जाहिरात
जाहिरात
Home >> National

National

 • न्यूज डेस्क - बिहारच्या पाटण्यात सासरच्या मंडळींनी एका नवविवाहितेची फक्त एका सोन्याच्या चेनसाठी गळा दाबून हत्या केली. मृत विवाहितेचे नाव रूपा कुमारी आहे. रूपा यांचे लग्न सात महिन्यांपूर्वी झाले होते, परंतु हुंड्याच्या लोभापायी त्यांनी तिची हत्या केली. रूपाचे वडील जितेंद्र पासवान म्हणाले की, लग्नादरम्यान त्यांनी ऐपतीपेक्षा जास्त हुंडा देऊन लग्न लावले होते. यानंतरही फक्त सोन्याच्या एका चेनसाठी त्यांनी मुलीची हत्या केली. ही घटना रानीतालाबमधील धाना गावातील आहे. पोलिसांनी मृतदेह...
  January 10, 03:32 PM
 • नवी दिल्ली - एखाद्या महिलेने आपल्या पतीला लोकांसमोर चापट मारल्यास ते आत्महत्येचे कारण असू शकत नाही. एका महिलेवर आपल्या पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे आरोप लागले होते. परंतु, दिल्ली हायकोर्टाने तिची निर्दोष मुक्तता केली. याच दरम्यान झालेल्या सुनानणीत कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे. जस्टिस संजीव सचदेवा यांनी दिलेल्या निकालानुसार, सामान्य परिस्थितीत इतरांसमोर एखाद्या व्यक्तीने आपल्याला चापट मारल्याने कुणी आत्महत्येचा विचार करणार नाही. चापट मारल्यास आत्महत्येसाठी...
  January 10, 12:44 PM
 • केवडिया- गुजरातच्या स्टॅच्यूू ऑफ युनिटी स्थापन झाल्यानंतर प्रथमच पुतळ्याच्या परिसरात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात देश-विदेशातील १०५ पतंगबाजांनी सहभाग नोंदवला. पतंगबाजांनी वेगवेगळ्या आकाराचे व डिझाइनचे पतंग उडवले. मंगळवारी आकाशात मोठमोठ्या फुलपाखरांपासून ते घाेडे, बलून, फळे व विविध आकाराचे पतंग उडताना दिसत होते. या वेळी स्पर्धकांनी एकमेकांचे पतंग कापले. या स्पर्धेत जिंकण्यासाठी आपल्या आवडत्या पतंगविक्रेत्याकडून पतंग तयार करवून घेतले जातात. या...
  January 10, 11:32 AM
 • लखनऊ- उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पार्टी (बसपा), समाजवादी पार्टी (सपा) आणि अन्य प्रादेशिक पक्ष मिळून मकरसंक्रांतीच्या दिवशी १५ जानेवारी राेजी महाआघाडीची घोषणा करू शकतात. ही महाआघाडी राज्यातील राजकारणास नवीन वळण देणार आहे. १५ जानेवारी राेजी मकरसंक्रांतीच्या दिवशी प्रयाग येथे कुंभाचे पहिले शाही स्नान आहे. त्याच दिवशी मायावती यांचा ६३ वा वाढदिवस अाहे. तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची पत्नी खासदार डिंपल यादव यांचा ४१ वा वाढदिवस आहे. यामुळे १५ जानेवारी राेजी महाआघाडीची...
  January 10, 11:16 AM
 • नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बुधवारी तारीख निश्चितीवर निर्णय दिलेला नाही. या प्रकरणात नियमित सुनावणीसाठीची याचिका अॅड. हरिनाथ राम यांनी नोव्हेंबर महिन्यात दाखल केली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे, सुनावणी घेणाऱ्या 5 सदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश यू.यू. ललित यांनी सुनावणीतून माघार घेतली आहे. 29 जानेवारीला नवीन खंडपीठ करणार सुनावणी अलाहाबाद हायकोर्टाच्या सप्टेंबर 2010 च्या...
  January 10, 10:59 AM
 • नवी दिल्ली- खुल्या प्रवर्गास आर्थिक आधारावर शिक्षण व सरकारी नोकऱ्यांत १०% आरक्षण देणाऱ्या घटनादुरुस्तीस संसदेने मंजुरी दिली. १० तास चर्चेनंतर १२४वे घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. बाजूने १६५, तर विरोधात ७ मते पडली. लोकसभेत हे विधेयक मंगळवारी ९२% बहुमताने मंजूर केले होते. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. २९ पैकी २७ पक्षांनी विधेयकाला पाठिंबा दिला, तर दोन पक्षांचा विरोध केला. द्रमुक, माकप व भाकपने विधेयक सलेक्ट कमिटीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. तो १८...
  January 10, 07:32 AM
 • बुरहानपूर- शासकीय उत्कृष्ट स्कूल धुलकोटमध्ये मुलीच्या दारू पिण्याचा व्हिडीओ वाट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडोओ पाहून गावातील युवक आणि कुटुंबीयांनी शाळेत जाऊन खुप हंगामा केला. शाळेच्या प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत तरी विद्यार्थ्यांवर लक्ष नाही. यांत पूर्ण जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यानंतर शाळेने असा प्रकार पुन्हा होणार नाही असे सांगितले. स्कूलमध्ये 32 सीसीटीवी कॅमरे - मिळालेल्या माहितीनुसार स्कूलमध्ये 32 सीसीटीवी कॅमरे लावलेले आहेत. प्रत्येक क्लासमध्ये दोन...
  January 10, 12:04 AM
 • रायपूर(छत्तीसगढ)- राजधानी रायपूरमध्ये पोलिसांनी एका अशा गँगला पकडले आहे, जे अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रूपये लुबाडायचे. हैराणीची बाब म्हणजे या गँगमधले बहुतेक मुल हे स्वत: विद्यार्थी आहेत. जेव्हा या गँगने एका मोठ्या व्यवसायीकाच्या मुलीवर हात टाकला तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी गँगच्या लीडरसोबतच इतर 4 मुलांना अटक केले आहे. गँगच्या लीडरचे नाव आदर्श आग्रवाल आहे. पोलिसांनी सांगितले की, रायपूरमध्ये राहणाऱ्या एका मोठ्या व्यवसायीकाची 15 वर्षीय मुलगी 10वीत...
  January 10, 12:03 AM
 • कोलकाता (प. बंगाल) - कोलकात्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे हुंड्याच्या लोभापायी नराधमांनी कथितरीत्या महिलेचा फक्त छळच केला नाही, तर पतीसहित कुटुंबातील इतरांनीही तिच्यावर बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडितेचा पती आणि दिराला अटक... कोलकात्याच्या बेलीगुंगे पार्कमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा कथितरीत्या रेप केल्याप्रकरणी...
  January 10, 12:02 AM
 • तिरूवनंतपुरम- केरळमधून 23 दिवसांच्या बाळाच्या खतन्याचे प्रकरण समोर आले आहे. खतना करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा प्रायव्हेट पार्ट गंभीर जखमी झाला. त्यानंतर बाळाच्या उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांना खुप पैसा खर्च करावा लागला, नंतर त्यांनी राज्य मानवाधिकार आयोगात मदत माहितली आहे. त्यानंतर आयोगाच्या तपासात कळाले की, ज्या रूग्णालयात बाळावर सर्जरी झाली त्यात खुप कमी सुविधा होत्या त्यामुळे आता आयोगने राज्य सरकारला त्या कुटुंबाला 2 लाख रूपये देण्याची मागणी केली आहे....
  January 10, 12:02 AM
 • पंचकुला (चंदिगड) - मोरनी एरियात एका रिसॉर्टच्या बॅक साइडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीची गळा दाबून हत्या आणि दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. पोलिस चौकशीत खळबळजनक खुलासा झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, इस्लामचा मर्डर त्याच्याच पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्येचा खुलासा मोबाइल कॉल, लोकेशन आणि महिलेच्या बांगड्यांवरून झाला आहे. याबाबत चंडीमंदिर पोलिस ठाण्याचे प्रभारी नवीन कुमार म्हणाले की, या केसचा उलगडा करण्यात आला आहे. आरोपी पत्नीला अटक...
  January 10, 12:01 AM
 • नवी दिल्ली- मुलाच्या हव्यासापोटी 19 वर्षीय मुलीने लहान मुळ चोरले. ते मुल तिने रस्त्यच्या किन्याऱ्यावर आपले मुल पाळणाऱ्या महिलेकडून. मागच्या महिन्यात संसद मार्गाच्या परिसरात 19 वर्षीय मुलगी लहान बाळाला चोरून घेऊन गेली. पोलिसांनी त्या मुलीला आणि बाळाला शोधून काढले आणि बाळाच्या आईकडे सुपूर्द केले. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपी सपना(19) आणि अजीत सिंह(45) यांना ताब्यात घेतले आहे. अजीतच्या पत्नीचे निधन झाले आहे, त्यामुले मुलीला त्याच्यासोबत राहायचे होते आणि त्यामुळेच तिने बाळाला चोरल्याचे...
  January 10, 12:01 AM
 • नवी दिल्ली - हायप्रोफाईल निवड समितीच्या सदस्यत्वातून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई बाहेर पडले आहेत. सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मा यांना पुन्हा सीबीआयच्या संचालकपदी विराजमान करण्याचा निर्वाळा दिला. सोबतच, केंद्र सरकारने वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश सुद्धा रद्द केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जारी केलेल्या निकालात एका आठवड्याच्या आत हायप्रोफाईल निवड समितीवर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी सोपविली...
  January 9, 01:04 PM
 • इंदुर- बाल विनय मंदिर स्कूलमधून रिटायर्ड 90 वर्षीय शिक्षक रवींद्र जोशी आणि 86 वर्षीय कल्पना जोशी यांचे 65 वर्षांचे अतुट नाते होते. त्या दोघात इतके प्रेम होते की, एकाला काही व्हयाचे तर दुसरा खाने-पीणे सोडायचा. तीन-चार दिवसांपूर्वी पण असेच झाले. घरात असताना पत्नी पडली, म्हणून त्यांना एका खासगी रूग्णालयात भर्ती केले, तब्येत जास्ती खराब झाली म्हणून आयसीयूत भर्ती करावे लागले. पतीला याची माहिती मिळताच त्यांनीही अन्न-पाणी सोडले. त्यांनतर त्यांचीही तब्येत खराब झाली आणि त्यांनाही आयसायूत भर्ती करावे...
  January 9, 12:57 PM
 • राजकोट(गुजरात)- 22 दिवसांपूर्वी गायब झालेल्या युवकाच्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. एका डॉक्टरने आपल्या दोन साथिदारांसोबत मिळून युवकाला मारहाण केली होती. डॉक्टरचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला होता, आणि त्यामागे या युवकाचा हात असल्याचा संशय होता. - पिडीत युवक डॉक्टराच्या रूग्णालयात काम करत होता. युवकाने डॉक्टरांच्या अनैतिक संबंधांचे माहिती डॉक्टरच्या पत्नीला दिली होती. - 22 दिवसांपूर्वी युवक मयुर मोरीच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला...
  January 9, 12:53 PM
 • भोपाळ- घटस्फोटाच्या 3 वर्षानंतर माहिलेचे मन बदलले आणि तिने पतीसोबत राहण्यासाठीचा अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणला दिला. प्राधिकरणने या प्रकरणात काउंसलिंग करण्यासाठी पतीला बोलवले. काउंसलिंगच्या पूर्वी पतीने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. पतीचे म्हणने आहे की, पत्नीमुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला तरूंगात जावे लागले होते. यामुळे आर्थिक आणि मानसीक छळ झाला. पतीने दुसरे लग्न केलेल नाहीये त्यामुळे त्यांच्यात काउंसिलींग करून त्यांच्या लग्नाचे प्रयत्न केले जात आहेत. आई, भाऊ आणि...
  January 9, 11:56 AM
 • चित्तोडगड- बांद्रा-उदयपूर रेल्वेत सोमवारी सकाळी स्लीपर कोचमध्ये झोपेत असलेल्या एका प्रवाशाच्या उशाखाली ठेवलेली आठ किलो सोन्याची सुमारे अडीच कोटी रुपयांची बॅग चाेरल्यानंतर चोरट्याने धावत्या रेल्वेतून खाली उडी मारली. ही घटना राजस्थानच्या निंबाहेडाजवळ घडली. तेव्हा रेल्वेचा वेग कमी होता. चोरट्याला या बॅगमध्ये किमती ऐवज असावा, याची कल्पना होती. हा चोर मुंबईपासून प्रवाशाच्या मागावर असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात माहिती अशी की, मुंबईतील रणजी स्ट्रीट जोहरी बाजार, चर्नी...
  January 9, 10:51 AM
 • नवी दिल्ली - 2019 लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान करा असे स्वेटशर्ट येथे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर संसद परिसरात मंगळवारी नमो अगेन असे लिहिलेले स्वेटशर्ट घालून पोहोचले. त्यांनी अशा प्रकारची हूडी घालताना हूडी चॅलेंज सुद्धा दिला. सोशल मीडियावर फक्त भाजप समर्थकच नव्हे, तर पंतप्रधान मोदींना सुद्धा हा स्वेटशर्ट खूप आवडला आहे. पीएम मोदींनी ठाकूर यांचे ट्वीट रीट्वीट करून चांगले दिसत...
  January 9, 10:46 AM
 • नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सॉलबर्ग यांच्यात मंगळवारी द्विपक्षीय चर्चा झाली. भारताने सागरी क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात गुंतवणुकीचे नॉर्वेला निमंत्रण दिले. उभय नेत्यांच्या बैठकीत भारत-नॉर्वे यांच्यातील संबंधांचा आढावा घेण्यात आला. दोन्ही देशांतील सहकार्य क्षेत्र वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांत समाधानकारक चर्चा झाली. त्यातही मुख्य भर हा सागरी अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यावर होता. भारत-नॉर्वे यांच्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील...
  January 9, 10:40 AM
 • नवी दिल्ली- लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक-२०१६ मंगळवारी पारित झाले. विधेयकात पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानच्या हिंदू, जैन, ख्रिश्चन,शीख, बौद्ध व पारशी लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. भारतात किमान सहा वर्षे राहण्याची त्यासाठी अट आहे. पूर्वी ही मर्यादा १२ वर्षे होती. नागरिकत्त्वासाठी कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावर निवेदन केले. हे विधेयक राज्यघटनेच्या विरोधात नाही. उलट आपल्या तीन शेजारी देशांतील...
  January 9, 10:36 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात