Home >> National

National

 • लखनौ - भारतासह जगभरात दिवाळी साजरी होत असताना एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशात एका अवघ्या 3 वर्षांच्या मुलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि आग लावली. चिमुकली इतकी गंभीर जखमी झाली की तिचे दोन्ही गाल फाटले. पीडितेच्या मुलीने सांगितल्याप्रमाणे, गावातच राहणारा एक युवक त्या मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि तिच्यासोबत असे कृत्य केले. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. गालांवर लागले 50 टाके... सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना 3 वर्षांची मुलगी...
  November 9, 03:11 PM
 • मॉस्को / नवी दिल्ली - रशियातील राजधानीत शुक्रवारी बहुराष्ट्रीय अनौपचारिक शांतता चर्चा आयोजित करण्यात आली. यामध्ये भारत, पाकिस्तान आणि चीनसह तालिबानी शिष्टमंडळाचा देखील समावेश आहे. रशियाकडून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत भारत आणि तालिबान एकाच व्यासपीठावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशियाच्या बहुराष्ट्रीय बैठकीत 9 नोव्हेंबर रोजी तालिबान येणार असल्याची माहिती आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले आहे. अफगाणिस्तानात शांततेला प्राधान्य भारत या बैठकीत...
  November 9, 12:00 PM
 • नवी दिल्ली- नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकल सर्कल या संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात बहुतांशी लोकांनी काळ्या पैशाचे व्यवहार पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे नमूद केले आहे. यात ३९ टक्के लोकांनी दैनंदिन व्यवहारात ५० ते १०० टक्के व्यवहार विनापावत्याच झाल्याचे नमूद केले आहे. तर १८ टक्के लोकांनी हे प्रमाण २५ ते ५० टक्के राहिल्याचे नमूद केले आहे. ३७ टक्के लोकांनी हे प्रमाण ५ ते २५ टक्के दरम्यान राहिल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, संपत्तीच्या खरेदीतही ५० टक्के लोकांनी २५...
  November 9, 08:41 AM
 • दंतेवाडा- छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच नक्षलवाद्यांनी गुरुवारी मोठा हल्ला केला. नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात आयईडी स्फोट घडवून सीआयएसएफची बस उडवून दिली. त्यात एक जवान शहीद झाला असून तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात सात जवान जखमी झाले असून त्यापैकी तीन जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात गेल्या सात दिवसात केलेला हा दुसरा हल्ला असून या हल्ल्यामुळे छत्तीसगड हादरून गेलं आहे....
  November 9, 08:08 AM
 • नवी कार खरेदी करणे हा प्रत्येकसाठी खास अनूभव असतो. कार खरेदी करताना अशा काही बाबी असतात ज्या तुम्हाला माहित असणे आवश्यक अाहे. कित्येकदा डीलर्स या बाबी ग्राहकांपासून लपवून ठेवतात. अशात तुम्ही जागरुक असणे महत्त्वाचे ठरते. विशेषकरुन नवीन कार खरेदी करताना काही गोष्टींबद्दल माहिती असायलाच हवी. यामध्ये प्री डिलिव्हरी इंस्पेक्शनपासून ते डिस्काऊंट पर्यंतचा समावेश आहे. प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन फेस्टीव्हल सिझन असताना शोरुममध्ये कार खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. अशावेळी...
  November 9, 12:09 AM
 • न्यूज डेस्क - ग्रेटर नोएडाच्या दनकौन परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून वाचवण्यासाठी तक्रार दाखल केली. रडतच पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या व्यक्तीन पोलिसांकडे न्यायाची मागणी करत म्हटले की, साहेब, माझी पत्नी माझ्याकडून घरातील कामे करवून घेते. कपडे धुवून घेते. जेवण बनवायला लावते आणि फरशीही पुसायला लावते. तिला नकार दिल्यावर ती हुंड्यासाठी छळाच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देते. यामुळे त्रस्त होऊन मला नोकरीही सोडावी लागली. हे प्रकरण नुकतेच समोर आले. परंतु यापूर्वी अशा...
  November 9, 12:07 AM
 • युटिलिटी डेस्क - कोणतीही व्यक्ती प्रॉपर्टी खरेदी करताना आपल्या मेहनतीची एक मोठी कमाई त्यात गुंतवत असते. त्यामुळे जी प्रॉपर्टी खरेदी केली जात आहे, तिची वैधता पूर्णपणे तपासणे अत्यंत गरजेचे होऊन जाते. म.प्र. हायकोर्टातील अॅडव्होकेट संजय मेहरा सांगतात की, जर तुम्ही एखाद्या टाउनशिपमध्ये प्रॉपर्टी खरेदी करत आहात आणि तेथे सर्व बँका लोन देण्यासाठी तयार आहेत तर तेथे मोठी रिस्क नाही असे समजायला हरकत नाही. कारण बँका कोणत्याही टाउनशिपमध्ये तेव्हाच लोन देतात जेव्हा तेथील टाइटल (स्वामित्व) आणि...
  November 9, 12:02 AM
 • गुरुग्राम - ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्याचा एका युवकाला इतका राग आला की त्याने आपल्याच गाडीला आग लावली. गुरुग्रामच्या रेलवे रोड परिसरात मंगळवारी दुपारी एक बाइकस्वार युवकाला पोलिसांनी चेकिंगसाठी अडवले होते. त्यावर तो इतका भडकला होता. मूक दर्शक होऊन पोलिसांना हे दृश्य पाहावे लागले. यानंतर युवक घटनास्थळावरून निघून गेला. ट्रॅफिक पोलिस निरीक्षक रमेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या युवकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी युवक दुग्ध विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला पोलिसांनी...
  November 8, 12:44 PM
 • हैदराबाद - येथील एका वयोवृद्ध महिलेला काही वर्षांपूर्वी तिच्या सुनांनी घराबाहेर हकलून दिले. मुलांनीही साथ सोडल्याने तिच्याकडे भीक मागून पोट भरण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता. तेव्हापासूनच ती ठिक-ठिकाणी थांबून पैसे मागून जगत होती. परंतु, याच माध्यमातून तिने इतका पैसा गोळा केला की आज ती लखपती बनली आहे. पोलिसांनी भिकाऱ्यांच्या ठिकाणावर धाड टाकल्यानंतर या महिलेची झडती घेतली. तेव्हा तिच्या गाठोड्यातून लाखो रुपये कॅश आणि दागिने सापडले आहेत. एकेकाळी होते स्वतःचे घर भिकारीचे आयुष्य...
  November 8, 12:27 PM
 • नवी दिल्ली- देशातील रिअल इस्टेटमध्ये खासगी क्षेत्रातील गुंतवणूक २०२६ पर्यंत वाढून ७.३ लाख कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. याचा सर्वाधिक फायदा प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील शहरांना मिळेल. या क्षेत्रात या वर्षी जानेवारी ते ऑगस्टदरम्यान खासगी क्षेत्रातील गुंतवणूक २२ हजार कोटी रुपयांपर्यंत राहिली. इंडो-युरोपियन बिझनेस फोरमने (आयईबीएफ) यासंदर्भातील अंदाज व्यक्त केला आहे. नुकतेच लंडनमध्ये एक संमेलन झाले. यात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात गतीने वाढणाऱ्या क्षेत्रात रिअल इस्टेट...
  November 8, 10:27 AM
 • नवी दिल्ली- राजधानी दिल्लीचा श्वास प्रदूषित हवेमुळे कोंडले जात आहेत. दिल्लीकरांची दिवाळी पहाट प्रदूषणाने आणखीनच नकोशी करणारी ठरली. हवेची गुणवत्ता जास्त खालावल्याने परिस्थिती वाईट बनली आहे. बुधवारी दिल्लीत सकाळी हवेची गुणवत्ता पातळी २६८ एवढी नोंदवण्यात आली होती. ती अतिशय वाईट मानली जाते, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली. त्या अगोदर दिल्लीत हे प्रमाण २७६ वर दिल्लीतील २८ भागांत हवेतील प्रदूषक घटकांचे प्रमाण वाढल्याने शुद्ध हवेचा अभाव आढळून आला आहे. ही गंभीर स्थिती...
  November 8, 10:03 AM
 • अयोध्या- जेथे रामललाची मूर्ती आहे तिथेच त्यांचे जन्मस्थानही आहे, अशीटिप्पणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी येथे श्रीराम जन्मभूमीला भेट देऊन रामललाचे दर्शन घेतले आणि राज्याच्या सुख-समृद्धीसाठी वरदान मागितले. योगी म्हणाले की, जेथे रामलला विराजमान आहेत तीच त्यांची जन्मभूमी आहे. आमचे सरकार अयोध्येचा विकास करण्यासाठी सतत काम करत आहे. भगवान श्रीराम यांचे भव्य मंदिर अयोध्येत बांधले जाईल. हे एक घटनात्मक प्रकरण आहे आणि ते...
  November 8, 10:02 AM
 • रांची- आतापर्यंत मुले ए फॉर अॅपल, बी फॉर बॉल व सी फॉर कॅट.. अशी वर्णाक्षरे शिकत होते. पण लवकरच ते ए फॉर अर्जुन, बी फॉर ब्रह्मा व सी फॉर कावेरी अशी वर्णाक्षरे शिकतील. कांचीपुरम येथील पीठात शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. नव्या अभ्यासक्रमाचा उद्देश मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख पटलेली नाही. यासाठी पीठाने भारतातील नद्या, रामायण, महाभारत व वेदांतील पात्रांचा या...
  November 8, 09:24 AM
 • अमृतसर -सुवर्णमंदिरात दिवाळीच्या दिवशी बुधवारी बंदी छोड दिवस साजरा झाला. दिवाळीच्या दिवशी शिखांचे सहावे गुरू हरगोविंद सिंह हे मोगल बादशहाच्या कैदेतून सुटून आले होते. त्यानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. सुवर्णमंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे हा परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला होता.
  November 8, 09:21 AM
 • श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमध्ये लडाख आणि ऐतिहासिक मुघल रस्ता यांना जोडणारा ४३४ किलोमीटरचा श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बुधवारी सातव्या दिवशीही हिमवृष्टी आणि रस्त्यावरील घसरण या कारणांमुळे बंद राहिला. वाहतूक पोलिसांनी सांगितले की, ३०० किलोमीटर लांबीचा श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग एका बाजूने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. लडाख महामार्गावर अनेक फूट बर्फ साचला असल्याने महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे. तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्याने आणि रस्त्यांवर बर्फ...
  November 8, 09:15 AM
 • चेन्नई- तामिळनाडूचे मत्स्यपालनमंत्री डी. जयकुमार यांचे अतिरिक्त खासगी सचिव लोकनाथन आणि त्यांच्या दोन मुलांचा कुड्डालोर जिल्ह्यातील वेप्पुर गावाजवळ बुधवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. हे तिघे त्रिची येथून चेन्नईला परतत होते. रस्त्यात त्यांची कार एका बसवर धडकली. या अपघातात तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात जखमी एका व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांंनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या...
  November 8, 09:08 AM
 • अहमदाबाद- गुजरातच्या गीर अभयारण्यात विषाणूच्या संसर्गात १७ सिंह मृत्युमुखी पडल्यानंतर तेथून सुटका केलेल्या ३६ सिंहांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, पण त्यांना आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल, अशी माहिती एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली. अमरेली जिल्ह्यातील गीर वन विभागाच्या दालखानिया परिक्षेत्रात कॅनाइन डिस्टेम्पर व्हायरसचा (सीडीव्ही) संसर्ग झाला होता. त्यामुळे सप्टेंबरच्या मध्यात तेथील २३ पैकी १७ सिंहांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या भागातून ३६ सिंहांना...
  November 8, 08:47 AM
 • डेहराडून- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग पाचव्यांदा लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. उत्तराखंडमधील हर्षिल येथील कॅम्पमध्ये पंतप्रधानांनी जवानांची भेट घेतली. जवानांना मिठाई देऊन त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, पंतप्रधानांनी केदारनाथाचेही दर्शन घेतले. दीड वर्षात हा मोदींचा तिसरा केदारनाथ दौरा आहे. २०१४ पासून मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदा उत्तराखंडातील हर्षिलमध्ये जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. ते म्हणाले, देशातील वीर जवांनासोबत...
  November 8, 07:07 AM
 • नॉलेज डेस्क - महाराष्ट्रात शहरात तसेच खेडोपाडी भारनियमनाची समस्या नेहमीचीच झाली आहे. यामुळे जर तुमच्या घरीही विजेची अडचण असेल, तर तुम्ही हा 500 वॉटचा इन्व्हर्टर बनवू शकता. यामुळे कमीत कमी प्रकाशाची तरी समस्या दूर होण्यास मदत होईल. या इन्व्हर्टरमधून तुम्ही 10 तासांपर्यंत LED बल्ब चालवू शकता. आणि यासाठी एखाद्या टेक्निशियनकडे जाण्याची बिलकूल गरज नाही, तुम्ही स्वत: घरबसल्या हे बनवू शकता. या प्रकारच्या इन्व्हर्टरसाठी अंदाजे 500 रुपये खर्च येतो. # या साहित्याची असते गरज 1. फॅन कॅपिसिटर 4.00uF 2. फॅन...
  November 8, 12:11 AM
 • कुरुक्षेत्र - गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृतदेह सापडला आहे. एका कालव्यातून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता तिचे नाव सोनिया असून ती गावातच राहत होती असे कळाले आहे. मृतदेहाची अवस्था पाहता पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, सोनियाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून सविस्तर तपास सुरू आहे. दोन नोव्हेंबरपासून होती बेपत्ता... पीडित महिलेचे नाव सोनिया (23) असून ती ठसका मीरांजी गावात...
  November 8, 12:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED