जाहिरात
जाहिरात
Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

 • दुपारची वेळ... दोन किंवा अडीचच्या सुमारास ट्रेनमध्ये लेडीज सेकंड क्लास मध्ये गर्दीही सुमारच! काहींचे डोळे लागलेले, काही साहजिकच मोबाइलला चिकटलेल्या. मधूनच गुजरातीत आरडाओरड झाल्याचे भासही होत होते.अंधेरी ते माटुंगा रोडपर्यंतचा प्रवास तसाही जीव वर आलेला होता. काही जणी ट्रेनमधल्या जाहिराती वाचण्यात मश्गुल होत्या. मोबाइलचे हेडसेट न आणल्याने मी स्वत:लाच कोसत बसले होते. अचानक, मागून जोरात बोलल्याचे, हसण्याचे आवाज तेथील शांतता भंग करतात. हसत-हसवत सगळ्यांना बोलायला भाग पाडत होता तो...
  August 1, 12:09 AM
 • जिज्ञासा हा ज्ञानाचा आरंभ आहे. जिज्ञासू लोकांनीच कर्मकांडाला नवीन स्वरूप दिले. हिंदू संस्कृतीमध्ये अशाच लोकांनी कर्मकांड सांभाळले. एक छोटे उदाहरण पहा. गणपतीची मूर्ती तयार केली जाते, पुजली जाते आणि विसर्जित केली जाते. त्यामागे मोठे तत्त्वज्ञान आहे. एका कर्मकांडातून मूर्ती तयार करून तिची पूजा होते, उत्सव होतो आणि तीच मूर्ती विसर्जितही केली जाते. म्हणजे कर्मकांड करूनही त्यापासून मुक्ती मिळवली. चिंतन व मनन यासाठी जिज्ञासा असेल तर कर्मकांड सहज अंधश्रद्धांपासून मुक्त होईल. स्वत:चे...
  August 1, 12:07 AM
 • नित्यनियमाप्रमाणे दोन-तीन आठवड्यांच्या अंतराने बँकेत गेले होते. तो सोमवार असल्याने गर्दी होतीच! त्यात नेहमीप्रमाणे पास-बुक प्रिंटर फुगून बसला होता. टेक्निकल बिघाड जडला होता त्याला! त्या काउंटरवर भांडणे चालू होती नि एक गृहस्थ बाकीच्या बँकांच्या तुलनेत स्टेट बँक कशी मागे पडलीय, हे सांगण्यात गुंतले होते. नि कॅश काऊंटरची लाईन संपता संपत नव्हती. एरवी मी फक्त कॅश भरण्याकरता जाते; पण चेक डिपॉझिट करण्याची माझी पहिलीच वेळ होती आणि त्याबाबतीत मी अज्ञानी होते. मी विचार करत होते की कोणाला विचारणे...
  July 30, 02:54 AM
 • संपूर्ण महाराष्ट्रात भूषण ठरावा अशा उड्डाणपुलाचे काम नाशिकमध्ये सुरू आहे. केवळ भूषण म्हणून नाही तर एक अत्यावश्यक काम म्हणून या प्रकल्पाकडे बघितले पाहिजे. दुर्दैवाने या प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत किंवा भविष्यातील फायद्याबद्दल चर्चा न करता केवळ काम चालू असताना होणाया अपरिहार्य, परंतु किरकोळ अडचणींचीच चर्चा जास्त होताना दिसते. जणू काही हा प्रकल्प नाशिककरांवर लादला गेला आहे. अपरिहार्य अडचणींचा सामना करावाच लागतो. आज आपण हा थोडाफार त्रास सहन केला नाही तर त्याचा परिणाम भावी पिढीला...
  July 30, 02:36 AM
 • नेव्हीनगर शाखेतल्या शिस्तीच्या आणि मनाने खूप निर्मळ अशा ग्राहकांबरोबरचे ते दिवस फार सुंदर होते. बँकेत पैसे काढणे किंवा भरणे आदी कामांसाठी येणाया या महिलांचे नवरे बयाचदा शिपवर किंवा अन्य ठाण्यांवर ड्यूटीवर गेलेले आणि सारा संसार स्त्रिया सांभाळत असे वातावरण. त्या दिवशी दुपारी एक लहानखुरी स्त्री आमच्या बँकेच्या शाखेत आली व तिने चेकबुक, रिक्वेस्ट स्लिप माझा अतितत्पर मित्र प्रकाश याच्याकडे दिली. स्लिप पाहून तो म्हणाला इसपे नेगीसाहब के दस्तखत होने चाहिये. हे ऐकताच तिचा चेहरा खाडकन उतरला....
  July 29, 02:39 AM
 • आयात केलेल्या सेकंडहँड इलेक्ट्रॉनिक वस्तू पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीशिवाय आणल्यास त्या ९० दिवसांच्या आत परत पाठवल्या जातील ही दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी अत्यंत महत्त्वाची अशीच आहे. विदेशातून येणारे सेकंडहँड कॉम्प्युटर, मॉनिटर, रॅम, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या वाढत्या संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याचे सर्वात मोठे कारण आपल्या देशामध्ये ई-कचरा मोठ्या प्रमाणावर साचू लागला आहे. तंत्रज्ञानामध्ये जसजसे बदल होतात तसतसे उपकरणांमध्येही होत असतात....
  July 29, 02:36 AM
 • एक रुपयाला आता तशी काय किंमत आहे? पण पंधरा-वीस वर्षांपूर्वी नक्की होती. मी ज्याबद्दल सांगणार आहे ती घटना त्याच काळातली आहे. जसे मुंबैकर पुण्याला चेंज म्हणून जातात, तसा मीही गेलो होतो. तुळशीबागेच्या गजबजलेल्या गर्दीत पाहत होतो. घरच्या मंडळींची अप्रुपाने खरेदी चालू होती. आपण तटस्थ राहायचे म्हणून गर्दीचे अवलोकन करत उभा होतो. अचानक गर्दीतून वाट काढत एक बाई धावत आली. हातात एक रिकामी काचेची बाटली होती आणि बडबडत होती, मला जीव द्यायचाय, रॉकेलसाठी एक रुपया द्या! रस्त्यातल्या तमाम बाया-बापड्यांचे,...
  July 28, 03:10 AM
 • निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथे शेतात वीज पडून तीन महिलांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाल्याची दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी मनाला चटका लावून गेली. पावसाळा सुरू झाला की विविध ठिकाणी वीज पडून माणसे, गुरेढोरे मरण पावल्याच्या किंवा जखमी झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होण्यास सुरुवात होते. वीज पडून माणसे मरण पावण्याच्या घटना केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी भागातही घडत असतात. फक्त त्यांच्या हानीचे स्वरूप जरा भिन्न असते. पावसाळा आला की शेतीच्या नांगरणी व...
  July 28, 02:52 AM
 • मी कॉलेज संपल्यानंतर पत्रकारितेचा कोर्स करायचा विचार केला आणि ह्या कोर्समुळे मला रेडिओसाठी काम करायची संधी मिळाली. इंदूरला असताना मी युववाणी हा कार्यक्रम करत होते; पण मुलीचे भाग्य लग्नाच्या रेषेबरोबर जोडलेले असते आणि मी अहमदाबादला आले. तिथे सगळेच गुजराती वातावरण व मला केम छो? ह्या या दोन गुजराती शब्दांशिवाय जास्त काहीच येत नव्हते म्हणून तेथील रेडिओवर कार्यक्रम करायचा प्रश्नच नव्हता. त्यानंतर काही वर्षांचा काळ तसाच गेला. दोन मुले झाली आणि मी घर-संसारात रमून गेले. अहमदाबादहून पुढे...
  July 27, 03:04 AM
 • अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरवर्षी सुमारे अडीचशे कोटींची वीजगळती होत असल्याची दिव्य मराठीतील बातमी धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात जर दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात वीजगळती होत असेल तर संपूर्ण राज्यात त्याचे प्रमाण किती असेल याची कल्पना केली तर अंगावर काटाच येतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत असून विजेची मागणी सातत्याने वाढतच आहे. त्या प्रमाणात वीजनिर्मिती होण्यासाठी प्रकल्पांची उभारणी होणे आवश्यक होते, ते मात्र आपल्या राज्यकर्त्यांकडून काही झाले नाही....
  July 27, 02:42 AM
 • २००७-०८ मध्ये मला अमेरिकेला जाण्याचा योग आला होता. मला खूप आनंदही झाला. माझ्या या सात-आठ महिन्यांच्या वास्तव्यात मला असं प्रकर्षानं जाणवलं की तिथल्या वृद्धांपेक्षा आमच्या येथील वृद्ध मंडळी किती सुखी आहे! अर्थात याला काही अपवादही असतील. तिथल्या मॉल्समध्ये, पोस्ट आॅफिसांमध्ये, कॉफी शॉप्समध्ये मला काही वृद्ध लोक काम करताना दिसायचे; मला खूप वाईट वाटायचं. विशेषत: मॉलच्या बाहेर आपण सोडलेली ट्रॉली आत नेताना जर एखादी वृद्ध स्त्री आणि पुरुष दिसला तर माझ्या मनात विचार यायचा की आपल्याकडील...
  July 26, 12:09 AM
 • लग्न व इतर समारंभात बँजो वाजविता वाजविता भीमगीते, बुद्धगीते सुचली व नंतर त्याचा कवितासंग्रह सिन्नर तालुक्याच्या ठाणगाव येथील रहिवासी सुनील पुंजाजी आव्हाड यांनी प्रकाशित केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती त्यानंतर वर्षातील ३६५ दिवस डोळ्यासमोर राहाव्यात या उद्देशाने सम्राट ही अभिनव दिनदर्शिकाही आव्हाड यांनी तयार केली ही दिव्य मराठी मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी नक्कीच प्रेरक व प्रबोधनपर आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांचे आपल्या समाजावर...
  July 26, 12:02 AM
 • असेच एकदा आम्ही मॉलमध्ये गेलो असतानाची गोष्ट. एका ठिकाणी जयपान कंपनीचा स्टॉल लागला होता. बऱयाच ऑफर होत्या, म्हणजे जुना कुकर द्या आणि अमुक टक्के डिस्काऊंट मिळवा, जुना तवा द्या आणि नवीन तव्यावर इतकी इतकी सूट मिळवा वगैरे. त्या ऑफर बघून मलादेखील मोह सुटला आणि अचानक माझ्या घरातील कितीतरी लाडकी भांडी मला जुनी वाटायला लागली. एक कान तुटलेली नॉनस्टीकची कढई, हँडल तुटलेला पॅन, जाड बुडाचा एक तवा आणि भरीस भर म्हणून माझा जुना फूड प्रोसेसरदेखील घेऊन अस्मादिकांची स्वारी मॉलकडे पुन्हा निघाली! नवनवीन...
  July 25, 12:03 AM
 • सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या विकासासाठी सुमारे १० कोटींचा निधी मंजूर झालेला असला तरी लालफितीच्या कारभारामुळे तीन वर्षांपासून ही रक्कम उपलब्ध होत नसल्यामुळे किल्ल्याच्या विकासकामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही ही दिव्य मराठीतील बातमी मुर्दाड शासनयंत्रणेवर कोरडे ओढणारी आहे. महाराष्ट्राला वैभवशाली इतिहास आहे. यादवकाळापासून ते मराठेशाहीपर्यंतच्या इतिहासावर नजर टाकली तर आपल्याला तिथे अनेक अभिमानस्थळे आढळून येतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या...
  July 24, 11:50 PM
 • महाराष्ट्रामध्ये स्त्री भ्रूणहत्येच्या विषयावरून सध्या गहन चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर विदर्भातील चार जिल्ह्यांनी स्त्री जन्मदरात आघाडी घेतली असल्याची दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी मनाला दिलासा देऊन गेली. लोकसंख्येच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत स्त्री-पुरुष जन्मदरामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान प्राप्त केले आहे. दुसरीकडे मुलींच्या जन्मदरात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांनी अव्वल स्थान प्राप्त केले आहे. राज्याचे...
  July 23, 03:07 AM
 • समोर उभा असलेला मार्क इंग्लिश पाय-या कशा चढतो, याकडे माझी नजर खिळून होती. तो भराभर पाय-या चढून वर गेला. अगदी तुमच्या-माझ्यासारख्या. मला वाटते गुडघेदुखीमुळे हैराण झालेले अधिक हैराण झाले असतील. माउंटेनिअर, रिसर्चर, वाइनमेकर, सायकलिस्ट असलेल्या मार्कने न्यूझीलंडच्या लिंकन युनिव्हर्सिटीमधून बायोकेमिस्ट्री घेऊन ग्रॅज्युएशन केले. वयाच्या २३ व्या वर्षी न्यूझीलंडमधील माउंट क्रूक हे हिमशिखर सर करताना मार्कला अपघात झाला. तो बर्फात अडकला. त्याची तब्बल १३ दिवसांनंतर सुटका झाली, तेव्हा त्याचे...
  July 23, 01:30 AM
 • दैनिक दिव्य मराठीमध्ये 19 जुलै रोजी प्रसिद्ध झालेला मंदिरांच्या संपत्तीचे राजकारण हा लेख फारच भावला. या लेखामध्ये श्रुति गणपत्ये यांनी खरेच आपल्या धार्मिक रूढी-परंपरांविषयी सखोल माहिती दिली. आज संगणकाच्या युगात आपला देश व देशवासीय त्याच जुन्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यातच गुंतलेले आहेत. आज देशात दुष्काळ, कुपोषण, बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारख्या अनेक समस्या आहेत. त्यातच त्या धार्मिक रूढींमुळे देव-देवता, साधुसंत व देवळे मात्र कोट्यधीश झालेली आहेत. याबाबतचे वृत्त आपण रोज वाचतो आणि...
  July 22, 03:21 AM
 • स्वीडिश संगीतकार मॅग्नस बिर्गेर्सन यांना भारतीय संगीतवाद्यांनी भुरळ घातली असून ते वीणा, सतारीच्या प्रेमात पडले आहेत. वीणा, सतारवादनाची कला त्यांना अवगत असून त्यांनी आपल्या कार्यक्रमात भारतीय वाद्यांना महत्त्वाचे स्थान द्यायचे ठरवले आहे असे वृत्त दिव्य मराठीमध्ये वाचून बरे वाटले. भारतीय शास्त्रीय संगीत व वादनकलेला प्राचीन परंपरा आहे. या गायनाचे व वादनकलेचे एक शास्त्र आहे. आधुनिक काळामध्ये शास्त्रीय संगीताचे महत्त्व तिळमात्रही कमी झालेले नाही. भारतीय संगीताने विदेशी लोकांना...
  July 22, 03:19 AM
 • परभणी जिल्ह्यामध्ये 23 हजार बनावट शिधापत्रिका सापडल्याचे दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त नक्कीच खळबळजनक आहे. सप्टेंबर ते डिसेंबर 2010 या कालावधीत पुरवठा खात्याच्या वतीने बनावट शिधावाटप पत्रिका शोधमोहीम राबवण्यात आली होती. एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये जर इतक्या मोठय़ा प्रमाणावर बनावट शिधापत्रिका सापडत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची संख्या किती असेल, याची कल्पनाच करवत नाही. सार्वजनिक शिधावाटप यंत्रणा ही खरे तर या देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वरदानच आहे.मात्र...
  July 21, 12:09 PM
 • समाजात अनैतिक प्रवृत्ती सदैव डोके वर काढत असतात. त्यातूनच अनैतिक धंदे बोकाळतात. दिल्लीमध्ये देहव्यापार करणार्या एका रॅकेटचा भंडाफोड तेथील पोलिसांनी केल्याची बातमी दिव्य मराठी मध्ये वाचनात आली. त्या रॅकेटमधील कॉलगर्लला महिन्याला दीड लाख रुपये पगार मिळत होता हे वाचून जोरदार धक्का बसला. माणूस पैसे मिळवण्यासाठी इमानेइतबारे काम करण्याऐवजी चुकीच्या मार्गाला जातो. तो इतका घसरतो की आपल्या वाईट वर्तणुकीचा त्याला पश्चात्तापही वाटेनासा होतो. त्याचा मतलब असतो फक्त पैशापुरता. जगण्यासाठी...
  July 20, 01:57 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात