Home >> National

National

 • नवी दिल्ली: एखाद्या उद्योजकाचा उत्तराधिकारी कोण असू शकतो? अर्थातच त्याची मुले. भारतात ही परंपराच आहे. आधुनिक काळात मात्र ही मानसिकता बदलत चालली आहे. नव्या पिढीला आता घरच्याच उद्योगातील आयते चालून येणारे पद किंवा मोठेपणा सहजपणे मिळत नाही. त्यासाठी पुरेसा अनुभव आणि कौशल्य त्याला आत्मसात करावेच लागते. ही मानसिकता आता विविध कंपन्यांमध्ये रुजू लागली आहे.तज्ज्ञांच्या मते, बदलत्या काळात उद्योजकांच्या कुटुंबाची मानसिकताही बदलत चालल आहे. पिढीजात उद्योग असलेल्या कुटुंबातील मुले किंवा मुली...
  July 18, 04:43 AM
 • नवी दिल्ली: टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी माजी दूरसंचारमंत्री व द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांच्या चौकशीसाठी सीबीआयने लांबलचक प्रश्नावली तयार केली आहे. याच घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, माजी सचिव सिद्धार्थ बहुरा आणि रिलायन्स अनिल अंबानी समूहाचे महासंचालक गौतम दोशी यांनी पुन्हा चौकशी करण्यासाठी सीबीआयने न्यायालयाची परवानगी घेतली आहे.
  July 18, 04:42 AM
 • उज्जैन: काळे झेंडे दाखविणा-या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी मारहाण केल्याच्या कारणावरून येथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.मुंबई बॉम्बस्फोटांत हिंदू संघटनांचा हात असल्याबाबत वक्तव्य करणारे सिंह येथे दाखल होताच भाजयुमो कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी सिंह यांनी काही कार्यकर्त्यांना चापटा मारल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे दोन्ही पक्षाच्या...
  July 18, 04:35 AM
 • गुवाहाटी: मुसळधार पावसामुळे आसाममधील जुळे जिल्हे असलेल्या लखीमपूर व धेमाजी या परिसराला पुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. सुमारे दोन लाख लोकांना याचा फटका बसला. या घटनेत चार जणांना मृत्यू झाला असून २०० गावांना पुराने वेढले आहे. आसाममधील दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले असून यामुळे आलेल्या पुरात दोन्ही जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे संपर्क तुटलेल्या गावकयांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बचाव पथकाचे काम सुरू आहे. त्यासाठी विशेष मोटारबोटींचा वापर करण्यात येत...
  July 18, 03:52 AM
 • नवी दिल्ली : गोदामांच्या अपु-या संख्येमुळे व क्षमतेमुळे हजारो टन धान्याची नासाडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १९ राज्यांसाठी १५२ लाख टन धान्य क्षमतेच्या नव्या गोदामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये ७२.६५ लाख टन धान्याची साठवणूक खासगी संस्था, केंद्र व राज्य गोदाम महामंडळामार्फत केली जाणार असल्याचे सरकारने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. उर्वरित धान्यसाठ्यांबाबतचा निर्णय येत्या काही महिन्यांत घेतला जाणार असून वर्षभरात ही गोदामे अस्तित्वात येतील, असे...
  July 18, 03:51 AM
 • नवी दिल्ली: द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या कुटुंबातच उत्तराधिकारी नेमण्यावरून गंभीर स्वरूपाचे मतभेद निर्माण झाल्यामुळे पुढील आठवड्यात कोईम्बतूर येथे होणारी द्रमुकच्या कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक वादळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करुणानिधींचे पुत्र एम. के. स्टॅलिन आणि त्यांचा मदुराईस्थित भाऊ व केंद्रीय मंत्री एम. के. अलागिरी यांच्यातील उत्तराधिकारी बनण्यावरून निर्माण झालेला संघर्ष लपून राहिलेला नाही. टूजी स्पेक्ट्रम घोटाळा आणि एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा...
  July 18, 03:44 AM
 • नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीत राज्यसभा सदस्यांच्या निवासासाठी बहुमजली इमारत बांधण्यासाठी २३ झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यापैकी बहुतांश झाडे लिंबाची आहेत. तालकटोरा रोडवरील ६००० चौरस मीटर परिसरामध्ये बहुमजली इमारतीत राज्यसभा सदस्यांसाठी १४ आलिशान सदनिका आणि कर्मचायांसाठी २८ निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त जिमखानाही असणार आहे. २० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाया या निवासी संकुलात प्रत्येक सदनिकेमध्ये चार बेडरूम आणि दोन...
  July 18, 03:36 AM
 • नवी दिल्ली- तिहार तुरुंगात असलेल्या माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्यानंतर राष्ट्रकुल आयोजन समितीचे बडतर्फ अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यासह अनेक हायप्रोफाइल कैद्यांनी खचाखच भरलेल्या व्हॅनद्वारे तुरुंगातून न्यायालयामध्ये सुनावणीसाठी ने-आण करत असताना अन्य कैद्यांकडून हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त केली आहे. राष्ट्रकुल घोटाळ्याची सुनावणी करीत असलेल्या विशेष सीबीआय न्यायालयात कलमाडी यांनी ही भीती व्यक्त केल्यानंतर न्या. तलवंत सिंग यांनी कलमाडी आणि अन्य कैद्यांना सुनावणीच्या...
  July 18, 03:29 AM
 • नवी दिल्ली: कर्मचा-यांच्या बौद्धिक योगदानाचे मूल्यमापन करण्यासाठी 'कॉस्ट टू कंपनी'ची (सीटीसी) संकल्पना महत्त्वाची असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे सहायक प्राध्यापक टी. व्ही. राव यांनी म्हटले आहे. सीटीसी हे व्यक्तीचे मूल्य आणि अप्रत्यक्षरीत्या प्रतिभेच्या सकल मूल्यांकनाचे महत्त्वाचे साधन आहे. संघटनात्मक रचनेमध्ये आम्ही जेवढ्या उच्च पदावर असतो, तेवढे आमच्या वेळेचे मू्ल्य जास्त आहे, असे राव यांनी त्यांच्या ह्युर्कानॉमिक्स ऑफ टॅलेंट मॅनेजमेंट या पुस्तकात लिहिले आहे....
  July 18, 03:23 AM
 • उज्जैन- कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा टीका केली आहे. आरएसएसकडून बॉम्ब बनवणारे कारखाने चालविले जातात असा आरोपही त्यांनी केला. १३ जुलैला झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटाप्रकरणी देशातील हिंदू संघटनांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आरएसएस देशात दहशतवाद पसरवत आहे. हिंदू दहशतवादी संघटनांबरोबरच सगळयाच दहशतवादी संघटनांच्या भूमिकेविषयी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळेस...
  July 17, 10:04 PM
 • दिल्ली- सन २००८ सालच्या कॅश फॉर व्होट या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करून आज एकाला अटक केली आहे. खा.अमर सिंग यांना भाजपच्या खासदारांना लाच देण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून संजीव सक्सेना याला अटक करण्यात आली. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने कॅश फॉर व्होटच्या तपासाविषयी दिल्ली पोलिसांवर तोशेरे ओढले होते.२००८ साली केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीवरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी भाजपच्या खासदारांना एक कोटीची लाच प्रकरणात संजीव सक्सेनाचा संबंध असल्याचा आरोप...
  July 17, 07:58 PM
 • श्रीनगर- वीस लाख रूपयांची मुदत संपलेली बिस्किटे, चॉकलेट्स बाजारात पुन्हा विक्रीस नेताना जप्त करण्यात आली. दक्षिण काश्मीर मधील अनंतनाग येथील गोडाऊनमध्ये हे खाद्यपदार्थ पोलिसांना मिळाले.मुदत संपलेली बिस्किटे, चॉकलेट्स, हे बेकरी पदार्थ एका गोडाऊन मध्ये जमा करून बिस्किटावरील उत्त्पादीत केलेल्या मालाच्या तारखेमध्ये छेडछाड करण्यात येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या गोडाऊनवर छापा टाकला होता. या खाद्य पदार्थांची मुदत आधीच संपली होती आणि ती पुन्हा बाजारात विकण्यास नेण्याची...
  July 17, 06:59 PM
 • आनंद- पोलादी पुरूष सरदार पटेल जर आज असले असते तर निष्पाप लोकांचे बळी गेले नसते. बळी गेला असता तर तो अतिरेक्यांचा गेला असता. आज अतिरेकीच आपल्याला वरचढ ठरत आहेत. केंद्र सरकार अतिरेक्यांचा प्रतिकार करण्यास असमर्थ ठरत आहे असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. यावेळेस त्यांनी मानवधिकार संघटनेवरही टीका केली.देशाला दहशतवादाने पोखरले आहे, अशावेळेस मानवधिकार संघटना कोठे असते. जर एखादा अतिरेकी पोलिस चकमकीत मारला गेला तर लगेच मानव अधिकाराच्या चर्चा केल्या जातात. अतिरेक्यांना आपण माणूस कसे म्हणू शकतो....
  July 17, 06:16 PM
 • किशनगंज- मुंबईत १३ जुलै रोजी सायंकाळी झालेल्या तीन बॉम्बस्फोटांच्या तपासासाठी पोलिसांनी हुजी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.रियेल सरकार असे त्याचे नाव आहे. रियेलबरोबरच आकाश खान या संशयित तरुणाची चौकशी करण्यासाठी गुप्तचर विभागाचे पथक किशनगंज येथे पोहोचले असून हुजीशी संबंधित लोकांशी चौकशी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चौकशीसाठी किशनगंजला पोहोचणार आहे.दरम्यान मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही माध्यमातून संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. तसेच हे...
  July 17, 05:48 PM
 • मुंबई- मुंबईसोबतच गुजरातही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते, अशी खळबळजनक माहिती मिळाली आहे. अहमदाबाद आणि सुरत ही दोन महत्त्वाची शहरे दहशतवाद्यांच्या लक्ष्यस्थानी होती. अहमदाबाद येथे पोलिसांनी 10 गावठी बॉम्ब जप्त केले. त्यानंतर हा खुलासा झाला आहे. मुंबईमध्ये 13 जुलै रोजी 3 बॉम्बस्फोट झाले. त्याच दिवशी या दोन शहरांमध्ये स्फोट घडविण्याची दहशतवाद्यांची योजना होती. दोन्ही शहरांमध्ये तब्बल 17 बॉम्ब पेरण्याची योजना आखली होती. अहमदाबादमध्ये 10 बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरीत 7 बॉम्बचा शोध...
  July 17, 03:53 PM
 • नवी दिल्ली- येत्या आठ वर्षात देशात सात नवी शहरे वसविण्यात येणार आहेत. याबाबत केंद्र सरकारने एक योजना तयार केली आहे. तसेच ही योजना देशातील आतापर्यंतची सर्वाधिक महागडी ठरणार आहे. ही सात शहरे भारतातील सहा राज्यांत वसविली जाणार आहेत. २४०० चौरस किलोमीटर क्षेत्रात ही आधुनिक औद्योगिक केंद्र म्हणून ही शहरे विकसित केली जातील.हा पट्टा विकसित केल्यानंतर मॉरीशेससारखा दिसेल. मात्र, क्षेत्रफळाचा विचार केला असता तो मॉरिशेसपेक्षा मोठा ठरणार आहे. तसेच हा पट्टा देशातील पाच मोठ्या शहरां इतका असेल....
  July 17, 03:19 PM
 • तिरुवनंतपूरम- श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील अफाट संपत्ती ज्यांच्यामुळे जगासमोर आली त्या टी. पी. सुंदरराजन यांचा मृत्यू झाला. ते 70 वर्षांचे होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप होता. सुदरराजन यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळेच पद्मनाभ स्वामी मंदिरातील अफाट संपत्ती जगासमोर आली. मंदिरातील संपत्तीची सुरक्षा व जतन यासंबंधी पारदर्शकता यावी, यासाठी सुंदरराजन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. फेब्रुवारीमध्ये केरळ उच्च न्यायालयाने मंदिराचे व्यवस्थापन...
  July 17, 01:08 PM
 • नवी दिल्ली- सार्वजनिक उपक्रमासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचे फेरवाटप करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे भुखंड घोटाळ्यांना चाप बसणार आहे. जयपूरमधील गेल्या दोन दशकांपासून सुरु असलेल्या प्रकरणासंदर्भात न्यायालयाने निर्णय दिला आहे. राजस्थानातील भोजपूरा येथील जमिनीचे राजस्थान सुधार प्रन्यासतर्फे अधिग्रहण करण्यात आले होते. प्रन्यासने सुमारे 552 बिघा जमिन अधिग्रहित केली होती. जयपूर शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी ही जागा घेण्यात आली...
  July 17, 12:21 PM
 • दिल्ली - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामार्फत सुरू असलेल्या योजनेमध्ये २०१०-११ या वर्षी महाराष्ट्र राज्यात देशाच्या तुलनेत डाळीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. या कामगिरीची दखल घेऊन केंद्रातर्फे महाराष्ट्राला कृषी क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ डाळ उत्पादनासाठी कृषि कर्मण पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधानांच्या हस्ते राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला. हा पुरस्कार राज्यातील शेतक-यांना समर्पित करीत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.येथील राष्ट्रीय कृषि...
  July 17, 10:28 AM
 • अहमदाबाद- मॉडेलिंग क्षेत्रात नशिब आजमावण्यासाठी आलेल्या एका 20 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना अहमदाबाद येथे घडली. ही तरुणी अमरेली जिल्ह्यातील अमरेली गावातील राहणारी आहे. अहमदाबाद येथे आल्यानंतर तिची काजल नावाच्या एका तरुणीशी ओळख झाली. काजलने तिची राहण्याची सोय करुन दिली. परंतु, काजलच्याच प्रियकराने बलात्कार केल्याचे या तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याच्या एका मित्रानेही बलात्कार केल्याचा या तरुणीने आरोप केला आहे. काजल, तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राने या...
  July 17, 08:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED