जाहिरात
जाहिरात
Home >> National

National

 • कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्याला आपल्या मुलीच्या अपहरण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुप्रभात बटव्याल असे त्यांचे नाव असून ते बीरभूम जिल्ह्यातील स्थानिक नेते आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बटव्याल यांनी आपल्या मुलीला गुरुवारी बंदूकीचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. दोन जिल्ह्यांतील पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोहिम राबवली. यानंतर रविवारी बीरभूमच्या रेल्वे स्टेशनजवळ त्या मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणात आणखी दोन जणांना सुद्धा अटक...
  February 18, 04:43 PM
 • सुरत - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तानविरुद्ध जनाक्रोष आहे. सोशल मीडिया असो की रस्ते सर्वत्र पाकिस्तानचा निषेध केला जात आहे. अशात सोशल मीडियावर पाकिस्तानच्या निषेधाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोकांनी कुठल्याही प्रकारची निदर्शने किंवा घोषणाबाजी न करता अनोख्या पद्धतीने आपला रोष व्यक्त केला. अनेकांना पाकिस्तानचा निषेध करण्याची ही पद्धत खूप आवडत आहे. सर्वांच्या पायाखाली तुडवण्यासाठी चौकात बनवला पाकिस्तानचा झेंडा सोशल मीडियावर शेअर केला जाणारा हा...
  February 18, 03:13 PM
 • कोटा - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले त्यातील एक हेमराज यांचा हा मुलगा. अवघ्या 5 वर्षांच्या या मुलाचा फोटो पाहून त्याच्या मनात काय सुरू असेल याचा अंदाजही आपण लावू शकणार नाही. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील मूळगावी हेमराज यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी आणला होता. यावेळी त्यांचा हा मुलगा ऋषभ एकटक त्याकडे पाहत होता. सुरुवातीला हे नेमके काय सुरू आहे याची जाणीव त्याला झाली नाही. मोठा मुलगा अजयने मुखाग्नी दिला. हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या अंत्यविधीमध्ये ऋषभला पाहून...
  February 18, 02:49 PM
 • गांधीनगर- गुजरातमधील नर्मदा जिल्हातील सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याचा एक ईमेल सुरक्षा यंत्रणेला मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्टॅच्यू अॉफ युनिटीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीसह गुजरातमधील अनेक प्रार्थनास्थळे आणि महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर हल्ला करण्यात येणार असल्याचे ईमेलमध्ये म्हटले आहे. या...
  February 18, 02:07 PM
 • श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यापासून 10 किमी दूर दहशतवादी आणि सैनिकांमध्ये जोरदार चकमक उडाली. यामध्ये भारतीय संरक्षण दलाचे 4 जवान शहीद झाले आहेत. सोबतच एका सामान्य नागरिकाचा सुद्धा जीव गेला. या परिसरात जैश-ए-मोहम्मदचे 2 ते 3 दहशतवादी दबा धरून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसरात घेराव टाकला होता. गेल्या 4 दिवसांत दहशतवादी हल्ला आणि चकमकीत 45 जवानांनी आपला जीव गमावला आहे. जैशचा कमांडर कामरानचा खात्मा...
  February 18, 11:59 AM
 • स्वातंत्र्याच्या वेळी काश्मीरमध्ये दोन तृतीयांश लोक मुस्लिम होते. शासक हिंदू होता. सौहार्द एवढे होते की,भारतात विलीनीकरणाची मागणी खोऱ्यातील चर्चित मुस्लिम नेते शेख अब्दुल्लांनी केली होती. स्वातंत्र्याआधी जम्मू-कश्मीर... २.१ लाख चौ. किमीतील या स्वतंत्र राजवटीचा राजा हिंदू स्वातंत्र्याआधी काश्मीर एक स्वतंत्र राज्य होते. २.१ लाख चौ. किमीच्या राज्यात डोगरा राजपूत वंशाचे राजा हरिसिंह यांचे शासन होते. डोगरा राजपूत राजांनी पूर्ण राज्य एक करण्यासाठी आधी लडाख जिंकले.नंतर १८४० मध्ये...
  February 18, 10:30 AM
 • बरौनी/हजारीबाग- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर ३ दिवसांत सहाव्यांदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. रविवारी त्यांनी बिहारच्या बरौनीत आणि झारखंडच्या हजारीबागमध्ये एकाच वेळी अनेक प्रकल्पांचा शुभारंभ केला आणि कोनशिला ठेवली. तसेच जाहीर सभाही घेतल्या. बरौनीत मोदींनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, तुमच्या आणि देशवासीयांच्या मनात क्षोभ आहे याची जाणीव मला आहे. जो क्षोभ तुमच्या मनात आहे तोच माझ्याही मनात आहे हे मी सांगू इच्छितो. मोदी म्हणाले की, रालोआ...
  February 18, 10:10 AM
 • चेन्नई- तामिळ चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले आहे. आपला फॅन क्लब रजनी मक्कल मंदरम(आरएमएम)च्या लेटरहेडवर जारी केलेल्या निवेदनात रजनीकांत यांनी चाहत्यांना सांगितले की, त्यांचे नाव व छायाचित्राचा वापर मते मागण्यासाठी केला जाऊ नये. रजनीकांत म्हणाले, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. आमचे ध्येय तामिळनाडू विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. त्यामुळे कोणीही माझे छायाचित्र किंवा आरएमएमच्या चिन्हाचा वापर...
  February 18, 10:07 AM
 • भुवनेश्वर- पाकिस्तान अतिरेक्यांना आश्रय देत असल्याचा आरोप गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केला. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दला(सीआरपीएफ)च्या ताफ्यावर झालेला हल्ला अतिरेक्यांतील नैराश्यातून झाला असल्याचे राजनाथ यांनी स्पष्ट केले. ते ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील रानीताल येथे विविध जिल्हास्तरीय बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, जम्मू-काश्मीर पोलिसांनी काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले...
  February 18, 10:03 AM
 • नवी दिल्ली/ श्रीनगर- पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांविरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. खोऱ्यातील सहा प्रमुख फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था, त्यांना देण्यात आलेल्या गाड्या आणि इतर सुविधा काढून घेण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनुसार, मीरवाईज उमर फारुक, अब्दुल गनी भट, बिलाल लोन, हाशिम कुरेशी, फजल हक कुरेशी आणि शब्बीर शहा या नेत्यांचा यात समावेश आहे. काश्मीरमधील विविध विचारप्रवाह असलेल्या संघटनांच्या नेत्यांना असलेला धोका लक्षात...
  February 18, 08:10 AM
 • नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर टेनिस स्टार सानिया मिर्झाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात असताना सानियाने यावर प्रत्युत्तर दिले. सोशल मीडियावर मला देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही. पुलवामा हल्ल्यामुळे समस्त भारतीयांइतकेच मलाही दु:ख झाले आहे, असे तिने म्हटले आहे. इन्स्टाग्रामवर सानिया म्हणाली, कुठलीही व्यक्ती दहशतवादाच्या विरोधातच असते. या दु:खाच्या प्रसंगी मी सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.
  February 18, 08:09 AM
 • भोपाळ- न्यायालयात एखादा गुन्हा सिद्ध झाला तर दोषीला तुरुंगवास किंवा दंड लावला जातो. पण मध्य प्रदेश हायकोर्टाच्या ग्वाल्हेर खंडपीठाचे न्यायमूर्ती आनंद पाठक यांनी शिक्षा देण्याची अनोखी पद्धत अवलंबली. दोषीला शिक्षा देण्यासह पर्यावरण समृद्धीचा वेगळा पायंडा त्यांनी पाडला. या कोर्टात दाखल होणाऱ्या याचिका, जामीन अर्जावर निर्देश देताना रोपटे लाऊन त्यांची देखभाल तसेच अनाथाश्रम, वृद्धाश्रमात सेवा कार्य करण्यास सांगितले जाते. एखाद्या प्रकरणात आदेश देताना त्यावर कोर्टाचा संदेश नमूद केलेला...
  February 18, 08:01 AM
 • चेन्नई - दाक्षिणात्य चित्रपट जगतातील सर्वात मोठे कलाकार रजनीकांत यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे. रजनिकांत सांगितल्याप्रमाणे, आगामी लोकसभा निवडणुकीत ते किंवा त्यांचा पक्ष उतरणार नाही. एवढेच नव्हे, तर कुणीही त्यांचा किंवा त्यांच्या पक्षाच्या चिन्हाचा वापर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करू नये. उल्लेखनीय बाब म्हणजे, रजनिकांत यांनी 31 डिसेंबर 2018 रोजी आपल्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली होती. कुणाचाही प्रचार किंवा समर्थन करणार नाही रजनीकांत यांचा राजकीय...
  February 17, 12:32 PM
 • नॅशनल डेस्क - जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. तसेच इतर अनेक जखमी जवान उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. त्याच जखमी जवानांपैकी एकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुद्धीवर येताच या जवानाने पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना प्रत्यक्षदर्शिनी सांगितली. अख्ख्या देशाला हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या काही सेकंदांपूर्वी काय घडले याची आपबिती त्याने मांडली. दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी अतिरेकी कसे आले आणि...
  February 17, 12:13 PM
 • नवी दिल्ली- दिल्लीच्या जलदगती न्यायालयाने एका व्यक्तीस अमेरिकी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. संयुक्त राष्ट्रातील कर्मचारी महिलेवर जून २०१३ मध्ये घरमालकाचा मुलगा रमेश पंवार याने ती पतीसोबत झोपलेली असताना डिजिटल बलात्कार केला होता. महिलेच्या गुप्तांगास हाताने छेडछाड करण्यास डिजिटल बलात्कार म्हटले जाते. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश इला रावत म्हणाल्या, आरोपीने केलेल्या कृत्यास ३ फेब्रुवारी २००३ रोजी भादंवि कलम ३७५ मध्ये बदलून तो बलात्कारच समजला जातो....
  February 17, 10:39 AM
 • बंगळुरू- फ्लाइट लेफ्टनंट हिना जायस्वालची भारतीय हवाई दलात देशाची पहिली महिला फ्लाइट इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. फ्लाइट इंजिनिअर म्हणून ती ऑपरेशनल हेलिकाॅप्टर युनिट्समध्ये कार्यरत असेल. हिना चंदिगडची रहिवासी असून ती म्हणाली, पहिली महिला फ्लाइट इंजिनिअर म्हणून निवड झाल्याने माझे स्वप्न साकार झाले आहे. मी लहानपणापासून सैनिकाचा वेश घालण्यापासून पायलट होण्याचे माझे स्वप्न होते. मला हवाई दलात मिळालेल्या कामावर खूप खुश आहे.काम करताना येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासही तयार आहे....
  February 17, 10:38 AM
 • नवी दिल्ली- भारताची सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये शनिवारी तांत्रिक बिघाड झाला. वाराणसीहून दिल्लीला परत येत असताना हा बिघाड झाला. ही गाडी रविवारपासून (१७ फेब्रुवारी) सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन झाले. शनिवारी वाराणसीहून रिकामी ट्रेन दिल्लीकडे परत येत होती. शनिवारी सकाळी पाच वाजता दिल्लीहून जवळपास २१५ किलोमीटर लांब इटावाजवळील चमरौला स्थानकाजवळ एक...
  February 17, 10:25 AM
 • नवी दिल्ली- पुलवामात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शनिवारी देशाने भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. जवानांच्या अंत्यदर्शनासाठी वेगवेगळ्या राज्यांत लाखोंच्या संख्येने गर्दी जमली. हातात तिरंगा घेऊन भारतमाता की जय, शहीद अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. प्रत्येक शहिदाच्या अंत्ययात्रेत एक-एक केंद्रीय मंत्री सहभागी झाला. ४० जवानांच्या अंत्ययात्रेत २० ते २५ लाख नागरिक सहभागी झाले. देशात शहीद झालेले ४० जवान १६ राज्यांतील आहे. त्यात सर्वाधिक १२ उत्तर प्रदेशातील...
  February 17, 10:18 AM
 • नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामाची घटना गुप्तचर व्यवस्थेचे अपयश असल्याचे मान्य केले आहे. दुसरीकडे, हल्ल्याच्या आठवडाभर आधीच ८ फेब्रुवारीला काश्मीर पोलिस महानिरीक्षकांनी संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याचे गुप्तचर इनपुट जारी केले होते. एक्स्ट्रीमली अर्जंट शीर्षकाने जारी केलेले एक पत्रक प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचले आहे. सुरक्षा दलाने तैनातीआधी आपल्या ठिकाणांची चांगली तपासणी करावी. कारण, आयईडीच्या साहाय्याने हल्ल्याची माहिती मिळाल्याचे त्यात...
  February 17, 09:29 AM
 • नवी दिल्ली/मुंबई- अहमदाबादचे ६४ वर्षीय अशोक यांची ओळख आता स्मृती अशी आहे. (दोन्ही नावे बदलली आहेत.) त्यांनी वयाची साठी पार केल्यानंतर शस्त्रक्रिया करून महिला म्हणून एक नवी ओळख मिळवली आहे. स्मृती यांनी आपल्या डॉक्टरांना सांगितले की, मला बालपणापासूनच माझे शरीर आवडत नव्हते. मला महिला म्हणून राहायचे आहे याची जाणीव मला खूप आधीपासूनच झाली होती. जीवनातील ६४ वर्षे मी घुसमटीतच काढली. शस्त्रक्रिया केल्यानंतर आता साडेसहा दशकांनी मला पूर्णत्व मिळाल्याचा अनुभव येत आहे. हे तर फक्त एक उदाहरण झाले. आता...
  February 17, 09:08 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात