जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Delhi

Delhi News

 • नवी दिल्ली - प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी संसदेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक लोकप्रिय घोषणांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र सर्वात मोठी घोषणा ठरली ती करदात्यांना दिलासा देणारी. विशेष म्हणजे पीयूष गोयल यांनी संसदेत ही घोषणा करताच भाजपच्या खासदारांनी बाके वाजवत एकच सेलिब्रेशन केले. मिनिटभर सुरू होते सेलिब्रेशन.. पीयूष गोयल यांनी लोकसभेत वार्षिक 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार अशी घोषणा करताच भाजप खासगदारांनी एकच सेलिब्रेशन...
  February 1, 03:35 PM
 • नवी दिल्ली- मोदी सरकार आपल्या कार्यकाळातील सहावा आणि अंतिम अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहे. प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर ठेवला आहे. मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे करमर्यादा अडीच लाखांवरून थेट पाच लाख करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरदार, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 3 कोटी करदात्यांना लाभ मिळणार आहे. 40 हजारापर्यंत व्याजही करमुक्त करण्यात आले आहे.80 सी अन्वये...
  February 1, 03:17 PM
 • नवी दिल्ली - मोदी सरकारच्या या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात जवळपास सर्वांसाठी लोकप्रिय घोषणांची बरसात करण्यात आली.प्रामुख्याने नोकरदार आणि मध्यमवर्गाला 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी ठरावीक उत्पन्नाची घोषणा सरकारने केली. कोणाला काय मिळाले... प्राप्तीकर तीन कोटी करदात्यांना फायदा मिळणारी घोषणा 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स लागणार नाही. तसेच...
  February 1, 02:58 PM
 • नवी दिल्ली-मोदी सरकार अंतरिम अर्थसंकल्प आज सादर करत आहे. निवडणुकीच्या तोंडावर यात काही महत्त्वपूर्ण घोषणांची अपेक्षा आहे. मोदी सरकारच्या पाच वर्षांतील अर्थसंकल्पांचा सीए उमेश शर्मा यांच्यासह ५ अर्थतज्ज्ञांशी केलेल्या चर्चेतून घेतलेला आढावा. 2014 : मोदी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प यूपीएने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने पहिला अर्थसंकल्प १० जुलैला मांडला. यात संरक्षण व विमा क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा २४ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत करण्यात आली. 2015 :...
  February 1, 10:07 AM
 • नवी दिल्ली- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय तपास संस्थांनी सूचना दिल्यानंतर सेनेगल पोलिसांनी त्याला अटक केली. तपास संस्थांना कर्नाटक पोलिसांनी माहिती दिली होती. कर्नाटक पोलिसांनीच पुजारीविरुद्ध इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. तो ऑस्ट्रेलियात असल्याची अटकळ बांधली जात होती. पुजारी १५ वर्षांपासून फरार आहे. खून, खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यात तो भारताला हवा आहे.
  February 1, 09:30 AM
 • नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील सर्व धर्मांमधील गरिबांना फायदा झाला. या सरकारने धर्माला गाैण स्थान देत सर्व धर्मांतील गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य दिले. तसेच ज्या-ज्या राज्यांत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, तेथेही एकही सांप्रदायिक दंगल किंवा कायदा-सुव्यवस्था बिघडवणारी घटना घडली नाही, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला. ते गुरुवारी येथे भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर बोलत होते. काँग्रेसवर टीका करताना या...
  February 1, 09:19 AM
 • नवी दिल्ली- नोटबंदी घोषित झाल्यानंतरच्या आर्थिक वर्षात २०१७-१८ मध्ये देशात बेरोजगारीचा दर वाढला असून तो ६.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या ४५ वर्षांतील हा सर्वाधिक दर आहे. एका इंंग्रजी वृत्तपत्राने राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या (एनएसएसओ) अहवालाचा हवाला देऊन हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. याच आठवड्यात राष्ट्रीय सर्वेक्षण संघटनेच्या दोन सदस्यांनी सरकारने हा अहवाल का प्रसिद्ध केला नाही, अशी विचारणा करत राजीनामा दिला होता. हा अहवाल अजूनही सरकारने सार्वजनिक केलेला नाही. २०१६ मध्ये...
  February 1, 07:21 AM
 • नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल शुक्रवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असून यानिमित्ताने विविध क्षेत्रांतील लोकांना दिलासा देणाऱ्या दमदार घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. जनतेलाही या अर्थसंकल्पातून खूप आशा आहेत. नोकरदार आणि चाकरमान्यांना यंदा प्राप्तिकरातील सूट देण्यासाठी असलेली मर्यादा वाढवली जाण्याची आशा आहे, तर दुसरीकडे कर्जाच्या ओझ्याखाली असलेले...
  February 1, 07:00 AM
 • नवी दिल्ली- दिल्लीच्या गुरूग्राम परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका घरमालकाच्या घरी बेडच्या आतमध्ये एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दिनेश असे घरमालकाचे नाव असून जवळपास पाच दिवसांपासून तो एका मृतदेहावर झोपत होता. घरात मृतदेह आढळून आल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली. घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात समोर आल्यानुसार, मृत महिला दिनेशच्या ड्रायव्हरची पत्नी आहे. कौटुंबिक वादातून ड्रायव्हरने पत्नीची हत्या केल्याचा संशय...
  February 1, 12:21 AM
 • दिल्ली : येथे एका व्यक्तीच्या खात्यातून अचानकपणे 1.20 लाख रुपये चोरी केल्याची घटना समोर आली आहे. एटीएम कार्ड व्यक्तीकडेच होते आणि त्याने कोणालाही कोणतीच माहिती शेअर केली नव्हती. पण तरीही एकापाठोपाठ तीन ट्रान्झॅक्शने खात्यातून पैसे काढले. अशावेळी चोरटे क्लोनिंगद्वारे ही चोरी करतात. यापासून बचाव करण्यासाठी काय करावे याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पाहा
  January 31, 02:05 PM
 • नवी दिल्ली-दिल्लीच्या मधु विहार परिसरात पोलिसांना एका सिरीयल सायको रेप्सिस्टला अटक केली आहे. मनिष चड्ढा असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर अनेक चिमुरडींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी मनिष मधु विहारपरिसरात एका चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या. आतापर्यंत अनेक चिमुरड्यांना बनवले वासनेचे शिकार पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी मनिषने एका चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतू चिमुरडीने आरडा-ओरड...
  January 31, 01:52 PM
 • नवी दिल्ली - संसदेत गुरुवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषण केले. यावेळी राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. 2014 च्या निवडणुकीपासून देश अनिश्चिततेला सामोरे जात होता. सरकारने हीच अनिश्चितता दूर करण्याची जबाबदारी उचलली. लोकांपर्यंत सुविधा कशा पोहोचतील याकडे सरकारने लक्ष दिले. तो मुलगा जो वीजेच्या अभावी अभ्यासाची वाट पाहत होता आणि तो युवक जो कर्जाच्या प्रतीक्षेत रोजगार करू शकत नव्हता, त्यांच्यासाठी योजना सुरू...
  January 31, 12:30 PM
 • नवी दिल्ली - सीबीआयचे काळजीवाहू प्रमुख एम नागेश्वरराव यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यापासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एनव्ही रमणायांनी माघार घेतली आहे. अंतरिम सीबीआय प्रमुखांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी याचिका करण्यात आली होती. एकेकाळी एम. नागेश्वर राव यांच्या मुलीच्या लग्नात आपण उपस्थिती नोंदवली होती. त्यामुळे, आपण त्यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी घेणे योग्य ठरणार नाही असे जस्टिस रमना यांनी स्पष्ट केले आहे. नागेश्वर राव यांच्या विरोधात...
  January 31, 11:27 AM
 • नवी दिल्ली/पणजी- कर्करोगाशी लढा देत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दाव्यांनी रफाल खरेदी करारावर नव्याने वाद सुरू झाला आहे. रफाल खरेदी करार बदलतेवेळी पंतप्रधानांनी संरक्षणमंत्र्याला काहीच विचारले नाही, असे पर्रीकर यांनी स्वत: मला सांगितल्याचा दावा राहुल यांनी बुधवारी केला. मात्र, पर्रीकर यांनी हा दावा चुकीचा असल्याचे सांगत राहुल यांना पत्र लिहिले. आपल्या जीवनाच्या अस्तित्वाची लढाई लढत...
  January 31, 08:12 AM
 • नवी दिल्ली- माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी 88 व्या वर्षी दिर्घ आजारने निधन झाले. ते अनेक वर्षांपासून अल्जायमर्सने ग्रासलेले होते. फर्नांडीस 1967 मध्ये दक्षिण मुंबईतून कांग्रेसच्या एस.के. पाटिलला हरवून पहिल्यांदा खासदार बनले होते. 1975 च्या आणीबाणीनंतर फर्नांडीस बिहारच्या मुजफ्फरपूर मतदार संघातून जिंकून लोकसभेत गेले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात बनलेल्या एनडीए सरकार (1998-2004) मध्ये फर्नांडीस यांना संरक्षण मंत्रालयची जबाबदारी देण्यात आली होती. कारगिल...
  January 30, 07:47 PM
 • नवी दिल्ली- आयएनएक्स मीडिया आणि एअरसेल- मॅक्सिस प्रकरणातील आरोपी आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले. कोर्टाने त्यांना कायद्याशी न खेळण्याचा इशारा देत खडसावले की, जर असे केले तर देवच तुम्हाला वाचवू शकतो. न्यायालयाने कार्तीला विदेशात जाण्यास सशर्त परवानगी दिली. सुरक्षेपोटी त्यांना १० कोटी रुपये कोर्टात जमा करावे लागतील. तसेच चौकशीसाठी प्रवर्तन संचालनालयासमोर (ईडी) हजर व्हावे लागेल. मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई...
  January 30, 07:35 PM
 • नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभ दरम्यान संगममध्ये स्नान केले. त्याचे काही फोटो सुद्धा समोर आले आहेत. त्याच फोटोंवरून काँग्रेस नेते शशी थरुर यांनी योगींना सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. योगी सरकारने मंगळवारी प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात कॅबिनेटची बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री योगींनी आपल्या कॅबिनेटसह कुंभमध्ये स्नान घेतला. त्यातील एक फोटो बुधवारी शेअर करताना थरुर म्हणाले, गंगा स्वच्छ करायची आहे आणि पाप सुद्धा याच ठिकाणी धुवायचे आहेत. यूपीए-1...
  January 30, 02:42 PM
 • नवी दिल्ली - प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Department) ने नोटीस बजावली आहे. अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी गायकाला सोमवारीच ही नोटीस बजावली असून यासंदर्भातील अधिकृत माहिती बुधवारी जारी करण्यात आली आहे. त्याने फॉरेन एक्सचेंजमध्ये जवळपास 2 कोटी रुपयांचा घोळ केल्याचे आरोप आहेत. या गैरव्यवहार प्रकरणात राहत फतेह अली खानला उत्तर देण्यासाठी ईडीने 45 दिवसांचा वेळ दिला आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी जारी केलेल्या माहितीनुसार, 2011 मध्ये दिल्ली विमानतळावर राहत फतेह अली...
  January 30, 11:34 AM
 • नवी दिल्ली - प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Department) ने नोटीस बजावली आहे. अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी गायकाला सोमवारीच ही नोटीस बजावली असून यासंदर्भातील अधिकृत माहिती बुधवारी जारी करण्यात आली आहे. त्याने फॉरेन एक्सचेंजमध्ये जवळपास 2 कोटी रुपयांचा घोळ केल्याचे आरोप आहेत. या गैरव्यवहार प्रकरणात राहत फतेह अली खानला उत्तर देण्यासाठी ईडीने 45 दिवसांचा वेळ दिला आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी जारी केलेल्या माहितीनुसार, 2011 मध्ये दिल्ली विमानतळावर राहत फतेह अली...
  January 30, 11:16 AM
 • नवी दिल्ली : विद्यापीठांतील नोकऱ्यांत आरक्षणासाठी रोस्टर प्रणाली केंद्र सरकारसमोर अडचणी वाढवू शकते. जॉइंट फोरम फॉर अॅकॅडमिक अँड सोशल जस्टिससह डझनभर संघटना गुरुवारी याविरोधात आंदोलन करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आठवडाभरापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश योग्य ठरवत सांगितले होते की, आरक्षणासाठी विद्यापीठाऐवजी विभागास युनिट मानले जावे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे एससी-एसटी व ओबीसीच्या सुमारे ४० टक्के जागांचे नुकसान होऊ शकते. विभागात कमीत कमी १५ जागा रिक्त...
  January 30, 09:39 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात