Home >> National >> Delhi

Delhi News

 • नवी दिल्ली- सणासुदी व लग्नसराईच्या निमित्ताने खरेदीत तेजी आल्याने सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमवर 125 रुपयांनी वधारून 32,625 रुपयांवर (दिल्ली) पोहोचले. गेल्या 6 वर्षांतील हे सर्वाधिक दर आहेत. दुसरीकडे, औद्योगिक मागणीत घट झाल्याने चांदीच्या दरात 130 रुपयांची घसरण झाली. ती 39,600 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. गेल्या 3 दिवसांत सोने 405 रुपयांनी महागलेे. सोमवारी प्रति 10 ग्रॅम दर 32,220 रुपये होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर तीन महिन्यांच्या उच्चांकावर आहेत. गुरुवारी सिंगापूरमध्ये...
  October 26, 07:11 AM
 • नवी दिल्ली- सोशल मीडियावर अफवा व भावना भडकावणारे मेसेज थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे निर्देश केंद्र सरकारने संबंधित कंपन्यांना दिले आहेत. काही समाजविघातक शक्ती या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग करत असल्याच्या तक्रारी अाहेत. त्याचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असेही निर्देश दिले. केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले, सोशल मीडियाने आपल्या व्यासपीठावर अफवा, अशांती पसरवणे, महिला आणि मुलांविरुद्ध गुन्हेगारी तसेच राष्ट्रहिताविरुद्धच्या कारवाया थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा...
  October 26, 06:49 AM
 • नॉलेज डेस्क- दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. कोर्टाने फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी न आणता काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. अर्जुन गोपाल, आरव भंडारी,जोया राव भासिन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. वरिष्ठ वकील गोपाळ शंकरानारायण यांनी खटला लढविला होता. सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय कितपत योग्य ठरेल? इकोफ्रेंडली फटाके कसे असतात? कोर्टाचे नियम मोडले तर का कारवाई होईल? हे...
  October 25, 07:37 PM
 • नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने दीवाळीच्या दिवशी दोनच तास फटाके फोडणे आणि प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर निर्बंधाचा निर्णय नुकताच जारी केला. या निकालावरून लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती तयार झाली आहे. राजधानीतील पर्यावरण तज्ज्ञ आणि जागरूक लोक सुद्धा या निर्णयाच्या अंमलबजावणीवर गोंधळात सापडले आहेत. त्यांच्या मते, गतवर्षी दिवाळीत प्रतिबंधित राहिलेले फटाके वाजवण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत प्रदूषणाचे ढग तयार झाले होते. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिलेल्या निर्णयात ग्रीन फटाके...
  October 25, 06:04 PM
 • नवी दिल्ली - बुराडी प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. एकाच घरातील 11 जणांनी एकाचवेळी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सर्वांना एकच प्रश्न पडला होता, तो म्हणजे 11 जणांसोबत नेमके काय झाले होते? जो काही तपास झाला त्यातून ठोस माहिती समोर आली नाही. परंतु चार महिन्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्या रात्री जे काही घडले तो एक अपघात होता. 11 जणांचा खुनही झाला नाही किंवा त्यांनी आत्महत्याही केली नाही. चार महिन्यानंतर रिपोर्टमध्ये चकीत करणारा खुलासा या घटनेचा उलगडा...
  October 25, 05:23 PM
 • नवी दिल्ली - वर्ष 2012 मध्ये आलेले विकी डोनर चित्रपट तर तुम्ही पाहिलाच असेल. चित्रपटात विकी नावाच्या एक पंजाबी मुलाची भूमिका साकारणाऱ्या आयुष्यमान खुराणाने स्पर्म डोनेटरचे आयुष्य दाखवले होते. परंतु आज आम्ही तुम्हाला रिअल लाइफमधील स्पर्म डोनेटरविषयी सांगत आहोत. याचे वय फक्त 22 वर्षांचे आहे. दिल्लीमध्ये राहणार हा तरुण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तरुणाने सांगितले की, मी एक छोट्याशा गावातून आलो आहे आणि आमच्या भागात लग्नापूर्वी एखाद्या मुलीसोबत संबंध स्थापित करणे फार अवघड काम आहे. एकदा या...
  October 25, 04:19 PM
 • लद्दाख- चीनने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचे दोन हेलिकॉप्टर 27 सप्टेंबरला जम्मू-काश्मीरला लागून असलेल्या लद्दाखमध्ये घुसखोरी करून तब्बल 10 मिनिटे भारतीय वायुसेनेच्या हद्दीत थांबले होते. भारत-तिबेटीयन सीमा पोलिसांनी याप्रकरणी आपला अहवाल सादर केला आहे. ट्रिंग हाइट भारतीय रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाची असून या परिसरात दौलत बेग ओल्डी एअरफील्ड देखील आहे. चीनने वारंवार या भागात घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. 30 सप्टेंबर रोजी एका पाकिस्तानी...
  October 25, 04:03 PM
 • नवी दिल्ली - CBI मध्ये सुरु असलेला अंतर्गत संग्राम वाढत चालला आहे. एजन्सीचे डायरेक्टर अलोक वर्मा आणि स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांची लढाई दिल्ली हायकोर्टात पोहोचली आहे. अस्थाना यांनी स्वतःविरुद्धची FIR रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबरपर्यंत त्यांची अटक थांबवण्यात आली. एजन्सीने आपल्याच स्पेशल डायरेक्टरवर मीट व्यावसायिक मोईन कुरेशीकडून 3 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप लावला आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला 8 अशा IPS अधिकाऱ्यांची माहिती देत आहोत, जे कधी...
  October 25, 12:49 PM
 • नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा अर्थात सीबीआयमधील वाद आणखीच चिघळू लागला आहे. संचालक आलोक वर्मा व उपसंचालक राकेश अस्थाना यांच्याकडून सर्व जबाबदाऱ्या परत घेऊन त्यांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांतील या वादाची सुरुवात एक वर्षापूर्वी झाली होती. तेव्हापासून दोघे परस्परांवर भ्रष्टाचाराचे आरोप करू लागले आहेत. अस्थाना यांच्या सीबीआयमधील पदोन्नतीवरील निर्णयासाठी झालेल्या सीव्हीसीच्या बैठकीत वर्मांनी पदोन्नतीला विरोध केला होता. त्यानंतर अस्थाना यांनी...
  October 25, 09:34 AM
 • नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंगळवारी रात्री सीबीआय संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थानांना सक्तीच्या रजेवर पाठवले. दोघांनी एकमेकांवर लाचखोरीचे आरोप केले होते. तोवर सहसंचालक एम. नागेश्वर राव यांना संचालकपदाची जबाबदारी सोपवली. सीव्हीसीच्या शिफारशींवरून पंतप्रधानांच्या नेतृत्वातील समितीने मंगळवारी रात्री हे निर्णय घेतले. या निर्णयाविरुद्ध आलोक वर्मांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ते म्हणाले, प्रत्येक चौकशी सरकारच्या कलेनेच व्हावी, असे नाही. काही वेळा चौकशीची दिशा...
  October 25, 08:18 AM
 • नवी दिल्ली - पेटीएमच्या विजय शेखर यांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रकरणामध्ये याच कंपनीच्या व्हीपी सोनिया धवनसह तिघांना अटक केली आहे. पण पोलिसांच्या मते सोनियाच या संपूर्ण प्रकरणाची मास्टर माइंड होती. या संपूर्ण कटामध्ये सहभागी असलेल्या देवेंद्रने सोनियाच्या म्हणण्यानुसारच डेटा कॉपी केला होता, असेही पोलिसांचे मत आहे. कोण आहे सोनिया.. सोनियाच्या आजवरच्या करिअरचा विचार करता ती चांगलीच यशस्वी ठरलेली आहे. अनेक दिवस विजय शेखर यांची सेक्रेटरी म्हणून तिने काम केले. त्यानंतर ती कंपनीची...
  October 24, 07:04 PM
 • नवी दिल्ली - सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याच्या प्रकरणाने आता राजकारण पेटले आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, राफेल घोटाळा समोर येऊ नये म्हणून त्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे. राहुल गांधी यांनी याबाबत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राजस्थानात निवडणूक प्रचाराच्या सभेत बोलताना राहुल गांधींनी सीबीआयचे प्रकरण आणि रफाल डीलचा संबंध जोडत सरकारवर आरोप केले आहेत. राहुल गांधी यावेळी म्हणाले, काल रात्री चौकीदाराने सीबीआयच्या डायरेक्टरला पदावरून...
  October 24, 03:17 PM
 • नवी दिल्ली - देशातील प्रमुख गुन्हे तपास संस्था सीबीआयमधील लाचखोरी प्रकरणाने एकच गोंधळ उडाला आहे. केंद्राने आरोप असलेल्या सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत नागेश्वर राव यांना सीबीआयचे प्रभारी संचालक नेमले आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याप्रकरमी माहिती दिली. सीबीआयमध्ये विचित्र स्थिती निर्माण झाली असून आरोपांची चौकशी करण्याचे अधिकार सरकारला नसल्याचे जेटली...
  October 24, 12:46 PM
 • नवी दिल्ली - गूगल प्लेस्टोअरवर एसबीआय, आयसीआयसीआय, अॅक्सिस, इंडियन ओव्हरसिज, बँक ऑफ बडोदा, यस आणि सिटी बँकेचे बनावट अॅप्स आहेत. यातून हजाराे ग्राहकांच्या खात्यातून आणि क्रेडिट कार्डमधून डेटा चोरी होण्याचा धोका आहे. आयटी सेक्युरिटी कंपनी सोफोस लॅब्जने एका अहवालात हा दावा केला. यानुसार, हे सर्व अॅप्स बँकांच्या मूळ अॅप्सशी मिळते-जुळते असून ग्राहक यातील फरक ओळखू शकत नाहीत. दरम्यान, या बनावट अॅप्सबाबत माहिती नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे. शिवाय सोफोस लॅब्जला या अहवालातून आपल्या बँकांची नावे...
  October 24, 09:53 AM
 • नवी दिल्ली - दिवाळीच्या रात्री फक्त ८ ते १० वाजेपर्यंत दोनच तास फटाके फोडता येतील. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ही वेळमर्यादा घालून दिली. दिवाळीसह इतर सण-उत्सव वा लग्नातही फटाके फोडण्यासाठी सबंध देशात हाच नियम लागू असेल. ख्रिसमस व नववर्षी रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत फटाके फोडण्याची मुभा राहील. आता देशात फक्त कमी आवाजी, कमी प्रदूषण करणाऱ्या ग्रीन फटाक्यांच्या निर्मिती-विक्रीची परवानगी असेल, असा आदेश कोर्टाने दिला. ई-काॅमर्स वेबसाइट्सवर फटाक्यांची ऑनलाइन विक्री करता येणार नाही....
  October 24, 07:54 AM
 • बनिहाल / जम्मू- जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात शहीद रणजितसिंह यांच्यावर अंत्यसंस्कारांची तयारी सुरू होती. त्याच वेळी शहिदाची पत्नी शिमूदेवी रुग्णालयात प्रसूत झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. रणजित व शिमू यांना अपत्यप्राप्तीसाठी दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. मुलीच्या जन्मानंतरच शहिदाला अंतिम निरोप द्यावा, असे नियतीलाही कदाचित मंजूर असावे. यासाठी अंत्यसंस्कारास थोडा उशीर लागला. राजोरी येथील सुंदरबनी सेक्टरमध्ये लान्स नायक रणजितसिंह (36) रविवारी दहशतवाद्यांशी लढताना...
  October 23, 08:14 PM
 • नवी दिल्ली - सीबीअाय विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याशी संबंधित सव्वातीन कोटींच्या लाचखोरी प्रकरणात आरोपी डीएसपी देवेंद्रकुमार यांना सोमवारी सीबीआयने अटक केली. देवेंद्र हे आधी अस्थानांच्या नेतृत्वातील एसआयटीमध्ये डीएसपी होते. त्यांच्याकडेच मांस व्यावसायिक मोईन कुरेशीच्या प्रकरणाचा तपासही होता. आरोपांनुसार, सीबीआयचे संचालक आलोक वर्मांना अडकवण्यासाठी देवेंद्रकुमार यांनी हैदराबादचा एक व्यापारी सतीश बाबू सनाचा बनावट जबाब नोंदवला होता. सीबीआयचे एक पथक रात्री उशिरापर्यंत...
  October 23, 08:49 AM
 • नवी दिल्ली : एका प्रेम विवाहाचा दुःखद अंत झाला. तरुणाने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर 24 तास मृतदेह घरातच पडून होता. या दरम्यान 2 वर्षांच्या मुलीला आईची आठवण आल्यामुळे आरोपी तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. आरोपीने शवाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला परंतु तसे काही करू शकला नाही. स्वतःची चूक लक्षात आल्यानंतर आरोपी स्वतः शनिवारी रात्री उशिरा मुलीला घेऊन कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. तेथे त्याने संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळावरून शव पोस्टमॉर्टमसाठी...
  October 22, 12:11 PM
 • नवी दिल्ली - विदेशांतून किती काळा पैसा देशात आला? त्यातील किती पैसे लोकांच्या खात्यात टाकले तसेच मे २०१४ ते ऑगस्ट २०१७ पर्यंत किती केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या व त्याच्याविरुद्ध काय कारवाई झाली, याची माहिती १५ दिवसांत द्यावी, असे निर्देश माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयास दिले आहेत. आयएफएस अधिकारी संजीव चतुर्वेदी यांच्या अपिलावर मुख्य माहिती आयुक्त आर. के. माथूर यांनी पीएमओला १५ दिवसांच्या आत ही माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. चतुर्वेदी यांनी एका...
  October 22, 08:07 AM
 • नवी दिल्ली - पार्ट-टाइम जॉब ऑफर करणारी कंपनी फ्लेक्सीजॉबने काही खास साइड बिझनेसचा त्यांच्या टॉप जॉब लिस्टमध्ये समावेश केला. अमेरिकन कंपनी फ्लेक्सीजॉब भारतात जॉब ऑफर करते. कंपनीने भारतीयांसाठी 10 कॅटेगरीत पार्टटाइम जॉब ऑफर केले आहेत. फ्लेक्सी जॉबनुसार लिस्टमध्ये फक्त अशा साइड बिझनेसचा समावेश आहे, ज्यात तासाला किमान 1000 रुपयांची कमाई होईल. त्यात 5 जॉब हे सर्वात चांगले समजले जात आहेत. ते 5 जॉब खालीलप्रमाणे आहेत. 1. ग्रुप फिटनेस इन्स्ट्रक्टर फ्लेक्सी जॉबच्या लिस्टमध्ये सर्वात आघाडीवर ग्रुप...
  October 19, 02:41 PM
 
जाहिरात

RECOMMENDED