Home >> National >> Delhi

Delhi News

 • नवी दिल्ली- रामदेव बाबांच्या उपोषणाबाबत अभिनेता शाहरुख खान याच्यानंतर आता सलमान खानने टिप्पणी केली असून रामदेव बाबांनी असे उपोषण करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.सलमान म्हणाला की, बाबा रामदेव ही व्यक्ती खूप मोठी आहे. ते एखादी गोष्ट म्हणत असतील तर ती कोणीही ऐकेल. पण म्हणून त्यांनी उपोषण करण्याची काही एक गरज नाही.दरम्यान सलमान खानचा रेडी हा चित्रपट आजच रिलिज झाला आहे. काल शाहरुख खानने रामदेव बाबांचे उपोषण हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. आज सलमान खानने त्याबाबत टिप्पणी केली.
  June 3, 07:28 PM
 • नवी दिल्ली - देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात योगगुरू बाबा रामदेव शनिवारपासून येथील रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. केंद्र सरकारबरोबर बाबा रामदेव यांची शुक्रवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. बाबा रामदेव यांच्या उपोषणासाठी रामलीला मैदानावर जोरादार तयारी करण्यात आलीये. त्याची ही झलक.
  June 3, 07:19 PM
 • लखनऊ - भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा राम मंदीराचा मुद्दा उचलला आहे. लखनऊ येथे सुरु झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अयोध्यामध्ये राम मंदीर बनविण्याची मागणी केली.उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी राम मंदीराचा पुन्हा एकदा उचलला आहे. उत्तरप्रदेशात बहुमत मिळविणे हे प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचे असून, राजकारण करण्यास सुरवात झाली आहे. या अधिवेशनात सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यातील वादावर...
  June 3, 03:38 PM
 • रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा शाही महाल एंटिलियावरील वाद वाढतच आहे. वक्फ बोर्डाला दिलेल्या जमिनीवर हा 27 मजली बंगला बांधण्यात आल्याची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केंद्राने राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे नविन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाने अल्पसंख्याक मंत्रालयाला या प्रकरणाची माहिती मागीतली होती. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या माजी सदस्यांना या मुद्यावरुन त्रास दिला जात आहे काय? याबाबत विचारणाही केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने...
  June 3, 10:37 AM
 • नवी दिल्ली- महाराष्ट्रासह देशातील 14 राज्यांतील काही जातींचा मागासवर्गीयांत समावेश करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक प्रकरणासंबंधीच्या समितीच्या बैठकीत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, सामाजिक न्याय मंत्रालय यासंबंधात अधिसूचना जारी करणार आहे.मंत्रिमंडळाचे इतर निर्णय : बीपीएल कुटुंबांसाठी शौचालय तयार करण्यासाठी 1000 रुपयांची मदत. एकूण 3200 रुपये मिळणार. दुर्गम क्षेत्रातील लोकांसाठी 3700. मॅट्रिकोत्तर...
  June 3, 04:14 AM
 • नवी दिल्ली- महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि ग्रामीण अर्थकारणाची सूत्रे फिरविणारी साखर लॉबी आता सहकारातून खासगी क्षेत्राकडे वळत असल्याचे चित्र असून यावर्षी तब्बल 91 खासगी साखर कारखान्यांना हवाई अंतर प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यात मराठवाड्यातील 36 कारखान्यांचा समावेश आहे. हे सर्व कारखाने पुर्वार्शमींच्या साखर सम्राटांचे किंवा त्यांच्या निटकवर्तीयांचे आहेत. दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातून यावर्षी राज्यातील सर्वाधिक 21 प्रस्ताव दाखल झाले असून माढा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय...
  June 3, 04:08 AM
 • नवी दिल्ली- केंद्रातील सरकारच्या मंत्रीगटाबरोबरच सुमारे पाच तास चालू असलेली बैठक अखेर निष्फळ ठरली. चर्चेतून तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच कॉंग्रेसने काही अटी मान्य करण्यास नकार दिल्याने बाबा रामदेव आपल्या मतावर ठाम राहिले. दरम्यान दुपारी सरकार एक-दोन मुद्दे सोडले तर सर्व मुद्यांशी सहमत आहे, असे बाबांनी म्हटले होते. मात्र, चर्चेनंतरही बाबांनी शनिवारपासून उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे. चर्चा अंतिम टप्प्यात- भष्ट्राचाराच्या मुद्यांवरुन उद्यापासून उपोषण बसणारे योगगुरु...
  June 3, 03:20 AM
 • २ जी स्प्रेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने देशातील प्रमुख उद्योगपती रतन टाटा, अनिल अंबानी, दयालू अम्मालू, नीरा राडिया यांच्या विरोधातील याचिका सीबीआयच्या न्यायालयाने फेटाळून लावली.सीबीआयने म्हटले आहे की, सदर कंपनीने २ जी स्प्रेक्ट्रमचे परवाने घेताना कोणताही घोटाळा केला नसल्याचे दिसून येते.गुरुवारी सीबीआयने न्यायालयात सांगितले की, टाटा टेलीसर्व्हिसेस व रिलायन्स कम्युनिकेशन कंपनींना परवाने (लायसन्स) देताना कोणतीही गडबड दिसून आली नाही. यासंदर्भात एक टाटा, अंबानी, राडिया, करुनानिधी...
  June 2, 08:08 PM
 • नवी दिल्ली- योगगुरु रामदेव बाबा हे गुरु कमी असून सध्या ते धंदेवाईकच जास्त आहेत,'' अशा शब्दांत कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी बाबांची खिल्ली उडवली.बाबा रामदेव योग शिकविण्यासाठी एका व्यक्तीकडून ५० हजार रुपयांचे शुल्क घेतात. योग शिकायला येणाऱ्या लोकांपैकी ५० हजार रुपये शुल्क पुढे बसणाऱ्यांसाठी, ३० हजार रुपये शुल्क मध्ये बसणाऱ्यांसाठी आणि १० हजार शुल्क अगदी शेवटी बसणाऱ्यांसाठी आकारले जाते. हा उद्योगच असून बाबांना धंदेवाईकच म्हटले पाहिजे. कॉंग्रेसला रामदेव बाबांची...
  June 2, 05:06 PM
 • बाबा रामदेव यांच्या आंदोलनाचा कॉंग्रेसने धसका घेतला आहे. आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेसच्या कोर ग्रुपची आज नवी दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी ही बैठक होणार आहे. रामदेव बाबांच्या आंदोलनावरून पक्षातील नेते आणि सरकारमध्ये काही मतभेद निर्माण झाले आहेत. हा मुद्दा कशा पद्धतीने हताळला गेला पाहिजे, यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचे बोलले जाते. कोर ग्रुपमध्ये प्रणव मुखर्जी, ए....
  June 2, 01:07 PM
 • नवी दिल्ली - एकात्मिक विकास आराखड्याअंतर्गत येणा-या योजना आखण्यात केंद्र सरकारकडूनच उशीर झाला परिणामी राज्य सरकारला वेळेत आपली कामे पुर्ण करता आली नाहीत असा आरोप गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला आहे. एकात्मिक कृती आराखड्यासाठी केंद्राने 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, या आराखड्यात नेमक्या योजनांबाबतच सावळा गोंधळअसल्यामुळे 1 कोटीपेक्षाही कमी रक्कमेची कामे झाली. एकूण निधीपैकी केवळ 18.89 टक्के निधी खर्च करण्यात सरकारला यश आले असून तब्बल 81.11 टक्के निधी पडून असल्याचे उघड झाले...
  June 2, 05:16 AM
 • नवी दिल्ली - अमेरिकेतील शिकागो न्यायालयात सुरु असलेल्या 26-11 च्या खटल्यात भारताने सहभागी व्हायचे की नाही, या संदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे केंद्रिय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी सांगितले. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था व अल-कायदा यांच्यातील संबंध स्पष्ट करणारे अनेक पुरावे भारताकडे आहेत. परंतु शिकागो खटल्यात सहभागी होण्याबाबत अजून सरकारने निर्णय घेतलेला नाही. या खटल्यात सहभागी होण्याचे जसे काही फायदे आहेत. तसेच त्याचे काही तोटे असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. गृहसचिव...
  June 2, 05:13 AM
 • नवी दिल्ली - सिक्किम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पी.डी. दिनकरन यांच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. राज्यसभेने नियुक्ती केलेल्या न्यायाधीश चौकशी समिती (जेआयसी) आणि केंद्र सरकारचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला.आपल्याविरुद्ध लावण्यात आलेल्या 12 पैकी 10 आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार जेआयसीला नाही, असा युक्तिवाद न्या. दिनकरन यांच्या वतीने करण्यात आला. दुसरीकडे दिनकरन यांच्याविरुद्धच्या सर्व आरोपांची चौकशी करण्याचा...
  June 2, 05:10 AM
 • नवी दिल्ली - आपला आगामी चित्रपट रेडीच्या प्रसिध्दीसाठी अभिनेता सलमान खान सध्या खूप व्यग्र आहे. परंतु यामध्येही त्याला आपला जवळचा मित्र करीम मोरानी याची चिंता सतावते आहे. त्याच्या मते 2-जी प्रकरणात मोरानीला अडकविण्यात आले आहे. तो निर्दोषआहे.मोरानीला बॉलिवूडमधील लोक ओळखतात. मी त्याला व्यक्तीश: चांगला ओळखतो. मी त्याचे अनेक शो व चित्रपट केले आहेत. मला त्याच्या विषयी एवढेच सांगायचे आहे की, तो दोषी असल्याचे सिध्द होणार नाही.सिनेयुग नावाने इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी चालविणारा करीम मोरानी हा...
  June 2, 05:07 AM
 • नवी दिल्ली - विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची वाणवा आणि प्रशिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांना शिकविणारे गुरू या दोन्ही बाबी उच्चगुणवत्तेच्या शिक्षणाला खोडा घालत आहेत.त्यामुळे केंद्र सरकारने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असतानाच नवा निर्देश जारी करून ज्या विद्यापीठांमध्ये आजपर्यंत बी.एड.,एम.एड. किंवा समकक्ष अभ्यासक्रम चालविले गेले नाहीत तेथे हे अभ्यासक्रम सुरू करण्याचे आणि विद्यमान प्रवेशक्षमता दुप्पट करण्याचे निर्देश दिले आहेत.मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या मते, शिक्षकांना...
  June 2, 05:01 AM
 • नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन.डी. तिवारी यांनी पितृत्व प्रकरणात बुधवारी रक्त नमुने दिले नाहीत. आपल्यावर नमुने देण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.तिवारी यांनी 1 जूनला रक्त नमुने द्यावेत, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने 10 मे रोजी दिले होते. दिल्ली उच्च न्यायालय परिसरातील रुग्णालयात त्यांना नमुने देण्यास सांगितले होते. परंतु ते देण्याऐवजी पुराव्यासाठी कोणावरही दबाव टाकला जाऊ शकत नाही, असा अर्ज तिवारी यांनी सादर केला.तिवारी यांच्या वकिलांनी सह रजिस्ट्रार...
  June 2, 04:52 AM
 • नवी दिल्ली. लोकपाल विधेयकाच्या कक्षेत पंतप्रधान पद आणायचे की नाही यावरून बाबा रामदेव आणि समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. या बातमीवर भास्कर डॉट कॉमवर वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. 95 टक्के वाचकांनी या मुद्दद्यावर अण्णा हजारे यांना समर्थन दिले आहे. वाचकांचे म्हणणे आहे की लोकपाल विधेयकाच्या कक्षेत पंतप्रधानपदही आणले पाहिजे. असे केले तरच भ्रष्टाचारावर प्रभावीपणे अंकुश आणता येईल. केवळ 5 टक्के वाचकांनी बाबांच्या मताला सहमती दर्शविली आहे. बाबांचे...
  June 1, 02:34 PM
 • नवी दिल्ली-हिंदी महासागरातील चीनचा वाढलेल्या हस्तक्षेपाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने अंदमान बेटावर 'युध्द साम्रगी केंद्र' सुरू करण्याचे ठरविले आहे. या युध्द साम्रगी केंद्रात भारतीय गुप्तहेर संस्था, सुरक्षा संस्था आणि संशोधन संस्था यांचा समावेश असेल.चीनने बर्मा मधील कोको बेटावर सैन्य दलाचे गुप्त केंद्र उभारण्याची तयारी सुरू केली आहे. चीनच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी चीनने भारताच्या सैन्य अधिकाऱ्यांना व्हिसा नाकारला होता भारतानेही...
  June 1, 12:19 PM
 • नवी दिल्ली- पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कर्मचार्यांना आता प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची गरज पडणार नाही. प्राप्तिकर खात्याच्या नव्या नियमानुसार या महिन्यापासूनच याची अंमलबजावणी होणार आहे.कर्मचाऱयाने आपल्या कंपनीमार्फत मिळणाऱया इतर उत्पन्नाचे टीडीएसदेखील वजा करून घेतले तरच या नवीन नियमाचा फायदा त्याला मिळेल. फक्त त्याचे वेतन आणि अन्य उत्पन्न हे पाच लाख रूपयांपेक्षा कमी असावे लागणार आहे.
  June 1, 09:06 AM
 • नवी दिल्ली- केंद्र सरकार रामदेव बाबांनी ठेवलेल्या काही मागण्यातील एक प्रमुख मागणी म्हणजेच चलनातून एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची केली होती. मात्र केंद्र सरकारने ही मागणी फेटाळून लावण्याचा निर्णय घेतला असून त्या नोटा चलनातून बंद करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.कॉंग्रेस पक्षाची गुरुवारी सायंकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घरी आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या कोअर ग्रुप बैठकीत प्रधानमंत्री यांच्याबरोबरच कॉंग्रेस पक्षाच्या...
  June 1, 08:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED