Home >> National

National

 • नवी दिल्ली- रामदेव बाबांच्या समर्थनात भाजपाने राजघाट येथे आपले उपोषण सुरू केले आहे. उपोषणात सहभागी होण्यासाठी मोठया प्रमाणात कार्यकर्ते जमा होत आहेत. हे उपोषण उद्या संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालेल. आंदोलनाच्या मुद्यावरुन भाजप आणि कॉंग्रेस पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले आहेत. ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी आहे, असे गडकरी पत्रकार परिषदेत म्हणाले. या घटनेनंतर सरकारला सत्तेत राहण्याचा हक्क नाही. त्यांनी सांगीतले की, राजघाटावर सत्याग्रह करण्यासाठी सरकारला परवानगी मागितली आहे. परवानगी...
  June 5, 08:48 PM
 • नवी दिल्ली- रामदेव बाबांच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापराचा अण्णा हजारे यांनी निषेध केला. पोलिसांच्या या दंडेलशाहीचा अण्णांनी जालियानवाला बागेतील हत्याकांडाशी तुलना केली आहे. महिला, वयस्कर आणि मुलांवर केलेल्या लाठीमार अत्यंत घृणास्पद आहे असे अण्णा हजारे म्हणाले. रामदेव बाबांच्या समर्थनात ते जंतर-मंतर येथे ८ तारखेस उपोषणास बसणार आहेत.सरकारचे हे कृत्य लोकशाहीविरोधी आहे. उपोषण, आंदोलन करणे हे घटनेने सामान्य माणसाला दिलेले अधिकार आहेत. सरकार बळाचा गैरवापर करून असा...
  June 5, 08:10 PM
 • भोपाल- मध्यप्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने आठ अतिरेक्यांना रविवारी अटक केली. यामध्ये बंदी घातलेल्या सिमीचे ५ आणि इंडियन मुजाहिदीनच्या ३ अतिरेक्यांचा समावेश आहे.यातील ४ अतिरेक्यांना जबलपूरमधून आणि ४ अतिरेक्यांना भोपाळ मधील हबीबगंज रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले असे पोलिसांनी सांगितले.यामध्ये अहमदाबाद बॉम्बस्फोटातील तीन फरार आरोपींचा समावेश आहे.
  June 5, 07:03 PM
 • नवी दिल्ली- सरकारने बलाचा वापर करून रामदेव बाबांचे उपोषण मोडीत काढल्याचा निषेध अण्णा हजारे यांनी केला आहे. पोलिसी कारवाईचा अण्णांनी निषेध केला आणि हा लोकशाही वर झालेला हल्ला आहे असे सांगितले. लोकशाहीवर पडलेला हा काळा डाग आहे. पोलिसांनी उपोषण स्थळी मध्यरात्री जाऊन स्त्रीया, मुले यांना बेदम मारले, निष्पाप लोकांवर लाठीमार केला. हे चूकीचे आहे असे ते म्हणाले. उद्या होणाऱ्या लोकपाल विधेयक मसुदा समितीच्या बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकणार आहे असे अण्णा म्हणाले. आणि येत्या काळात सरकारला धडा...
  June 5, 05:32 PM
 • तेल कंपन्यांनी डिझेलच्या किमती वाढवण्याची मागणीबरोबरच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सल्लागार परिषदे(पीएमईएसी)ने डिझेलची किंमत लवकरात लवकर नियत्रंण मुक्त करावी अशी मागणी केली आहे. डिजेलची किंमत नियत्रंण मुक्त केल्यास डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार असून यामुळे सामान्यांची झोप उडणार आहे. सध्या तरी महागाईने सामान्य लोक होरपळले असून डिझेलच्या दरात वाढ झाली तर त्याचा दैनंजिन जीवनावर परिणाम जाणवणार आहे.
  June 5, 04:56 PM
 • हरिद्वार- शनिवारच्या रात्रीच्या घटनेची तुलना जालियानवाला हत्याकांडाशी करता येऊ शकेल. ही रात्र मी कधीही विसरू शकणार नाही, असे रामदेव बाबांनी माध्यमांशी बोलताना सागिंतले. पोलिसांनी स्त्रीया, मुलांनाही सोडले नाही. त्यांना फार वाईट वागणूक देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.भ्रष्टाचाराविरूध्द उपोषण सुरू केलेल्या रामदेव बाबांना पहिल्याच दिवशी अनेक संकटांचा सामना करावा लागला. पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर मला महिलांचे कपडे घालून पळून जावे लागले असे त्यांनी सांगितले. त्याच वेषात...
  June 5, 04:52 PM
 • डेहराडून- दिल्ली पोलिसांनी रामदेव बाबांवर दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील आदेश येईपर्यंत बाबांना दिल्लीमध्ये प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. बाबांच्या ३९ समर्थकांविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली मधील काही भागात १४४ कलम लागू करण्यात आले आहे.रामदेव बाबांच्या जीवितास धोका असल्यामुळे त्यांना संरक्षण पुरवण्यात येईल असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले.
  June 5, 04:12 PM
 • बाबा रामदेव यांच्यावर सात्यत्याने टीका-टिप्पणी करणारे कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग हे भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी सिंग यांच्यावर निशाना साधत म्हटले आहे कॉंग्रेसच्या या सरचिटणीसांनी अतिशय खालच्या स्तरावर जाऊन भाषा वापरली आहे तसेच अपमानितही केले आहे.जेटली पुढे म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस सिंग हे कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी लादेनला 'ओसामाजी' असे संबोधतात. तर योगगुरु बाबांना ते ठग असे म्हणतात. यावरुन असे दिसून येते की,...
  June 5, 04:11 PM
 • नवी दिल्ली:माझ्यावर आरोप करणार्या मंत्र्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी रामदेव बाबांनी केली. कालच्या लाठीमारानंतर एका महिलेला पक्षाघाताचा झटका आला. अनेक महिला गंभीर जखमी झाल्या असून माझ्या सचिवाचा पाय देखील मोडला आहे. अशी माहिती रामदेव बाबांनी पत्रकारांना दिली.भ्रष्टाचाराविरूध्द उपोषणाला बसलेले रामदेव बाबा पुन्हा दिल्लीत येणार आहेत. पण हे उपोषण दिल्लीमध्ये न करता दिल्लीच्या जवळ एनसीआर मध्ये करणार आहेत. पण उत्तर प्रदेश सरकारने रामदेव बाबांना नोएडा मध्ये उपोषण करण्यास...
  June 5, 02:33 PM
 • योगगुरु बाबा रामदेव यांचे भ्रष्ट्राचाराविरुध्दचे उपोषण केंद्र सरकारने उधळून लावल्यानंतर देशांतील त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरु केली आहेत. रविवारी सकाळपासून त्या-त्या शहरातील समर्थक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले आहेत. तर काहींनी चौका-चौकात आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत. रामदेव बाबा यांचे समर्थक जगभर काही कोटीच्या घरात आहेत. परदेशातही त्यांचे मोठे समर्थक असून तेथून बाबांच्या उपोषणास मोठा पाठिंबा मिळाला आहे. एकट्या अमेरिकेतून १७ शहरातून...
  June 5, 02:06 PM
 • गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकरवर टीकेचे झोड उठवली असून, रामलीला मैदानावर शांततेने चाललेल्या उपोषणात सरकारने रावणलीला केली असल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारच्या अंताची घटिका जवळ आल्याचे चिन्ह आहे.सरकारला धडा शिकवण्याची वेळ- अण्णा हजारेज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले, सरकारने केलेली ही घटना म्हणजे देशातील लोकशाहीला कलंक आहे. आता अशी आंदोलन करण्याची वेळ आली आहे की, सरकारला यातून चांगला धडा बसेल. तसेच देशातील...
  June 5, 12:43 PM
 • देहराडून- दिल्ली पोलिसांनी बाबा रामदेव यांच्यावर दंगा भडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रामलीला मैदानाजवळच्या भागासह दिल्लीतील अनेक ठिकाणी १४४ कलम लागू केले आहे. माहितीनुसार, बाबा रामदेव यांना पुढील आदेश मिळेपर्यंत दिल्लीत येण्यास मनाई करण्यात आली आहे.उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले, बाबा रामदेव यांच्या जीवाला धोका असून, त्यांना आमचे सरकार संपूर्ण सुरक्षा देईल. तिकडे दिल्लीत बाबांचे उपोषण जबरदस्तीने उधळून लावल्यानंतर पोलिस...
  June 5, 11:24 AM
 • रामदेव बाबांच्या आंदोलनावर केलेल्या कारवाईचा भारतीय जनता पार्टीने तीव्र निषेध केला आहे. याविरोधात भाजप देशभर 24 तास सत्याग्रह करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत सांगितले. हा लोकशाहीवर घाला आहे. या पक्ररणी पंतप्रधान आणि कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जाहिर माफी मागावी, अशी मागणी गडकरी यांनी केली आहे. देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना सत्याग्रह करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले आहे. ज्या प्रकारे सरकाने हे आंदोलन मोडीत काढले आहे,...
  June 5, 10:45 AM
 • सरकारने आंदोलन मोडून काढल्यानंतर कॉंग्रेसचे नेते सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी रामदेव बाबांवर पुन्हा हल्ला चढविला आहे. रामदेव बाबा हे ठक असल्याचा आरोप करुन त्यांनी सरकारने केलेल्या कारवाईचे जोरदार समर्थन केले. रामदेव बाबांनी कायदा मोडला आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. रामलीला मैदानावर पोलिसांनी योग शिबिरासाठी परवानगी दिली होती. परंतु, ते तिथे उपोषणाला बसले होते. हा पुर्णपणे पोलिसांचा विषय असून कॉंग्रेसचा या कारवाईसोबत कोणताही संबंध नाही, असे दिग्विजय सिंग...
  June 5, 10:30 AM
 • रामलीला मैदानावर रामदेव बाबांचे उपोषण मोडून काढल्याप्रकरणी सरकारवर टिका सुरु झाली आहे. लोकपाल विधेयक मसूदा समितीचे सदस्य शांती भूषण यांनी हा प्रकार आणीबाणीचे स्मरण करुन देणारा होता असे म्हटले आहे. हा प्रकार निषेधार्ह आहे. पंतप्रधानांना याचे उत्तर द्यावे लागेल. तर भारतीय जनता पार्टीनेही टिका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते राम माधव यांनीही टिका करतांना म्हटले आहे की, सरकार भ्रष्टाचाऱ्यांना घाबरली असून त्यांच्या दबावामुळेच बळजबरीने हे आंदोलन संपविले आहे. तर स्वामि...
  June 5, 09:31 AM
 • अतिशय नाट्यमय घडामोडींनंतर रात्री उशीरा पोलिसांनी रामदेव बाबांचा सत्याग्रह मोडून काढला. रामदेव बाबांना अटक होवू नये म्हणून त्यांच्या समर्थकांना बराच विरोध केला. परंतु, पोलिसांनी बलाचा वापर करुन बाबांना अटक केलीच. यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडेही फोडले. त्यामुळे बाबांना घेराव घालुन वाचविणारे समर्थक स्वैरभैर झाले. या सगळ्या घडामोडींची पहा सचित्र झलक . सरकारने विश्वासघात केला: रामदेव बाबांचा आरोप आता सिब्बलशी बोलणे नाही: रामदेव बाबा
  June 5, 08:54 AM
 • नवी दिल्ली: रामलीला मैदानावरील आंदोलन सरकारने मोडीत काढले असले तरीही उपोषण सुरुच राहणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींवर त्यांनी कडाडून टिका करतांना त्यांच्याच इशाऱ्यावरुन हल्ला झाल्याचा आरोप रामदेव बाबांनी केला आहे. हरिद्वारला पोहोचल्यानंतर त्यांनी पतांजली आश्रमात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. हा पुर्ण घटनाक्रम अतिशय भयानक होता, असे वर्णन रामदेव बाबा यांनी केले. कालची रात्र काळी रात्र होती. सोनिया गांधींना देशावर प्रेम नाही. महिला आणि लहान...
  June 5, 03:36 AM
 • नवी दिल्ली - बाबांच्या मागण्या आधीच मान्य करण्यात आल्या होत्या, असे मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने जारी झालेल्या अॅक्शन टेकन रिपोर्टमध्ये काळा पैसा राष्टीय संपत्ती जाहीर करण्याच्या दृष्टीने कायदा बनविण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचे आम्ही स्पष्ट केले होते. गैरसमजांमुळे बाबांपर्यंत हा निरोप पाहोचू शकला नाही, असेही ते म्हणाले. रामदेवबाबांचे सहकारी बालकृष्ण यांनी दिलेले पत्र सिब्बल यांनी माध्यमांना दाखविले. यात ४ ते ६...
  June 5, 03:31 AM
 • नवी दिल्ली: रामलीला मैदानावर पाच हजार पोलीस दाखल झाले असून त्यांनी रामदेव बाबांना घेराव घातला आहे.कुठल्याही क्षणी रामदेव बाबांना अटक होऊ शकते. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाकडून रामलीला मैदानावर योग शिबिराची परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला असून सुमारे पाच हजार पोलीस रामलीला मैदानावर दाखल झाले आहे. बाबांच्या समर्थकांमध्ये असंतोष पसरला असून हळूहळू परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. पोलीस मंचाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर बाबांच्या समर्थकांकडून...
  June 5, 02:40 AM
 • नवी दिल्ली - योगगुरू रामदेव बाबा यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनास देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. अमेरिकेतील १७ शहरांतील एनआरआयनी या उपोषणाचे समर्थन केले आहे.अमेरिकेतील १७ शहरातील हजारो एनआरआय उपोषणाला बसले आहेत. जगभरातूनही कोट्यवधी लोकांनी याचे समर्थन केले आहे, असे रामदेव बाबा यांनी आपल्या भाषणातून सांगितले. लंडनमध्ये १५० हून अधिक मंदिर-मस्जिदीमध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, कॅनडा, आॅस्ट्ेलिया या ठिकाणी...
  June 5, 02:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED