जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Gujarat

Gujarat News

 • अहमदाबाद - गुजरातच्या ठाकोर समुदायाच्या जात पंचायतीने मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी लावली आहे. यापुढे समुदायाच्या अवविहित मुलींना मोबाईल फोन वापरता येणार नाही. मोबाईल बाळगल्याप्रकरणी पकडले गेल्यास त्याचा दंड वडिलांना भरावा लागणार आहे. जात पंचायतीच्या फतव्यानुसार, दंडाची रक्कम म्हणून संबंधित मुलीच्या वडिलांकडून तब्बल 1.5 लाख रुपये वसूल केले जाणार आहेत. बनासकांठा येथील दंतीवाडा गावात हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या पंचायतीचे लोक आपल्या समुदायात राहणाऱ्यांसाठी नव-नवीन नियम...
  July 17, 02:58 PM
 • सुरत -सुरतच्या महावीर रुग्णालयातील डॉक्टरांनी स्टेम सेल थेरपीने तिसऱ्या स्टेजच्या ब्लड कॅन्सर पीडितेचा जीव वाचवला आहे. उपचार करणारे हेमॅटोलॉजिस्ट डॉ. धर्मेश वघासिया व डॉ. हसमुख बलार यांचा दावा आहे की, एक महिनाभर चाललेल्या उपचारानंतर रुग्णाची ब्लड कॅन्सरची शक्यता ९० टक्के संपली आहे. स्टेम सेल थेरपीने उपचार करण्याची दक्षिण गुजरातमधील ही पहिलीच वेळ आहे. मूळ उत्तराखंडची व सध्या सुरतमध्ये राहणाऱ्या दीपा राजभर (२६) असे या महिला रुग्णाचे नाव अाहे. तिची प्रकृती उत्तम आहे. तिला रुग्णालयातून...
  July 16, 10:23 AM
 • अहमदाबाद(गुजरात)- हिमाचलमध्ये इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. अहमदाबादच्या कांकरिया अम्यूझमेंट पार्कमध्ये झोपाळा तुटल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात झोपाळा तुटल्याने झाला. यात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर तत्काळ अग्नीशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे आणि सध्या बचावकार्य सुरू आहे. जखमी झालेल्या लोकांना...
  July 14, 08:29 PM
 • सुरत(गुजरात)- काकरा खाडी ब्रिजच्या रेल्वे ट्रॅकवर चालत जात असलेल्या राजस्थानच्या तिघांचा शनिवारी ट्रेन खाली येऊन मृत्यू झाला. तिघेही राजसमंदचे रहिवासी होते. तेथील सहा तरुण राजकोटमध्ये नोकरी करत होते आणि आता वलसाडमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यासाठी अजमेर-पुरी एक्सप्रेस बदलून सूर्यनगरी एक्सप्रेस मधून जात होते. ट्रेन सुरू झाली आणि काही वेळानंतर त्यांना ही ट्रेन वलसाडला थांबत नसल्याचे कळाले. काही वेळेनंतर ट्रेनची गती कमी झाल्यामुळे ते उधनाजवळ उतरले आणि पायी चालत रेल्वे ट्रॅकवरून उधना...
  July 14, 01:45 PM
 • सुरत -छायाचित्रात दिसणारे सुरतचे देवाणी दांपत्य आणि युक्रेनची नातालिया. या दोहोंमध्ये त्यांच्या मुलामुळे हृदयाचे नाते जोडले गेले आहे. देवाणी दांपत्याचा मुलगा रवी देवाणी याचा एप्रिल २०१७ मध्ये ब्रेन डेड झाला होता. त्यांनी रवीचे हृदय, किडनी व यकृत, पॅनक्रियाज व डोळे दान केले. रवी देवाणीचे हृदय मुंबईत युक्रेनची तरुणी नातालियावर प्रत्यारोपित करण्यात आले. फक्त ८७ मिनिटांत हृदय मुंबईत आणण्यात आले होते. यशस्वी उपचारानंतर नतालिया युक्रेनला परतली.
  July 13, 10:18 AM
 • अहमदाबाद -माहितीचा अधिकार क्षेत्रातील (आरटीआय) कार्यकर्ते अॅड. अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी भाजपचे माजी खासदार दिनू बोघा सोळंकी आणि इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जेठवा हे गीर वन विभागातील अवैध खनन प्रकरणे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांची हत्या झाली होती. दिनू सोळंकी हे २००९ ते २०१४ यादरम्यान जुनागढचे खासदार होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश के. एम. दवे यांनी हा निकाल देताना दिनू सोळंकी आणि त्यांचा पुतण्या शिवा यांना खून...
  July 12, 11:37 AM
 • सूरत - गुजरातमधील सुरतमध्ये स्मार्ट टीव्हीद्वारे गुप्तपणे बेडरूममधील खासगी छायाचित्रण होत असल्याच्या दोन दिवसांत दोन घटना उघडकीस आल्या. यात हॅकर्सनी कसलीही सिस्टिम न वापरता स्मार्ट टीव्हीने दांपत्याचा व्हिडिओ तयार केला. नंतर तो इंटरनेटवर व्हायरल केला. आपलाच व्हिडिओ पाहून या जोडप्यास धक्काच बसला. त्यांनी सायबर क्राइम शाखेत तक्रार दिली. सायबर क्राइमचे पोलिस निरीक्षक जे.बी. आहिर यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. सायबर एक्सपर्ट डॉ. चिंतन पाठक यांनी सांगितले,...
  July 10, 11:28 AM
 • नवी दिल्ली- गुजरातचे माजी गृह मंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज(शुक्रवार) खालच्या न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवून 12 आरोपींन दोषी ठरवले आहे. 2011 मध्ये गुजरात हायकोर्टाने सगळ्या आरोपींची सुटका केली होती, या निर्णयाविरूद्ध सीबीआय आणि गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 26 मार्च 2003 ला हरेन पांड्या सकाळी फिरण्यासाठी अहमदाबादच्या लॉ गार्डन परिसरात गेले असता, त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस ट्रायल कोर्टाने दहशदवाद...
  July 5, 01:50 PM
 • अहमदाबाद(गुजरात)-अहमदाबाद - जगातील सर्वात उंच मूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये लीकेज दिसून आले आहे. पहिल्याच पावसाळ्यात या मूर्तीमध्ये पाणी साचले. हे पाणी व्ह्यूइंग गॅलरीतून लीक होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 182 मिटर उंच अशा या मूर्तीवर तब्बल 3 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तरीही पहिल्याच पावसाळ्यात मूर्तीची ही अवस्था झाली. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांना शनिवारी मूर्तीच्या ज्या भागात लीकेज दिसून आले ते मूर्तीचे हृदय आहे. मुर्तीच्या मेंटेनन्सची...
  June 29, 06:09 PM
 • अहमदाबाद(गुजरात)- जामनगर सेशंस कोर्टाने गुरुवारी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि कॉन्स्टेबल प्रवीण झाला यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने त्या दोघांना तुरुंगात असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यू(कस्टोडिअल डेथ)साठी दोषी ठरवले आहे. 1990 मध्ये 133 जणांना अटक झाली होती संजीव भट्ट जामनगरचे तत्कालीन एएसपी होते. लालकृष्ण आडवाणींच्या रथयात्रेदरम्यान जातीय दंगलीवर नियंत्रण आणण्यासाठी 30 ऑक्टोबर 1990 ला जामखंभाणियामधून 133 जणांना अटक करण्यात आले होते. त्यांच्यात प्रभुदास वैष्णा...
  June 20, 02:48 PM
 • अहमदाबाद(गुजरात)- जामनगर सेशंस कोर्टाने गुरुवारी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि कॉन्स्टेबल प्रवीण झाला यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने त्या दोघांना तुरुंगात असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यू(कस्टोडिअल डेथ)साठी दोषी ठरवले आहे. 1990 मध्ये 133 जणांना अटक झाली होती संजीव भट्ट जामनगरचे तत्कालीन एएसपी होते. लालकृष्ण आडवाणींच्या रथयात्रेदरम्यान जातीय दंगलीवर नियंत्रण आणण्यासाठी 30 ऑक्टोबर 1990 ला जामखंभाणियामधून 133 जणांना अटक करण्यात आले होते. त्यांच्यात प्रभुदास वैष्णा...
  June 20, 02:28 PM
 • नवी दिल्ली -गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी वेगवेगळ्या वेळी निवडणूक घेण्याच्या निर्णयाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला नोटीस जारी करून सोमवारपर्यंत आपले उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जूनला होईल. या मुद्द्यावर सविस्तर सुनावणीची गरज आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. भाजपचे नेेते अमित...
  June 20, 10:57 AM
 • अहमदाबाद - हुंड्यामध्ये दुचाकी, कार आणि आवश्यक सामान दिले जाते, पण गुजरातच्या एका डॉक्टरने हुंड्यामध्ये चक्क कामवाली बाई मागितली. यामुळे पत्नीने पोलिसांत तक्रार दिली आहे. अहमदाबाद येथील डॉ.श्वेताबेनने आपला पती डॉ.आशीष पटेल याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. 2018 मध्ये दोघांचा विवाह झाला होता. दिलेल्या तक्रारीत श्वेताने सांगितले की, लग्नानंतर सासरी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत होता. तिला घरात कामवाली बाईची वागणूक देण्यात येत होती. तिची सासू म्हणायची की, डॉक्टर असली तर काय...
  June 15, 03:13 PM
 • वडोदरा - गुजरातच्या एका हॉटेलमध्ये सात मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. हे सर्वच मजूर हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये उतरून सफाई करत होते. त्याच दरम्यान सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 3 हॉटेलचे कर्मचारी होते. तर उर्वरीत 4 जण मजूर होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हॉटेल मालक अब्बास भोरानियाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच सर्वच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालकाने...
  June 15, 12:59 PM
 • अहमदाबाद- विमानात अपहरणाच्या धमकीची चिठ्ठी ठेवल्याप्रकरणी एनआयए कोर्टाने मंगळवारी मुंबईचे दागिने व्यापारी बिरजू सल्ला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय पाच कोटी रुपये दंडही ठोठावला. दंडाची रक्कम विमानाचे सात क्रू सदस्य आणि 115 प्रवाशांना देण्यात येणार आहे. वैमानिक आणि सहवैमानिकाला एक-एक लाख आणि हवाई सुंदरींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येतील. प्रवाशांना प्रत्येकी 25 हजार रुपये मिळतील. 2016 मध्ये लागू झालेल्या विमान अपहरण प्रतिबंधक कायद्यानुसार सुनावलेली ही पहिलीच शिक्षा आहे....
  June 12, 12:41 PM
 • पालनपूर(गुजारात)- येथील बनासकांठा जिल्ह्यातील जेसोर जंगलामध्ये जगातील सर्वात लहान आणि दुर्मिळ मांजर आढळली आहे. या मांजरीचे वजन फक्त 3 किलो असून तिला रस्टी स्पॉटेड कॅट असे म्हटले जाते. वन विभागाचे डीसीएफ गंगा चरण सिंह यांनी सांगितले की, सध्या मांजरीची ही प्रजाती विलूप्त होत आहे. ही प्रजाती गवताळ प्रदेश आणि दगड असणाऱ्या भागात राहतात. शरीरावर असतात पांढरे चट्टे तपकिरी शेपूट, लाल चट्टे आणि बादामी रेषा असणाऱ्या या मांजरीच्या शरीराचा खालचा भाग पांढरा असतो. याव्यतिरिक्त मोठे गडद चट्टे...
  June 11, 01:43 PM
 • सुरत -जोधपूर ते बंगळुरू जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेचा एसी शनिवारी बिघडला. दोन वेळा बॅटरी बदलूनही एसी सुरू न झाल्याने प्रवासी संतापले. त्यांनी गांेधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तीन अधिकाऱ्यांना त्याच रेल्वेतून सुरत ते वलसाडपर्यंत ५४ किमी प्रवास करावा लागला. कोच थंड झाला तेव्हाच प्रवाशांनी अधिकाऱ्यांना सोडले. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बी-२ व बी-३ कोचमधील एसी राजस्थानातील फालना स्थानकापासून बिघडला होता. बडोद्यात बॅटरी बदलण्यात आली. सुरत स्थानक आल्यानंतर कुलिंग सुरू न...
  June 4, 10:22 AM
 • अहमदाबाद - देशभर सामान्य लोक पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत. अशात गाऱ्हाणे मांडण्यासाठी एका भाजप आमदाराकडे गेलेल्या महिलेचे काय हाल झाले त्याचाच एक व्हीडिओ समोर आला आहे. हा व्हीडिओ अहमदाबाद येथे रविवारी रेकॉर्ड झाला. यामध्ये भाजपचा आमदार बलराम थवानी एका महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून आला. त्याने महिलेला रस्त्यावर आणून अगदी लोळवून मारहाण केली. तिची चूक एवढीच की ती पाण्याची समस्या मांडण्यासाठी नेत्याकडे गेली होती. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या क्लिपवर सर्वत्र...
  June 3, 04:23 PM
 • बालासिनोर -बालासिनाेरमधील डायनासाॅर आणि फाॅलिस पार्क पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. जगातील तिसरा सर्वात माेठा आणि देशातील पहिला डायनासाॅर आणि फाॅलीस पार्क लवकरच सामान्य जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. गुजरातचे पर्यटन मंत्री जवाहर चाेपडा यांनी अलीकडेच या पार्कचा दाैरा केला. गुजरातच्या पर्यटन विभागाने बालासिनाेरमध्ये ५२ हेक्टर जागेवर हा पार्क उभारला आहे. आजपासून ३६ वर्षांपूर्वी याच ठिकाणी डायनासाॅरचे जीवाश्म आढळून आले हाेते. महाकाय डायनासाॅरचा जवळपास ६५ दशलक्ष वर्षांचा इितहास...
  June 3, 11:09 AM
 • सुरत-गुजरातच्या सुरतची रहिवासी १२ वर्षीय खुशी शहाने जैन भिक्षू होण्यासाठी दीक्षा घेतली आहे. दीक्षा घेतल्यानंतर खुशी म्हणाली, या जगात जेवढाही आनंद आहे, तो कायम नाही. केवळ सामान्य जीवन जगून शांती व मोक्ष मिळू शकतो. खुशीने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबात दीक्षा घेणारी ती एकमेव सदस्य नाही. यााअाधी चार सदस्यांनी जैन दीक्षा घेतलेली आहे. खुशीचे वडील विनित शहा सरकारी कर्मचारी आहेत. खुशीने दीक्षा घेतल्याबद्दल ते म्हणाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. संत झाल्यावर ती अनेकांचे जीवन उजळून टाकेल....
  May 31, 10:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात