जाहिरात
जाहिरात
Home >> National

National

 • नवी दिल्ली - संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सोमवारी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था कायद्यात बदलाला सोमवारी मंजुरी देण्यात आली. या दरम्यान सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी भाजपचे गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यात चांगलीच जुंपली. लोकसभेत भाजप खासदार बोलत असताना ओवैसींनी मध्ये बोलण्यावरून शहांनी त्यांच्याकडे बोट दाखवून शांत राहण्याचे आवाहन केले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. नेमके काय घडले.... लोकसभेत एनआयए संशोधन विधेयकावर चर्चा सुरू होती. त्यावर...
  July 15, 05:30 PM
 • कोलकाता(पश्चिम बंगाल)- 5 दिवस समुद्रा उपाशी राहून आयुष्यासाठी केलेल्या संघर्षानंतर भारतीय मच्छीमाराला बांग्लादेशच्या एका जहाजाने वाचवले. पश्चिम बंगालच्या 24 परगना जिल्ह्यातील नारायणपूरचे रहिवासी रवींद्र नाथ दास आपल्या 14 साथीदारांसोबत मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले होते. काही वेळेनंतर त्यांचे जहाज वादळात अडकले, यात रवींद्रच्या भाच्यासोबत 13 क्रु मेंबरचा बुडून मृत्यू झाला. ते कसे-बसे एका लाकडी फळीच्या सहाय्याने 5 दिवस पाण्यात जिवंत राहून बांग्लादेशच्या किनारपट्टीजवळ पोहचले. येथे...
  July 15, 05:05 PM
 • ग्वाल्हेर(मध्यप्रदेश)- 41 वर्षांपासून 20 रुपयांच्या चोरीचा खटला शनिवारी नॅशनल लोक न्यायालयात संपला. खरतर, इस्माइल खानवर 1978 मध्ये 20 रुपये चोरल्याचा आरोप होता. जिल्हा कोर्टात 41 वर्षांपासून त्याची ट्रायल लांबणीवर पडली होती. कोर्टात उपस्थित न राहिल्यामुळे एप्रिलमध्ये त्यांना अटक करण्यात आले. त्याचा जामीन देणारा कोणीच नव्हता, त्यामुळे त्याला चार महिने तुरुंगात राहावे लागले. लोक न्यायालयाने शनिवारी फिरयादीला बोलवाले. कोर्ट म्हटले- प्रकरण 41 वर्षे जुने आहे. आरोपीदेखील चार महिने तुरुंगात...
  July 15, 03:52 PM
 • नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार कलराज मिश्र यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहे. कलराज मिश्र यांनी नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उतरण्यास नकार दिला होता. तर दुसरीकडे, हिमाचल प्रदेशचे विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रत यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना आता गुजरातच्या राज्यपाल पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी राज्यसभेचे माजी सदस्य ओपी कोहली राज्यपाल होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कलराज मिश्र यांनी निवडणूक लढवण्यास...
  July 15, 03:19 PM
 • यमुनानगर(हरियाणा)- एका महिलेने लग्नानंतर अनैतिक संबंध बनवले. यानंतर महिला गरोदर राहिली. सुरुवातील त्यांनी गर्भपात करण्याचा विचार केला, पण तसे करता आले नाही. प्रियकराने तिला लग्न करेल आणि होणाऱ्या मुलाचे संगोपण करेल अशी ग्वाही दिली, पण त्याने महिलेला आपल्या पतीला घटस्फोट देण्याची अट घातली. महिला यासाठी तयार झाली आणि कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यानंतर पती-पत्नी वेगळे झाले. त्यानंतर प्रियकराने लग्नास नकार दिला. आता त्या महिलेला तिच्या सासरले आणि माहेरचे, कोणीच स्विकारायला तयार...
  July 15, 01:16 PM
 • नवी दिल्ली - बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या आसारामच्या हाती निराशा लागली आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्या जामीनाचा अर्ज सोमवारी फेटाळून लावला. गुजरातच्या सुरत बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेल्या आसारामने जामिनाची मागणी केली होती. प्रकरणाच्या सुनावणीमध्ये गुजरात सरकारने त्याच्या जामीनाला विरोध केला. सुरत बलात्कारात आणखी 10 साक्षीदारांचे जबाब नोंदवणे बाकी आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आसारामने यापूर्वी गुजरात हायकोर्टात सुद्धा अर्ज जामीन आणि शिक्षेवर आक्षेप...
  July 15, 01:14 PM
 • नवी दिल्ली -महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती वर्षानििमत्त दिल्लीतील संसद परिसरात दोन दिवस स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. याचे नेतृत्व लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. पहिल्या दिवशी भाजप खासदारांनी परिसरात ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती तो परिसर स्वच्छच होता. तेथे कचरा नव्हता. यामुळे साेशल मीडियावर युजर्संनी या लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवली. झाडू पकडण्याच्या पद्धतीवरून खासदार हेमामालिनी साेशल मीडियावर ट्रोल झाल्या. लोकांनी म्हटले, मॅडमजी, आधी झाडू नीट धरायला तरी...
  July 15, 10:26 AM
 • भाेपाळ-आगामी पाच वर्षांत राम मंदिराचे निर्माण झाले नाही तर माेदी सरकारला संत समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे, असे कमलनाथ सरकारमध्ये राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या काॅम्प्युटरबाबांनी म्हटले आहे. मंदिराबाबत केंद्र सरकारला ठाेस निर्णय घ्यावा लागणार आहे, अन्यथा संत समाज त्यांच्याविराेधात जाईल ही गाेष्ट लक्षात घ्यायला हवी. रविवारी वृक्षाराेपण, पर्यावरण संरक्षण या विषयावरील बैठकीसाठी नामदेव दास त्यागी ऊर्फ काॅम्प्युटरबाबा येथे आले हाेते तेव्हा ते पत्रकारांशी बाेलत हाेते....
  July 15, 10:18 AM
 • पाटणा -नेपाळ, बिहार व ईशान्येकडील राज्यांची परिस्थिती पुरामुळे गंभीर बनली आहे. नेपाळमध्ये पाऊस व दरडी कोसळल्याने मृतांची संख्या ५० च्या घरात गेली. २५ लाेक जखमी तर ३५ बेपत्ता आहेत. पुरामुळे १० लाखांहून जास्त लोकांना फटका बसला. नेपाळमधील गंडक, बागमती, बुढी गंडक, लालबाकिया, कमला बलान, भूतही बलान, कोसी व महानंदेची पाणी पातळी वाढली. त्यामुळे पूर्व व पश्चिम चंपारण, कटिहार, मुजफ्फरपूर, सहरसा, सुपौल, भागलपूर, पूर्णियासह १० जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर झाली.बिहारमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या १२...
  July 15, 10:07 AM
 • जाेधपूर-भारतात दरराेज जेवढे भाेजन तयार केले जाते, त्यापैकी ४० टक्के अन्नाची नासाडी हाेते, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. वर्षभरात देशात ५० हजार काेटी रुपयांहून जास्त किमतीच्या भाेजनाचा अपयव्य हाेताे, असे कृषी विभागाने म्हटले आहे. विवाह भाेजनावळी, पार्ट्या, हाॅटेल-भाेजनालये इत्यादी ठिकाणी नासाडी हाेते. दुसरीकडे देशात लाखाे लाेकांना रात्र उपाशीपाेटी काढावी लागते. या समस्येवर ताेडगा काढण्यासाठी जयपूर शहरातून माेठा पुढाकार घेण्यात आला आहे. ताटात उष्टे टाकू नये यासाठी जागृती माेहीम...
  July 15, 09:58 AM
 • झुंझुनू-राजस्थानमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना वीज कपातीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कुसुम (शेतकरी ऊर्जा संरक्षण आणि उत्थान महाअभियान) योजना सुरू केली आहे. तीत सौर प्रकल्प उभारून शेतकरी स्वत: वीज तयार करून शेती करू शकतील. या योजनेत शेतकरी शहरांच्या धर्तीवर शेतात सौर प्रकल्प आणि सौर उर्जा उपकरणे लावतील तसेच अतिरिक्त विजेची विक्रीही करू शकतील. या योजनेत ७५ एचपी लोडपर्यंतचे शेतकरीही सहभागी होऊ शकतील. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ३० टक्के रक्कम केंद्र सरकार आणि ३० टक्के...
  July 15, 09:53 AM
 • बंगळुरू -कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकारवर बंडखोर आमदारांमुळे संकट कायम आहे. काँग्रेसने भाजपवर आपले आमदार फोडल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर आमदार एम. टी. बी. नागराज यांची समजूत काढण्याची पक्षाच्या नेत्यांचे प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे दिसत आहे. बंगळुरू येथून रविवारी मुंबईला रवाना होण्याआधी पक्षासोबत राहू, असे संकेेत...
  July 15, 09:50 AM
 • अहमदाबाद -अहमदाबादमध्ये रविवारी सायंकाळी एका अॅम्युझमेंट पार्कमधील झुलता पाळणा तुटल्याने त्यात बसलेल्या दोन लोकांचा मृत्यू झाला. या घटनेत १७ जण जखमी झाले असून त्यापैकी १४ जणांची प्रकृती गंभीर आहे. पाळण्याचा मुख्य शाफ्ट मध्यभागी तुटल्याने त्यात बसलेले ३१ जण सुमारे ६० फूट उंचीवरून खाली पडले. पोलिसांनी पाळण्याच्या संचालकाला ताब्यात घेतले आहे. हा अपघात कांकरिया लेक फ्रंट येथील अॅम्युझमेंट पार्कमध्ये घडला. डिस्कव्हरी नावाचा हा पाळणा घड्याळाच्या लंबकाप्रमाणे फिरतो. त्यात ३२ लोक बसू...
  July 15, 09:49 AM
 • कांकेर-छत्तीसगडमधील बस्तरच्या आदिवासी वृद्ध दांपत्याने आपल्या गरिबीची व्यथा लोकन्यायालयात ऐकवल्यानंतर न्यायाधीशाने या दांपत्याला न्याय देण्यासोबतच बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी रक्कम दिली तसेच घरून येण्या-जाण्याचे भाडेही त्यांना दिले. नक्षलवादग्रस्त असलेल्या कोलरिया या गावातील धन्नुराम दुग्गा (८०) हे पत्नी नथलदेई दुग्गा (७०) यांच्यासह बँकेची नोटीस मिळाल्यानंतर शनिवारी कांकेर जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये आले होते. त्यांनी गावात आपल्या लहानशा घराच्या...
  July 15, 09:34 AM
 • श्रीहरिकोटा -भारतासह जगाचे लक्ष लागलेल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान- २ मोहिमेचे प्रक्षेपण अवघ्या ५६ मिनिटे २४ सेकंदांआधी रोखण्यात आले. तांत्रिक अडचण निदर्शनास आली. मोहिमेला धोका उद्भवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इस्रोच्या वैज्ञानिकांनी प्रक्षेपण रोखण्याचा निर्णय घेतला. मोहिमेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती इस्रोचे जनसंपर्क अधिकारीगुरुप्रसाद यांनी दिली. सोमवारी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान - २ चे प्रक्षेपण करण्यात येणार होते. रविवारी...
  July 15, 07:34 AM
 • अहमदाबाद(गुजरात)- हिमाचलमध्ये इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. अहमदाबादच्या कांकरिया अम्यूझमेंट पार्कमध्ये झोपाळा तुटल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात झोपाळा तुटल्याने झाला. यात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर तत्काळ अग्नीशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे आणि सध्या बचावकार्य सुरू आहे. जखमी झालेल्या लोकांना...
  July 14, 08:29 PM
 • सोलन(हिमाचल प्रदेश)- येथे आज(रविवार) दुपरी जोरदार पावसामुळे तीन मजली इमारत कोसळली. यात 2 जणांचा मृत्यू झाला, तर 25 जण आत दबल्या गेल्याचा संशय. इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये ढाबा होता, यावेळी असम रायफल्सचे काही जवान चहा पिण्यासाठी आले होते, त्यामुळे जवानही यात अडकले आहेत. दरम्यान लष्कराचे 200 पेक्षा अधिक जवान, फायर ब्रिगेडच्या टीमने बचावकार्य सुरू केले ाहे. आतापर्यंत 18 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे, यात सेनेचे 10 जवान आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेवेळी इमारतीत 25 पेक्षा अधिक जण होते....
  July 14, 07:50 PM
 • अमृतसर - येथील वाघा-अटारी सीमेवर भारत आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी शीख बांधवांच्या करतारपूर कॉरिडोअरवर चर्चेसाठी रविवारी एकत्रित आले. शीख भाविकांची सुरक्षितता हा या चर्चेतील प्रमुख मुद्दा आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळात खलिस्तान समर्थक गोपाल सिंग चावला यांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, भारताच्या आक्षेपानंतर पाकिस्तानने प्रतिनिधींच्या यादीतून गोपालचे नाव वगळले. त्यानंतरच दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी चर्चेस सुरुवात केली. भारत आणि पाकिस्तान सीमेवर शून्य रेषेवर...
  July 14, 06:29 PM
 • नवी दिल्ली- आधीच एअरलाइंसवर आर्थिक संकट कोसळत आहे आणि त्यातच जेट अयरवेजचे झालेले मोठे नुकसान. मागील काही वर्षात भारतीय एअरलाइंसवर आर्थिक भार वाढवत आहे. याच्यापासून वाचण्यासाठी अनेक एव्हिएशन कंपन्या आपला खर्च कमी करण्यावर जोर देत आहेत. एअरक्राफ्ट उडवण्यासाठी येणाऱ्या एकून खर्चापैकी 40% फक्त फ्यूलसाठी लागतो. त्यामुळेच अनेक एव्हिएशन कपन्या घाटा कमी करण्यासाठी पेट्रोलची बचत करत आहेत. दिल्लीमध्ये सध्या दोन टॅक्सी बोटचा वापर होत आहेत. बंगळुरूमध्येही टॅक्सीबोटचा वापर सुरू झाला आहे....
  July 14, 04:19 PM
 • कीव्ह - भारतात केंद्रीय कॅबिनेटने नुकतेच लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर पोक्सो कायद्याला मंजुरी दिली. त्यामध्ये चिमुकल्यांचे शोषण करणाऱ्यांना कमाल शिक्षा फाशी दिली जाणार आहे. त्यातच युक्रेननेही लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नवीन कायदा केला. त्यामध्ये दोषी सापडणाऱ्यांना बळजबरी केमिकलचे इंजेक्शन देऊन त्यांना आयुष्यभरासाठी नपुंसक केले जाणार आहे. लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षा झाल्यानंतर हजारो कैदी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत....
  July 14, 02:57 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात