जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Delhi

Delhi News

 • नवी दिल्ली - संसद भवनात शनिवारी काँग्रेसच्या 52 नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा संसदेतील नेत्या पदावर निवड करण्यात आली आहे.यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींच्या नेतृत्वातच ही बैठक पार पडली. यामध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यास काँग्रेस खासदारांनी बहुमताने मंजुरी दिली. यापूर्वी काँग्रेसच्या संसदेतील नेते पदासाठी राहुल गांधींचे नाव चर्चेत होते. परंतु, काँग्रेसच्या परंपरेशी एकनिष्ठ असलेल्या खासदारांनी...
  June 1, 11:26 AM
 • नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५७ मंत्र्यांनी गुरुवारी शपथ घेतली. त्यापैकी ३६ जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. २१ नवीन चेहरे हे मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य होय. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात शेवटच्या टप्प्यात ७६ मंत्री होते. त्यापैकी ३६ मंत्र्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही. त्यात अनेक मोठी नावे आहेत. दुसऱ्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज, सुरेश प्रभू, जे. पी. नड्डा, मनेका गांधी, उमा भारती, सत्यपाल सिंग, महेश शर्मा, राज्यवर्धन राठोड, जयंत सिन्हा यांना संधी मिळाली...
  June 1, 10:57 AM
 • नवी दिल्ली -वर्ष २०१७-१८ या काळात देशातील बेरोजगारी वाढीचा दर ६.१ टक्के राहिला. मागील ४५ वर्षांतील हा सर्वाधिक दर आहे. सांख्यिकी मंत्रालयाने शुक्रवारी जुलै २०१७ ते जून २०१८ या काळातील पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे जारी केला. जानेवारीत एक वृत्तपत्राने हा अहवाल प्रसिद्धीपूर्वीच प्रकाशित केला होता. मात्र सरकारने आकडेवारी अंतिम नसल्याचे सांगत बेरोजगारीचा हा ४५ वर्षांतील सर्वाधिक दर असल्याचा इन्कार केला होता. हा अहवाल प्रकाशित न केल्याबद्दल सांख्यिकी आयोगाच्या दोन सदस्यांनीही राजीनामे...
  June 1, 09:31 AM
 • नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांसाठी दाेन निवडणूक आश्वासनांना मंजुरी दिली. सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी याेजनेची कक्षा वाढवत देशातील सर्व शेतकऱ्यांचा यात समावेश केला आहे. यासाेबत ५ काेटी शेतकऱ्यांसाठी पेन्शन याेजनाही मंजूर केली आहे. पंतप्रधान- किसान याेजनेअंतर्गत आतापर्यंत दाेन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या १२ काेटी शेतकऱ्यांना पैसे मिळत हाेते. नवे कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी सांगितले की, सरकारने...
  June 1, 09:11 AM
 • नवीदिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या नव्या मंत्र्यांचे खातेवाटप केले. मोदी यांचे जुने विश्वासू सहकारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना गृहमंत्रिपद देण्यात आले आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना शहा त्यांच्यासोबत गृहमंत्री होते. सोहराबुद्दीन प्रकरणात त्यांना २०१० मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. नऊ वर्षांनंतर शहा पुन्हा एकदा मोदींसोबत गृहमंत्र्यांच्या भूमिकेत आले आहेत. मागच्या सरकारमध्ये गृहमंत्रिपदी असलेले राजनाथ सिंह हे आता संरक्षणमंत्री असतील, तर...
  June 1, 08:59 AM
 • नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काल (30 मे) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 सहकाऱ्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोणाला कोमते मंत्रीपद देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. त्यातच आता खाते वाटप झाले आहे. कोणाला कोणते मंत्रिपद- नरेंद्र मोदी- पंतप्रधान अमित शाह गृहमंत्री निर्मला सीतारमण अर्थमंत्री नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री एस. जयशंकर परराष्ट्र मंत्री पियुष...
  May 31, 03:50 PM
 • नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली आहे. मोदींनी मंत्रिमंडळाच्या कामांचे वाटप आज केले. पंतप्रधानांशिवाय एकूण 57 खासदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. यात अमित शाह गृहमंत्री, राजनाथ सिंह संरक्षणमंत्री आहेत. पण अनेक अशी मंत्रालये आहेत जी कोणत्याही मंत्र्याला देण्यात आलेली नाहीत, कारण ते सर्व विभाग मोदींनी स्वत:कडेच ठेवली आहेत. जाणून घ्या कोणते खाते मोदींनी आपल्याकडेच ठेवली आहेत. पंतप्रधानांकडे असलेली खाती पंतप्रधान कार्यालय कार्मिक मंत्रालय...
  May 31, 03:46 PM
 • नवी दिल्ली- राष्ट्रपती भवनात गुरुवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नूतन मंत्र्यांच्यां शपथविधी समारंभात देश-विदेशातील सुमारे ८ हजार पाहुणे सहभागी झाले होते. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधीही सहभागी झाले होते. उद्योग क्षेत्रातील रतन टाटा, मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी, नारायणमूर्तीही राष्ट्रपती भवन परिसरात सहभागी झाले होते. पार्श्वगायिका आशा भाेसले, अभिनेता रजनीकांत,...
  May 31, 10:59 AM
 • नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या महिन्यातच तीन देशांचा दौरा करणार आहेत. पहिला दौरा मालदीव अाहे. दुसऱ्या आठवड्यात ते किर्गिस्तानला जातील. महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ते जी-२० शिखर बैठकीत सहभागी होण्यासाठी जपान भेटीवर जातील. या दौऱ्यांत त्यांची जगभरातील अनेक नेत्यांशी भेट व चर्चा होईल. दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या ३० दिवसांत ८ तासांचा प्रवास करून माली ते दिल्ली येणे-जाणे, सुमारे ४० तासांचा प्रवास करून ओसाका, तर ७...
  May 31, 10:08 AM
 • नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाने मंथन केले. एकीकडे अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्यावर आडून होते. दुसरीकडे अनेक राज्यांतील काँग्रेस कार्यकारिणीतील मोठ्या बदलाचे संकेत मिळू लागले आहेत. काँग्रेसने आपल्या प्रवक्त्यांसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला गुरुवारी म्हणाले, पुढील महिन्यापर्यंत पक्षाचे सर्व प्रवक्ते टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होणार नाहीत. काँग्रेस नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रण देऊ नये, असे आवाहन सुरजेवाला यांनी...
  May 31, 10:00 AM
 • नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह ५७ मंत्र्यांनीदेखील शपथ घेतली. यात २४ कॅबिनेट, ९ स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री, तर २४ राज्यमंत्री आहेत. नियमानुसार मंत्रिमंडळात आणखी २३ जणांना मंत्रिपद मिळू शकते. मागील सरकारमधील ३६ मंत्र्यांना या वेळी स्थान मिळालेले नाही. यात अरुण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती, मनेका गांधी, महेश शर्मा, जेपी नड्डा, राज्यवर्धनसिंह राठोड, अनुप्रिया पटेल, सत्यपाल सिंह, मनोज सिन्हा, अनंतकुमार हेगडे यांचा समावेश आहे. भाजपचे...
  May 31, 09:00 AM
 • नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात झाली. हा शपथविधीचा सोहला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री आपल्या घरात बसून पाहत होत्या. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. शपथविधी कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी गोपनियतेची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्या मातोश्री आपल्या घरातील टीव्हीवर हा कार्यक्रम पाहत होत्या. मोदींनी शपथ घेतली तेव्हा त्यांच्या मातोश्री ताळ्या वाजवताना दिसल्या....
  May 30, 07:23 PM
 • नवी दिल्ली- देशाच्या राजकारणतून मोठी घडामोड समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार आणि राहुल गांधी यांची दिल्लीत सध्या बैठक होत आहे. या बैठकीनंतर ही माहिती समोर आली, पण याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाहीये. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन करण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. पवार-राहुल यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मूळ काँग्रेसमधून फुटून निर्माण झालेल्या सर्व पक्षांना...
  May 30, 06:24 PM
 • नवी दिल्ली - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा सत्ता स्थापित करणाऱ्या एनडीए सरकारचे मंत्री गुरुवारी शपथ घेत आहेत. यामध्ये 64 मंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवन परिसरात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मोदींनी शपथविधी होण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी नवीन मंत्री होणाऱ्या खासदारांना लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेटीसाठी बोलावले. या सर्वच मंत्र्यांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः फोन करून आपण मंत्री होणार...
  May 30, 05:02 PM
 • नवी दिल्ली- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी रॉबर्ट वढेरा यांची 9व्यांदा चौकशी केली. यासाठी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी पती रॉबर्ट वढेरा यांच्यासोबत ईडीच्या ऑफिसमध्ये पोहचल्या. ईडी वढेरा यांच्या अवैध संपत्ती आणि लँड डील प्रकरणाचा तापस करत आहेत. चौकशीसाठी त्यांना बुधवारी समन्स जारी करण्यात आले होते. त्यांती लंडन, एनसीआर, बीकानेरसहित इतर जागांवर खरेदी केलेल्या जमिनीच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. ईडीच्या ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी वढेरा यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीली. त्यात...
  May 30, 02:38 PM
 • नवी दिल्ली -१७ व्या लोकसभा निवडणुकीतील भाजपप्रणीत एनडीएच्या मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी गुरुवारी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. शपथविधी सोहळा सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. मोदी यांच्यासह अनेक मंत्री शपथ घेतील. या वेळी या सोहळ्यासाठी ८००० पाहुणे येण्याच्या शक्यतेतून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्यास बिम्स्टेक देशांचे प्रमुख, व्हीव्हीआयपी आणि देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला निर्णय बदलत या सोहळ्यास...
  May 30, 11:07 AM
 • नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या सहकारी पक्षांकडून मोठा पराभव पत्करावा लागला असला तरीही विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आम आदमी पक्ष पुन्हा विजय मिळवेल, असा विश्वास या पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. केजरीवाल यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्येच पक्षाला एका जागेवर विजय मिळाला. इतर ठिकाणी मात्र पक्षाला पराभव पत्करावा...
  May 30, 10:07 AM
 • नवी दिल्ली- यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आजाद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात सामील होणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंगदेखील याठीकाणी हजेरी लावू शकतात. 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. तेलंगानाते मुख्यमंत्री के. चंद्रशेखर रावदेखील या कार्यक्रमात येणार आहेत. त्यांच्याशिवाय वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी येतील, पण आधी ते गुरुवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार...
  May 29, 07:58 PM
 • नवी दिल्ली- अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नवीन सरकारमध्ये सामील होण्यास असमर्थ असल्याचे सांगितले आहे. जेटली यांनी पत्रात आपल्या आरोग्याचे कारण दिले आहे. मोदींनी 2014 मध्ये सरकार चालवण्यासाठी जेटली यांना तीन मंत्रालये दिली होती. त्यात, अर्थ, रक्षा आणि सूचना आणि प्रसारण हे विभाग होते. मागील 7 मे रोजी किडनी ट्रांसप्लांटनंतर जेटली यांचे तब्येत पूर्णपणे ठीक झालेली नाहीये. फेब्रुवारीमध्ये झालेले शेवटचे बजेटदेखील ते सादर करू शकले नव्हते. त्यावेळी...
  May 29, 06:39 PM
 • नवी दिल्ली- भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोदी सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे खात्रीशीर सुत्रांकडून कळाले आहे. न्यूज एजंसी आयएएनएसनुसार, आता पक्ष अध्यक्षाचे पद आरोग्य मंत्री मंत्री जे.पी. नड्डा यांना दिले जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीत नड्डा यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आले होती. ही जबाबदारी योग्य रितीने पार पाडत त्यांनी यूपीत 80 पैकी 62 जागा मिळून दिल्या. अमित शाह यांनी 2014 मध्ये यूपीत 71 जागा मिळून दिल्या होत्या. 2014 मध्ये अमित शाह यांना मिळाली होती यूपीची जबाबदारी 2014 लोकसभा...
  May 29, 06:39 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात