जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Delhi

Delhi News

 • नवी दिल्ली - मनपा अधिकाऱ्यांना क्रिकेट बॅटने मारहाण करून चर्चेत आलेल्या भाजप आमदारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. आकाश विजयवर्गीयचे नाव न घेता मोदींनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. मला या गोष्टीने काहीच फरक पडत नाही, की या घटनेमागे कुणाच्या मुलाचा हात आहे. अशा स्वरुपाचे वर्तन कदापी सहन करता येणार नाही. ज्या लोकांनी त्याला यासाठी प्रोत्साहित केले, त्यांना देखील पक्षातून काढायला हवे. आकाश विजयवर्गीय भाजपचे वादग्रस्त नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत. गेल्या...
  July 2, 12:52 PM
 • नवी दिल्ली -माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी दरात घट करण्यास विरोध केला आहे. यामुळे सरकारच्या महसुलावर परिणाम होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक जुलै रोजी जीएसटीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये हे मत नमूद केले.] माजी अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जीएसटी दरात आणखी कपात करायला नको. यामुळे सरकारकडे खर्च करण्यासाठी साधने कमी पडू शकतात. यामुळे महसूल संकलनावर विपरीत परिणाम होईल आणि खर्च करण्यास पैसे राहणार नाहीत. आगामी अर्थसंकल्पात जीएसटी दरात...
  July 2, 11:06 AM
 • नवी दिल्ली -मान्सून उशिराने आल्याने तसेच वायू वादळामुळे याची गती मंदावल्याने जूनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी झाला. मागील पाच वर्षांत जून महिन्यात झालेला हा सर्वात कमी पाऊस आहे. याआधी २०१४ मध्ये या महिन्यात सामान्यपेक्षा ४२ टक्के कमी पाऊस झाला होता. सामान्यपणे एक जुलैपर्यंत मान्सून पूर्ण देशात मान्सून पोहोचलेला असतो. मात्र, यंदा केवळ दोन तृतीयांश भागातच पोहोचला आहे. यामुळे यंदा देशातील खरीप पेरणी सामान्यच्या तुलनेत २५.४५ % कमी झाली. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशात एकूण...
  July 2, 10:54 AM
 • नवी दिल्ली -गृहमंत्री अमित शहांनी सोमवारी राज्यसभेत दोन विधेयके सादर केली. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा अवधी ६ महिने वाढवण्याचे आणि आरक्षण दुरुस्तीशी संबंधित ही दोन्ही विधेयके सर्वसंमतीने मंजूर करण्यात आली. लोकसभेत ती आधीच मंजूर झाली आहेत. जम्मू-काश्मीर मुद्द्यावर विरोधकांवर टीका करताना शहा म्हणाले, काश्मिरी पंडितांना आपल्याच देशात त्रास सहन करावा लागत आहे, त्यांची धार्मिक स्थाने तोडण्यात आली. तुम्ही त्यावर बोलला असता तर तुम्हाला कश्मिरियतची चिंता आहे हे मानले असते....
  July 2, 08:14 AM
 • नवी दिल्ली -गेल्या सव्वा महिन्यापासून काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्यावर ठाम असलेले राहुल गांधी येत्या दोन दिवसांत आपल्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतील. राहुल यांनी राजीनामा माघारी घेतला नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे यांच्या नावावर गांभीर्याने विचार सुरू आहे. सोनिया गांधी यांनीही फोनवर त्यांच्याशी चर्चा केली आहे. सूत्रांच्या मते, संसदेच्या अधिवेशनानंतर...
  July 2, 07:41 AM
 • नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मिरातील गिलगिट-बाल्टिस्तान लोकसभा मतदार संघ जाहीर करण्याची याचिका सोमवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. भारताच्या सर्वोच्च गुप्तचर संस्था रॉचे माजी अधिकारी राम कुमार यादव यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांनी आपल्या याचिकेतून केंद्र सरकारला न्यायालयाने निर्देश द्यावे अशी विनंती केली होती. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावतानाच याचिकाकर्त्यांवर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या...
  July 1, 03:08 PM
 • नवी दिल्ली- भारत रशियाकडून अँटी-टँक मिसाइल स्ट्रम अटाका खरेदी करणार आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये 200 कोटींचा करार झाला आहे. मिसाइलला एमआय-35 हेलिकॉप्टरमध्ये लावले जाईल. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपातकालीन नियमांतर्गत रशिकाडून अँटी-टँक मिसाइलसाठी डील झाली आहे, या करारांतर्गत तीन महिन्यात भारताला हे मिसाइल मिळणार आहे. सुत्रानुसार, अँटी मिसाइलला युद्धक एमआय-35 मध्ये लावल्याने शत्रुंचे टँक आणि इतर शस्त्रांसोबत लढाई करताना फायदा होईल. एमआय-35 भारतीय वायुसेनेचे अटॅकिंग...
  June 30, 06:59 PM
 • नवी दिल्ली- पंप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत परत आल्यावर रविवारी पहिल्यांदाच आपल्या रेडिओवरील मन की बातमध्ये आपले विचार मांडले. ते म्हणाले लोकसभा निवडणुकीदरम्यान तुमच्याशी बोलणे न झाल्याचे दुखः आहे, या कार्यक्रमाला खूप मिस केले. फेब्रुवारीमध्ये मी म्हणालो होतो की, आता 3-4 महिन्यानंतर भेटू, त्यावर अनेकांनी वेगळे अर्थ लावले. मला हा विश्वास तुमच्यकडूनच मिळाला आहे. तुम्हीच मला परत बोलण्याची संधी दिली आहे. मोदींनी पाण्याच्या संकटाच्या सामना करण्यासठी आणि पाण्याचे रक्षण करण्यासठी तीन...
  June 30, 02:14 PM
 • नवी दिल्ली -देशभरात गेल्या १० वर्षांत ३०% म्हणजे ४५०० नद्या कोरड्या पडल्या आहेत. गेल्या ७० वर्षांत ३० लाखांपैकी २० लाख तलाव, विहिरी, सरोवरे पूर्णपणे गायब झाली आहेत. भूजलाची स्थितीही अत्यंत खराब आहे. देशातील अनेक राज्यांत काही ठिकाणी भूजल पातळी ४० मीटरपर्यंत खाली गेली आहे. ही बाब चेन्नईत पाण्याची भीषण टंचाई पाहता दिव्य मराठीच्या देशभरात पाण्याच्या स्थितीवर केलेल्या पडताळणीत समोर आली आहे. विशेष म्हणजे अलीकडेच नीती आयोगाच्या अहवालातही म्हटले आहे की, २०३० पर्यंत ४०% लोकांना पिण्याचे पाणी...
  June 30, 12:28 PM
 • नवी दिल्ली - देशभरात ८० टक्के मुलांकडे स्मार्टफोन आहेत. अशा मुलांना सायबर दादागिरीला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या सहा महिन्यांत सायबर दादागिरीची १६ हजार प्रकरणे उजेडात आली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतीच ही माहिती दिली. राज्यसभेचे खासदार विकास महात्मे यांनी सायबर दादागिरीबद्दलची माहिती मागवली होती. त्यावर मंत्रालयाने उपाययोजनांची माहिती दिली. इंटरनेटवर मुले, महिलांच्या विरोधातील सायबर दादागिरी रोखण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आलेे....
  June 30, 10:18 AM
 • नवी दिल्ली - यंदा नैऋत्य मोसमी पाऊस विलंबाने आल्याने जूनमध्ये सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी पाऊस झाला. गेल्या शंभर वर्षांतील हा पाचवा दुष्काळी जून ठरला आहे, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. २९ जूनपर्यंत देशात सरासरी १५.९ सेंमी पाऊस होता. परंतु प्रत्यक्षात १०.४३ सेंमी पाऊस झाला. १९२३ मध्ये जून महिन्यात १०.२ सेंमी, १९२६ मध्ये ९.८७ सेंमी, २०१४ मध्ये ९.५४ सेंमी व २००९ मध्ये ८.५ सेंमी पाऊस झाला हाेता. २९ जूनच्या सायंकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार अंदमान-निकोबार, पूर्व राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्ये...
  June 30, 09:59 AM
 • नवी दिल्ली -संदेसरा भावांनी भारतीय बँकांना नीरव मोदीच्या तुलनेत खूप जास्त चुना लावला असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला आहे. ईडीच्या वतीने करण्यात आलेल्या तपासानुसार स्टर्लिंग बायोटेक लि. (एसबीएल) किंवा संदेसरा ग्रुप आणि याचे प्रमुख संचालक - नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती संदेसरा यांनी भारतीय बँकांची सुमारे १४,५०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेला ११,४०० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने ५,३८३ कोटी...
  June 30, 09:58 AM
 • नवी दिल्ली- राजस्थान सरकारने पहलू खान आणि त्यांच्या मुलांविरूद्ध बेकायदेशिररीत्या जनावरं घेऊन जाण्याच्या आरोपाखाली चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. पहलू खान यांचा एक एप्रिल 2017 काही कथित गोरक्षकांनी बेदम मारहाण केली होती, त्यानंतर उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. ते जयपूरवरून जनावरे घेऊन हरियाणाला आपल्या घरी जात होते, तेव्हा ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती. पहिली आफआयआर पहलू खान यांच्या हत्येप्रकरणी 8 जणांविरूद्ध आणि दुसरी आफआयआर विना कलेक्टर...
  June 29, 02:08 PM
 • नवी दिल्ली -काश्मीर समस्येच्या इतिहासावरून गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी लोकसभेत काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसने राज्याच्या वाईट स्थितीसाठी मोदी सरकारला जबाबदार ठरवले होते. त्यावर शहा म्हणाले की, काश्मीर समस्येचे मूळ पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे आहेत. त्यांनी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांना विश्वासात न घेताच काश्मीरचा एक भाग पाकिस्तानला दिला. राज्यातील राष्ट्रपती राजवट ६ महिने वाढवण्यासंबंधीच्या घटनात्मक तरतुदी आणि जम्मू-काश्मीर आरक्षण...
  June 29, 07:31 AM
 • नवी दिल्ली- केंद्रातील मोदी सरकार वन नेशन-वन कार्डसाठी मोठे पाऊल उचलणार आहे. यामुळे भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईलच, त्यासोबत रोजगाराच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या गरीबांनाही फायदा होणार आहे. गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या गरीब कुटुंबांना देशात कुठेही राशन खरेदी करता येईल. संपूर्ण देशासाठी एकच रेशन कार्ड देण्याची घोषणा केंद्र सरकारने गुरुवारी केली. या बदलानंतर एकापेक्षा अधिक कार्ड ठेवणाऱ्यांची संख्याही कमी होणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
  June 28, 07:02 PM
 • नवी दिल्ली- दुष्काळी मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी, अशी मागणी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत केली. त्यांना उत्तर देताना वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मराठीतून उत्तर दिले. मी महाराष्ट्राचीच असून मलाही शेतकऱ्यांच्या समस्या माहित आहेत, निश्चितच शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे स्मृती इराणी म्हणाल्या. स्मृती इराणी यांच्यासाठी प्रीतम मुंडेंनी इंग्रजीतून प्रश्न विचारला होता. पण मलाही मराठी येतं, असे...
  June 28, 06:37 PM
 • नवी दिल्ली- नवनिर्वाचीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये 6 महीन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी शाह म्हणाले की, रमजान, अमरनाथ यात्रेला लक्षात घेऊन नंतर निवडणुका ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या वर्षाच्या शेवटी त्याठिकाणी निवडणुका होत आहेत. शाहंनी काश्मीरमध्ये सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना आरक्षण देण्याचा प्रस्तावही मांडला. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये....
  June 28, 01:57 PM
 • नवी दिल्ली - रालाेआतील घटक पक्ष शिवसेनेनेही आता ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदान यंत्र दाेन-दाेन तासांला कसे बिघडते. मतदार रांगेत उभे असतात आणि निवडणूक आयाेग मात्र अशा तक्रारी मिळाल्या नसल्याचे सांगते, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राऊत गुरुवारी राज्यसभेत ईव्हीएमवर बाेलत हाेते. ईव्हीएमबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उत्तरावर राऊत यांनी आठवण करून दिली की, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी बुधवारी सांगितले हाेते की, स्वत:चे सामर्थ्य...
  June 28, 08:07 AM
 • नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. झारखंडमधील एका मुस्लिम तरुणाला बांधून मारहाण केल्याने मृत्यूचे प्रकरण व बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनांवरील मौन पंतप्रधानांनी बुधवारी सोडले. जमावाकडून झालेल्या हिंसाचारामुळे दु:ख व्यक्त करून मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. झारखंड झुंडशाही व हिंसाचाराचे केंद्र बनले आहे, असा आरोप केला...
  June 27, 10:36 AM
 • नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. मोदी यांनी झारखंडमध्ये मुस्लिम युवकाचा जमावाकडून झालेल्या मारहाणीतील मृत्यू आणि बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मेंदूज्वराने झालेले बालकांचे मृत्यू याबाबत प्रथमच मौन सोडले. मोदी यांनी झारखंडमधील जमावाने केलेली हिंसा दुर्दैवी असल्याचे सांगत विरोधकांबाबत काही प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान म्हणाले - झारखंड हे धमक्या आणि जमावाच्या...
  June 27, 08:19 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात