जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Delhi

Delhi News

 • नवी दिल्ली/मुंबई- अहमदाबादचे ६४ वर्षीय अशोक यांची ओळख आता स्मृती अशी आहे. (दोन्ही नावे बदलली आहेत.) त्यांनी वयाची साठी पार केल्यानंतर शस्त्रक्रिया करून महिला म्हणून एक नवी ओळख मिळवली आहे. स्मृती यांनी आपल्या डॉक्टरांना सांगितले की, मला बालपणापासूनच माझे शरीर आवडत नव्हते. मला महिला म्हणून राहायचे आहे याची जाणीव मला खूप आधीपासूनच झाली होती. जीवनातील ६४ वर्षे मी घुसमटीतच काढली. शस्त्रक्रिया केल्यानंतर आता साडेसहा दशकांनी मला पूर्णत्व मिळाल्याचा अनुभव येत आहे. हे तर फक्त एक उदाहरण झाले. आता...
  February 17, 09:08 AM
 • नवी दिल्ली-काश्मिरात भलेही दहशतवाद सतत वाढत असेल, पण येथील फुटीरवादी नेत्यांच्या सुरक्षेवर सरकार वार्षिक १० कोटी रुपये खर्च करत आहे. हे निवडक फुटीरवादी महागड्या गाड्यांत फिरतात आणि पंचतारांकित रुग्णालयांत उपचार करून घेतात. त्यांच्या सुविधांबाबत दिव्य मराठीने लष्करी कारवाईचे संचालक राहिलेले लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांना विचारले असता, ते म्हणाले की, एका फुटीरवादी नेत्याच्या सुरक्षेसाठी २० ते २५ सुरक्षा कर्मचारी आहेत. त्यांना करदात्यांच्या खिशातून सुरक्षा देणे समजण्यापलीकडचे...
  February 17, 09:02 AM
 • नवी दिल्ली- उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा व मनोज अरोरा यांचा अंतरिम जामीन २ मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने हा दिलासा दिला. मनी लाँडरिंग प्रकरणात या दोघांची चौकशी सुरू आहे. न्यायालयाने मागील सुनावणीदरम्यान रॉबर्ट वढेरा यांच्या अटकेला १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली होती. शनिवारी सुनावणीसाठी वढेरा पुन्हा न्यायालयात पोहोचले. लंडनमधील ब्रायनस्टन स्क्वेअर येथील संपत्ती खरेदी प्रकरणाचा हा प्रकार आहे....
  February 17, 07:41 AM
 • नवी दिल्ली- पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांवर त्यांच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील १६ राज्यांतील अंत्ययात्रांत या शहिदांना अंतिम निरोप देण्यासाठी लाखो लोक सहभागी झाले होते. भारतमाता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हातात तिरंगा घेतलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी या शहिदांना अंतिम निरोप दिला. सर्व विरोधी पक्षांनी दहशतवादाच्या विरोधात एकत्र येत सुरक्षा दलांबरोबर खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री...
  February 17, 07:36 AM
 • श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. हत्यानंतर देशातील जनता आक्रोश करत आहे. दुसरीकडे, हल्ला घडवून अाणणारा सुसाइड बॉम्बर आदिल अहमद दारच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मुलाच्या क्रूरकृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिली आहे. आदिल हा काश्मीरमधील राहाणारा हता. त्याचे घर हल्लाच्या ठिकाणापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर होते. असा नरसंहार करून एखादा व्यक्ती कसा आनंदी होईल? -...
  February 16, 06:39 PM
 • श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन दिवस होत नाही तोच राजौरीमधील नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट झाला आहे. या स्फोटात लष्कराचा अधिकारी शहीद झाला असून एक जवान गंभीर जखमी झाला. पेट्रोलिंगदरम्यानएलओसीजवळ शनिवारी (ता.16) सायंकाळी हा स्फोट झाला. या स्फोटात लष्कराचा अधिकारी शहीद झाला. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्विकारलेली नाही. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 40 जवान शहीद.. जम्मू...
  February 16, 06:33 PM
 • हे छायाचित्र जम्मूचे असून, तेथे जवानांवर झालेल्या हल्ल्याविरोधात लोकांनी आंदोलन करत अनेक वाहने जाळली. त्यामुळे प्रशासनाने कर्फ्यू लावला आहे. नवी दिल्ली- पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. सीआरपीएफने जवानांना श्रद्धांजली देताना टि्वटरवर लिहिले, आम्ही विसरणार नाही, माफही करणार नाही, बदला घेऊ. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवली. झाशीत सभा घेतली. या दोन्ही ठिकाणी...
