जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Delhi

Delhi News

 • नवी दिल्ली - प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबलावादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील ख्यातनाम कलाकारांना बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात देशभरातील ४२ कलाकारांना वर्ष २०१७ चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात...
  February 7, 08:55 AM
 • नवी दिल्ली. प्राप्तिकर परतावा दाखल करण्यासाठी आधारला पॅन कार्डशी संलग्नित करणे अनिवार्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. संबंधित प्रकरणात निर्देश देताना न्यायालयाने याआधीच प्राप्तिकर कायद्यातील कलम १३९ ए ए ला योग्य ठरवले असल्याचे न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांच्या पीठाने नमूद केले. आधारचे पॅन कार्डशी संलग्नीकरण न करता श्रेया सेन आणि जयश्री सातपुते यांचा २०१८-१९ चा प्राप्तिकर परतावा दाखल करून घेण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले होते. या आदेशाविरुद्ध...
  February 7, 07:54 AM
 • नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फार स्वच्छ स्वभावाचे आहेत. त्यांच्या मनात काही इच्छा असेल तर सर्वात आधी ते मला बोलले असते किंवा बोलतीलही. षड्यंत्र करणाऱ्यांपैकी ते नाहीत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. डेहराडूनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, २०१४ मध्ये राममंदिराचा मुद्दा नसता तरी सरकार स्थापन झाले असते, पण २०१९ मध्ये राममंदिर सर्वात आवश्यक मुद्दा आहे. भगवान राम सर्वांना प्रिय आहेत. त्यामुळे मंदिर उभारणे गरजेचे...
  February 7, 07:50 AM
 • नवी दिल्ली - सबरीमाला मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवासम बोर्डाने त्यांच्या भूमिकेवरून माघार घेतली आहे. त्यांनी महटले आहे की, सुप्रीम कोर्टाच्य आदेशाचा सन्मान करत सर्व वयाच्या महिलांना मंदिरात प्रवेशाची परवानगी दिली जाणार आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात 54 पुनर्विचार याचिकांसह 64 अर्ज सादर करण्यात आले होते. बुधवारी यावर सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील घटनापीठाने सुनावणी केली. याचिकाकर्ते म्हणाले-परंपरेचा संबंध वर्णभेदशीनको याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या नायर...
  February 6, 04:41 PM
 • नवी दिल्ली - आसाममध्ये एनआरसीचे (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ) काम दोन आठवड्यांसाठी थांबवण्यात यावे, ही केंद्र सरकारची मागणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने कठोर शब्दांत सरकारला फटकारले. गृह मंत्रालय जणू आसाममधील एनआरसीच्या प्रक्रियेला विस्कळीत करू इच्छिते आहे, असे वाटते. कारण ते एनआरसी प्रक्रियेसाठी काहीही सहकार्य करण्यास तयार दिसत नाही. एनआरसीसाठी निश्चित करण्यात आलेली ३१ जुलैची तारीख वाढवली जाणार नाही, असे...
  February 6, 09:07 AM
 • नवी दिल्ली - गांधी-नेहरू घराण्यातील पाचव्या पिढीतील प्रतिनिधी प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. अाता त्यांना दिल्लीतील २४ अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात केबिन मिळाली आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या शेजारची केबिन त्यांना देण्यात आली आहे. सरचिटणीसपदी असताना राहुल यांना जी केबिन दिली होती, त्या केबिनमध्ये आता प्रियंका बसणार आहेत. राहुल यांच्या शेजारचीच ही केबिन अाहे. राहुल गांधी २००७ मध्ये काँग्रेसेचे सरचिटणीस झाले हाेते. त्यानंतर २०१३ मध्ये उपाध्यक्ष...
  February 6, 09:00 AM
 • नवी दिल्ली - प. बंगाल सरकार आणि सीबीआय यांच्यातील तणावपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दोन्ही बाजूंनी अशा नाहक विरोधाभासापासून दूर राहिले पाहिजे, अशा शब्दांत दोन्ही पक्षांना फटकारले. सीबीआयच्या याचिकेवर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालय म्हणाले, शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणाच्या चौकशीत पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना सहकार्य करावे लागेल. मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने राजीव कुमार यांना सीबीआयच्या...
  February 6, 07:53 AM
 • नवी दिल्ली - तेलंगणच्या )Telangana)नालगोंडामध्ये 5 महिन्यांपूर्वी झालेल्या ऑनर किलिंगमुळे (Honor Killing) देशभरात खळबळ उडाली होती. तेव्हा 23 वर्षीय तरुण प्रणयची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली होती, कारण त्याने सवर्ण जातीतील अमृताशी लग्न केले होते. तरुणीच्या वडिलांना आपली मुलगी दलित तरुणाच्या मुलाची आई बनू नये असे वाटत होते. अमृताला असे करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी तिचा गर्भपात करण्याचीही धमकी दिली होती, परंतु अमृताने त्याची पर्वा केली नाही. ती जेव्हा 4 महिन्यांची गर्भवती होती, तेव्हा तिच्या...
  February 6, 12:01 AM
 • नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने 8 वर्षापूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा केला आहे. महिलेचा मृतरदेह यमुना किनारी उस्मानपूर परिसरात डिसेंबर 2011 मध्ये मिळाली होती. सुरूवातीला मृतदेहाबद्दल पोलिसांना काहीच पुरावे सापडले नाही. तर महिलेच्या भावाने जानेवारी 2012 महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार मॉडल टाउन पोलिस ठाण्यात केली होती. महिलेच्या भावाने संशय व्यक्त केला होता की, तिचे पतीसोबत भांडण झाले असावे. त्याने हेदेखील सांगितले की, घर मालकासोबत तिचे घर रिकामे करण्यावरून वाद सुरू...
  February 4, 03:40 PM
 • गुरुग्राम - सेक्टर-5 परिसरात एक विवाहितेची तिच्या पतीने निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. महिलेच्या शरीरावर चाकूने 41 वार करण्यात आले आहेत. दुसरीकडे लोखंडी पान्याने तिच्या डोक्यावर एवढे वार केले की, तिचा मेंदू कवटी फुटून बाहेर आला. वंशिका (24 वर्षीय) ऊर्फ नेहा असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह 2017 मध्ये झाला होता. चौकशीत आरोपी पती पंकजने सांगितले की, त्याची पत्नी त्याच्याशी नीट वागत नव्हती. ती तिच्या माहेरच्या माणसांचे ऐकून माझा अपमान करायची. यामुळे त्याच्या मनात खूप राग साचला...
  February 4, 12:30 PM
 • कोलकाता - शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीवरून झालेला वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. सोमवारी सीबीआयने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोलकात्याचे पोलिस आयुक्त पुरावे नष्ट करू शकतात अशी शक्यता सीबीआयने कोर्टासमोर व्यक्त केली आहे. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले की, जर त्यांच्या मनातही असा विचार आला तर आम्हाला पुरावा द्या, अशी कारवाई करू की, त्यांना पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, या प्रकरणी सरकारी वकिलांनी या प्रकरणी सोमवारीच...
  February 4, 12:22 PM
 • नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशात सतत बर्फवृष्टी सुरूच असून ५-८ फेब्रुवारीपर्यंत राज्यात पाऊस होण्याची शक्यता भारतीयह हवामान विज्ञान विभागाचे संचालक मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली आहे. सिंह म्हणाले, जानेवारी व फेब्रुवारीमध्ये हिमालय क्षेत्रात प्रत्येक महिन्यात सरासरी पाच पश्चिम विक्षोम सक्रिय होतात. एका दीर्घ खंडानंतर या वेळी राज्यात पश्चिम विक्षोम (वेस्टर्न डिस्टर्बन्स) एकानंतर एक सक्रिय आहे. पश्चिम विक्षोम भूमध्य सागरात निर्माण होणाऱ्या एका वादळ प्रणालीसाठी वापरल्या जाणारा...
  February 4, 10:09 AM
 • न्यूयॉर्क - केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान किसान योजनेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदत निधीत वाढ होण्याचे संकेत दिले. शेतकऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या 500 रुपयांच्या निधीमध्ये भविष्यात वाढ होऊ शकते असे ते म्हणाले. अरुण जेटली सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. भारतात त्यांच्या अनुपस्थितीमुळे काळजीवाहू अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावर वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना जेटली बोलत होते. पंतप्रधान शेतकरी योजनेचा हा पहिलाच वर्ष आहे. येणाऱ्याकाळात...
  February 3, 06:04 PM
 • नवी दिल्ली- महात्मा गांधीचे हे १५० वे जयंती वर्ष साजरे होत आहे. नवी दिल्ली महापालिका (एनडीएमसी) व खादी ग्रामोद्योग आयोग अनोख्या पद्धतीने साजरे करत आहे. दोघांनी मिळून एनडीएमसीच्या मुख्यालयात देशातील १५० ठिकाणांहून माती आणली आणि त्यापासून ३८७० कुल्हड तयार केले. त्यानंतर भिंतीवर महात्मा गांधींची म्युरल पेंटिंग तयार केली. १५० चौरस मीटरची ही भिंत १५० कलावंतांनी बांधली होती. यासाठी विविध राज्यांतील माती येथे आणण्यात आली. या पेंटिंगचे अनावरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते...
  February 3, 10:39 AM
 • नवी दिल्ली- प्रियंका गांधी यांच्यावर सोशल मीडियावर व्यक्तिगत टीका करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करणार असल्याचे राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुश्मिता देव यांनी सांगितले. देव दिल्लीत तर इतर राज्यांतील महिला काँग्रेसच्या अध्यक्ष त्या त्या राज्यांत सोमवारी एफआयआर दाखल करतील, अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली. सुश्मिता देव म्हणाल्या की, प्रियंका यांच्यावर आता व्यक्तिगत पातळीवर टीका होत आहे. देशात राजकारणातील महिलांची संख्या कमी आहे. त्यातच ज्या महिला राजकारणात येतात...
  February 3, 10:20 AM
 • नवी दिल्ली- फ्रान्सच्या डॅसो कंपनीकडून लढाऊ विमान रफालच्या खरेदीसंबंधीचा अहवाल उजेडात आला आहे. हा अहवाल संरक्षण मंत्रालयाच्या समितीने तयार केला आहे. डॅसो एव्हिएशन कंपनी वर्षभरात ८ विमानांची निर्मिती करू शकत असल्यास ती भारताला वेळेवर सर्व विमाने कशी देऊ शकेल? असा प्रश्न त्यात उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत समितीने अहवालात सविस्तर टिप्पणी केली आहे. १२६ रफाल विमानाच्या सौद्यानुसार पहिले विमान करारापासून ३६ व्या महिन्यात, तर १८ वे विमान ४८ व्या महिन्यात मिळणे अपेक्षित होते. अर्थात ती...
  February 3, 09:59 AM
 • नवी दिल्ली- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दूरसंचार कंपनी एअरसेलचे माजी संचालक सी. शिवशंकरन यांच्याशी संबंधित कंपनीची २२४.६ कोटी रुपयांची संपत्ती सील केली आहे. आयडीबीआय बँकेच्या कथित स्वरूपातील सुमारे ४७० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात मनी लाँडरिंगचा तपास करत असलेल्या ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने सांगितले की, कॅरेबियन देश ब्रिटिश व्हर्जिन आयर्लंडमधील शिवा ग्रुप ऑफ कंपनीज आणि एक्सेल सनशाइन लिमिटेडच्या विरोधात पीएमएलएचमधील तरतुदीअंतर्गत संपत्ती सील करण्याची प्रोव्हिजनल...
  February 3, 09:21 AM
 • नवी दिल्ली- यंदा कडाक्याच्या थंडीने नवे विक्रम नोंदवले आहेत. दरवर्षी मध्य भारतापर्यंत येणारी थंडीची लाट यंदा दक्षिण भारतात जाऊन धडकली. आता येणारा उन्हाळाही असाच कडक राहील आणि पारा २ अंशांनी चढा राहील. मान्सूनच्या पावसाचे प्रमाणही चांगले राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या क्लायमॅट प्रेडिक्शन विभागाचे प्रमुख डी.एस. पई यांनी सांगितले, दरवर्षी थंडीच्या लाटेचा परिणाम दक्षिण भारतात फारसा जाणवत नाही. यंदाच्या जानेवारीत थंडीच्या लाटेने...
  February 3, 07:37 AM
 • नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर तसेच दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सायंकाळी भूकंपाचे जोरदार धक्के डाणवले. या भूकंपाचे केंद्र अफगानिस्तानातील हिंदुकुशमध्ये होते. प्राथमिक माहितीनुसार केंद्रस्थानी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 एवढी होती. भारतात अद्याप कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही.
  February 2, 07:20 PM
 • नवी दिल्ली - केंद्रीय गुन्हे अन्वेषन म्हणजेच सीबीआय या केंद्रीय तपास संस्थेच्या संचालकपदी ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला हे 1983 सालच्या बॅचमधील आयपीएस अधिकारी आहे. सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मा यांच्या बाजुने निकाल दिल्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने त्यांची होमगार्डमध्ये उचलबांगडी केली होती. त्यानंतर वर्मा यांनी राजीनामा दिल्याने एम. नागेश्वर राव यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर उच्चाधिकार समितीने आता शुक्ला...
  February 2, 05:43 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात