Home >> National >> Gujarat

Gujarat News

 • अहमदाबाद- रविवारी आठ देशी बॉम्बसहित अटक केलेल्या शहजादने पोलिस चौकशीत अनेक बाबी समोर आणल्या आहेत. युनूस बुटका हा झांसी आणि कानपूर मधून बॉम्बचे सामान आणत असत आणि मी बॉम्ब बनवत असत, अशी माहिती त्याने पोलिस चौकशीत दिली. पोलिसांनी शहजाद आणि युनूस यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शहजादला १० दिवसांची तर युनूसला ८ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.गुन्हे शाखेकडून शहजादच्या अतिरेक्यांबरोबरच्या संबंधाची माहिती घेण्यात येत आहे. पोलिसांना शहजाद खोट बोलत असल्याची शंका आहे....
  July 19, 08:42 AM
 • आनंद- पोलादी पुरूष सरदार पटेल जर आज असले असते तर निष्पाप लोकांचे बळी गेले नसते. बळी गेला असता तर तो अतिरेक्यांचा गेला असता. आज अतिरेकीच आपल्याला वरचढ ठरत आहेत. केंद्र सरकार अतिरेक्यांचा प्रतिकार करण्यास असमर्थ ठरत आहे असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. यावेळेस त्यांनी मानवधिकार संघटनेवरही टीका केली.देशाला दहशतवादाने पोखरले आहे, अशावेळेस मानवधिकार संघटना कोठे असते. जर एखादा अतिरेकी पोलिस चकमकीत मारला गेला तर लगेच मानव अधिकाराच्या चर्चा केल्या जातात. अतिरेक्यांना आपण माणूस कसे म्हणू शकतो....
  July 17, 06:16 PM
 • मुंबई- मुंबईसोबतच गुजरातही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते, अशी खळबळजनक माहिती मिळाली आहे. अहमदाबाद आणि सुरत ही दोन महत्त्वाची शहरे दहशतवाद्यांच्या लक्ष्यस्थानी होती. अहमदाबाद येथे पोलिसांनी 10 गावठी बॉम्ब जप्त केले. त्यानंतर हा खुलासा झाला आहे. मुंबईमध्ये 13 जुलै रोजी 3 बॉम्बस्फोट झाले. त्याच दिवशी या दोन शहरांमध्ये स्फोट घडविण्याची दहशतवाद्यांची योजना होती. दोन्ही शहरांमध्ये तब्बल 17 बॉम्ब पेरण्याची योजना आखली होती. अहमदाबादमध्ये 10 बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरीत 7 बॉम्बचा शोध...
  July 17, 03:53 PM
 • अहमदाबाद- मॉडेलिंग क्षेत्रात नशिब आजमावण्यासाठी आलेल्या एका 20 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना अहमदाबाद येथे घडली. ही तरुणी अमरेली जिल्ह्यातील अमरेली गावातील राहणारी आहे. अहमदाबाद येथे आल्यानंतर तिची काजल नावाच्या एका तरुणीशी ओळख झाली. काजलने तिची राहण्याची सोय करुन दिली. परंतु, काजलच्याच प्रियकराने बलात्कार केल्याचे या तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याच्या एका मित्रानेही बलात्कार केल्याचा या तरुणीने आरोप केला आहे. काजल, तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राने या...
  July 17, 08:20 AM
 • राजकोट: गुजरातच्या राजकोट गुन्हे शाखेने एका व्यापायाच्या घरावर छापा टाकून अंदाजे दोन कोटी किमतीची 383 किलो चांदी जप्त केली आहे. गुन्हे शाखेचे इन्स्पेक्टर एच. के. राणा यांनी सांगितले की, ही कारवाई चांदीच्या व्यापाराशी संबंधित जयेश शाह या व्यापायाच्या बंद पडलेल्या बंगल्यावर छापा मारल्यावर क रण्यात आली. शाह यांनी चांदी घराच्या छताच्या टाइल्समध्ये लपवून ठेवली होती. पोलिसांनी जेव्हा छत तोडायला सुरुवात केली तेव्हा लपवलेली चांदी सापडली. अवैध मार्गाने प्रेते गाडली गेल्याची माहिती पोलिसांना...
  July 16, 04:29 AM
 • पांथावाडा. आपली खरी संपत्ती तर आपले आई वडील असतात. त्यांची सेवा करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठविण्याऐवजी आधी पुत्र धर्माचे पालन केले पाहिजे, मग इतर गोष्टी... हे शब्द आहेत कैलाशगिरी ब्रह्मचारी नामक तरुणाचे. गेल्या 15 वर्षांपर्वी हा तरुण आपल्या आईला कावडमध्ये बसवून चार धाम यात्रेस निघाला. आता हा युवक गुजरातेतील पांथावाडा इथे पाहोचला आहे. याची मातृभक्ती पाहण्यासाठी लोकांची झुंबडच उडाली होती. ही मातृभक्ती पाहून अनेकांच्या अंत:करणात गलबलून आलं. आजच्या युगात घरात...
  July 15, 01:13 PM
 • सुरत- खरे तर हि-यासारख्या अनमोल वस्तूची वेगळी ओळख आपण काय करून देणार? कारण हिरा त्याची ओळख स्वत:च सांगत असतो. हिरा खरेदी करणा-यांना त्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी कुण्या रत्नपारख्याकडे जाण्याची गरज नाही. हिरा स्वत:ची ओळख किंवा मार्केटिंग स्वत:च करणार आहे. नव्या स्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे हि-याचे स्कॅनिंग व डिझायनिंग काही क्षणांत शक्य होणार आहे. सुरतच्या सहजानंद टेक्नॉलॉजी कंपनीने हिरे व्यापा-यांसाठी नवीन स्मार्ट आय हे मशीन विकसित केले आहे. यात अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या आधारे...
  July 15, 03:16 AM
 • अहमदावाद: ९ वर्षांपूर्वी गुजरातमध्ये गोध्रा कांडानंतर अहमदाबाद जिल्ह्यातील विरामगाव तालुक्यात उसळलेल्या जातीय दंगलीतील सहा आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली, तर चार जणांची निर्दोष मुक्तता केली. या दंगलीत अल्पसंख्याक समुदायाच्या तिघांचा मृत्यू झाला होता. २८ फेब्रुवारी २००२ रोजी उसळलेल्या या दंगलप्रकरणी भोपा भार्वद व बचूजी रणछोडजी या दोन आरोपींना जन्मठेपेची, विठ्ठल ऊर्फ कुचिओला 1० वर्षे तुरुंगवासाची, तर वहाल घेला व मुला घेला या दोघांना ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
  July 14, 05:15 AM
 • राजकोट - शहरातील भद्र विभागातील 'रत्नाकर' नवाच्या एका बंगल्यात पोलिसांना ३८३ किलो चांदीच्या विटा सापडल्या आहेत. या चांदीची किंमत जवळजवळ २.३ कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिस या बंगल्यात एका युवकाचे प्रेत शोधत असतांना त्यांना चांदीच्या विटा सापडल्या, त्या त्यांनी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 'रत्नाकर' या बंगल्यात एका युवकाचे प्रेत गाडण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांची एक तुकडी बंगल्याची पहाणी करण्यासाठी गेली. निर्मनुष्य असलेल्या या...
  July 13, 06:41 PM
 • अहमदाबाद: येथील चिकित्सकांनी शस्त्रक्रिया करून सातवर्षीय गजलची उंची चार इंच वाढवली. जन्मानंतर या मुलीची शारीरिक वाढ सामान्य नव्हती. आॅपरेशननंतर आता उंचीसहित तिची शारीरिक वाढही नैसर्गिक पद्धतीने होऊ शकणार आहे.सलग सात महिन्यांच्या देखरेखीनंतर आणि उपचारानंतर गजलची उंची आता 30 हून वाढून 34 इंच झाली आहे. स्थानिक नागरी रुग्णालयातील डॉक्टरांनी रशियाच्या एलिजा रो नावाच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गजलचे आॅपरेशन केले. गजलला एकोन्ड्रोप्लाजिया नावाचा आजार होता. आॅपरेशनशिवाय या रोगावर जगात...
  July 13, 02:57 AM
 • अहमदाबाद: अनेकांना फसविणा-या महाठग अभय गांधीने कोलंबोत मुक्काम ठोकला असल्याची माहिती समोर आली आहे. अभय गांधी तेथे समुद्रकिना-यावर मौजमस्ती करताना अनेकांना आढळून आला. त्याची माहिती गुजरात पोलिसांनाही प्राप्त झाली आहे. अभय हवाई मार्गाने चेन्नईला पोहोचला व तेथून त्याने कोलंबो गाठले.
  July 13, 02:01 AM
 • अहमदाबाद - गुजरातमध्ये सन २०१२ मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस या दोन मोठ्या राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सविस्तर योजना तयार केली आहे तर काँग्रेसने अरविंद मोधवाडिया या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पक्षालाच टार्गेट करण्याबरोबरच विस्कटलेली पक्षांतर्गत घडी नीट करण्याची योजनाही तयार केली आहे. पक्ष बळकट करण्यासाठी २००७...
  July 12, 07:39 AM
 • जामनगर- गुजरातमध्ये जामनगरकडे निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 31 प्रवासी जखमी झाले आहेत. ५० प्रवाशांना घेऊन ही बस राजकोट येथून निघाली होती. फल्ला शहराजवळील एका वळणावर चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि बस उलटली. मृतकांमध्ये एका दांपत्याचाही समावेश आहे. महेंद्रसिंग जडेजा, विजयसिंग जडेजा, मधुबेन व्यास, मोहनभाई पढियार घनश्याम व्यास आणि मर्खी दांगर अशी मृतकांची नावे आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर...
  July 10, 05:25 PM
 • नवी दिल्ली- राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुजरातमधून भाजपने स्मृती इराणी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या भारतीय महिला मोर्चाच्या त्या अध्यक्षा व पक्षाच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा होती. मात्र इराणी यांना संधी मिळाली. गुजरातमधून दिलीपभाई पंड्या हे भाजपचे दुसरे उमेदवार आहेत.
  July 10, 04:55 PM
 • बडोदा- बॉलिवुड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांनी एका मद्य पार्टीत सहभाग घेतल्याचे प्रकरण तापले आहे. सयाजीराव राजघराण्याकडून लक्ष्मीविलास राजवाड्यात गुरुवारी डान्स अँड ड्रिन्क पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत हृतिकही बेभान नाचला. कॅटरिनानेही ठेका धरला. या पार्टीत दारूची रेलचेल होती, ही माहिती पोलिसांना प्राप्त होताच प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. पोलिस आयुक्त सतीश शर्मा यांनी सांगितले, की राजवाड्यात आयोजित पार्टीत दारू पाजली गेली, हे खरे असले तर तो नक्कीच पोलिस...
  July 10, 02:26 AM
 • बडोदा- बॉलिवुड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांनी एका मद्य पार्टीत सहभाग घेतल्याचे प्रकरण तापले आहे. सयाजीराव राजघराण्याकडून लक्ष्मीविलास राजवाड्यात गुरुवारी डान्स अँड ड्रिन्क पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत हृतिकही बेभान नाचला. कॅटरिनानेही ठेका धरला. या पार्टीत दारूची रेलचेल होती, ही माहिती पोलिसांना प्राप्त होताच प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. पोलिस आयुक्त सतीश शर्मा यांनी सांगितले, की राजवाड्यात आयोजित पार्टीत दारू पाजली गेली, हे खरे असले तर तो नक्कीच पोलिस...
  July 10, 02:25 AM
 • अहमदाबाद- शोलेच्या रिमेकमध्ये काम करून चूकच केली, असे मत गुजरातचा ब्रँड अॅम्बेसेडर, महानायक अमिताभ बच्चनने व्यक्त केले. जी गोष्ट मूळ चित्रपटामध्ये पाहायला मिळते, ती रिमेकमध्ये दिसत नाही. आपण देवदास चित्रपटाची चर्चा करतो तेव्हा सर्वप्रथम दिलीपकुमार यांची आठवण होते. दुसरीकडे आजची पिढी शाहरुख खानला देवदास मानते. बुढ्ढा होगा तेरा बाप या आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी येथे आलेल्या अमिताभने विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. ज्या कलाकारांना आव्हानात्मक भूमिका मिळत जातात, त्यांच्यातील...
  July 9, 01:09 AM
 • अहमदाबाद-साधारणात: परदेशात शिक्षण घेतलेला व्यक्ती कुठल्यातरी मोठया कंपनीत किंवा कॉर्पोरेट कंपनीमध्ये मोठया पगारावर काम करत असतो. पण येथील एक युवक ज्याने लंडनमध्ये एमबीए केले तो एका कॉर्पोरेट कंपनीच्या ऑफिसात न राहता तुरूंगात राहतोय. चोरीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी जिज्ञेश अरविंद ठक्का या युवकाला त्याच्या साथीदारांसह अटक केली आहे. या टोळीने प्लायवुडचे शीट चोरले होते आणि ते विकायला घेऊन जात असताना त्यांना अटक करण्यात आली. हे प्लायवुडचे शीट त्याने आपल्या...
  July 7, 05:51 PM
 • सुरत/अहमदाबाद - उत्तरप्रदेश आणि दिल्ली नंतर आता देशातील सर्वात संपन्न राज्य म्हणून ओळखल्या जाणा-या गुजरातमध्येही मुलींना लक्ष्य केले जात आहे. सुरतमध्ये दोन युवकांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन एक आठवडा तिच्यावर बलात्कार केला आहे. तर दुसरीकडे एका सहा वर्षीय मुलीने बुरखा घातला म्हणून कपडे उतरवून शाळेत तिची धिंड काढण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पहिल्या घटनेत सुरतमधील नानपूरा भागातील एका फ्लॅटमध्ये मुलीला बंदी बनवून ठेवण्यात आले. पोलिसांनी तेथे छापा मारून मुलीची सुटका...
  July 5, 09:08 PM
 • अहमदाबाद- गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीसंदर्भातील सर्व रेकॉर्ड व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित असल्याचा दावा गृह विभागाचे मुख्य सचिव बलवंत सिंह यांनी केला आहे. हे रेकॉर्ड हरवले असून सरकारनेच ते नष्ट केल्याचा दावा सरकारनेच या दंगलीची चौकशी करणाया आयोगासमोर या आधी केला होता. प्रसार माध्यमांनी याबाबत सरकार विचारल्यानंतर सिंह यांनी हा खुलासा केला आहे. २००२ च्या दंगलीचे रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध व वेळ आल्यास आम्ही ते सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार व तपास पथकाकडे सादर करू शकतो....
  July 5, 02:43 AM
 
जाहिरात

RECOMMENDED