  February 16, 10:37 AM
 • दिल्ली, श्रीनगर- पुलवामा अतिरेकी हल्ल्यात ४० जवानांच्या हौतात्म्यानंतर सीआरपीएफ व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्वाणीचा इशारा दिला. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत सीआरपीएफने म्हटले की, ही घटना विसरणार नाही, माफी नाहीच. या भ्याड हल्ल्याचा बदला घेऊ. मोदी म्हणाले, अतिरेकी व त्यांना पोसणाऱ्यांनी मोठी चूक केली आहे. याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल. जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ.अतिरेक्यांना संपवण्याचे ठिकाण, वेळ व स्वरूप ठरवण्याचे सर्वाधिकार आता लष्कराला देण्यात...
  February 16, 08:38 AM
 • नवी दिल्ली- राजस्थानच्या बिकानेर जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित फर्मची ४.६२ कोटी रुपयांची संपत्ती ताब्यात घेतली आहे. यात चार जणांशी संबंधित १८.५९ लाख रुपयांच्या जंगम संपत्तीचाही समावेश आहे. याशिवाय दिल्लीत सुखदेव विहारमधील ४.४३ कोटींच्या स्थावर मालमत्तेचाही समावेश आहे. स्थावर मालमत्तेची मालकी रॉबर्ट वढेरा यांच्या स्कायलाइट हॉस्पिटि लिटी कंपनीकडे आहे. ईडीने बिकानेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेनजीक...
  February 16, 08:25 AM
 • नवी दिल्ली- रफाल विमान प्रकरणात सुनावलेल्या आपल्या निकालावर फेरविचारासाठी दाखल याचिकांचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने काही वकिलांना चांगलेच खडसावले. कोर्ट म्हणाले, खूप त्रुटी असलेल्या याचिका दाखल करून काही वकील प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने या प्रवृत्तीवर नाराजी व्यक्त करत म्हटले की, हे वकील रजिस्ट्रीत याचिका दाखल करतात आणि त्यातील त्रुटी दूर करण्याऐवजी प्रसिद्धीसाठी प्रसार मीडियाकडे धाव घेतात. कोर्टाने...
  February 16, 08:20 AM
 • नवी दिल्ली- प्राप्तिकर रिटर्न भरताना आधार कार्ड पॅन कार्डशी जोडणे आवश्यक असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे. जे प्राप्तिकर रिटर्न फाइल करणार आहेत त्यांना ३१ मार्चपर्यंत आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडावे (लिंक) लागेल. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार आधारची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. त्यानंतर प्राप्तिकर कायदा कलम १३९ एए आणि सीबीडीटीच्या ३० जून २०१८ च्या आदेशानुसार आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. सर्वोच्च...
  February 16, 08:12 AM
 • बीजिंग- जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 42 जवान शहीद झाले. या हल्ल्याबद्दल चीनने दु:ख व्यक्त केले, परंतु हल्ला घडवणारी संघटना जैश-ए-मोहंमद संघटनेचा संस्थापक मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चीनचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले की, भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याचा आम्हाला मोठा धक्का बसला. आम्ही कोणत्याही प्रकारचा दहशतवादाचा विरोध करतो. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा विषय आम्ही...
  February 15, 06:56 PM
 • नवी दिल्ली- केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी श्रीनगरला पोहोचले. राजनाथ सिंह यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. सिंह यांनी शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदा दिला.त्यांच्यासोबत जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंगही होते. सर्व शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीकडे रवाना करण्यात आले आहेत . पुलवामा हल्ल्याच्या...
  February 15, 06:55 PM
 • श्रीनगर- जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी अब्दुल रशीद गाजी हा पुलवामामध्ये (लेथपोरा) केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. तो पाकिस्तानात राहतो. अफगाणच्या युद्धात तो सहभागी झाला होता. गाजी हा आयईडी एक्सपर्ट असून भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरने आपला पुतण्या उस्मान आणि भाचा तल्हा रशीद याच्या एन्काउंटरचा बदला घेण्यासाठी अब्दुल गाजी याची निवड केली होती....
  February 15, 04:15 PM
 • श्रीनगर- जम्मूहून श्रीनगरला जाणार्या केंद्रीय राखव दलाच्या (सीआरपीएफ) 70 वाहनांच्या ताफ्याला काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी टार्गेट केले. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले असून अनेक गंभीर जखमी झाले आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यात 2500 जवान होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद ऊर्फ वकास कमांडोने गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजता हल्ला घडवून आणला. क्रुरकर्मा आदिल अहमद याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याने...
  February 15, 11:49 AM
 • नवी दिल्ली- व्हॉट्सअॅपने आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पक्षाचे राज्यसभा खासदार सी.एम.रमेश यांचे अकाउंट ब्लॉक केले आहे. यामागील कारण व कोणताही खुलासा मात्र कंपनीने केलेला नाही. टीडीपीचेच एक नेते आर.श्रीनिवास रेड्डी यांचे अकाउंटही बंद केले आहे. याबाबत सी.एम. रमेश यांचे म्हणणे आहे की, मी कधीही व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग केला नाही. तसेच या नंबरवरून कुणालाही आक्षेपार्ह मेसेजदेखील केलेले नाही. मी व्हॉट्सअॅपचा वापर केवळ टीडीपीच्या नेत्यांशी बोलण्यासाठी करतो. असे असूनही माझे अकाउंट बंद केल्याने मी...
  February 15, 10:56 AM
 • नवी दिल्ली- दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या केजरीवाल सरकारला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दोनसदस्यीय पिठाने दिलेल्या निर्णयामुळे झटका बसला. प्रशासकीय नियंत्रणाचा अधिकार नेमका दिल्ली सरकारला आहे की केंद्राला? याबाबतचा खंडित निर्णय देताना हे प्रकरण वरिष्ठ पीठाकडे पाठवले. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) केंद्राला अधिकार दिले. एसीबी, महसूल, तपास आयोग, लोकायुक्त नियुक्तीच्या मुद्द्यांवर पीठाचे एकमत राहिले. पीठाचे न्यायमूर्ती ए.के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्यात या...
  February 15, 10:24 AM
 • नवी दिल्ली- देशातील पाणी संकट व गंगा शुद्धीकरणासाठी लवकरच सात संशोधन प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. भारत व युरोपीय संघ संयुक्तपणे सात प्रकल्पांना निधीचा पुरवठा करणार आहेत. त्याद्वारे देशाला पाण्यासंबंधी भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढला जाणार आहे. युरोपीय संघ व भारताचे विज्ञान व तंत्रज्ञान तसेच जैव तंत्रज्ञान विभागाच्या वतीने या सात प्रकल्पांवर काम केले जाणार असल्याची घोषणा केली जाणार आहे. यामध्ये नवीन प्रकल्पांचा विकास केला जाणार आहे. त्यात भारतीय वातावरणाचा विचार...
  February 15, 10:23 AM
 • उरी-मोहरामध्ये हल्ला : डिसें. 2014 बारामुल्लाच्या उरी भागातील मोहरा येथे सैन्याच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला. १२ जवान शहीद. ६ अतिरेक्यांचा खात्मा. मणिपुरात हल्ला : 4 जून 2015 मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात सैन्याच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भूसुरुंगाद्वारे हल्ला केला. त्यात १८ जवान शहीद झाले होते. गुरुदासपूरमध्ये हल्ला : जुलै 2015 पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये सैन्याचा गणवेश परिधान करून दीनानगर पोलिस ठाण्यावर हल्ला. ४ जवान व ३ नागरिकांचा मृत्यू. पठाणकोट हल्ला : 2 जानेवारी 2016 जैश-ए-मोहंमदच्या ६...
  February 15, 10:13 AM
 • नवी दिल्ली- जम्मू-कश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४२ जवान हुतात्मा झाले. हा गेल्या १८ वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी २००१ मध्ये श्रीनगर येथे विधानसभेवर जैश-ए-मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांनी कार बॉम्बहल्ला केला होता, त्यात ३८ ठार झाले होते. १८ सप्टेंबर २०१६ ला उरी येथे लष्करी छावणीवर हल्ला झाला होता. त्यात १९ सैनिक हुतात्मा झाले होते. हा लष्करी छावणीवरील सर्वात मोठा हल्ला होता. सीआरपीएफच्या ताफ्यात ७८ पेक्षा जास्त वाहने होती, त्यात २५०० वर...
  February 15, 10:10 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात