पण तरीही मनाला कसली तरी हुरहूर लागल्यामुळे मन अस्वस्थ होते. हेमंतलाही पुण्याला जायची घाई होती. त्यामुळे तोही गाडी तशी जोरातच चालवत होता. चंदन घाट चढत असताना जरा ट्रॅफिक लागले म्हणून आणि दुस-या बाजूने कोणतीही गाडी येत नसल्याकारणाने त्याने गाडी त्या साइडने...
  August 3, 10:32 PM
 • १३ नोव्हेंबर १७९४ रोजी राहिलेसाहिले बंडखोर अटकेत आल्याने व्हिस्कीचे बंड अधिकृतपणे संपुष्टात आले.व्हिस्कीचे बंड हे अमेरिकेत अठराव्या शतकात झालेले प्रमुख बंड आहे. त्या कालखंडात अमेरिका कर्जसंकटाला तोंड देत होती. अमेरिकन काँग्रेसने या संकटापासून मुक्त होण्याचा भाग म्हणून प्रति गॅलन व्हिस्कीवर सात सेंट उत्पादन शुल्क आकारले. बहुतांश अमेरिकन जनता या कराविरुद्ध होती; पण पश्चिम पेनसिल्व्हानिया राज्यात या कर आकारणीला प्रचंड विरोध झाला. पेनसिल्व्हानियातील शेतक-यांना पर्वतीय प्रदेशातून...
  August 3, 12:29 AM
 • शारीरिक, मानसिक कमतरता स्वीकारल्याने माणसाच्या अंगी आत्मविश्वास निर्माण होतो, अनेक कमतरता असूनही माणूस यशस्वी ठरतो.ऑलिव्हर क्रॉमवेल त्यांच्या अभूतपूर्व साहस व शौर्यासाठी ख्यातनाम होते. परिस्थिती कितीही बिकट असो, ऑलिव्हरर तिच्याशी भिडायला तयार राहत असे. संपूर्ण युरोपियन समाजात त्यामुळे ऑलिव्हर क्रॉमवेल यांच्याकडे आदराने पाहिले जात असे आणि त्यांना भेटण्यासाठी दूरवरून लोक येत. ऑलिव्हर यांच्या शौर्याच्या कथा सांगून युरोपीय माता त्यांच्या मुलांना ऑलिव्हररच्या धैर्याचा संस्कार...
  August 3, 12:28 AM
 • सारा प्रसंग त्या मुलाने सांगून संपवताच माझेही मन नकळत हेलावले...माझ्या परिचयाचा एक मुलगा आहे. तो आता यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे. मात्र, हाच मुलगा दहावी परीक्षेत नापास झाला होता व तो क्षण त्याच्यासाठी खूपच कसोटीचा होता. त्यातून तो कसा बाहेर आला याची कहाणी त्याने मला एकदा सांगितली ती त्याच्याच शब्दांत इथे देत आहे. हा मुलगा मला म्हणाला, जून महिना उजाडला की दहावी व बारावी परीक्षांचे निकाल जवळ येतात. आजही मनाला निकालाबद्दल तीच हुरहूर जाणवते. आयुष्यातला तो दहावी परीक्षेचा निकाल आजही पाठ...
  August 3, 12:23 AM
 • आयर्लंडमध्ये सन १८४५ ते १८४९ च्या मध्यावर बटाट्याचे पीक वाया गेल्याने भीषण दुष्काळ पडला होता. हा दुष्काळ आयरिश बटाट्यांचा दुष्काळ नावाने जगप्रसिद्ध आहे. आयरिश भाषेत या दुष्काळाला गोर्टा मोर म्हणजे महाभूकबळी म्हटले गेले. हा एकोणिसाव्या शतकात युरोपात पडलेला सर्वात भीषण दुष्काळ होता. लेट लाइट नावाच्या बटाट्याच्या जातीवर पडलेला रोग हा या दुष्काळामागचे कारण होता. बटाट्यावर रोग पडल्याने १८४० च्या दशकात पूर्ण युरोपातील बटाट्याचे पीक सतत चार-पाच वर्षे वाया गेले. पण आयर्लंडमध्ये (या...
  August 1, 11:24 PM
 • काही अनुभव आपले विचार व वेळप्रसंगी आयुष्य बदलून टाकणारे असतात. प्रत्येक अनुभव आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून जातो. १९९३ मध्ये लग्न होऊन मी बोरिवलीस राहण्यास आले आणि कंपनी सेक्रेटरीचा कोर्स शिकण्यास सुरुवात केली. हा कोर्स जिथे चालायचा ते महाविद्यालय मालाडला होते. मी रोज संध्याकाळी बेस्ट बसने प्रवास करत असे. एकदा काही कारणाने मला घर सोडण्यास उशीर झाला. मी अतिशय घाईत बसस्टॉपवर आले व नेहमीच्या बसमध्ये चढले. बसायला जागाही मिळाली. कंडक्टर आल्यानंतर मी माझ्या बॅगमध्ये हात घालून छोटी मनीपर्स...
  August 1, 11:21 PM
 • धर्म धनाला शुद्ध करतो अशी शास्त्रांची उद्घोषणा आहे. त्यामुळे धनासोबत दान जोडले गेले आहे. पण काळ बदलला तसा नवा दृष्टिकोन समोर येऊ लागला आहे. धर्मामुळे धन जेवढे शुद्ध होत गेले तेवढाच धनामुळे धर्मही विकृत जाण्याचा धोका वाढला. धन आणि धर्म समजदार आणि विवेकशील लोकांच्या हाती नसतील तर ते एकमेकांना विकृत करतील. मंदिरे, तीर्थ, मठ आणि आश्रम सध्या पैशांचा पाऊस पडत असलेल्या वादळाने डळमळीत झाले आहेत. एवढा पैसा येऊ लागला की पैशाचे महत्त्वच बदलले. पैसा आणि विलास यांची फार जुनी मैत्री आहे. त्यादरम्यान...
  August 1, 11:18 PM
 • विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडात ब्रिटन सर्वात शक्तिशाली युरोपियन देश होता. ब्रिटनचे साम्राज्य सर्वात मोठे होते. उद्योगधंदे सर्वात समृद्ध होते आणि ब्रिटिश नौसेनाही इतर देशांपेक्षा मोठी होती. दुसया बाजूला जर्मनी वेगाने साम्राज्यविस्तार साधत ब्रिटनसमोर आव्हान म्हणून उभा राहत होता. यादरम्यानच जर्मनीने फ्रान्सचे दोन प्रांत ताब्यात घेतले होते. त्यामुळे फ्रान्सही जर्मनीच्या विरोधात होता.याशिवाय इतर युरोपियन देश एकमेकांवर नाराज असल्याने परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती....
  August 1, 12:11 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात