जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Delhi

Delhi News

 • नवी दिल्ली. अण्णा हजारेंच्या कोअर टीमने हे आंदोलन दीर्घकाळ लावून धरण्यासाठी प्रभावी रणनीतीची आखणी केली आहे. सरकार जनलोकपालची मागणी लटकवून ठेऊन तिच्यातील हवा जाण्याची वाट पाहाणार याची टीम अण्णाला पूर्णपणे जाणीव आहे. यासाठीच देशभरात हे आंदोलन पसरवण्यासाठी अण्णांची चारसूत्रीय रणनीती तयार आहे. एनजीओ नेटवर्कचा वापर देशभरातील हजारो अशासकीय संघटनांची पथके टीम अण्णाच्या सतत संपर्कात आहेत. मेधा पाटकर, गोपाल राय, स्वामी अग्निवेश, अखिल गोगोई आणि पी.व्ही. राजगोपालसारख्या अण्णांच्या...
  August 19, 06:13 AM
 • घोटाळे आणि भ्रष्टाचाराचा इतिहास लिहायला बसले तर तो देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या वह्यांएवढा होईल. सन १९९२पासून आजपर्यंत सुमारे ३६ मोठ्या घोटाळ्यांत ८० लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. देशभरात भ्रष्टाचाराचे थैमान चालू असतानाच महागाई, पायाभूत सुविधा व विकासासाठी लोकांची होरपळ सुरु आहेच; पण चिंता आहे ती भविष्याची - आमचा उद्या कसा असेल? आम्हाला, आमच्या मुलाबाळांना भ्रष्टाचारमुक्त देश मिळेल..? शाळेपासून महाविद्यालयांपर्यंत प्रवेशासाठी, नोक-यांसाठी, साधे लायसन्स काढण्यासाठी...
  August 19, 06:10 AM
 • नवी दिल्ली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनव भारत या संघटनेचा हात असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या तपासात निष्पन्न होत असल्यामुळे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या स्थानिक अल्पसंख्याक लोकांच्या सुटकेची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे केली आहे. या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि अल्पसंख्याक विकास मंत्री मोहंमद आरिफ नसीम खान यांचा समावेश होता....
  August 19, 04:01 AM
 • नवी दिल्ली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सरकारने परवानगी दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांत गुरुवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दुसरीकडे देशातील विविध भागात दुस-या दिवशीही अण्णांच्या समर्थनासाठी जोरदार आंदोलन करून जनतेने उत्साह दाखवला. सरकारच्या निषेधार्थ अनेक राज्यांतून निदर्शने, बंद झाले. दरम्यान, रामलीला मैदान या ऐतिहासिक शांती संग्रामासाठी सज्ज झाले आहे. अण्णांच्या आंदोलनासाठी ठरलेल्या रामलीला मैदानाची तयारी गुरुवारी युद्धपातळीवर करण्यात येत असल्याचे...
  August 19, 03:57 AM
 • नवी दिल्ली - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज (शुक्रवार) तिहार कारागृहातून बाहेर पडणार आहेत. सकाळी दहा वाजता ते तिहार कारागृहातून बाहेर पडून चार तास मार्च काढून ते समर्थकांसह रामलीला मैदानावर पोहचणार आहेत. रामलीला मैदानावर जाण्यापेक्षा अण्णा राजघाट येथे जाणार आहेत. पोलिसांच्या आठ बटालियन मैदानावर तैनात करण्यात आल्या असून, कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून उपोषणादरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे.अण्णांच्या मार्चसाठी खुल्या ट्रकचा आणण्यात येणार आहे....
  August 19, 01:58 AM
 • नवी दिल्ली- कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश सौमित्र सेन यांच्या विरूध्दचा महाभियोग प्रस्ताव गुरूवारी राज्यसभेत मंजूर झाला आहे. या प्रस्तावाला दोन तृतीयांश मतांनी मंजुरी मिळाली.राज्यसभेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता लोकसभेत यावर मतदान होणार आहे. लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या अर्धे किंवा उपस्थित सदस्यांपैकी दोन तृतीयांश बहुमताने हा प्रस्ताव समंत झाला तर तो राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येऊन न्या.सेन यांना पदावरून हटवण्यात येईल.न्या.सौमित्र सेन यांना बुधवारी...
  August 18, 06:58 PM
 • नवी दिल्ली- अण्णा हजारे यांच्या उपोषणास परवानगी देणे म्हणजे कोणाचाही विजय किंवा पराभव नसल्याचे मत केंद्रीय गृहसचिव आर.के सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. सरकारकडून आलेली अशाप्रकारची ही पहिलीच टिप्पणी आहे. अण्णांच्या विजयाबद्दल बोलण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळेस त्यांनी दिल्ली पोलिसानी परिस्थिती चांगली हाताळल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.यापूर्वी टीम अण्णांना १५ दिवसांसाठी रामलीला मैदानावर उपोषणास दिल्ली पोलिसांना परवानगी दिल्याने अण्णा समर्थकांनी हा...
  August 18, 06:15 PM
 • नवी दिल्ली- अण्णांनी रामलीला मैदानात उपोषण करणार असल्याची घोषणा केल्यानंतर एमसीडी मैदान साफ करण्यासाठी युध्दस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. मैदानात मोठयाप्रमाणात खड्डे आहेत आणि त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. एमसीडीचे २०० कर्मचारी मैदान साफ करत आहेत. एमसीडीच्या उपायुक्तांसहित अनेक कर्मचारी मैदानात उपस्थित होते. एकंदर परिस्थितीवरून आज काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. मैदानात दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेची तयारी करण्यात येत आहे. श्वानपथकाकडून मैदानाची तपासणी...
  August 18, 04:04 PM
 • नवी दिल्ली- अण्णा हजारेंनी रामलीला मैदानावर उपोषण करणार असल्याची घोषणा केल्यापासून एमसीडी मैदान स्वच्छ करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मैदानावर मोठया प्रमाणात खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. जोपर्यंत मैदान पूर्णपणे व्यवस्थित होत नाही तोपर्यंत टीम अण्णांकडून उपोषणाचा कार्यक्रम सुरू होणार नाही. फोटोमध्ये पाहा रामलीला मैदानाची साफसफाई होताना....
  August 18, 02:39 PM
 • दिल्ली - मागील दोन-तीन वर्षांपासून राज्यसरकार बेस्टे फाईव्हसाठी न्यायालयीन लढाई लढत होते. आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या बाजूने निर्णय देत बेस्ट फाईव्हला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यी आणि एस.एस.सी बोर्डाला मोठा दिलासा मिळाला आहे. यापूढे राज्यातील एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांचा निकाल बेस्ट फाईव्हनूसार लावला जाणार आहे, तर या निर्णयाचा सर्वाधिक फायदा अकारावी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना होणार आहे. केंद्रिय शाळेतील विद्यार्थी आणि...
  August 18, 02:33 PM
 • नवी दिल्ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज (गुरूवार) उपोषणाच्या तिसर्या दिवशी माझी तब्येत ठणठणीत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी तरुण हे माझ्या आंदोलनाचे प्रेरणास्थान असून, मी थकलेलो नसल्याचे सांगितले. तिहार कारागृहातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये अण्णांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान अण्णांचा आजही मुक्काम तिहार तुरूंगात राहणार आहे. आज ते रामलीला मैदानावर जाणार होते, परंतु आता ते शुक्रवारी रामलीला मैदानावर उपोषणासाठी जाणार आहेत. रामलीला मैदान उपोषण करण्यासाठी...
  August 18, 11:04 AM
 • नवी दिल्ली - अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ सुरु असलेले आंदोलन अमेरिकेने अतिशय गंभीरतेने घेतले आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन मॅक्केन यांनी 'टि्वट' केले आहे की, 'माझ्या निवासस्थानाबाहेर अण्णा हजारे समर्थक त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करीत आहेत. यावरून अंदाज बांधता येतो की, भारतातील परिस्थीती किता गंभीर आहे.' एकीकडे सरकार अण्णा हजारेंची मनधरणी करीत आहे तर काँग्रेस पक्ष त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रशिद...
  August 18, 10:46 AM
 • नवी दिल्ली - टीम अण्णांना सध्या रामलीला मैदानवर उपोषणाची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र त्यात एक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांना सरकारने रामलीला मैदानावर उपोषण करण्यासाठी १५ दिवसांची परवानगी दिली आहे म्हणजे २ सप्टेबंरपर्यंत अण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषण करु शकणार आहेत. परंतू १ सप्टेबंर रोजी भारत मक्ती मोर्चा या संघटनेने त्यांच्या कार्यक्रमासाठी रामलीला मैदान यापूर्वीच आरक्षीत केलेले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयातील वकील जे.एस.कश्यप यांच्या नावाने हे...
  August 18, 10:04 AM
 • नवी दिल्ली-बुधवारी अण्णांच्या समर्थनात इंडिया गेट ते जंतर मंतर पर्यंत मार्च चे आयोजन करण्यात आले होते. या मार्चमध्ये अण्णांच्या मर्थनात छोटयांपासून मोठयापर्यंत अनेकांनी भाग घेतला. फोटोमध्ये पाहा त्यातील काही दृश्ये.....
  August 18, 09:58 AM
 • नवी दिल्ली. जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीबद्दल जाणून घ्यायला प्रत्येक जणच उत्सुक असतो. या अवाढव्य झोपटपट्टीतील लोक नेमके कसे राहतात, कसे जगतात याबद्दल कुतूहल असते. तीन समकालीन छायाचित्रकारांनी एकत्र येऊन धारावीतील लोकजीवनाचे अंतरंग छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला आणि दाटीवाटीने गजबजलेल्या, घाण आणि दुर्गंधीने माखलेल्या या झोपडपट्टीतही चांगुलपण गवसले. या छायाचित्रांचे प्रदर्शन...
  August 18, 02:45 AM
 • नवी दिल्ली. शिक्षणसंस्थांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करायचा की नाही या संदर्भातील महत्त्वपूर्ण फैसला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. न्यायमूर्ती आर.व्ही. रवींद्रन व ए.के. पटनायक यांचे पीठ गुरुवारी यावर निर्णय जाहीर करणार आहे. कट ऑफ मध्ये खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ओबीसी वर्गातील विद्यार्थ्याला १० टक्के कमी गुणांना निश्चित करायची की नाही, याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. किंवा किमान निकषातील गुणांत १० टक्के गुणांची सरसकट कपात...
  August 18, 02:40 AM
 • नवी दिल्ली. भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेतील पदवी शिक्षणाचा ओढा वाढला आहे. २०१०-११ या शैक्षणिक वर्षात भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले असून या यादीत चीन अव्वल स्थानी आहे. परदेशातील पदवी प्रवेशात चालू शैक्षणिक वर्षात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००६ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदवीसाठी विद्यार्थ्यांनी परदेशातील शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. पदवी मंडळाच्या (सीजीएस) एका पाहणीत ही माहिती समोर आली आहे. मागील वर्षी ही वाढ...
  August 18, 02:36 AM
 • नवी दिल्ली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी बुधवारी माकपच्या कार्यकर्त्यांनी येथे निदर्शने केली. या निदर्शनसाठी शंभरावर कार्यकर्ते येथे जमा झाले होते. हे आंदोलन संसद मार्गावर अचानक करण्यात आले. या वेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी निदर्शकांना अटक केली. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. हजारे यांच्या संघटनेच्या विचाराशी मतभेद असले तरी सामान्यांच्या हक्काची पायमल्ली करणा-या सरकारविरोधात आम्ही हे...
  August 18, 02:34 AM
 • नवी दिल्ली. अण्णा हजारेंच्या हाकेला ओ देत भ्रष्टाचारविरोधातील लढाई जनता रस्त्यावर येऊन लढत असताना संसदेत लोकप्रतिनिधी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न होते. सत्ताधारी काँग्रेस असो वा विरोधी पक्ष भाजप यांची राजकीय साठमारी संसदेत दिसून आली. भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी लोकपालच्या मसुद्यावरून सरकारवर टिकेची झोड उठविली.लोकपालचा मसुदा ठरवताना सरकारने संसदेचे सर्वोच्च स्थान व संसदीय परंपराचे पालन केले नाही...
  August 18, 02:24 AM
 • नवी दिल्ली. देशातील अणु प्रकल्प हे नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे बुधवारी सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. गृहराज्य मंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. देशातील अणु भट्ट्यांच्या सुरक्षेवर सरकारचे लक्ष आहे. अणु ऊर्जा विभागाने काही नियम हे अत्यंत कडक केले आहे. काही बंधनकारक आहेत. त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर विभागाची नजर आहे, असे रामचंद्रन यांनी सांगितले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) या संस्थेची...
  August 18, 02:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात